
साहित्य
मुठिया -
पाऊण (मोठा) कप बेसन पीठ,
त्याच कपाने पाव कप जाड गव्हाचे पीठ (दाल बाटी साठी वापरतो ते),
दीड कप बारीक चिरलेली मेथी,
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
दीड चमचा साखर,
दीड चमचा लिंबू रस,
अर्धा चमचा मिरची आणि आले ह्यांची पेस्ट,
अर्धा टी स्पून हळद,
एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,
हिंग,
गरम मसाला अर्धा टी स्पून,
अर्धा टी स्पून धने जिरे पावडर,
दोन चमचे तेल,
ओवा आणि मीठ चवीप्रमाणे.
ग्रेव्ही साठी साहित्य:
एक कप तुरीचे दाणे (मीठ आणि हळद घालून दोन शिट्ट्या काढून वाफवलेले).
तीन मोठ्या टोमॅटो ची प्युरी (टोमॅटो न शिजवता मिक्सर मधून काढावेत),
तीन वाट्या गरम पाणी,
चार मुठिया गोळे कुस्करून,
अर्धा टी स्पून हळद,
अर्धा चमचा आले मिरची पेस्ट,
एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,
एक टी स्पून गरम मसाला,
दोन चमचे साखर,
एक टी स्पून धने जिरे पावडर,
फोडणीसाठी दोन डाव तेल, दोन अखंड काश्मिरी मिरच्या,जिरे, हिंग.
मुठिया साठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र करावेत, पिठाला व्यवस्थित चोळून घ्यावेत. आता अगदी थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. पीठ मळताना पाणी अगदी हबका मारत पीठ मळावे. खूप कमी पाणी लागते. आता लगेच ह्याचे गुलाबजाम च्या आकाराचे गोळे करावेत. गरम तेलात हे गोळे एकाच बॅच मध्ये सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. एवढ्या पिठात वीस गोळे होतात.
आता एका कढईत प्रथम तेल घ्यावे तेल तापले की त्यात जिरे, हिंग, दोन काश्मिरी लाल मिरच्या, आले लसूण पेस्ट घालावी आणि एक मिनिट परतावे. आता त्यात टोमॅटो प्युरी घालावी. आता लगेच हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, मीठ आणि साखर घालावे. आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत वाफ काढावी. तेल सुटले की त्यात शिजवलेले तुरीचे दाणे घालावेत. तीन वाट्या गरम पाणी घालावे. दोन तीन मिनिट चांगली उकळी आणावी. आता ह्यात ग्रेव्ही मिळून येण्यासाठी कुस्करलेल्या मुठिया घालाव्या आणि इतर मुठिया गोळे पण घालावेत. परत पाच मिनिट शिजवून घ्यावे.

गव्हाचे पीठ जाडसरच घ्यावे. मोठ्या गिरण्यात बाटीचे वेगळे पीठ मिळते ते घ्यावे.
ह्या भाजी बरोबर पुरीच हवी.
मुठिया करताना एकाच वाटीने पीठ, कोथिंबीर, मेथी प्रमाण घ्यावे. लिंबू साखर गरम मसाला पावडर ओवा वगळू नयेत. कांदा लसूण अजिबात नको.
नुसत्या मुठिया पण छान लागतात. चहा बरोबर भजीला पर्याय.
तुरीचे दाणे सध्या चांगले मिळत आहेत. भाजी खूपच चविष्ट होते, नक्की करून बघा.
मी पण केली. आई, बाबा, नवरा
मी पण केली. आई, बाबा, नवरा सगळ्यांना खूप आवडली. फोटो काढायला विसरले.
अर्धा किलो तुरीच्या शेंगांचे दाणे घेतले. सगळ्यांनी भरपूर भाजी खाल्ली. मोठी वाटी भरून उरली आहे. आई - बाबा ती उद्या दुपारच्या जेवणात खातील.
मेघ फोटो आवडला.
मेघ फोटो आवडला.
ममो ताई, अंजू ताई, अनिरुद्ध,
ममो ताई, अंजू ताई, अनिरुद्ध, मेघ, अनया धन्यवाद.
मेघ खूप खूप धन्यवाद. मस्तच दिसत आहे भाजी. आवडली का सगळ्यांना? अनया तुम्हाला आवडली का?
हो तर. मला खूप आवडली. वेगळी
हो तर. मला खूप आवडली. वेगळी आणि चवीची भाजी खायला मिळाल्यामुळे रविवार सार्थकी लागल्यासारखं वाटलं.
हो म्हणजे काय सगळ्यांना आवडली
हो म्हणजे काय सगळ्यांना आवडली. आता सुद्धा रात्री खाल्ली आणि खीर पण बनवली. धन्यवाद लंपन जी
(No subject)
झाला आज बेत!
बनविण्याचे कष्ट १००% बायकोचे फक्त!
एकदम झकास!!!
आम्हीपण केली होती ही भाजी आज.
आम्हीपण केली होती ही भाजी आज. मेथीचे गोटे करून घातले होते.
कृष्णा खूपच yummy छान दिसत
कृष्णा खूपच yummy छान दिसत आहे ताट
कृष्णा खूप धन्यवाद. ताट एकदम
कृष्णा खूप धन्यवाद. ताट एकदम मस्त दिसत आहे.
Srd धन्यवाद.
सर्व फोटो मस्त मस्त.
सर्व फोटो मस्त मस्त.
लंपन, आज रेसिपी करून बघितली.
लंपन, आज रेसिपी करून बघितली. आवडली घरी सगळ्यांना. तूर आणि मेथी एकत्र ने पित्ताचा त्रास होईल या भीतीने तूर ऐवजी मटार दाणे घातले . टोमॅटो थोडा कमी घालीन पुढच्या वेळी. जराशी आंबट वाटली.

Pages