*चेतावनी – पहिले दोन किस्से काहींना गलिच्छ आणि तिसरा अयोग्य वाटण्याची शक्यता आहे.
आपल्या जबाबदारीवर जपून वाचावेत 
----------------------
परवाच्या दिवशी कॅन्टीनमध्ये जेवता जेवता अचानक तोंडात केस आला. मनातल्या मनात प्रचंड तिटकारा आला. पण तो चेहऱ्यावर न दाखवता कोणाच्या लक्षात यायच्या आत पटकन तो केस खेचून तोंडाबाहेर काढला. त्यासोबत मिक्स भाजीतील एक सिमला मिरचीचा अर्धवट चावलेला तुकडा देखील लटकून बाहेर आला. आपल्याच उष्ट्या अन्नाची किळस वाटली आणि त्याला केसासकट झटकून दूर फेकले तसे अघटीत घडले!
एखादी चुडेल हवेत फेर धरून नाचावी तसे तो सिमला मिरचीचा तुकडा माझ्या तोंडाभोवताली लटकू लागला. लंबकासारखा इकडून तिकडे बागडू लागला. थोडावेळ हे काय घडतेय समजेनासे झाले आणि मग अचानक बत्ती पेटली. तो माझाच केस होता. तो देखील तुटलेला नव्हता तर डोक्यावरचाच मोकळा केस घरंगळत तोंडात आला होता. त्याचे दुसरे टोक माझ्याच डोक्यात रुतले असल्याने तो माझ्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. अजून शोभा नको म्हणून मी निमुटपणे तो केस पिळून स्वच्छ केला आणि त्याला होते तसे डोक्यात खोचून ठेवले.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - पुन्हा ऑफिसच. दुपारची साडेतीन चारची वेळ. चहापान आटोपले आणि निसर्गाच्या एकेरी हाकेला साद द्यायला वॉशरूममध्ये गेलो. ब्रेक असल्याने ती जागा डिमांडमध्ये होती. सहसा पुरुषमंडळी एक सोडून एक उभे राहतात आणि एकमेकांची प्रायव्हसी जपतात. पण गर्दीच्या वेळी नाईलाज असतो. एक जागा पकडून मी सुद्धा सुरू झालो. पाचेक सेकंद झाले तोच माझ्या शेजारचा 'खाली मुंडी पाताळ धुंडी' अचानक माझ्याकडे बघून दचकला, की तसा अभिनय केला, आणि मोठ्याने म्हणाला, "अरे डरा दिया आपने तो, मुझे लगा कही गलत जगह तो नही आ गया.." आणि ते ऐकून आजूबाजूचे सगळे खाली मुंडी दात काढून खिदळू लागले. मलाही हसण्यावाचून पर्याय नव्हता.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - ट्रेनचे कंपार्टमेंट. नेहमी रिकामेच असते. बसायला जागा असूनही मी दारावर केस फडफडवत उभा राहतो. दोन स्टेशनसाठी काय ते बसायचे. पण त्या दिवशी ट्रेनचा गोंधळ असल्याने गर्दी होती. आजचे उभे राहणे नाईलाजाचे होते. दरवाज्यापासून थोडे आत, एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हाताने हॅण्डल पकडून मी निवांत उभा होतो. केसांची मागे मोळी बांधलेली असली तरी काही चुकार केस त्यातून निसटून हलकेसे भुरभुरत होते.
मी मोबाईलवर ईन्स्टा रील बघत होतो. इतक्यात अचानक शेजारचा माणूस तडतडला, "भाईसाहब, क्या कर रहे हो?"
.. आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!
याला माझ्या ईन्स्टाशी काय प्रॉब्लेम आहे? थोडे रील होते म्हणा चावट, पण ती माझी पर्सनल स्पेस आहे. याला काय करायचे आहे म्हणत मी सुद्धा त्याला उलटे तडकावले, क्या हुआ भाई? क्या प्रॉब्लेम है??
"अरे पुरा बाल मूह पे आ रहा है.. संभाल के रखो ना" .. आणि मी ओशाळलो!
वर पाहिले तर डोक्यावरचा फॅन गरागरा फिरत होता. जो गरजेच्या वेळी नेमका बंद असतो. पण आता बघा...
असो, पण आता मला कळायला मार्ग नव्हता. किती केस मागच्या बछड्यात बांधले गेले आहेत, किती सुटे आहेत आणि त्यातील किती त्याच्या चेहऱ्यावर जात आहेत.
बरे त्याचा चेहरा पाहिला तर त्यावर असे भाव की कहां से आते है ये लोग.. एवढेच केस वाढवायचे होते तर लेडीज डब्यातच चढला असता.
बरे हेच केस जर एखाद्या महिलेचे असते, तर कदाचित तो काही तक्रार न करता किंवा आहे त्यात सुख शोधत निमूट उभा राहिला असता. पण ठीक आहे. मी पुरुष होतो आणि तो स्ट्रेट असावा. त्यामुळे तो देखील आपल्या जागी बरोबरच होता. म्हणून मग मी निमूटपणे जागच्याजागी जमेल तसे हात वर करत बांधलेले केस मोकळे करून पुन्हा एकदा करकचून घट्ट बांधायला घेतले. मुंबई लोकल ट्रेन गर्दीच्या डब्यात चार दिशांनी चार माणसे चिकटली असताना ते एक दिव्यच होते. पण इलाज नव्हता. ना घर का ना घाट का ही परिस्थिती मीच ओढवून घेतली होती.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - आपलेच घर.
वेळ - रात्री जेवल्यानंतर स्वीट डिश खायची.
गुलाबजाम! जो मी कधीतरीच मूड येईल तेव्हाच खातो. दिवाळीत कोणीतरी फराळासोबत दिला होता. दोनेक आठवडे फराळ खाऊन झाल्यावर आता काहीतरी वेगळे हवे म्हणून गुलाबजाम आठवले. लुसलुशीत पदार्थाला सुरक्षित ठेवायला पत्र्याचा डब्बा होता. आणि त्याला पत्र्याचेच झाकण होते. त्या पत्र्याला जी काही भन्नाट धार होती तिने अंदाज चुकवला. थोडे झाकणं उचकटून तिथे बोट घालून झपकन वर खेचले आणि बोटाला रक्ताची धार लागली. गुलाबजाम खाण्याच्या नादात इतके उशीरा लक्षात आले की अचानक हातावर नजर पडली तेव्हा रक्ताने माखलेला हात बघून मी बेशुद्धच पडायचे शिल्लक राहिलो होतो.
मग चापूनचोपून त्यावर हळदीचा मारा केला. मग कधीतरी ते रक्ताचे ओहोळ थांबले. कधीतरी मी ते गुलाबजाम खाल्ले, कधीतरी झोपायला गेलो.. आणि तेव्हा मोकळे झालेले केस बांधायला म्हणून हेअर बँड टाईट करत केसांची पोनी हाताने खेचून घेतली आणि केसाने गळा कापणे म्हणजे काय या म्हणीचा प्रत्यय घेतला. थांबलेली रक्ताची धार पुन्हा सुरू झाली. आणि आता मात्र मी बेशुद्धच पडलो!
------------------------------------
------------------------------------
स्थळ - सोसायटी.
पात्र - मुलाचे मित्र. जे त्याच्याच वयाचे पहिल्या दुसऱ्या इयत्तेतील आहेत.
एक मित्र साळसूदपणे आपल्या आईला विचारतो – रुनूचे बाबा हे आई का दिसतात?
दुसऱ्या मित्राला घरी गंगावन (केसांचा विग/वेणी) सापडते. तो ते डोक्यावर घालून आरश्यात बघतो. आणि नाचायला लागतो. मी रुनूचे बाबा दिसतो, मी रुनूचे बाबा दिसतो..
हे आणि असे बरेच काही..
या सर्वांचे पालक माझ्या बायकोला हे किस्से हसत हसत मीठ मसाले लावत सांगतात.
आणि घरचे मला सुनावतात, तुझ्यामुळे मुलांना नको नको ते ऐकून घ्यावे लागते.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - पुन्हा ऑफिस.
पण आतली वर्किंग प्लेस नाही तर बाहेरचा कॅम्पस.
लिफ्ट मधून बाहेर पडलो. आजूबाजूला ईकडल्या तिकडल्या वरच्या खालच्या इतर ऑफिसमधील अनोळखी मुलींच्या घोळक्यात थोडावेळ रमलो. मग उगाचच स्टाईल मारायला म्हणून "मै हू ना" मधील शाहरुखसारखी ऍक्शन करत एका हाताने गळ्यातले आयडी कार्ड काढायला गेलो. पण ते कुठेतरी केसांच्या आत फसले होते. आणि केस खांद्यावरच्या बॅगेखाली दबले होते. या जांगडगुत्यात आयडी कार्ड आणि केस यांचा जो गुंता झाला तो मला दोन हातांनी सोडवणे देखील अवघड झाले आणि सगळ्या स्टाईलचा पचका झाला. घोळक्यापासून दूर असा मी एकटाच मग तो सोडवत बसलो.
घरी असताना देखील बरेचदा केस, टी-शर्ट आणि चष्मा हे एकमेकांत मनसोक्त गुंतून घेतात. पण बाहेरच्या फजितीची त्याला सर नाही.
------------------------------------
------------------------------------
स्थळ – होम थिएटर.
चित्रपट ऐन रंगात आला होता, मनोरंजनाचे मीटर फुल स्पीड धावत होते, आणि खटकन बत्ती गुल झाली. मुंबईत अंधार झाल्यावर खरा त्रास पंधरा मिनिटांनी सुरू होतो. गर्मीने उकडायला लागते. वेळप्रसंगी अंगातून पाण्याच्या धारा येतात. अश्यावेळी पुरुष जन्माला यायचा फायदा उचलत मी नेहमीसारखे कपड्यांना शरीरापासून वेगळे केले. पण यावेळी परिस्थिती नेहमीसारखी नव्हती. वाढलेल्या केसांचा झुबका पाठीवर केरसुणी फिरवल्यासारखा गुदगुल्या करू लागला. स्त्री जन्माला आलो नसल्याने त्या केसांना माझ्या उघड्या शरीरावर लोळण्यापासून दूर कसे ठेवावे याचे उपाय मला माहीत नव्हते. इरिटेशन वाढू लागले तसे नाईलाजाने पुन्हा बनियान अंगावर चढवली. आणि एका हाताने न्यूजपेपर तर दुसऱ्या हाताने केसांचा झुबका फिरवत स्वतःला वारा घालू लागलो.
ता.क. – लग्नसमारंभासारख्या गरम हवेच्या ठिकाणी उघड्या पाठीचे ब्लाऊज घालणाऱ्या सर्व आयाभगिनींना आदरयुक्त प्रणाम!
------------------------------------
------------------------------------
स्थळ - शहरातील कुठलाही रस्ता. जो क्रॉस करताना आधी उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा, मग पुन्हा उजवीकडे बघा असे शिकवले जाते. मी हे लहानपणापासून पाळत आलोय. आता मात्र उजवीकडे बघताच केसांचा एक तडाखा डाव्या गालावर बसतो, तर डावीकडे बघताच दुसरा उजव्या गालावर बसतो. यात रस्ता क्रॉस करायची सारी मजाच हरवून जाते.
मान इकडे तिकडे हलवून विखुरलेले केस डोळ्यावर येत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तो वेगळाच!
------------------------------------
------------------------------------
स्थळ बाथरूम – इश्श्य!.. इथले सगळेच डिटेल देऊ शकत नाही. पण सहा वाजता जे आत जातो ते साडेसात वाजताच बाहेर येतो.
ही वेळ उदाहरण म्हणून दिली आहे. त्यामुळे सहा सकाळचे की संध्याकाळचे करू नये. किंबहुना आता डोक्यावरून आंघोळ रोजच करता येत नाही. आणि डोक्यावरून आंघोळ करायची नसेल तर करायचीच का? या मनात आलेल्या नकारात्मक विचारांना मोठ्या प्रयासांनी हाकलून रोज बाथरूममध्ये शिरावे लागते.
पण हे रोजच जमत नाही. प्रामुख्याने थंडीच्या मोसमात आळस केलाच जातो. त्यामुळे रोज आंघोळ करणाऱ्या आयाभगिनींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा!
बाथरूम डिटेल देऊ शकत नसलो तरी बाहेर आल्यावरचे देऊ इच्छितो. धुवा, पुसा, सुकवा, विंचरा, हेअर ड्रायर वापरा, पुन्हा विंचरा, पूर्ण सुकवा आणि मगच घराबाहेर पडा.
या आधी सुट्टीच्या दिवशी क्रिकेटचा सामना एन्जॉय करताना दोन इनिंगच्या ब्रेकमध्ये आंघोळपाणी उरकून घ्यावे अशी आमच्याकडे पद्धत होती. ती आता पुर्णपणे लोप पावली आहे. कारण त्या नादात दुसरी इनिंग सुरू होऊन रोहीत शर्माचे सिक्सर किंवा बुमराहचे यॉर्कर मिस करू शकत नाही.
------------------------------------
------------------------------------
स्थळ बेडरूम – इश्श्य!...
बिश्श्य.. वगैरे काही नाही. तिथे हल्ली दर विकेंडला बायकोच्या पाया पडावे लागते. पाय चेपावे लागतात. तेव्हा त्या बदल्यात ती माझ्या डोक्यावर तेल थापायचे काम करते. या आधी कधी अशी वेळ आली नव्हती. तिने विनंतीला मान दिला तर ठिक, अन्यथा फार भाव द्यायचा नाही हेच सुखी संसाराचे धोरण होते. पण एक दिवस झोल झाला. केसांचा घोळ झाला. त्याला जबाबदार मीच होतो. कारण आयुष्यात कधी कंगवा वापरला नव्हता. आपला हात जगन्नाथ म्हणत केसातून बोटे फिरवा आणि केस सेट करा हेच माझे हेअर स्टाईल स्टेटमेंट होते. ज्याचा एके दिवशी पुरता स्टीलमेट झाला. केसातून बोटे पुढे जायला तयारच नव्हती. गुप्तधनाच्या हंड्याला नांगर अडकून बसावा तशी बोटे केसांच्या जटांना जाऊन धडकली. बायकोने लगेच चान्स घेत डिक्लेअर केले की आता केस कापण्याशिवाय पर्याय नाही. या कारणासाठी धारातीर्थी पडलेल्या केसांची इतिहासातील उदाहरणे देऊ लागली. बायकांना सुद्धा गुंता झाल्याने लांबसडक केस कापावे लागले आहेत, मग तू तर एक क्षुद्र पुरुष आहेस याची मला जाणीव करून देऊ लागली.
मी घाबरलो तसे तिने माझ्याशी डील केले. बदल्यात ते मागितले जे तसेही तिला न मागता मिळतेच. त्याहून आणखी काही मागितले असते तरी दिले असतेच. कारण वर मी कितीही तक्रारींचा पाढा वाचला असला तरी केसांमुळे येणारे वेगळेपण मला आतून कुठेतरी सुखावतेच. किंबहुना म्हणूनच सारे त्रास झेलतो, सारे अपमान गिळतो, पण केस कापायला टाळतो.

तर सध्या डीलप्रमाणे आमच्याकडे दर वीकेंडला हा असा वेणी-फनीचा कार्यक्रम होतो. जो वरवर दिसायला कितीही फनी वाटला तरी त्यात प्रचंड मेहनत असते. त्यामुळे हे आयुष्यभर करणार्या सर्वच महिलांना पुन्हा एकदा सलाम!
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
(अश्याच एका खर्याखुर्या जुन्या किस्स्यावर आधारीत - परतीचा पाऊस - ए शॉर्ट ऍण्ड स्वीट लव्ह स्टोरी - https://www.maayboli.com/node/85834 )
कालच लहान केस अजुन लहान करुन
कालच लहान केस अजुन लहान करुन आले. वारंवार कापते मी. नवर्याचा क्रु च आहे.
>>>>महिलांच्या बाबतीत बोलायचे तर 'ब्लंट कट' सगळ्यात आवडता... डावी-उजवीकडे मान वळवताना वेट लाईन ज्याप्रकारे स्विंग होते ती अदा एकदम कातिल वाटते.
हाहाहा एलेगन्ट आहे तो कट.
या शीर्षकाच्या बरोबर उलट
या शीर्षकाच्या बरोबर उलट शीर्षक सुचतंय. लिहू का त्याच्या वर ? बायकांचा त्रास असं काही तरी ?
परवानगी असावी.
धुरंदर पार्ट टू च्या
धुरंदर पार्ट टू च्या स्वागतासाठी फायनली मी या विकेंडला केस कापले आणि पुरुषात आलो.
एकंदरीतच भन्नाट अनुभव होता.
जमल्यास स्वतंत्र लेख लिहेन.
तशी काही गरज नाही...
तशी काही गरज नाही...
उकसवायला मुद्दाम उलटी पोस्ट
उकसवायला मुद्दाम उलटी पोस्ट
तरी सध्या बीजीच आहे
हवे तेव्हढे प्रतिसाद मिळतील.
हवे तेव्हढे प्रतिसाद मिळतील. काळजी नसावी. फक्त ड्युआयडी चा आरोप झाला तर स्ट्रॉन्ग रहावे. अस्वस्थ होऊ नये.
बीजीच रहा नेहमी ..
बीजीच रहा नेहमी ..
देव तुम्हाला खूप छान कामं,
देव तुम्हाला खूप छान कामं, मित्र परिवार आणि activities देवो.
खूप साऱ्या ट्रिप्स, आनंदी family time मिळो.
ह्यात busy होऊन screen आणि टायपिंग कशाला हवा असे वाटो!!!
किल्ली आणि धनवती हा आशिर्वाद
किल्ली आणि धनवती हा आशिर्वाद कि शाप?
अपना अपना नजरिया है
अपना अपना नजरिया है
बिझी झाल्यावर कुणालाही सुचणार
बिझी झाल्यावर कुणालाही सुचणार नाही अशा विषयावर धागे कोण विणणार?
सध्या एक लेखक हे ऋन्मेऽऽष
सध्या एक लेखक हे ऋन्मेऽऽष यांची अनुपस्थिती जाणवू देत नाहीये
धन्यवाद किल्ली. या आठवड्यात
धन्यवाद किल्ली. या आठवड्यात फॅमिली फंक्शन आहे त्यातच बीजी आहे. एकदा ते झाले आणि हँगओव्हर उतरला की पब्लिक डिमांड पाहता लिहेन सावकाश
ऋन्म्या आणि साधा आणि बे कार
ऋन्म्या आणि साधा आणि बे कार माणूस ???
अपना अपना नजरिया है
अपना अपना नजरिया है
नवीन Submitted by किल्ली on 18 March, 2026 - 12:10>>>ह्यां,,,,किल्ली, या पेक्षा तर बाघा चा "वो तोह जैसी जिसकी सोच.." चपखल बसतोय....जे 'लेव्हल्स', 'सोच' या शब्दानें अंडरलाईन होतात ते 'नजरिया' ने शंभर जन्मात नाही व्हायचे, अगदीच मुळमुळीत लेकाचा.. ..
बाघा कोण?
बाघा कोण?
(माबो अभ्यास कमी पडतोय )
बाघा कोण?
बाघा कोण?
(माबो अभ्यास कमी पडतोय )>>>नाही हो, मायबोलीवर नाही आहेत ते.... सब टिव्ही वरच्या 'तारक मेहता का उलटा चश्मा' सिरीयल मधलं पात्र आहे ते..
बडे सयाने कहते है, शेठजी ,
बडे सयाने कहते है, शेठजी , जैसी जिसकी सोच!
विषय काय आणि आपण बोलतोय काय..
विषय काय आणि आपण बोलतोय काय...
असे मनात येत असतानाच लक्षात आले की अरे हा तर माझाच धागा आहे.. मग ठीक आहे
हो ना. कधी कधी अरे हे आपणच
हो ना. कधी कधी अरे हे आपणच लिहीलं का असं होतं, मग लक्षात येतं कि अरे आपलाच आयडी आहे, ते आपण त्या वेळी होतो, आता नाही. आता आपण हे आपण आहोत. हा आपला धागा आहे. आता आपण आपले लिहायचे आहे. नाहीतर त्या आपल्यांना आपले समजले कि आयडीघोटाळा झालाच समजा.
Pages