मुंबईत 17 मुलांचं अपहरण

Submitted by जावेद_खान on 30 October, 2025 - 10:31

रोहित आर्या नावाच्या माणसाने मुंबईत 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. सरकारकडे त्याचे काही पैसे बाकी होते म्हणून त्याने असं केल्याचं बोललं जातंय.

त्याने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलाय

https://www.indiatoday.in/india/video/any-wrong-move-and-chilling-video-...

स्वच्छता अभियानावर आधारित काही लघुपट आणि कुठलेसे कार्यक्रम त्याने केले होते. त्याने पंधरा वर्षाखालील जवळपास 17 मुलांना मुंबईत एका स्टुडिओमध्ये बोलावून डांबून ठेवले.

सध्याच्या घडीला पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याचे कळते आहे.

स्वतःला सामान्य नागरिक म्हणवून घेणाऱ्या मनुष्याने असं टोकाचे पाऊल का उचललं असेल बरे?

Group content visibility: 
Use group defaults

रोहित आर्याला हे काम तेव्हाचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. त्याला सरकारकडून येणे असलेली रक्कम मिळेपर्यंत म्हणून केसरकरांनी स्वतः काही रक्कम दिली असं रोहित आर्या आणि केसरकर या दोघांनी म्हटल्याचं वाचलं / ऐकलं.
असं का केलं असेल? public private partnership चा हा नवा प्रकार आहे का?

लोकसत्तेचा अग्रलेख - बांडगुळांचे बंड

निवडक भाग
कोणा रोहित आर्या नामे मध्यमवयीनाने वेबमालिकेच्या निवड चाचणीचे कारण पुढे करत अनेकांस एके ठिकाणी बोलावून घेतले आणि नंतर त्या सर्वांस ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. तो सर्वथा निषेधार्ह. कारण काहीही असो. पण आयुष्याची सुरुवात ज्या वयात करावयाची त्या वयात कोणा क्षुल्लक व्यक्तीच्या माथेफिरूपणास सामोरे जावे लागल्यास मनावर खोल आघात होतो. ते व्रण जाता जात नाहीत. सरकार कोणा कामाचे आपले देणे चुकते करत नाहीत, असे या व्यक्तीचे म्हणणे. ते किती खरे किती खोटे याची शहानिशा आता होणार नाही. कारण जी व्यवस्था त्याचे कथित देणे लागत होती त्याच व्यवस्थेने ती देणे मागणाऱ्यास नामशेष केले. त्याचे कृत्य सर्वथा असमर्थनीय ही बाब मान्य केली तरी त्यास गोळी घालून ठार करण्याच्या सरकारच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. हा रोहित आर्या कोणी सराईत दहशतवादी नव्हता, ना एखादी टोळी त्याच्या समवेत होती. तो एकटा होता. हाती काही शस्त्रे होती असेही नाही. एका एअरगनवर तो हे ओलीस नाट्य करत होता. त्याचा उद्देश होता फक्त व्यवस्थेचे लक्ष वेधून घेणे आणि आपली व्यथा जगासमोर मांडणे. असे असतानाही, त्यास तास- दीडतास चर्चेत गुंगवून ठेवण्यात यश आलेले असतानाही आणि मुख्य म्हणजे ओलिसांची सुटका झालेली असतानाही पोलिसांनी त्याच्या छातीवर गोळी झाडली. ही कारवाई अशा प्रसंगासाठी प्रशिक्षित राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी केली नाही. ही गोळी झाडली ती पोलिसाने. ज्या अर्थी पोलीस त्याच्या छातीचा वेध घेऊ शकले त्याअर्थी त्याच पोलिसांस या तरुणास जायबंदी करण्याची संधी होती. ती त्यांनी अजिबात साधली नाही. तसा प्रयत्नही केला नाही. या तरुणाने कसलाही हल्ला, गोळीबार सुरक्षा रक्षकांवर केलेला नसताना पोलिसांनी थेट त्याला ठार केले. या तरुणाचे म्हणणे खरे होते किंवा काय यावर कोणतेही मत प्रदर्शन करायचे नाही असे ठरवले तरी त्याच्या आरोपांतून काय चित्र निर्माण होते?

माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर काही खुलासा करतात. या तरुणास ‘स्वत:च्या’ खिशातून आपण काही आर्थिक मदत केली होती, असे माजी मंत्रिमहोदय म्हणतात. त्यांच्या दातृत्वाबाबत कुठलीही टिप्पणी न करताही त्यावर प्रश्न असा की मंत्रिमहोदयांवर ती वेळ मुळात का आली? अन्य कोणाकोणास कोणकोणत्या मंत्र्यांनी अशी ‘स्वत:च्या’ खिशातून आर्थिक मदत केली? ती किती होती? त्याचा हिशेब त्यांनी आयकर विवरण पत्रात दिला आहे काय? ही मदत त्या तरुणाने मागितली होती काय? तिची परतफेड तो कशी करणार होता? की ते अपेक्षित नव्हते? म्हणजे हा मदतनिधी मंत्रिमहोदयांनी धर्मार्थ खर्च केला म्हणायचे. या सगळ्या वा यातील काही प्रश्नांची उत्तरे तो तरुण जिवंत असता तर कदाचित मिळाली असती. पण ती मिळू नयेत यासाठीच त्याचे ‘एन्काऊंटर’ केले गेले, असे कोणी म्हटल्यास ते वावगे ठरेल?

त्याला न्यूट्रल करून, अटक करून खटला चालवला असता तर अनेक लोक उघडे नागडे झाले असते.

त्यामुळे सोयीस्कर बाजू घेऊन संपवला त्याला.

केलेल्या कामाचे अडीच वर्षांपासून पैसे दिले नाहीत, घर चालवणंही कठीण झालंय', महाराष्ट्रात कंत्राटदारांची स्थिती

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले -अशा प्रकाराला कंटाळून जलजीवनचे काम करणारे सांगलीचे अभियंते हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. नागपूरचे पी. व्ही. वर्मा यांनी देखील आत्महत्या केली. पवई येथे देखील घटना घडली, त्यात आर्या यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला. त्यांचा विचार हा चुकीचा असला तरी शासन अशाप्रकारे देयक थकीत ठेवत आहे, त्यामुळे असे पाऊल लोक उचलत आहेत.
वर्मा आणि हर्षल प्रमाणेच राज्यातील विविध विभागात काम केलेल्या कंत्राटदार, अभियंते आणि इतर व्यक्ती असे एकूण चार लाखांपेक्षा अधिक लोकांचे 76 हजार करोड रुपयांच्या कामांचे देयके शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांनी केला आहे.

त्याने मुलांना ओलीस धरून चूक केली का? तर होय,
त्याला ठार मारले ते बरोबर केले का? नक्कीच बरोबर केले. यापुढे कोणी कितीही system मुळे पिचलेला असेल तरी असे पाऊल उचलायला नको

पण आता जेव्हा या नाट्यावर पडदा पडलाच आहे तर त्याने केलेल्या आरोपांची शहानिशा होऊन जर खरेच कोणी दोषी असतील तर त्यांना शिक्षा करावी. या मागे कोणी मोठी धेंडं खरच असतील तर त्यांच्या चुकांवर याने फक्त लहान मुलांना ओलीस ठेवले या कारणामुळे पडदा टाकण्यात येऊ नये.

यापुढे कोणी कितीही system मुळे पिचलेला असेल तरी असे पाऊल उचलायला नको >>रोगावर औषध शोधण्यापेक्षा रोग्याच्या इलाजाला प्राधान्य दिल्यानेच तर आजची परिस्थिती उद्भवली आहे. जर त्याच फॉर्मुल्यावर काम करत राहिलो तर निदान या घडीला जगातल्या कोणत्याच देशाकडे एवढं मोठं सैन्य नाही आहे जे यामुळे भविष्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उद्रेकाच्या यादवीला चाप लावू शकेल आणि त्यावेळी काय चुक काय बरोबर, काय अनावश्यक, काय उपयोगी या फंदात न पडता, सुक्या सोबत ओलेही जाळून (कारण आज जात्यातले भरडले जात असताना  सुपातले नामानिराळे रहाण्यात धन्यता मानत आहेत) सर्व गोष्टी फॅक्टरी रीसेट केल्या जातील.

रोहित आर्याचा खून झाला त्याला आज सात दिवस होतील. त्याने जे आरोप केले त्याची चौकशी होईल असे वाटण्याइतका निरागसपणा मला लाभो.
तसंच त्याला छातीवर गोळ्या घालायच्या आधीच ओलिसांची सुटका झाली होती, या गोष्टीकडे दुर्लक्ष करणारी दृष्टीही मला लाभो.

तसंच त्याला छातीवर गोळ्या घालायच्या आधीच ओलिसांची सुटका झाली होती, या गोष्टीकडे दुर्लक्ष करणारी दृष्टीही मला लाभो.

>>> अरे बापरे! ही बाब माहीत नव्हती.

मलाही माहीत नव्हती ही गोष्ट
याची लिंक मिळेल का?
त्याला मारले ते योग्यच केले असे म्हणणाऱ्यांचे मत कदाचित बदलेल.
कारण मलाही असे वाटत आहे की त्याला कुठले उदाहरण सेट करायला मारले नसून काही गोष्टी जगासमोर येऊ नये म्हणून मारण्यात आले आहे.

Pages