‘वंदे मातरम्’
श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्री. नेहरू हे हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये फूट पडण्यास जबाबदार होते. मूलतः आपण त्यांना सनातन आणि मुस्लिम समुदाय असे म्हणूया. काँग्रेसचे नेते मात्र या विधानाचा जोरदार विरोध करत आहेत. असे दिसते की काँग्रेसच्या वरच्या पातळीवरील नेत्यांनी भारताचा इतिहास नीट शिकलेलाच नाही.
मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी भारतात सनातन, बौद्ध आणि जैन असे समुदाय अस्तित्वात होते. त्या काळी भारतातील राजकीय संरचना अनेक राज्यांत विभागलेली होती. सीमेवरील काही राज्यांवर हल्ले होत असले तरी मोठ्या प्रमाणातील मुस्लिम सत्ता स्थापन करणारा पहिला शासक शेरशहा होता. तो मोगल नव्हता, तो अफगाण होता. अफगाण भारतात जिहादासाठी आले नव्हते; त्यांना मुख्यतः भारतातील संपत्ती लुटण्यात रस होता.
बाबर भारतात आल्यानंतरच दोन समुदायांतील संघर्ष वाढू लागला. मोगल काळात मुस्लीम लोकसंख्या वाढली, पण बहुतांशी युद्धे जमीन आणि सत्तेच्या नियंत्रणासाठीच होत होती. दक्षिणेतील बहमनी साम्राज्य आणि मोगलही एकमेकांच्या विरोधात होते—आणि दोन्हीही मुस्लिम राजवटी होत्या. या सगळ्यांकडे इतर समुदायांतील वीरसैनिकही होते.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सर्व समुदायांतील सैनिकांनी मिळून ब्रिटिशांविरुद्ध लढले. बहादुर शाह झफर हे त्या लढ्याचे प्रतीक होते. त्यानंतर काही वर्षांत बंकिमचंद्रांनी ‘वंदे मातरम्’ लिहिले आणि ते स्वातंत्र्यसैनिकांची ओळख पटवण्याचे सूत्र बनले. ‘वंदे मातरम्’ला सहा कडवी आहेत. हे गीत गायल्यामुळे अनेक लोक, अगदी शाळकरी मुलांनाही ब्रिटिशांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले.
या काळातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे करून मुस्लिम समुदायाला खूष करण्याचा प्रयत्न केला. हाच तो ठिणगीचा क्षण, जो पुढे ज्वालामुखी झाला आणि दोन्ही समुदायातील लाखो लोकांचा बळी गेला. बंगालचे विभाजन १९४७ मध्ये झाले नाही; ब्रिटिशांनी ते १९०५ मध्ये केले होते. पहिल्या महायुद्धानंतर खलिफत आंदोलन सुरू झाले. केरळमध्ये अनेक हिंदू कुटुंबांवर जिहाद म्हणून हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला, ज्यामुळे तणाव आणखी वाढत गेला.
१९४७ मधील फाळणी ही नेहरू आणि बॅरिस्टर जिना यांच्या राजकीय उद्दिष्टांना पूरक ठरली. संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्यासाठी सैन्याला रोखण्याचे कारण आजतागायत समजलेले नाही. यामुळे पाकिस्तानसारख्या दुष्ट राष्ट्राचा जन्म झाला.
इंदिरा गांधींनी किमान पूर्व पाकिस्तानचा नाश करून बांगलादेश निर्माण केला, परंतु ९६,००० युद्धकैद्यांची सुटका करताना त्यांनी POK विषयी चर्चा का केली नाही हेही कोडेच राहते.
त्यांच्या मुलाने श्रीलंकेत तमिळांविरुद्ध सेना पाठवली, हे विसरून की दक्षिण भारतातील तमिळ आपलेच नागरिक आहेत. यामुळे उत्तर आणि दक्षिण यांच्यात फूट वाढली.
हे सगळे इतिहासात अनेक ठिकाणी दस्तऐवजीकृत आहे. श्री. मोदी यांनी जे सांगितले ते चुकीचे नव्हते. काँग्रेस नेत्यांनी संसद आणि सभांमध्ये ओरडण्याऐवजी स्वतःचा इतिहास शिकणे आवश्यक आहे. मी BJPचा समर्थक नाही आणि कोणत्याही पक्षाचा विरोधकही नाही. पण माझ्या देशासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी मी शंभर टक्के उभा आहे
संघ भाजपला दोन्ही
संघ भाजपला दोन्ही राष्ट्रगीतांबद्दल किती प्रेम आहे त्याचं पितळ उघड पडलं आहे. आता राष्ट्रध्वजाबद्दल बोलू.
संघाने तिरंगा या राष्ट्रध्वजाला विरोध केला होता.
संघाचे मुखपत्र द ऑर्गनायझर १९४७ मध्ये काय छापत होते पहा. The people who have come to power by the kick of fate may give in our hands the Tricolour but it [shall] never be respected and owned by Hindus. The word three is in itself an evil, and a flag having three colours will certainly produce a very bad psychological effect and is injurious to a country.”
kick of fate वरून छत्रपती शिवाजी महाराज आणि काकतालीय न्याय आठवले की नाही?
संघाच्या नागपूर रेशीमबाग येथील कार्यालयात १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० या दोन दिवशी तिरंगा फडकवला गेला. पण त्यानंतरची ५०+ वर्षे कधीही नाही.
राष्ट्रप्रेमी युवा दल या संस्थेच्या तिघा कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ रोजी रेशिमबागेत घुसून तिरंगा फडकवला. त्यांच्या विरोधात संघकार्यालया च्या केअरटेकरने पोलिसांत तक्रार नोंदवली . खटला भरला. चालवला गेला. तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलं.
२००२ पासून संघ कार्यालयात स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवला जाऊ लागला.
संघ आणि भाजपवाले मखलाशी करतात की २००२ मध्ये ध्वजसंहितेत बदल होऊन सर्वांना ध्वजारोहण करायची परवानगी मिळाली, त्याआधी नव्हती. तर त्याआधी फक्त विशिष्ट दिनी म्हणजे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दोन दिवशी सर्वांना तिरंगा फडकवता यायचा. त्यानंतर नवीन जिंदाल यांच्या प्रयत्नांमुळे तो वर्षाचे ३६५ दिवस फडकवण्याची परवानगी मिळाली.
आपण सगळे लहानपणापासून शाळा , कॉलेजे, हाउसिंग सोसायट्या , अगदी गावागावांत या दोन दिवशी ध्वजारोहण होताना आपण पाहत आलो आहोत की नाही?
भरत, तुम्ही काँग्रेसबहुल
भरत, तुम्ही काँग्रेसबहुल देशात राहत असाल
भारतीय जनता पक्षाने डाव
भारतीय जनता पक्षाने डाव टाकायचा आणि विरोधी पक्षाने त्यावर विरोधी पण पूरक पवित्रा घेतल्याने भारतीय जनता पक्षाचा हेतू सफळ होतो. काँग्रेस पक्षाला १५० वर्षांची परंपरा आहे. सक्रीय राजकारणाची सुद्धा १०० वर्षे झालेली आहेत. त्यांना हे समजत नाही का ?
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाला कोंंडीत पकडण्यात तरबेज आहे. एके काळी इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी आपल्याला हव्या तशा भूमिका विरोधकांकडून वठवून घेण्यात तरबेज होत्या. आताच्या काळात नरेंद्र मोदी आहेत. मोदी आल्यापासून संसदेत अनेक बिलं पास झाली आहेत. पण त्यावर कधी चर्चाच होत नाही. मोदी - भाजप हे मुद्दामून वादग्रस्त बिलं आणतात. त्याचं टायमिंग सुद्धा अचूक असतं. तीन तलाक , बुरखा बंदी , वक्फ बोर्ड, ३७० , नागरिकता बिल अशी बिलं आणली. या बिलांवर जर विरोधी पक्षाने भूमिका घेतली नाही, तर ज्या मतदारांच्या जिवावर हे विरोधी पक्ष जगतात त्यांना जवाब देणे अशक्य होते, आणि जर भूमिका घेतली तर भाजपने बहुसंख्यांकवादाचे कार्ड आधीच उतरलेले असते. या बिलांचा फायदा भाजपला होतो.
संपूर्ण चर्चा हिंदू मुस्लीम वर जाते आणि देशातले महत्वाचे प्रश्न हे असेच लोंबकळत राहतात. हिंदू आणि मुसलमान किंवा आजच्या भाषेत हिंदुत्व / हिंदूराष्ट्र विरूद्ध सेक्युलर असा वाद उकरून काढून भाजपने अनेक महत्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष भरकटवले आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाला याची कल्पना नाही अशी गोष्ट नाही. खर्गे, आता काँग्रेसमधे नसलेले सिब्बल, प्रियंका गांधी यांनी उल्लेख केला. पण अल्पसंख्यांक आणि दलित समाजाला निव्वळ वापरून घेत असल्याने नावापुरते लोणचे असलेले त्या समाजातून उचललेले निकृष्ट नेतृत्व ज्याला समाजात कुणी ओळखत नाही, अशांची खोगीरभरती असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्याची कुठलीच यंत्रणा नाही.
सत्तेत असताना माध्यमे, पेड पत्रकार, विकत घेतलेले बुद्धीजीवी यांच्या जीवावर हव्या त्या भूमिका हव्या तशा पोहोचवता येत होत्या. पण कार्यकर्ता हा बेअच उद्ध्वस्त झालेला असल्याने आता काँग्रेसला ओपन मीडीयातून कूटनीतीक भूमिका मांडता येणे अवघड झाले आहे. याउलट भाजप कार्यकर्ता अधिक संघ कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे उघड भूमिका - कूटनीतीक भूमिका आणि खरे उद्दीष्ट हे घरोघरी जाऊन कळवणे भाजपला शक्य होते.
यामुळेच सोशल मीडीयावर काहीही आपटली तरी भाजप निश्चिंत असतो. कारण भूमिका पोहोचलेल्या असतात. एके काळी म्हणजे २०११ साली भारतॉय जनता पक्षाने ईमेल, फेसबुक आणि ट्वीटर वर आपली सेना उतरवली होती. आज व्हॉट्स अॅप ग्रुपचं जाळं विणून भाजप आपली भूमिका पोहोचवत असताना काँग्रेस फेसबुक ट्वीटरवर पोहोचली आहे. मायबोली हे किरकोळ उदाहरण आहे.
इथे त्यांच्या बुद्धीजीवींना बिझी ठेवण्यासाठी आयटी सेलचे प्रशिक्षित लोक बॉट्स आणि असंख्य फेक आयडीज द्वारे एकास हजार या सूत्राने बिझी ठेवत राहतात.
आताही संसदेत हवी ती चर्चा घडवून आणली. काँग्रेसने त्यावर अपेक्षित प्रतिक्रिया दिल्याच. जी द्यायला हवी होती ती कुणीही दिली नाही. या चर्चेच्या धुरळ्यात कोण कोणते प्रश्न दबले गेले हे काही दिवसांनी अन्य बुद्धीजीवी , पक्ष आरडा ओरडा करू लागतील. पण त्यांना संसदेत शिरूच दिलेले नाही.
भाजपचा हा असा चहूबाजूंनी आखलेला कार्यक्रम आहे. या पक्षाशी माझा संबंध नाही. पण हे वास्तव विरोधी पक्षाने मांडले पाहीजे ते कुणी मांडत नसल्याने लिहीले आहे.
काही काळाने भारतीय जनता पक्ष,काँग्रेस, शिवसेना व अन्य आजी माजी सत्ताधारी राहिलेल्या / असलेल्या पक्षांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊयात.
जरूर लिहा.
जरूर लिहा.
तुमच्या लेखातील हुमायूनला भारताबाहेर पळवून लावणारा शेरशहा सुरी (फरीद अल-दीन खान) याला मात्र सगळ्यांनीच वाळीत टाकलेले आहे.
आपला एकही सैनिक न गमावता दिल्ली जिंकणारा व जनतेत लोकप्रिय झालेला हा सत्ताधारी होता. अकबर त्याच्यापुढे खूपच फिक्का पडतो.
त्याच्या व त्याच्या वारसांच्या १५ वर्षांच्या काळाचा आढावा घेतला तर मोगल व इंग्रज किती भयंकर होते ते लक्षात येते.
इतिहासाच्या पुस्तकात ही १५ वर्षांची राजवटीचा इतिहास सांगणारा धडा असलाच पाहिजे.
फरीद अल-दीन खान उर्फ शेरशहा सुरी यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
Pages