बोलत राहा ..

Submitted by - on 15 November, 2025 - 07:17

सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असतो?
मनाला पाहिजे ते बोलता येण्यात सर्वात जास्त आनंद असतो . नाही का ….

मनाप्रमाणे तर कमी अधिक प्रमाणात जगतोच कि आपण. पाहिजे तेव्हा फिरणे, झोपणे, उठणे, पाहिजे ते खाणे हे रडवत नाही आपल्याला. आपल्याला रडू तेव्हाच येते जेव्हा आपण बोलून मोकळे होतो.

मला आयुष्यात हे करता आले नाही.. असे बोलल्या नंतर रडू येते कारण मन मोकळे होते.
मला कोणी समजून घेतले नाही ..,मी सगळ्यांसाठी खूप केले ... माझंही जगणेच राहून गेले. असे आणि अनेक काही काही आणि मग मन शांत होते ..
न बोलणार्यांची मनाची कुचंबणा होते. बोलण्यासाठी जीव तगमग करतो, मग कोणाला सांगू असे होते. मग चिडतात, खूप खूप चिडतात. बोलता न आल्यामुळे होणारी घालमेल. समोरच्याने समजून घेण्याच्या अपेक्षा. मग नाही समोरच्याला समजले कि येणार राग ...आणि हाच राग व्यक्त करतात नको त्यावर, नको तिथे. कारण पाहिजे ते बोलता नाही येत.

बोललेच पाहिजे कि. का लपवायचे? का नाही सांगायचे?

मला वाटते, जीवनात सर्वात ज्यास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे आपल्याला पाहिजे ते बोलता येणे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

ऐकणारे पाहिजेत ना पण? तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमं वाढली पण भावनिक संवाद कमी झाला. समाज माध्यमांमुळे एकूणच समाज मानस बदललय. त्यामुळे संवाद करायची कधी भितीच वाटते. पुर्वी मित्रमंडळींमधे वाद झाले तरी संवाद चालू राहायचा. अपवाद फार कमी. पण हल्ली वाद होईल या भीतीने मी संवादच करायच टाळतो. आपला आत्मसन्मान आपणच जपावा. शाब्दिक क्रूरता, शाब्दिक हिंसा दीर्घकाळ तुमच्यावर परिणाम करत असतो. तोंडाने फटकळ असणारी माणसे पटकन विसरुन देखील जातात व नंतर तुमची विचारपुस करतात असे काही लोक म्हणतात. पण मला तसा अनुभव नाही. आपण समाज माध्यमांवर संवाद करण्याचा प्रयत्न करतो फेस्बुक या माध्यमाच्या व मानवी मनाच्याही काही मर्यादा आहेत. तुम्ही एखाद्या विषयावर गंभीर असता त्यावेळी समोरचा अतिशय लाईट/मिष्कील मूड मधे असतो वा याउलट. तुमच्या वेदनेचा विषय एखाद्याच्या विनोदाचा असू शकतो. आपल्या विनोदामुळे समोरच्याची दुखरी नस आपण छेडतो आहोत याची कल्पना एखाद्याला खरोखरच नसते. इथे देहबोली समजत नसल्याने टंकबोली व त्यातल्यात्यात भावदर्शिका यांचा उपयोग करावा लागतो.मानवी भावनांचे बहुतांशी अविष्कार यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तिमत्वाची फ्रेक्वेन्सी ही बदललेली असते व त्यामुळे संवाद व संबंध आउट ऒफ फेज च्या दिशेने जात असतात. समोरचा संवादोत्सुक असला तरी आपण आता संवादाच्या मूड मधे नाही हे प्रतिसादावरुन आकलन होईलच असे नाही. काही लोक प्रत्यक्ष भेट वा फोन यावरील संवादास फारसे उत्सुक नसतात पण फेसबुकवर संवादी असतात. त्यांच्याबाबत अंदाज लावणे फारच अवघड असते. मला इथे एखाद्या विक्षिप्त भुभुंची आठवण येते. मला भेटणारी बरीच भुभुलोक हे त्यांच्या देहबोलीवरुन आपल्याशी संवादाला उत्सुक आहेत की नाही हे मला समजते. पण एखादे भुभु देह्बोलीवरुन शेपटी हलवून संवादी असल्याचा आपला समज होतो व आपण हात लावायला गेल्यास वस्कन अंगावर येते असा अपवादात्मक अनुभवही आहे. फेसबुक/ कायप्पा सारख्या माध्यमांनी आपल्या मेंदुचा ताबा घेतला आहे. आपल्याला अनपेक्षित अशी काही प्रतिक्रिया आली की काहीतरी कटकारस्थान रचले जाते आहे असा समज करुन घेणारे मनोविकार इथेही दिसतात.फेसबुकवर काही लोकांचे व्यक्तिमत्व दुभंगते. सामाजिक क्षेत्रातील दिग्गज म्हणवली जाणारी व्यक्तिमत्वही इथे सटकतात. कारण ती ही शेवटी होमोसेपीयन सेपीयन असतात

मनातील व्यथा नाही बोललो तर मन झुरत राहते . काय करू कधी वाटते खूप बोलावे लोकांना सांगावे त्यांच्या वागण्या बोलण्याचा त्रास होतोय पण मग कळते आपणही कुठे स्वतःहून बोलतो .

कम्युनिकेशन म्हणजे केवळ पत्रव्यवहार नाही, त्यात देहबोली, आवाजातील चढौतार, हातवारे इ. अंगभूत असते. आणि इथेच समाजमाध्यमे मार खातात...