वर्ष २०२६ - संकल्प आणि त्यांचे अपडेट्स

Submitted by किल्ली on 15 December, 2025 - 11:20

नमस्कार मंडळी,

यंदाचा संकल्प धागा लिहिताना स्वतः मधले बरेच बदल जाणवत आहेत.
म्हणून पुन्हा धागा प्रपंच!
IMG-20251215-WA0020.jpg

हाच तो आपला हक्काचा vision board आहे असे समजून संकल्प/योजना किंवा vision नक्की लिहा.

इथे अगदी फॅन्सी संकल्पच हवेत असं नाही. बारीकसारीक गोष्टीसुद्धा असू शकतात ज्या ह्या वर्षी करायच्याच आहेत. एक लक्षात आलंय की baby स्टेप्स लिहून त्या पूर्ण केल्या तरी चालू शकतं.
.
२०२५ चा धागा
https://www.maayboli.com/node/86136
.
जुनी list आणि त्याचे अपडेट्स / टिक्स :

१. मानसिक आरोग्य जपणे आणि stress management - शिकतेय, सुधारतेय, जमतंय

२.website सुरु केल्यात live तिकडे content टाकायचा आहे- काहीही लिहिलं नाही. लिखाण शून्य.Website बंद पडू दिल्या, सोडणार आता हे झाड. लोड नाही घेणार त्याचा

३..Health आणि व्यायाम : जैसे थे परिस्थिती, पण बारीक सारीक सुधारणा आहेत, लिहाव्यात इतकं काही नाही, पण हे नेहमीच सुरु राहणार, दरवर्षी असणार

४. नविन टेकनॉलॉजि शिकणे - on the job शिकतेय, advanced technology Lol ह्यावर्षी जॉब change केला, बेटर प्रोफाइल, more workload, मज्जा!

५. Documents ची कामं- झाली बाबा जुनी पेंडिंग कामं एकदाची.
आता नवनवीन येतात पण ठीक आहे ते चालत राहतं

६. ह्यावर्षी चा नविन संकल्प हा की अनावश्यक बडबड करणार नाही. उत्तम श्रोता व्हायचा प्रयत्न करेन रोजच्या आयुष्यात - पहिले काही महिने जड गेलं पण आता जमतंय

७.दुसरं कोणी चिडचिड करत असेल, negative mood मध्ये असेल तर आपणही ती energy absorb करून बसायचं नाही. फरक पडू न देणे साध्य करायचे आहे. अति sensitive nature काही कामाचे नाही- Same जमतंय बरं का मंडळी, कमल पत्र का काय त्याप्रमाणे राहणे (थोडक्यात बेशरम पणा)
८.Productivity वाढवणे, कामाच्या जागी आणि वैयक्तिक कामे करताना, जे काम करतोय त्या क्षणाशी प्रामाणिक राहायचे आहे.- शिकतेय, जमवेन हळूहळू
......
२०२६ साठी नवीन काय?
१. स्वतःच्या Finance कडे लक्ष देणार, हिशोब लिहिणार व्यवस्थित आणि planning करणार, गोल्स ठरवून
२. शॉपिंग वर बंधन घालणार- खासकरून ऑनलाईन केली जाणारी
३. स्वतः ला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी ट्रेन करणार, स्ट्रेस न घेता निर्णय घेता यायला हवेत
..
तुमचं काय काय ठरलंय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

किती लवकर उद्दिष्ट गाठलं.. कौतुक आहे

अतुल यांनी केलेल्या एका संकल्पासाठी त्यांचं कौतुक करावे तितके थोडे आहे. त्यांनी इंटरनेट टाईम कमी करून टाकला आहे. तेव्हापासून डोक्यात आहे. पण जमेल का ही शंका होती.

या धाग्यावर लिहिले आणि न राहवून वारंवार आले तर हसं होईल असे वाटत होते. पण फायनली ठरवलं कि जाहीर करू. नंतर बघता येईल.
मायबोली असं नाही तर मोबाईल चा वापर एक तासावर आणायचा आहे.
डोळ्यांसाठी करावे लागणार आहे.

भाऊ आणि किल्ली खूप खूप आभार. Happy

मीही सोशल मीडिया बंद केलंय
No photo posting policy
इतकं बरं वाटतंय ना
आणि स्क्रीन time कमी करण्यात सुद्धा प्रगती आहे
वीकएंड ला तर मला कळत नाही फोन कुठे पडलाय

पहिले २ नवीन पैकी जे आहेत
ते व्यवस्थित follow होत आहेत.
आर्थिक शिस्त लागली आहे.
हे लक्षात आलंय की आपण पूर्वी लिहीत नव्हतो पण शिस्त होतीच.
Impulse shopping शून्य झालं आहे.
हा बड्डे month आहे हे जाणून ह्या महिन्यात ठरवून shopping करणार Happy
डाएट मध्ये लाडू सोडलाय - जमलंय आता पर्यंत तरी.
लाडु नाही तर वडी खाऊ हे झालं सुरुवातीला पण आता नाही होत इच्छा

माझे updates...

Healthify app through diet coach आणि fitness coach लावले आहेत. मागच्या एका महिन्यात चार किलो वजन कमि झालं आहे. शिवाय व्यायाम पण होत आहे.

जानेवारि महिन्यात थोडा जास्त खर्च झाला पण आत्ता गाडि रुळावर येतेय

Sadhguru यांचा Inner Engineering course सुरु केला आहे, आवडतोय.

वीकएंड ला तर मला कळत नाही फोन कुठे पडलाय >>
Impulse shopping शून्य झालं आहे >>क्या बात है ! अभिनंदन. दोन्ही अचिवमेंटससाठी.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

मागच्या एका महिन्यात चार किलो वजन कमि झालं आहे. शिवाय व्यायाम पण होत आहे. >>> ग्रेट ! अभिनंदन

माझं टार्गेट - ३००० किमी च्या अगदी जवळ. लक्ष गाठल्याने आता असंच चाललंय.

मागच्या एका महिन्यात चार किलो वजन कमि झालं आहे.
शिवाय व्यायाम पण होत आहे.

>>>
अभिनंदन; व्यायामाबद्दल विशेष अभिनंदन. ‌

तरीही, वजन किती वेगाने कमी करावे याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतला असेल ना?

१. पोटाचा घेर कमी करणे.
>>>
नियमित व्यायाम ( प्राणायाम, cardio, strength training), व्यवस्थित आहार (low carb, high protein), व्यवस्थित दिनचर्या या आधारे दोन महिन्यात दोन किलो वजन कमी केले आहे. ‌ पोटाचा घेर काही मिलिमीटर कमी झाला आहे. ‌

इतरही उद्दिष्टांवर काम सुरू आहे.‌ वेळोवेळी प्रगती (किंवा अधोगती!) नोंदवित राहीन.

अधोगती नोंदवू नका! Proud
सोशल मिडीयाचा पहिला नियम आहे की फक्त प्रगती नोंदवावी, अधोगती गिळून टाकावी. रामदासांच्या काळात असता सोमि तर एखादे शार्दुलविक्रीडीत ही पाडले असते त्यांनी.
हा! आता माबो हा सोशल मिडिया कसा नाही आणि सगळे कसे एका कुटुंबातील लोक वाटतात यावर एक पोस्ट पडलीत तर चालवून घेऊ.

+ १
लोक व्हाईब कॉन्शस झालेत, फक्त पॉझिटिव्ह व्हाइब्स गती शेअर करा.

किल्ली, रानभूली, वामनराव वेगवेगळे माईलस्टोन्स गाठल्याबद्दल अभिनंदन.

आज शंभर किलोमीटर राईड पूर्ण. जाऊन येऊन नव्वद किमी झाले. मग दहा किलोमीटर का नको म्हणून घरी आल्यावर ते पूर्ण केलं.
फेब्रुवारी महीन्यात काल पर्यंत सहाशे किमी झाले होते. महिना अखेरीपर्यंत ८०० किमीचं लक्ष्य ठेवलं आहे. बघू जमतंय का.
इलेव्हेशन गेन २००० मीटर (एकूण महिनाभरात) ठरवली आहे. पण आता सायक्लोमीटर चार्ज झाल्यावर कळेल.
आठच दिवस शिल्लक आहेत.

वामनराव तुमचेही अभिनंदन !
मानव, सनविवि, वामनराव धन्यवाद तुमचे सर्वांचे.

या महीन्यात ८०० किमी चॅलेंज घेतलं होतं. ते आज पूर्ण झालं.
हेच सांगायला आले होते. Happy

यंदाचे ३ नवीन संकल्प व्यवस्थित सुरु आहेत पालन करणे.
पण ते health आणि fitness चं घोडं पार मंद पणे जातं आमचं...
पण त्यातल्या त्यात बरी प्रगती म्हणजे डाएट quality आधीपेक्षा सुधारली आहे.
गोड बंद जमलं नाही
पण कमी झालंय
खरं तर finances ला कॅप लावल्यामुळे बाहेर खाणं फार कमी झालं
प्रत्येक transaction लिहायची सवय लावली त्यात पाणीपुरीच्या खूप साऱ्या किंवा zomato च्या multipleentries बघून त्रास झाला.
त्यामुळे अगदीच गरज असेल तेव्हा बाहेरचे खाणे किंवा मागवणे ह्या stage ला पोचले आहे.
एखादेवेळेस फारच इच्छा झाली तर ती मारत नाही हेही आहेच.
थोडक्यात balance साधण्याचा प्रयत्न सुरुये.
.
आठवड्यातून ५ वेळा compulsory मॉर्निंग walk जमतोय
पण तेवढंच.
मध्यंतरी ते चक्कर डोकेदुखी प्रकरणामुळे सू न बंद झाले ते करीन पुन्हा मग नवीन काहीतरी

कळवण्यास खूप आनंद होत आहे की मी FPSB (India) ची Certified Financial Planner (CFP) ही अंतिम परीक्षा पास झालो आहे (एकूण ५ परीक्षा असतात). वैयक्तिक वित्त क्षेत्रात (Personal Finance) ही परीक्षा मानाची समजली जाते व ३१ डिसेंबर २०२५ च्या मोजणीनुसार संपूर्ण भारतात केवळ ३५३४ जण CFP होते.

Screenshot 2026-05-07 at 20-20-27 Learning Center.png

वा! उपाशी बोका, अभिनंदन!

ही परीक्षा खुप कठीण अहते, असे ऐकून आहे

आता प्रॅक्टिस करणार का? की त्याआधी आणखी काही करावं लागतं?

Pages