‘वंदे मातरम्’
श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्री. नेहरू हे हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये फूट पडण्यास जबाबदार होते. मूलतः आपण त्यांना सनातन आणि मुस्लिम समुदाय असे म्हणूया. काँग्रेसचे नेते मात्र या विधानाचा जोरदार विरोध करत आहेत. असे दिसते की काँग्रेसच्या वरच्या पातळीवरील नेत्यांनी भारताचा इतिहास नीट शिकलेलाच नाही.
मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी भारतात सनातन, बौद्ध आणि जैन असे समुदाय अस्तित्वात होते. त्या काळी भारतातील राजकीय संरचना अनेक राज्यांत विभागलेली होती. सीमेवरील काही राज्यांवर हल्ले होत असले तरी मोठ्या प्रमाणातील मुस्लिम सत्ता स्थापन करणारा पहिला शासक शेरशहा होता. तो मोगल नव्हता, तो अफगाण होता. अफगाण भारतात जिहादासाठी आले नव्हते; त्यांना मुख्यतः भारतातील संपत्ती लुटण्यात रस होता.
बाबर भारतात आल्यानंतरच दोन समुदायांतील संघर्ष वाढू लागला. मोगल काळात मुस्लीम लोकसंख्या वाढली, पण बहुतांशी युद्धे जमीन आणि सत्तेच्या नियंत्रणासाठीच होत होती. दक्षिणेतील बहमनी साम्राज्य आणि मोगलही एकमेकांच्या विरोधात होते—आणि दोन्हीही मुस्लिम राजवटी होत्या. या सगळ्यांकडे इतर समुदायांतील वीरसैनिकही होते.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सर्व समुदायांतील सैनिकांनी मिळून ब्रिटिशांविरुद्ध लढले. बहादुर शाह झफर हे त्या लढ्याचे प्रतीक होते. त्यानंतर काही वर्षांत बंकिमचंद्रांनी ‘वंदे मातरम्’ लिहिले आणि ते स्वातंत्र्यसैनिकांची ओळख पटवण्याचे सूत्र बनले. ‘वंदे मातरम्’ला सहा कडवी आहेत. हे गीत गायल्यामुळे अनेक लोक, अगदी शाळकरी मुलांनाही ब्रिटिशांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले.
या काळातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे करून मुस्लिम समुदायाला खूष करण्याचा प्रयत्न केला. हाच तो ठिणगीचा क्षण, जो पुढे ज्वालामुखी झाला आणि दोन्ही समुदायातील लाखो लोकांचा बळी गेला. बंगालचे विभाजन १९४७ मध्ये झाले नाही; ब्रिटिशांनी ते १९०५ मध्ये केले होते. पहिल्या महायुद्धानंतर खलिफत आंदोलन सुरू झाले. केरळमध्ये अनेक हिंदू कुटुंबांवर जिहाद म्हणून हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला, ज्यामुळे तणाव आणखी वाढत गेला.
१९४७ मधील फाळणी ही नेहरू आणि बॅरिस्टर जिना यांच्या राजकीय उद्दिष्टांना पूरक ठरली. संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्यासाठी सैन्याला रोखण्याचे कारण आजतागायत समजलेले नाही. यामुळे पाकिस्तानसारख्या दुष्ट राष्ट्राचा जन्म झाला.
इंदिरा गांधींनी किमान पूर्व पाकिस्तानचा नाश करून बांगलादेश निर्माण केला, परंतु ९६,००० युद्धकैद्यांची सुटका करताना त्यांनी POK विषयी चर्चा का केली नाही हेही कोडेच राहते.
त्यांच्या मुलाने श्रीलंकेत तमिळांविरुद्ध सेना पाठवली, हे विसरून की दक्षिण भारतातील तमिळ आपलेच नागरिक आहेत. यामुळे उत्तर आणि दक्षिण यांच्यात फूट वाढली.
हे सगळे इतिहासात अनेक ठिकाणी दस्तऐवजीकृत आहे. श्री. मोदी यांनी जे सांगितले ते चुकीचे नव्हते. काँग्रेस नेत्यांनी संसद आणि सभांमध्ये ओरडण्याऐवजी स्वतःचा इतिहास शिकणे आवश्यक आहे. मी BJPचा समर्थक नाही आणि कोणत्याही पक्षाचा विरोधकही नाही. पण माझ्या देशासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी मी शंभर टक्के उभा आहे
सर, तुम्हीच देश वाचवायला पुढे
सर, तुम्हीच देश वाचवायला पुढे या. तसेही शाखा साठीला पोचलाय. आणि त्याला तुमच्या सपोर्टची तशी गरज नाही. त्याचा मुलगाही सेटल झालाय. शर्माजी आता फक्त वन डे पुरते उरलेत. पंतजींना वन डे मधून वगळलं आणि त्यांची फिटनेस धड नाही. या तिघांपेक्षा देश महत्त्वाचा. तुम्ही तो वाचवा.
राहुल गांधी आणि नरेंद्र
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांइतकी राजकीय ताकद ऋन्मेष यांच्याकडे आहे का ? काहीच्या काही.
समजा गावात दोन गुंड असतील, दोघांकडे गन्स असतील, मसलपावर असेल, मनी पावर असेल आणि बाकीचे भिऊन चिडीचूप असतील. तर या दोघांपैकी एकानेच गाव वाचवायचे असा नियम आहे का ? एखाद्या सामान्य माणसाने परिस्थितीचं आकलन सांगायचा प्रयत्न केला तर आता तुम्ही तिसरी गँग बनवा असा हाकारा सुरू करायचा का ?
ऋन्मेष यांनी एक विचार मांडला. त्याने अस्वस्थ कशाला व्हायचं ?
ज्यांना नाही पटणार ते नाहीत त्यांना समर्थन देणार. ज्यांना पटेल ते हा विचार प्रसारीत करतील. गुंडांना विरोधच करायचा नाही हे अजबच आहे.
सरांचा आणखी एक ड्यु आयडी?
सरांचा आणखी एक ड्यु आयडी?
भरत कोणाला माझा मुद्दा पटला
भरत कोणाला माझा मुद्दा पटला म्हणून तो माझा डू आयडी होत असेल तर तुमच्याकडे तो मुद्दा खोडायला उत्तर नाही असे समजूया.
एक लेखक यांच्या इतर काही पोस्ट पाहिल्या तर मला त्या विषयात बिलकुल गती नाही हे तुम्हालाही माहीत आहे. पण तुमच्याकडे उत्तर नसल्याने आता डूआयडी वगैरे आरोप करू लागले आहात.
असो,
दोन्ही राजकीय पक्षांना हरामखोर म्हटले तर तुम्हाला राग येणे स्वाभाविक आहे कारण त्यात तुम्ही एका पक्षाचे समर्थक आहात. त्यामुळे आपला पक्ष सुद्धा चुकला आहे हे कधी तुम्हाला पटणारच नाही. माहित असले तरी तुम्ही ते उघडपणे तसे लिहिणार नाही. तुमच्याशी वाद घालणारे भाजप समर्थक सुद्धा तेच करतात. तुम्ही दोन्ही बाजूच्या समर्थकांच्या पोस्ट आपल्या पक्षाला दुसऱ्या पक्षापेक्षा वरचढ ठरवायचे याच अजेंड्यातून आलेले असतात. त्यामुळे मला तुमच्याशी राजकीय वाद घालायची बिलकुल इच्छा नाही.
कारण माझी इच्छा देशाचे भले व्हावे अशी आहे. तर तुम्हा राजकीय आयडींचा अजेंडा आमच्या पक्षाला सत्ता द्या तरच देशाचे भले होईल असा असतो.
शाहरुख खान, रोहीत शर्मा, ऋषभ पंत या सर्वाचा मी चाहता आहे आणि म्हणून तुम्ही त्यांचा विषय इथे काढणे हे खरे तर हास्यास्पद आहे.
पण ठीक आहे. कारण मला कल्पना आहे राजकीय वाद असेच चालतात. इथे एकमेकांवर चिखल फेक करणे हाच अजेंडा असतो. कारण दोन्ही पक्षाचे नेते हरामखोर असल्याने समोरच्यावर जास्तीत जास्त चिखल जो उडवेल तो जिंकला असेच इथले वाद असतात. (प्रत्यक्षात जिंकत कोणीच नाही तर दोन्ही बाजूच्या नेत्यांची लाज निघते).
पण म्हणून तुम्ही माझ्या आवडत्या कलाकारांवर आणि खेळाडूंवर चिखल उडवला याचा अर्थ मी त्या बदल्यात तुमच्या आवडत्या खेळाडूंवर आणि कलाकारांवर चिखल उडवणार असे बिलकुल करणार नाही. त्यामुळे त्यावर सुद्धा नो कॉमेंट !
सर अमित शहांसारखी शिवीगाळ करू
सर अमित शहांसारखी शिवीगाळ करू लागले.
सर अमित शहांसारखी शिवीगाळ करू
सर अमित शहांसारखी शिवीगाळ करू लागले.
>>>>>
कुठली शिवी?
हरामखोर नेते?
हे लिहिताना सुद्धा तुम्ही अमित शहा यांचे नाव घेतले
आता कोणीतरी येईल आणि काँग्रेसचे नेत्यांनी दिलेल्या शिव्या मोजून दाखवेल.
असेच तुम्ही एकमेकांच्या नेत्यांची लाज काढत रहा.
आणि मी जे त्यांना हरामखोर म्हणतो हे सिद्ध करायला मलाच मदत करा.
बाकी मी कुठल्या एका नेत्याचे नाव कधी घेत नाही.
जे नेते हरामखोर असतात त्यांच्या समर्थकांना ते बरोबर झोंबत.
आणि जे नेते मला नालायक वाटतात त्यांचाही उल्लेख मी नेहमी आदरार्थीच करतो
कारण संस्कार!
सरांचे आवडते शर्माजी मैदानात
सरांचे आवडते शर्माजी मैदानात आपल्याच खेळाडूंना आयाबहणींवरून गलिच्छ शिव्या देतात त्याचेही सरांनी समर्थन केले होते. संस्कार !
असो लंच टाईम संपला!
असो लंच टाईम संपला!
जे संसदेत नेते करत आहेत
तेच त्यांच्या समर्थकांनी इथे करत राहावे यासाठी शुभेच्छा ।!
रोहीत शर्माचे उत्तर थोडे काम झाल्यावर देतो..
सर, लंचमध्ये काय होतं त्याचा
सर, लंचमध्ये काय होतं त्याचा फोटो खाऊगल्लीवर देताय ना?
ऋन्मेष , शाहरूख खानचा अतिरेक
ऋन्मेष , शाहरूख खानचा अतिरेक झाला कि माझी सेव्ह केलेली पोस्ट चिकटवत राहणार.
पण इथल्या पोस्टस आवडल्या.
प्रियंका गांधींचं भाषण सुद्धा आवडलं. हाच आशय आहे.
चला आताच घ्या उत्तर...
चला आताच घ्या उत्तर...
रोहीत शर्मा विषयच आवडीचा आहे..
तो खेळाडूना जश्या शिव्या देतो तसे मी सुद्धा माझ्या मित्रांना देतो.
त्यामुळे हो मला त्यात काही गैर वाटत नाही.
उलट रोहीत शर्मा कर्णधार असतानाचे संघातील बाँडिंग मला आवडायचे. एकजुटीने खेळायचे. पुढे गंभीर आला आणि ते सुरू झाले ज्याने देशाची वाट लागली.. ते म्हणजे राजकारण!
तुम सबकी मॉं xद दूंगा असे
तुम सबकी मॉं xद दूंगा असे म्हणण्यात काही गैर नाही, असं सर म्हणताहेत.
ड्युआयडी , लोल.
ड्युआयडी , लोल.
काय लॉजिक !
मला वाटलं यांना मुद्द्यावर चर्चा करता येत असेल.
अरूण गवळी आणि दाऊद इब्राहीम यांच्या समर्थकांसमोर त्यांच्या मालकांना गुंड म्हणू नये हे आपलं चुकलं हे कबूल. अग चा समर्थक दाईचा माणूस ठरवून शूट करणार आणि दाई चा माणूस अगचा माणूस ठरवून शूट करणार. बेक्कार रे बेक्कार.
जर कुणाला अरूण गवळी किंवा दाऊद इब्राहीमचा असा समर्थक माहिती असेल तर सांगा जो म्हणेल कि आमचा बॉस गुंड आहे तर सांगा. सापडणार नाही असं नाही म्हणत. ते म्हणतातच. राजकारणात म्हणत नाहीत. प्रामाणिक कोण ते ठरवा.
सर, शाखा साठीला आला, शर्माजी
सर, शाखा साठीला आला, शर्माजी फक्त ओडीआय खेळतात, पंतजी सध्या ओडीआयमध्ये नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यात चिखलफेक कशी काय सर?
सर, तुम्हांला देशाबद्दल इतकी कळकळ वाटते. पण सर, तुमच्या लेखनातून देशाबद्दलची कळकळ दिसण्यापेक्षा या तिघांबद्दलच कळकळ अधिक दिसली, म्हणून त्यांची नावे घेतली. सर, तुम्ही सध्याच्या भाषेत एक स्ट्राँग मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहात. सर, तुमची पॉवर तुम्ही देशाच्या भल्यासाठी नक्कीच वापरू शकता. आणि सर, यांच्याबद्दल तुम्ही मायबोलीवर संधी काढून काढून लिहीत असता. तेच अन्य कोणी करायला तुमची परवानगी घ्यायची का सर?
सर , तसंच राजकीय पक्षाच्या नेत्यांना हXXXXX म्हणणे तुम्ही भूषण मानता. मायबोलीवर शिवीगाळ करण्याची परवानगी असलेला एकच आयडी आहे, असे मला वाटत होते. आता त्यात तुमची भर पडली . सर.
एक आयडी राजकीय नेत्यांना शिवी देतो. दुसरा आयडी त्यांना गँगस्टरची उपमा देतो. आणि तरीही सर म्हणतात मी त्यांच्याबद्दल आदरार्थी लिहितो. सर. आता तुम्ही ज्या दोन पक्षांची नावे घेतली, त्यातल्याच एका पक्षात आपले आदर्णीय पंतप्रधान मोदीजी आहेत. ते काही वंचित बहुजन आघाडीत नाहीत. म्हणजे तुम्ही दिलेली शिवी त्यांना सुद्धा लागू होते.
या आयडीचे पित्त खवळल्याने
या आयडीचे पित्त खवळल्याने उपमा, उदाहरणं, दृष्टान्त यातला फरक समजेनासा झालेला दिसतोय. लोल
आणि समजा दिली राजकीय नेत्यांना गँगस्टरची उपमा, तरी काय फरक पडतो. ज्या दोन पक्षांनी उच्छाद मांडलाय, त्या पक्षाच्या तिकीटावर इच्छुक असणारे कोण आहेत ? मटकाकिंग, जुगार, दारूवाले हे पूर्वी होते. आता लँडमाफिया आहेत, ड्राग्जमाफिया आहेत. बलात्कारी दोन्हीकडे आहेत. खूनी दोहीकडे आहेत. भ्रष्टाचारात तर कोण एव्हरेस्ट गाठतो अशी स्पर्धा चालू आहे.
असल्या नालायकांची बाजू घेऊन जनतेला शिवीगाळ करणारे समर्थक हे या पक्षांची शान आहे. बास ना. टीव्ही लावला तेच. पेपर उघडला तेच. फेसबुक उघडलं तेच. इथं तरी गप्प बसा. तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच आणि तेच.
हे दोन पक्ष नसले तर जनतेचं काय अडणार आहे खेटर ? समर्थकांना वडापाव मिळणार नाही, त्यांचं जळत असेल. बासच आता. यांच्या मनासारखं लिहीलं कि हे गालगुच्चा घेतात , जरा वेगळं लिहीलं कि चिमटे काढत बसतात.
आता विरोधात लिहीणारे हे दोन आयडी नेमके कोणत्या पक्षाचे मतदार हे समजत नाही तोपर्यंत हे विविध पक्षाची नावे घेत राहणार. तोपर्यंत पित्ताचे ढेकर देणार. नाही तर मग अक्कल शिकवायला येणार कि राजकीय भूमिका असलीच पाहीजे. आम्ही कसे पक्षाचे नाव घेतो, तुम्ही का लाजता इत्यादी. यांना साधं निवडणुकीत मत देताना गुप्त मतदान असतं ते माहिती नाही आणि हे इतरांना शिकवणार.
इग्नोर मारा या कुजकट आयडीला. याच्या वाचून कुणाचंही अडणार नाही. बस कोकलत.
एक लेखक यांचे 'माहितीचा अभाव
एक लेखक यांचे 'माहितीचा अभाव आणि लिखाणाची सुरसुरी याचे सुरेख मिश्रण या ठिकाणी कथेत आहे. ' हे निरिक्षण योग्य आहे.
हिंदू महासभा आता नाही
हिंदू महासभा आता नाही म्हणणार्यांसाठी - त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेत होते. त्यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनाला विरोध केला आणि हे आंदोलन मोडून काढा असे ब्रिटिश सरकारला लिहिले. हेच मुखर्जी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. जनसंघ आता नाही, असे म्हणणार असाल, तर भाजप मुखर्जींना मानतो.
काँग्रेसने केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींबद्दल इत्थंभूत माहिती ठेवणार्यांना आपल्या वैचारिक पूर्वजींची माहिती नसावी, हे शोभत नाही.
सर, शाखा साठीला आला, शर्माजी
सर, शाखा साठीला आला, शर्माजी फक्त ओडीआय खेळतात, पंतजी सध्या ओडीआयमध्ये नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यात चिखलफेक कशी काय सर?
>>>>>>>
रोहीत शर्माच्या थूलथुलीत पोटाला चिमटे काढून पैसे कमवा हे आपलेच वाक्य ना..
याला चिखलफेक आणि बोडीशेमिंग असे म्हणतात.. स्पेशली जेव्हा हे आपला मित्र नसलेल्या व्यक्ती बोलले जाते.
आणि ते सुद्धा का? तर मला आवडतो म्हणून उगाच त्यांना नावे ठेवा..
आताही गरज नसताना वरील सर्वांची नावे घेतली. याने राजकीय नेत्यांना हरामखोर म्हटल्याने आपल्या भावना दुखावल्या तर आपण सुद्धा याच्या दुखावूया.. करत राहा प्रयत्न
बाकी मला खरेच यारी दोस्ती मध्ये दिल्या जाणाऱ्या शिव्यांचा काही प्रॉब्लेम नाही.
आणि मी स्वतःही शिव्या देतो हा शोध तुम्हाला आता लागला असेल तर तुमचा मायबोली अभ्यास कमी पडत आहे.
माझा हा धागा वाचा
माझ्या वाईट सवयी ३ – शिवीगाळ
https://www.maayboli.com/node/56984
आणि सारखा शाहरुखचा विषय काढू नका. तुम्हा लोकांना त्याचे नाव घेतल्याशिवाय करमत नाही आणि नंतर लोकं माझ्यावर चिडतात
सर , शर्माजीं बद्दलच्या
सर , शर्माजीं बद्दलच्या माझ्या या पोस्टची भरपूर चर्चा तुम्ही त्या धाग्यावर केलीत. सर, तुमच्या बाजूने एकही मत वळलं नाही. सर, ती कमेंट कशाबद्दल होती हे त्या धाग्यावर तुम्हांला व्यवस्थित समजावून सांगितले गेले. अर्थात तुम्हांला समजून घ्यायचेच नसते, हा अनुभव अनेकदा आला आहे सर.
सर , आणि शर्माजी तुमचे आवडते म्हणून मी तसं लिहिलं , असा बळेच शोध लावू नका . सर, सगळ्यांचं जग तुमच्याभोवती फिरत नाही. ती कमेंट केली त्यावरच तसं का लिहावंसं वाटलं तेही तिथे लिहिलं होतं , सर.
सर, तुम्ही तुम्हांला हवं तेवढंच वाचता आणि हवं तेवढंच लक्षात ठेवता, भरपूर फेकाफेकीही करता. तुमचे हे गुण एका राजकारणी नेत्यासारखेच आहेत सर.
सर , तुम्ही पुन्हा एकदा आईबहिणीवरून गलिच्छ शिव्या देण्याचं समर्थन करताय.

तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा शिवी दिली आहे सर.
अत्यंत फालतूपणा आहे हा.
अत्यंत फालतूपणा आहे हा. गृहमंत्री आणि विश्वगुरु ना कोणीतरी आवाहन द्यावे, न बघता सुस्पष्ट न चुकता पूर्ण कडवी म्हणावीत. येणार आहे का ह्या दोघांना? अधिवेशनाच्या एक मिनिटाचा खर्च काही एक लाख आहे. १० -१० तास हे लोक ह्यावर घालवतात.
.
.
सर , शर्माजीं बद्दलच्या माझ्या या पोस्टची भरपूर चर्चा तुम्ही त्या धाग्यावर केलीत. सर, तुमच्या बाजूने एकही मत वळलं नाही.
>>>>
कोणाचे मत?
आणि जनतेचे बहुमत मानता तर भाजपला सुद्धा माना. ते जनतेच्या बहुमताने जिंकून आलेत. बोला जमतेय का
.
.
सर, ती कमेंट कशाबद्दल होती हे त्या धाग्यावर तुम्हांला व्यवस्थित समजावून सांगितले गेले. अर्थात तुम्हांला समजून घ्यायचेच नसते, हा अनुभव अनेकदा आला आहे सर.
>>>>>>
रोहित शर्माच्या थूलथूलीत पोटाला चिमटे काढून पैसे कमवायची पोस्टचे समर्थन केले होते आणि ते मला समजले नाही.
वाह!
जरा पुन्हा समजवा. बघूया इथे कोणा कोणाला समजते.
.
.
सर , आणि शर्माजी तुमचे आवडते म्हणून मी तसं लिहिलं , असा बळेच शोध लावू नका.
>>>>>
इथे रोहीत शर्मा, शाहरुख, आणि ऋषभ पंत यांचा विषय काहीही संबंध नसताना ते मला आवडतात म्हणूनच आणलात ना
.
.
सर, सगळ्यांचं जग तुमच्याभोवती फिरत नाही.
>>>>>>
सगळ्यांचे माहित नाही पण तुमचे तर नक्कीच फिरत असावे
.
.
सर, तुम्ही तुम्हांला हवं तेवढंच वाचता आणि हवं तेवढंच लक्षात ठेवता, भरपूर फेकाफेकीही करता. तुमचे हे गुण एका राजकारणी नेत्यासारखेच आहेत सर.
>>>>>>>
म्हणजे तुम्हाला माझे कौतुक आहे तर.. मी सुद्धा तुमचा आदर्श आहे तर
.
.
सर , तुम्ही पुन्हा एकदा आईबहिणीवरून गलिच्छ शिव्या देण्याचं समर्थन करताय. Sad

>>>>>>>
समर्थन काय घेऊन बसला आहात. मी तर म्हणतोय की मी स्वतः क्रिकेट खेळताना मित्रांना द्यायचो
आणि त्या धाग्याची लिंक सुद्धा दिली आहे वाचून या.
माझ्यासारख्या प्रामाणिक माणूस दुसरा मायबोलीवर सापडणार नाही
.
.
तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा शिवी दिली आहे सर. Sad
>>>>>>>
सगळ्याच पक्षात हरामखोर नेते आहेत म्हणणे म्हणजे पंतप्रधानांना शिवी दिली म्हणत असाल तर नो कॉमेंट्स.
पण एवढ्यावरच थांबू नका. आता गावभर पोस्टर लावा याचे. माझा फोटो देऊ का
ऋन्म्या, इतक्या तावातावाने
ऋन्म्या, इतक्या तावातावाने राजकीय धाग्यावर लिहिताना तुला कधी पाहिलं नाही. तुला वंदे मातरमबद्दलची सद्यस्थिती, त्याचा जन्म आणि इतिहास याबद्दल नेमकं माहिती आहे का? आपल्या संविधानाचं पहिलं पेज तू वाचलं आहेस का?
उदाहरणार्थ, तू सतत शाखा शाखा करण्याबद्दल लोक तुझ्यावर शाखा शाखा म्हणून धावून येत आहेत, आणि त्यांना तूही सतत तेच शाखा शाखा बोंबलून उत्तर देतो आहेस. हे उदाहरण झालं. सांभाळ स्वतःला. तुझ्याशी बोलू शकतो अजूनही. इतर बुद्धी गहाण ठेवलेल्या आयडींशी नाही.
उत्तर देऊ नकोस. इतक्यांना देतोस ते पुरे नाही का?
साजिरा मला माहीत नाही हा काय
साजिरा मला माहीत नाही हा काय विषय आहे.
मी धागा सुद्धा वाचला नाही पूर्ण.
मला राजकीय घडामोडीत इंटरेस्ट सुद्धा नाही फार. कळतही नाही.
फक्त काही संसदेचे व्हिडिओ बघून समजले की तिथे ज्या लोकांना आपण देश चालवायला बसवले आहे ते आपसात भेंड्या खेळत आहेत. म्हणून तितकीच कॉमेंट केली. त्यावरून विषय वाढला.
गेले काही वर्षात ज्या युती आघाडी सडके राजकारण मतदारांचा विश्वासघात धर्माचे राजकारण शेतकरी असो किंवा सैनिक यांच्या टाळूवरचे लोणी खाणे वगैरे प्रकार या सगळ्यांनी केले आहे ते बघून माझा या लोकांवरचा विश्वास तसाही उठला आहे. संधी मिळाली की चार शिव्या हासडून हलके होतो!
आणि मग कोणी गप्पा मारायला आला की चालू होतो. तसेही या धाग्यावर समाजाचे कल्याण होणारी किंवा देशाचा विकास घडवणारी चर्चा होणार असे वाटत तरी नाही.
मग हा धागा वेगळाच आहे. तु हे
मग हा धागा वेगळाच आहे. तु हे सारं लिहायला वेगळा धागा काढ जा.
ओके
ओके
सुरुवातीच्या काही प्रतिसादात संसदेत वंदे मातरम वर चर्चा यावर काहींनी टीका केली होती आणि लेखाचे शीर्षक ते होते म्हणून वाटले त्यावरच निषेध धागा असावा.
तसेही बरेच जण माझ्या धाग्यावर येऊन धागा नाही वाचला पण प्रतिसाद वाचले असे म्हणतात त्यांच्यासोबत फिट्टमफाट झाली.. चला या धाग्यावर शेवटची पोस्ट. शुभरात्री
मि. मोदींनी पाकिस्तानवर
मि. मोदींनी पाकिस्तानवर आक्रमण करुन, फौजा रावळपिंडी पर्यंत आत घालुन, अगदी अणुबॉम्ब ठेवलेल्या ठिकाणी हल्ला करायची तयारी करुन मग शेपुट का घातलं? टाकोच्या दबावाला बळी पडून पदरात काय पडलं? व्यापारावर निर्बंध आणि भरमसाठ कर. बदललेल्या इंडियाचा पंतप्रधान तरी तो इतका लुळा का बरं पडतो दरवेळी?
तो ऋन्मेशचा डूआयडी नाही, इथेच
तो ऋन्मेशचा डूआयडी नाही, इथेच पोस्ट टाकत असलेल्या दुसऱ्या आयडीचा आणखी एक दुआयडी आहे.
भरतजी वेलकम इन न्यू अवतार.
हे सांगायला एका ड्युआयडीचा आधार घ्यावा लागला. अरेरे !
आणि या ड्युआयड्यांबद्दल कुणालाच तक्रार नाही. मी ऋन्मेष यांचा ड्युआयडी नाही हे सांगितल्यावर मुद्दामून हा आयडी आला आहे.
मी किंवा ऋन्मेष यांनी मांडलेल्या विचारांपेक्षा हा ड्युआयडी कुणाचा यातच जास्त इंटरेस्ट आहे. राजकारणी लोकांसारखे गैरसोयीचे मुद्दे आले कि पर्सनल व्हायचं काम चालू आहे.
आता यांनी पातळी सोडली म्हणून हा ड्युआयडी कुणाचा हे सांगणार नाही. कारण
संस्कार
(राजकारण या ग्रुपातले जुने धागे वाचले. सोयीच्या ड्युआयडीने केलेली शिवीगाळ गोड वाटली आहे हे लक्षात आले. मग गुंड,मवाली, दंगलखोर, भ्रष्ट नेत्यांचा अभिमान वाटला यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे ? )
अमितव, अभ्यास वाढवा.
अमितव, अभ्यास वाढवा. पाकिस्तानचे सगळे अणुबॉम्ब नष्ट झालेत. बोरॉनची विमानं मागवावी लागली त्यांना. अमिरीकेन स्पॉन्सर्ड न्यूक्लिअर प्रोग्राम आहे पाकचा. त्यामुळे चिडून टॅकोने टॅरीफ लावलाय.
https://ianslive.in/vishal
https://www.instagram.com/reel/DSCUlHHEWNS/
आता याला भाजपवाल्यांनी अर्बन नक्षल म्हणावं आणि काँग्रेसवाल्यांनी शिंदे सेना, मनसे, स्वाभिमानी पक्ष, वंचित बहुजन आघाडी , आम आदमी पक्षाचा असल्याचं ठरवावं. पण मुद्दा चूक का बरोबर यावर नाही बोललं तरी चालेल.
आणि आजारी लोकांनी हा कुणाचा ड्युआय ते सांगावं. त्यासाठी ड्युआयडीच वापरावा.
Pages