
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत हवेतील वाढलेल्या प्रदूषणाविरोधात नागरिक, विद्यार्थी, पर्यावरण कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. धुरकट हवा, वाढता स्मॉग, शाळा कॉलेज बंद ठेवावी लागणारी परिस्थिती, श्वसनाचे वाढते त्रास. यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मते, स्वच्छ हवेसाठी मागण्या करताना काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, परवानगी न देता जागोजागी अडवणूक केली, तर काही ठिकाणी लोकांना जबरदस्तीने हलवण्यात आल्याचंही सांगितलं गेलं. काही कार्यकर्त्यांनी हे सर्व अन्यायकारक दडपशाही असल्याचा आरोप केला. प्रशासनाचं म्हणणं मात्र असं की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही पावलं उचलली गेली.
मागणी आहे की सरकारने कडक उपाययोजना कराव्यात आणि दीर्घकालीन स्वच्छ हवा धोरण तयार करावं. काही गटांनी सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे आणि नागरिकांना जागरूक करणे यावरही भर दिला आहे.
माझा प्रश्न असा की स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाण्यासाठी आपण नेमकं किती जागरूक आणि किती सक्रिय आहोत? प्रदूषण थांबवण्यासाठी लोक आवाज उठवतात, पण त्यांच्यावरच दडपशाही झाल्यास आपण शांत राहावं का? स्वच्छ हवा मागणं हा अपराध आहे का, की मूलभूत हक्क?फक्त सरकारच्या निर्णयावर अवलंबून राहणं योग्य आहे का की आपणही काही पावलं उचलायला हवीत?
मागे ते एका महिलेला खुर्चीवर
मागे ते एका महिलेला खुर्चीवर मांडी घालून बसले म्हणून हटकले ती घटना दिल्लीच्याच हॉटेल मधील होती ना...
एकीकडे एक गट हायजीनबाबत इतका जागरूक आहे,
तर दुसरीकडे त्याच शहरात सामान्य लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा मिळत नाहीये.
किती विषमता आहे या देशात.
पण वाहनेच अ ति असतील तर सरकार
पण वाहनेच अ ति असतील तर सरकार काय करु शकेल?
- पब्लिक कम्युट सुधारणे, वाढविणे
- परिवहनाची वारंवारिता वाढविणे
- अधिकाधिक झाडे लावणे, सुशोभित व हरित उपवने (आयलंडस) जागोजागी तयार करणे
मला हे उपाय फक्त सुचतायत.
NASA ला काही कामधंदे नसावेत
NASA ला काही कामधंदे नसावेत किंवा पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचा IQ 900+ झाला असावा.
लखनौला आज क्रिकेटचा सामना
लखनौला आज क्रिकेटचा सामना खराब हवेमुळे रद्द झाला.
Air Quality index hazardous