वर्ष २०२६ - संकल्प आणि त्यांचे अपडेट्स

Submitted by किल्ली on 15 December, 2025 - 11:20

नमस्कार मंडळी,

यंदाचा संकल्प धागा लिहिताना स्वतः मधले बरेच बदल जाणवत आहेत.
म्हणून पुन्हा धागा प्रपंच!
IMG-20251215-WA0020.jpg

हाच तो आपला हक्काचा vision board आहे असे समजून संकल्प/योजना किंवा vision नक्की लिहा.

इथे अगदी फॅन्सी संकल्पच हवेत असं नाही. बारीकसारीक गोष्टीसुद्धा असू शकतात ज्या ह्या वर्षी करायच्याच आहेत. एक लक्षात आलंय की baby स्टेप्स लिहून त्या पूर्ण केल्या तरी चालू शकतं.
.
२०२५ चा धागा
https://www.maayboli.com/node/86136
.
जुनी list आणि त्याचे अपडेट्स / टिक्स :

१. मानसिक आरोग्य जपणे आणि stress management - शिकतेय, सुधारतेय, जमतंय

२.website सुरु केल्यात live तिकडे content टाकायचा आहे- काहीही लिहिलं नाही. लिखाण शून्य.Website बंद पडू दिल्या, सोडणार आता हे झाड. लोड नाही घेणार त्याचा

३..Health आणि व्यायाम : जैसे थे परिस्थिती, पण बारीक सारीक सुधारणा आहेत, लिहाव्यात इतकं काही नाही, पण हे नेहमीच सुरु राहणार, दरवर्षी असणार

४. नविन टेकनॉलॉजि शिकणे - on the job शिकतेय, advanced technology Lol ह्यावर्षी जॉब change केला, बेटर प्रोफाइल, more workload, मज्जा!

५. Documents ची कामं- झाली बाबा जुनी पेंडिंग कामं एकदाची.
आता नवनवीन येतात पण ठीक आहे ते चालत राहतं

६. ह्यावर्षी चा नविन संकल्प हा की अनावश्यक बडबड करणार नाही. उत्तम श्रोता व्हायचा प्रयत्न करेन रोजच्या आयुष्यात - पहिले काही महिने जड गेलं पण आता जमतंय

७.दुसरं कोणी चिडचिड करत असेल, negative mood मध्ये असेल तर आपणही ती energy absorb करून बसायचं नाही. फरक पडू न देणे साध्य करायचे आहे. अति sensitive nature काही कामाचे नाही- Same जमतंय बरं का मंडळी, कमल पत्र का काय त्याप्रमाणे राहणे (थोडक्यात बेशरम पणा)
८.Productivity वाढवणे, कामाच्या जागी आणि वैयक्तिक कामे करताना, जे काम करतोय त्या क्षणाशी प्रामाणिक राहायचे आहे.- शिकतेय, जमवेन हळूहळू
......
२०२६ साठी नवीन काय?
१. स्वतःच्या Finance कडे लक्ष देणार, हिशोब लिहिणार व्यवस्थित आणि planning करणार, गोल्स ठरवून
२. शॉपिंग वर बंधन घालणार- खासकरून ऑनलाईन केली जाणारी
३. स्वतः ला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी ट्रेन करणार, स्ट्रेस न घेता निर्णय घेता यायला हवेत
..
तुमचं काय काय ठरलंय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज spend analysis २०२६ साठी template create केला
त्यात सगळं लिहिणार
मागच्या quarter चा data आहेच
पण आता जास्त efficient planner बनवला आहे
(कुणी म्हणेल वेडी झाली ही सारखं काय एक्सेल data power bi machine learning AI करत राहते Lol )

सिमरन लिही . वेळ घेऊन लिही.
किल्ली छान आहेत संकल्प. सर्वांचेच संकल्प छान.

दोन तीन संकल्प मनाशी केले होते. इथे लिहीलं कि खोडता येत नाही. Proud
त्यातला एक म्हणजे या वर्षी किमान २५०० किमी चा टप्पा (सायकलिंगचा) पूर्ण करायचा. हे थोडं सावध टार्गेट ठेवलंय. कारण काहीही समस्या उद्भवू शकतात.

दुसरं म्हणजे चित्रकला / पेटिंग शिकायचीय. यातलं पेटिंग या वर्षी होईल असं वाटत नाही. पण पेन्सिल स्केच थोडं फार जमत होतं. त्याची उजळणी करून घ्यायचीय म्हणजे पेंटींगकडे दुसरं पाऊल टाकता येईल.

बाकीचे मनातच. Lol
जसं कि सोशल मीडीया एकदम कमी Lol

>>बाकीचे मनातच. Lol
जसं कि सोशल मीडीया एकदम कमी Lol

हाहा हे पटलंच.

यंदा शक्यतो एन्टरटेनमेन्ट रीपीट करायची नाही म्हणजे कितीही आवडलेले असले/ऑटाफे तरी तोच सिनेमा/सिरीयल/वेबसिरीज पुन्हा बघायची नाही असं ठरवलंय. त्या वेळात नवीन काहीतरी बघायचं. तसंच सिनेमा/सिरीयल/वेबसिरीज इ. पेक्षा आवडत्या विषयांवरील डॉक्युमेंटरीज जास्त बघायच्या. बघूया, बहुतेक जमावे. Happy

आणखी हे मी मागच्या वर्षीही केले होते पण यंदा आणखी जोमाने करणार.
आपण अनेक नवनवीन खाद्य/फूड प्रॉडक्ट्स ट्राय करत असतो.
कधी आवडतात तर आवडत नाहीत, कधी शरीराला चालतात तर कधी चालत नाहीत. (अ‍ॅलर्जी). आवडलेल्या प्रॉडक्ट्सच्या उत्पादकांना कळवणे की प्रॉडक्ट आवडले म्हणून. हे मी खासकरुन छोट्या-मिडीयम, होमबेस्ड उद्योगांना, मराठी ब्रँड्जना शक्यतो कळवते. तसंचकाही खटकलं/आवडलं नाही तर तेही कळवते.
कधी उत्तरं येतात कधी नाही.
उदा. इथे काही स्पेसिफिक स्नॅक बार फार आवडले होते तेव्हा त्यांना तसे कळवले होते. त्याच दिवशी त्यांचे उत्तरही आहे, धन्यवाद म्हणून. काटदरे फूड्सचाही खूप चांगला, पॉझिटीव्ह प्रतिसाद आला होता.
कधीकधी अजिबात उत्तर/पोचपावती येत नाही. पण ठिके. जमेल तेव्हा फीडबॅक/सजेशन्स देत राहणार आहे. पॅकेजिंगवर बहुतेक वेळा ईमेल असतोच. जे उत्पादक तो इमेलबॉक्स मॉनिटर करतात, त्यांना अशा फिडबॅकचा उपयोग होत असावा Happy

धनश्री, रानभूली कथा सुचेल तेव्हा लिहीन पण चित्र काढण्याचा श्रीगणेशा केलाय लवकरच चित्र पोस्ट करेन.

चित्र काढायला बसलं की जमतं रानभुली .मला माझ्या थेरपिस्ट ने सांगितलं होतं कलर ब्रश घेऊन कागदावर सुरुवात करायची ,मनाला येईल ते पेंट करायचं अगदी फटकारे मारलेस तरी चालेल. अँबस्ट्रॅक पैंटिंग म्हणून खपून जातं Happy मला तेच जमत नव्हतं मी ब्रश घेऊन नुसती बसून राहायचे नाहीतर दुसरंच काहीतरी कामं करत राहायचे.
शांत बसून चित्र काढायचा वेळ मिळत नाही असं आपणच आपली समजूत घालत असतो आणि टाळत असतो. वेळ काढणं इतकही कठीण नसतं . पिच्चरं मोबाईल बघण्यात आपण वेळ काढतोय कारण ते आवडतं तसच ज्यांना पेंट करायचंय, पुस्तकं वाचायचीयत ,रेसिपीज करायच्यात आवड आहे पण वेळ मिळत नाही त्यासाठी त्यांनी वेळ काढा आणि आपले छंद जोपासा. रोजचं रुटीन संपणार नाही पण आयुष्यात खूप काही करायचं होतं आणि काहीच केलं नाही ही रुखरुख लागणार नाही.

हो जमेल युट्युब वर खूप चॅनेल्स आहेत टुटोरिअल्स चे अगदी बिगेनर्स साठी ही, सोप्या पद्धतीने शिकवणारे ,काढणारे आहेत.
पण खरं सांगू का शिकवून चित्रकला येण्याचा काही संबंध नाही .अगदीच न जमाणार्यानाही काढून काढून जमतात. आपल्याला कुठे परीक्षा द्यायच्यात. आनंदासाठी काढायचं आहे. ब्रश घ्यायचे सुरुवात करायची.
तुला पेन्सिल स्केच साठी हवे असेल तर souravjoshiarts म्हणून युट्युबर आहे त्याचे जुने व्हिडीओज बघ .तो खूप प्रो आहे स्केचिंग मध्ये . पण तुला सुरुवात करायची असेल तर सिम्पल व्हिडीओज पण आहेत. त्याचे नुसते व्हिडीओज बघत राहणं म्हणजेही ट्रीट आहे डोळ्यांना. आता खूप फेमस vlogger झालाय पण त्याची सुरुवातही स्केच काढत साध्या कॅमेरावर तासंतास vlogs करत झालीय.

यावर्षी लक्ष देण्यासाठी ठरवलेल्या बाबी येणेप्रमाणे :

Marathi: मी / मला / माझा
Hindi: मैं / मुझे / मेरा
Urdu: میں / مجھے / میرا
English: I / Me / My
Punjabi: ਮੈਂ / ਮੈਨੂੰ / ਮੇਰਾ
Bengali: আমি / আমাকে / আমার
Gujarati: હું / મને / મારું
Rajasthani: म्हैं / म्हाने / म्हारो
Haryanvi: मैं / मन्ने / मेरा
Bhojpuri: हम / हमरा / हमार
Awadhi: हम / हमका / हमार
Maithili: हम / हमरा / हमर
Tamil: நான் / என்னை / என்
Telugu: నేను / నన్ను / నా
Kannada: ನಾನು / ನನಗೆ / ನನ್ನ
Malayalam: ഞാൻ / എന്നെ / എന്റെ
Odia: ମୁଁ / ମୋତେ / ମୋର
Assamese: মই / মোক / মোৰ
Konkani: हांव / म्हाका / म्हाजें
Kashmiri: بہٕ / مےٚ / میون
Nepali: म / मलाई / मेरो
Sindhi: مان / مون کي / منهنجو

दोन्ही क्षणभंगुर असतात असं असलं, तरीही निवडणुकीचे जाहीरनामे म्हणून तुम्ही तुमचे नववर्षाचे संकल्प नाही पाठवू शकत माझ्याकडे !! 20181201_085313.jpg

भाऊ Lol

१. स्वतःला prioritize करणे. दुसर्यांच्या सुखासाठी adjust करायचे नाहि
२. अवघड लोकान्शी deal करताना grey rocking technique वापरायचे
३. वजन कमी करायचे. १०० किलो touch होतंय! Double chin दिसायला लागली आहे! Religiously calorie tracking करणार आहे. रोज किमान अर्धा तास चालणे
४. ISKCON शी connected राहणार. त्यान्च्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सोडुन द्यायच्या. रोज जप कराय्चा. कोणीही नसले तरि क्रुष्ण नेहमी आपल्याबरोबर आहे हे लक्षात ठेवायचे.
५. Agentic AI, PowerBI - याशी related skills शिकायचे
६. कितीही काम असले तरी मुलीला वेळ द्यायचा
७. जी नाती उर्जा देतात त्याण्ना खत द्यायचे, जी नाती मनःशान्ती खातात तिथे वेळ आणि उर्जा खर्च करायचि नाही आणि काही अपेक्षा ठेवायच्या नाहित, फक्त आपले कर्तव्य कराय्चे
८. कामात बढती मिळवायची किन्वा नवीन नोकरी बघायची.

मला वाटते आपण सार्‍यांनी इथे ठोस, कोंक्रीट आणी अ‍ॅक्शनेबल संकल्प शेयर करावेत. व्हेग नकोत.
२०२६ च्या शेवटी कितपत पूर्ण झाले हे पहाता येइल.

माझ संकल्प : साखर घातलेला चहा /कॉफी, गुलाबजामून , सामोसा, जिलेबी व खीर हे पदार्थ पूर्ण वर्ज्य ! अगदी प्रसाद म्हणूनही नाही.
( सामोसा व जिलेबी खाण्याचे प्रसंग सदाशिव पेठेपेक्षा न्यू जर्सीतच जास्त येतात !)

विकु Lol समोसा समजू शकतो पण जिलेबी! असा प्रतिसाद देणार होतो. पण मग सुखाडिया आणि मिठास आठवलं. मी कधी जिलेबी न खाणारा सुद्धा सुखाडियाची असेल तर 'द्या एखादी बारकी' करुन खातो. Proud

मला वाटते आपण सार्‍यांनी इथे ठोस, कोंक्रीट >> सारभाई चा तो एपिसोड आठवला ज्यात इंद्रवदन साराभाई ठोस constructive करायचं मनावर घेतात आणि एक प्ले सादर करतात
धमाल आहे Lol
.
मुद्दा बरोबर आहे
Quantifiable का काहीतरी शब्द आहे
नेमकं लिहायचं जे करणार ते (काय किती कुठे )
मी excel sheet बनवलीये गोल्स लिहिलेत त्यात

या वर्षी काहीही संकल्प नाही केले. त्या ऐवजी वर्षाच्या शेवटी अचिवमेंट्स लिहून काढेन म्हणते Happy जमलं तर हा उपक्रम दर महिन्याअखेरीस करायला आवडेल.

या वर्षीसाठी खालील कॉम्बिनेशन ऑफ कोट बेस म्हणून घेतलंय आणि ते डोक्यात ठेवून वर्षभर वागायचा प्रयत्न करणार.
Boredom is the birth of creativity & Amusement (Entertainment) under late capitalism is the prolongation of work.

त्यातला एक म्हणजे या वर्षी किमान २५०० किमी चा टप्पा (सायकलिंगचा) पूर्ण करायचा. हे थोडं सावध टार्गेट ठेवलंय. कारण काहीही समस्या उद्भवू शकतात. >>> हा धागा १५ डिसेंबरलाच आलेला होता. २५ डिसेंबरला १५०० + किमी पूर्ण केले होते. तेव्हांपासून आतापर्यंत २००० चा टप्पा पूर्ण झाला आहे. आता उरलेल्या ३५४ दिवसात ५०० किमी पूर्ण करायचे आहेत.

खांद्याच्या दुखापतीने सायकल बंद करण्याचा डॉक्टरांचा सल्ला असल्याने आता एव्हढेच करणार.

आत्ता माझा संकल्प किती तारखेचा होता ते पाहिलं. २ जानेवारी.
त्याच्या आसपास १५०० किमी झाले होते. टार्गेट या वर्षीचे १००० किमी ठेवले होते. म्हणजे एकूण २५००.
आज २३ तारखेला एकूण किमी २३४१.४० झाले, Happy
म्हणजे आता फक्त १६० किमी सायकल चालवली कि संकल्प पूर्ण !!
यिप्पी !!! Happy

अभिनंदन. आता गोल वाढवून वर्षात ५००० किमी. करू शकता. Exceeding expectations is even better than just meeting your goal. All the best.

उबो , अस्मिता आणि सिमरन सर्वांना धन्यवाद.

उबो, मी मोठे टार्गेट का नाही ठेवले याची कारणे इथे आणि अन्यत्र दिली आहेत.

Pages