
दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान दक्षिण क्षितीजावर चमकणारा एक तारा लक्ष वेधून घेत असतो. अग्नेयेकडून नैऋत्येकडे संथपणे वाटचाल करणारा हा 'अगस्ती' (Canopus) नावाने ओळखला जाणारा तारा आहे. व्याधाच्या तार्यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Sirius) तारा सूर्याच्या तीनपट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे, तर 'अगस्ती' (Canopus) तारा सूर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे.
सूर्याप्रमाणेच 'अगस्ती' ताऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते अशी पुरातन काळापासून धारणा आहे. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो, या दरम्यान अगस्ती तारा दक्षिण गोलार्धात अधिक वर येऊन चमकू लागतो. मे महिन्याच्या शेवटी हा तारा हळूहळू दक्षिण दिशेला अस्त पावू लागतो. याच्या अस्तानंतरच मान्सूनची सुरुवात होते. त्यामुळे समुद्राचे पाणी पिणारा 'अगस्ती' तारा ही ओळख त्याला मिळाली असावी.
वैदिक साहित्यामधील सर्वात जुन्या समजल्या जाणार्या ऋग्वेदामध्ये 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख आढळतो. वृत्रासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर देवतांना त्रास देत होता. ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. हे बघितल्यानंतर इतर राक्षस आपला जीव वाचवून समुद्रात जाऊन लपले. राक्षस दिवसा समुद्रात लपत असत आणि रात्री समुद्रातून बाहेर येऊन देवतांना आणि ऋषींना त्रास देत असत. या जाचाला कंटाळून देवता भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णुंनी त्यांना अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवतांनी अगस्त्य ऋषींना हा प्रकार सांगितला. समुद्रात लपलेल्या या राक्षसांना मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकले. अखेरीस पाणी संपल्यानंतर लपलेल्या या राक्षसांचा देवतांनी वध करून त्यांची दहशत संपविली. ही कथा कधी ना कधी आपण ऐकली असेल.
अगस्ती ऋषींची अजून एक कथा रूढ आहे. मेरू पर्वताची उत्तुंग शिखरे पाहून विंध्य पर्वताला ईर्षा निर्माण झाली व त्याने त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. विंध्य पर्वताच्या वजनाच्या असंतुलनामुळे पृथ्वीच्या कालगणनेत फरक पडू लागला. त्यामुळे विंध्य पर्वताचा गर्व वाढू लागला, तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना साकडे घातले. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत असताना अगस्ती ऋषींना वाटेत विंध्य पर्वत लागला. अगस्ती ऋषींकडे असणाऱ्या अद्भुत सिद्धी विंध्य पर्वताला माहीत होत्या. त्यांचा आदर म्हणून विंध्य पर्वताने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी 'मी दक्षिणेतून परत येईपर्यंत' त्याला त्याच अवस्थेत राहण्याची आज्ञा केली. ते दक्षिणेतून परत येतील या आशेने विंध्याचल पर्वत रांगा अजूनही तशाच झुकलेल्या अवस्थेत वाट पाहत आहेत.
विंध्य अगस्ती कथेला एक खगोलशास्त्रीय आधार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे विंध्य पर्वताची उंची वाढली. त्याकाळी अगस्ती तारा विंध्य पर्वताची उंची वाढल्यामुळे पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या भूभागांवरून दिसेनासा झाला. हा काळ काही हजार वर्षांपूर्वीचा असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येणार्या काळात पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा तारा अगस्त्य ध्रुव (दक्षिण ध्रुव) बनेल आणि हे चक्र असेच चालू राहील.
याच 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यातून करताना दिसतात. कर्झन वायलीच्या वधानंतर इंग्लंडमध्ये सावरकरांच्या मागे ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा लागला होता. या दरम्यान ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर त्यांना 'सागरा प्राण तळमळला' हे जगप्रसिद्ध विरहगीत सुचले होते. त्याच काव्याच्या शेवटच्या कडव्यात सागराला दम देण्याच्या भाषेत ते म्हणतात, तुझ्या फेसाळलेल्या लाटेच्या आवाजाने हसून मला खिजवणार्या सागरा, तू मला परत माझ्या देशी नेशील असे वचन तू मातृभूमीला दिले होते. या आंग्लभूमीला घाबरून तू माझा वचनभंग करतो आहेस. मात्र तू माझ्या (भारत) मातेला अबला समजू नकोस. कथिल हे अगस्तिस आता । रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला, सागरा, प्राण तळमळला ।। तुला आठवते का? आमचे ऋषी अगस्ती एका क्षणात तुला प्यायले होते. तुला नामशेष केले होते. अगस्तीचा वारसा सांगणारे आम्ही तुला धडा शिकवू! हतबल असतांना देखील सागराला दम देणार्या कवी मनाच्या सावरकरांचा आवाका विराट होता.
चला तर मग! सूर्याहून अनेक पटींनी मोठे असणारे अनेक सूर्य एकाच वेळी डिसेंबर जानेवारीच्या रात्रींमध्ये साध्या डोळ्यांनी पाहता येतात. या दरम्यान दक्षिण दिशेला दरवर्षी साध्या डोळ्यांनी सहज दिसणारा 'अगस्ती' तारा आकाशात शोधूया. पुराणातून, मिथकातून, आख्यायिकांतून आणि काव्यातून आलेला आपल्या ऋषीमुनींचा समृद्ध वारसा या कथांच्या माध्यमातून सर्वांना सांगूया.
आणि हो, यापुढे हा तारा पाहिल्यावर सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रायटनच्या किनार्यावर 'सागरा प्राण तळमळला' हे विरहगीत गुणगुणणारे सावरकर आणि ही कविता लिहून घेणारे त्यांचे मित्र निरंजन पाल यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.
अगस्त्य दक्षिणेला समुद्रात
अगस्त्य दक्षिणेला समुद्रात बुडाला वा दिसेनासा झाला >> हे व्हायला दक्षिणेला समुद्र नको का??
बरं ते खलाशांना प्रवासात दिसलं असं तुम्हाला म्हणायचं आहे असं पुढच्या प्रतिसादावरुन वाटतंय. त्याकाळी नौकानयन किती प्रिमिटिव्ह होतं हे लंकेला जायला सेतू बांधला, नाव नाही बांधली यावरुन दिसतं. तर ते ही असोच. तरी तो समुद्रात बुडताना फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार महिने दिसेल. आता यावरुन राम रावण युद्धाचा काळ कोणाला काढायचा असेल तर आणि एक भाकडकथा लिहिता येईलच.
स्पॉट ऑन!
बाकी तो व्हिडिओ भाकडकथांना मागाहुन पुस्ती जोडत हेच विज्ञान आहे करणारा उत्तम नमुना आहे.
इतका प्रतिसाद काल खरडलेला पण पोस्ट करायचा राहुन गेला.
आत्ता चेराजची पोस्ट वाचली.
'अगस्ती' (Canopus) हा तारा
'अगस्ती' (Canopus) हा तारा सूर्यापेक्षा ६५ पट मोठा आहे आणि सूर्यापेक्षा तीस टक्के जास्त प्रखर आहे. पृथ्वीपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे. हा तारा पृथ्वीच्या जवळ जर असता, तर कल्पना करा की पृथ्वीवरच्या पाण्याची कधीच वाफ झाली असती. म्हणूनच या तार्याला ‘अगस्ती’ हे नांव समर्पक वाटते.
>>>>
आपल्याला पृथ्वीवर दिसणारी तार्याचा ब्राइटनेस तो तारा किती मोठा / गरम आहे याचबरोबर आपल्यापासून त्या तार्याचे अंतर यावर अवलंबून असते ना? पुराण काळात निरिक्षण करणार्यांना तार्यांमध्ये किती उर्जा आहे, आकाशात दिसणार्या तार्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर हे माहिती होते का? त्यांचे आकाश निरिक्षण उच्च दर्जाचे होते हे निर्विवाद. पण अगस्ती तारा हा खूप मोठा तारा असून त्याच्या उर्जेने समुद्राच्या पाण्याची वाफ होईल म्हणून त्याचे नाव अगस्ती हे थोडे फार फेच्ड वाटते.
त्याकाळी नौकानयन किती
त्याकाळी नौकानयन किती प्रिमिटिव्ह होतं हे लंकेला जायला सेतू बांधला, नाव नाही बांधली यावरुन दिसतं>>>>>
पाण्यात सेतू बांधणारे पाण्यावरची नाव का नाही बांधू शकणार? सोबत युद्ध करायला सैन्य घेऊन जायचे होते. किती नावा बांधणार हा प्रश्न पडुन सेतू बांधणे योग्य वाटल्याची शक्यता आहे.
"पण अगस्ती तारा हा खूप मोठा
"पण अगस्ती तारा हा खूप मोठा तारा असून त्याच्या उर्जेने समुद्राच्या पाण्याची वाफ होईल म्हणून त्याचे नाव अगस्ती हे थोडे फार फेच्ड वाटते."
ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तर मी सुरवातच करत नाही टवणेजी. काय काय लिहिणार. "जिलो अपनी जिंदगी" असा विचार करून सोडून देतो. निलेश ओकचे नाव वाचले म्हणून राहवले नाही.
"अगस्ती" वस्तुमान = १० x सूर्य वस्तुमान. १० पट गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याची वाफ होणे च्या कितीतरी पटीने family jewels कपाळात जाणे झाले असते, म्हणून " xx कपाळात असती' हे नाव जास्त समर्पक ठरले असते. Anyway l am sure there are many visibly bright stars with more than 10 solar mass (chat gpt tells me it's an order of 100). बाकी खगोल निरक्षण क्वालिटी वगैरे तर असणारच कारण सेक्स शिवाय दुसरा कोणता मनोरंजनाचा प्रकारच नसेल एकदा अंधार पडला की. गांज्याचा शोध एव्हाना लागला असेल तर काय बहार आली असेल "खगोल निरीक्षणाला".
On positive note, भारतीय अस्ट्रॉनॉमी च्या इतिहासासंदर्भात काहीही विचार करण्याअगोदर मयांक वाहिया, ex professor, department of astronomy and astrophysics, TIFR ह्यांना ऐकायलाच हवं. एक सहज मिळालेली लेक्चर लिंक देऊन ठेवतो for anyone who cares https://youtu.be/zEYPdo_d6Zk?feature=shared
मार्गी यांनी निलेश ओक यांचा
मार्गी यांनी निलेश ओक यांचा संदर्भ दिला याचे मलाही आश्चर्य वाटले. नंतर चेराज यांचा प्रतिसाद वाचला. हास्यास्पद लिखाण आहे निलेश ओक यांचे. त्याला ते संशोधन म्हणतात.
धन्यवाद शिनुक्स !
धन्यवाद शिनुक्स !
चेराज आणि अमितव.
मी भारतातुन दक्षिणेला समुद्र दिसतो असे कुठेही म्हटली नव्हत.
निलेश ओकना डॉक्टर मी कधीही म्हटले नाही.
रामायणाबद्दल त्यांची मते बरोबर आहेत असे मी कुठेही म्हटले नाही आणि ते बरेच कपोल कल्पित असावे.
उत्तान्पाद आणि ध्रुव हे ओरायन आणि अगस्त्य असावे आणि त्याचा नौकानयनात (दक्षिण पुर्व एशियाबरोबरच्या व्यापारात) वापर केला जात असावा हे मात्र जास्त शक्य आहे. अगस्त्याची समुद्र पिण्याची गोष्ट तशीच आली असावी. आपल्याकडे इतर तार्यांत पण सप्तर्षी आहेतच.
विश्वामित्र त्रिशंकु, इतर गोष्टी आकाशात पाहुन लिहिल्याचे सहज जाणवते. यात काही ऐतिहासिक तथ्य असल्याचा निलेश ओक यांच्या
प्रमाणे माझे मत नाही. पण त्याच्या काही गोष्टी पुर्ण नाकारता येण्या जोग्या नाहित. पुरावा हा प्रस्थापित झाला नसला तरी काही गोष्टी लक्ष वेधुन घेतातच. रामाला समुद्र ओलांडायच्या आधि अगस्ती ने भटुन शिवलिंग (नटराज रिलेटेड) स्थापन करायला संगणे ही गोष्ट असली सत्य नसले तरी ती गोष्ट लिहिणार्या च्या कल्पनेला काही वास्तविक रुढींचा आधार असु शकतो.
मी काही इतिहासकार नाही आणि मायबोलीवर असे लिहुन काही मोठे संशोधन होणार नाही इतकी कल्पना मला आहेच. फर्मीच्या चार पॅरॅमीटर बरोबर माणसाच्या नको तिथे पॅटर्न शोधायच्या सवयीबद्दल पण मला पुर्ण कल्पना आहे. पण म्हणुन कोणतेही विचार कुठे माण्डु नयेत असेही नाही.
शिनुक्स, तुम्ही लिहीत रहा.
शिनुक्स, तुम्ही लिहीत रहा. चर्चा होणार आणि मते मतांतरे होणार. ही तुमच्यावर वैयक्तिक टिका टिपण्णी नाही.
चेराज, लिंकबद्दल धन्यवाद. बघून प्रतिक्रिया देईन.
सगळ्यांना लाइट पोल्युशन शिवाय न दिसणारे रात्रीचे आकाश, त्याची कालगणनेसाठी आणि दिशादर्शनासाठी असलेली उपयुक्तता सर्व संस्कृत्यांनी ओळखली आणि वापरली. अगदी इतर समाजांशी संबंध नसलेल्या इंका आणि मायन सुद्धा तेच करत होते जे बॅबिलोनियन, ग्रीक, पर्शियन, भारतीय, चिनी करत होते. आजच्या आम्हाला सगळेच ठाउक होते युगात सगळ्याचे घाऊक गर्वीकरण होते (गर्व से कहो)
निलिमा, तुम्हाला उद्देशून नाही हे! तुम्ही पण व्यवस्थित तुम्हाला जे योग्य वाटते आहे ते दिले आहे.
नासदीय सूक्त वाचून थक्क होते पण त्यांना बिग बँग ची इक्वेशन माहिती होती इथे आली चर्चा की क्ष्क्ष कपाळात.
नासदीय सूक्त वाचून थक्क होते>
नासदीय सूक्त वाचून थक्क होते>>>
थक्क होण्यासारखे काय आहे त्यात?
<<पण त्याच्या काही गोष्टी
<<पण त्याच्या काही गोष्टी पुर्ण नाकारता येण्या जोग्या नाहित. पुरावा हा प्रस्थापित झाला नसला तरी काही गोष्टी लक्ष वेधुन घेतातच.>>>
निलिमा, आणि मार्गी तुम्ही वाचले नसतील तर किंवा जर तुम्हाला अगदी उत्तम संस्कृत येत नसेल त्यामुळे वाचले आहेत परंतु मूळ संस्कृत श्लोकांचा अर्थ तपासला नसेल तर, त्याचे रामायण महाभारत (परत) एकदा वाचा असे सुचवेन. पूर्ण वाचलेच पाहिजे असे नाही, प्रस्तावनेचे प्रकरण ( संशोधन असावे, पॉपरची थेअरी, सौर्य-चान्द्र मास-वर्ष याबद्द्ल त्याने बरेच लिहिले आहे सुरवातीला) वगळुन विषयाला हात घातल्या पासुन वाचा आणि त्याने संदर्भास घेतलेल्या संस्कृत श्लोकाचा अर्थ (तुम्हाल उत्तम संस्कृत येत असेल तर उत्तमच नाहीतर नेटवर तपासा. अनेक संस्कृत पंडितांनी अर्थ सांगितले आहेत.) अणि निलेश ओकने त्याचा अक्षरशः बादरायण संबंध लावुन काढलेला अर्थ पहा.
पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही, विषयाला हात घातल्यापासुन २५% वाचुन बघा, सगळे वाचले तर उत्तमच. त्याने योग्य अर्थ लववला ते चेरी पिक करावे लागतील एवढे कमी आहेत. पुरावा प्रस्थापित होण्याचा प्रश्नच नाहीये तर भलेतच कसेही अर्थ काढुन पुरावा म्हणुन घेतले आहेत.
वानगी दाखल: सुरवातीलाच निवृत्ताSकाशशयना पुष्यनीता हिमारुणा | शीता वृद्धतरायामास्त्रिया यान्ति सांप्रतम्|| (अरण्यकाण्ड १६-१२).
यात 'रात्रीचे प्रहर' हे अनेकवचन असल्याने सुरवाती पासुन श्लोक अनेकवचनात आहे. अर्थः या समयी पौषातल्या रात्रीचे तीन प्रहर मोठे होत जातात, हिमकणांनी धूसर होतात, थंडी वाढते, आकाशा खाली (उघड्यावर) झोपत नाहीत. अरुण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे 'मिश्रीत / भरलेले' असा अर्थ आहे. हिमारुण हा समास झाला. अर्थ ( frosty) ( हिमकणांनी ) धूसर. रात्रीच्या तीन प्रहरांना विशेषण लावले असल्याने त्याचे अनेकवचन हिमारुणा वापरलेय. (या श्लोकाचा अर्थ हपांनीही सांगावा अशी विनंती.)
ओक साहेब असे श्लोक देऊन त्यांचे अर्थ त्यांनी काय व कसे लावले याबद्दल काहीही लिहित नाहीत सरळ निष्कर्ष लिहितात. ते लिहितात This is clear evidence of sun setting near Pushya. कसा काय श्लोकाचा ( यामागील व पुढील दहा दहा श्लोक सलग घेतले तरी) अर्थ किंवा निष्कर्ष Sun setting near Pushya होइल? पुष्य दिसले, हिमारुणात अरुण दिसला, निवृत्ताSकाशशयनात निवृत्त दिसले म्हणुन तर नाही लावला हवा तो अर्थ?
रामायणात अभिजीत तारा ध्रुव तारा होता हा निष्कर्ष सुद्धा असाच ओढुन ताणुन आणला आहे, त्यांनी संदर्भ दिलेल्या श्लोकात किंवा इतरत्र तसे म्हटलेले नाही.
आणि त्यांनी रामयाण महाभारतात शोधुन काढलेल्या इतर काही पुराव्यांचा नमुना:
"आणि त्या सभेत रामाचा चेहरा शरदाच्या चांदण्या प्रमाणे उजळुन निघाला होता." निष्कर्ष: This is the evidence that it was Sharad rutu!.
ती दोघे त्या रथात अशी शोभून दिसत होती जणु ( यद्वत हा शब्द श्लोकात वापरला आहे, ज्यावरुन रुपक आहे हे स्पष्ट होते) अमावस्येला क्षितीजाशी जाणारे (गतौ - हे द्विवचन श्लोकात वापरले आहे, चंद्र-सूर्याच्या जोडीला ) चंद्र-सूर्यच.
निष्कर्षः: इथे गतौ अमावस्या लिहिले आहे म्हणजे नुकतीच अमावस्या होऊन गेली याला दुजोरा मिळतो.
अशा तर्हेच्या पुराव्यांचे संशोधन(?) आहे, त्याला कोण, कसे प्रस्थापित करणार?.
त्यांचे हे दावे कसे फोल आहेत यावर सुध्दा पुस्तकं आली आहेत. त्यातील डॉ. राजाराम राय यांचे पुस्तकही मी वाचले आहे. त्याची ओळख देणारा हा व्हीडीओ. डॉ. राजाराम रॉय यांचे यावर ब्लॉग सुढा आहेत.
Around 15,000 years ago,
Around 15,000 years ago,
humans were primarily hunter-gatherers, living in small groups and relying on foraging and hunting for food. This period is significant as it marks the time when humans began to migrate into the Americas and develop more complex social structures and tools.
मापृ इतक्या सविस्तर
मापृ इतक्या सविस्तर पोस्टीबद्दल धन्यवाद.
राजवाड्यानीही असेच ओढुन ताणुन निष्कर्ष काढुन विवाहसंस्थेचा इतिहास लिहिलाय हे दाखवणारे पुस्तक कोणीतरी लिहिलेय.
थक्क होण्यासारखे काय आहे
थक्क होण्यासारखे काय आहे त्यात?
>>
@साधना https://en.wikipedia.org/wiki/Nasadiya_Sukta
सृष्टीच्या उगमाच्या आधी अस्तित्व या शब्दालाही काही अर्थ नव्हता, प्रकाशही नव्हता, अंधारदेखील नव्हता. देवही नंतर निर्माण झाले.
इतका प्रोफाउंड विचार हे जेव्हा कधी लिहिले असेल त्या मनुष्याने केला हे मला थक्क करते.
रामायणात अभिजीत तारा ध्रुव
>>>
मानव छान माहिती! मलाही बरेच से संदर्भ ताणलेले च वाटतात, पण काही माहितीचे बीट्स तसे बरोबर पण वाटतात. ओफ कोर्स आपण म्हटले तसे कालमापनासाठी ते प्रुफ होत नाहित, पण कधी कधी इतर काही माहिती त्यातुन मिळते. उदा अहोरात्र संवत्सर हा निलेश ओक यांचा संदर्भ मला ताणलेला वाटला. पण ग्रीक तासाला आणि वर्षाला एकाच नावाने मोजत असत ( ओरा ज्याचा अर्थ होरा आणि अवर किंवा इयर हा कॉन्टेक्स्ट प्रमाणे होत असे. आणि प्रत्येक दिवसात पण ग्रीक ऋतु मोजत असत. Hóra (ὥρα) means hour, time, or season) हे कळल्यावर यात काही तथ्य असु शकते. जरी याचा काल मापनासाठी उपयोग ओढुन ताणुन केला तरी काही उपयुक्त माहिती जी मला तरी माहित नव्हती ती मिळाली इतकेच मला महत्व.
त्यातील डॉ. राजाराम राय यांचे पुस्तकही मी वाचले आहे. त्याची ओळख देणारा हा व्हीडीओ. डॉ. राजाराम रॉय यांचे यावर ब्लॉग सुढा आहेत.
>> यासाठी धन्यवाद! व्हिडियो आजच पाहिन.
मानव, खूप संयत प्रतिसाद.
मानव, खूप संयत प्रतिसाद. अतिशय उत्तम शब्दात तुम्ही निलेश ओक यांच्या कामातील फोलपणा दाखवला आहे. मी त्यांचं कुठलंच लिखाण वाचलेलं नाही. पण मुलाखती किंवा व्याख्यानं ऐकली आहेत आणि त्यात ते वडाची साल पिंपळाला लावण्याचे प्रकार करतात असा समज माझा झाला होता. त्यांच्या थियरीला जुळणारे एखाद दुसरे संदर्भ सोडले तर बाकीच्या विरुद्ध जाणाऱ्या सर्वच संदर्भांकडे ते चक्क इग्नोरास्त्र मारतात. हा प्रकार मला पटला नाही.
Pages