शाहरुखचे स्टारडम

Submitted by फार्स विथ द डिफरंस on 24 October, 2025 - 07:37

शून्य मजकूर.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋ सर, त्याआधी तुमच्या घरात घुशी फिरत होत्या त्यावरचा धागा काढा ना
>>>>>>>

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
नोंद करून ठेवतो पक्की आता.. झाल्यास येत्या वीकेंडला किंवा जसे जमेल तसे लवकरात लवकर काढतो नक्की Happy

ऋन्मेष, काय वेगळं आहे “किंग” च्या ट्रेलरमधे? तेच खोटे स्लोमोशनमधे मारामारीचे सीन व कायतरी वेगळा दिसतोय असं भासवायचा प्रयत्न करत चालणारा शारुक. मलापण शारुक आवडतो पण तेच फसवे सिनेमे घेऊन येतो वेगवेगळी नावे देऊन. त्यापेक्षा निखळ विनोदी सिनेमा व विद्या बालनसारखी टॅलेंटेड सहकलाकार असलेला सिनेमा यावा अशी स्वप्नं मी पहात बसते.

एक डंकी वेगळ्या धाटणीचा केलेला की.. पण हिराणीने नीट जमवला नाही तो.

पठाण मलाही ओके ओके च वाटला होता. पण जवान वेगळा प्रयोग होता शाहरुखसाठी. रजनीकांत किंवा तश्याच साऊथ इंडियन स्टाईलने ऍक्शन हिरो करणे.

हा किंग आता रिपीट मोड वाटत आहे खरे.. पण त्याशिवाय पैसा कसा येणार या व्यवसायात. असे सिक्वेल, फ्रॅंचाईजी मूवी आणि अमुकतमुक युनिव्हर्सच निघतात हल्ली जास्त.

डंकी वेगळा विषय होता खरा, पण ‘पहावा का??’ हा विचार करण्याआधीच सगळ्या मायबोलाकरांनी त्याला उचलुन भिंतीवर फेकला व त्याची तंगडी तोडली म्हणुन मग पाहिला नाही.
अ‍ॅक्शन सिनेमे आवडतात पण तेचतेच आलं की नको वाटतं. बघु, तरीही मूड झाला तर पाहीन. जवान जरा पाहिला पण झेपला नाही म्हणुन बंद केला. आमची पिढी जुनी झाली. तरुण पिढीला आवडत असेल तर तसेच सिनेमे येणार म्हणा.

डंकी वेगळ्या धाटणीचा हे मान्य, पण जमला नाही. पठाण आणि जवानही जमले नाहीत. पण माझ्या डोक्यातली एसआरकेची इमेज अजून तशीच आहे. म्हणजे नवी आहे. तीच ती फिलीमवाली इमेज टिकली नसती. आता आहे ती टिकली आहे. इथवर टिकली म्हणजे अजून खूप टिकणार हे नक्की.

खूप छान लेख येत आहेत इथे शाहरुखबद्दल.

गेल्या काही काळात साउथ इंडियन सुपरस्टार समोर बॉलीवूडवाले काहीच नाहीत अश्या आशयाच्या पोस्ट फिरताना आपण बरेच पाहिल्या असतील.

त्यांची शाहरुख सरांबद्दल आदराची आणि ते शाहरुखचे कसे मोठे फॅन आहेत हे दर्शवणारी वक्तव्ये या रीळमध्ये बघू शकता. इतकेच नाही तर पुढे ग्लोबल क्रेझ सुद्धा दिसेल.

https://www.facebook.com/share/v/15k19W4ct5/

शाहरुखचे स्टारडम वादातीत आहे.

समस्त फॅन वर्गाची क्षमा मागून सांगते ऊद्या जर शाखा निधन पावला तर मुंबई बाॅलिवूड महाराष्ट्र दिल्ली हे एक दिवस सुधा बंद होणार नाहित.

झुबिन गर्ग च्या मृत्यु ने असम बंद पडला होता.. शाखा कसलाही सुपरस्टार असू दे पण त्याच्यासाठी स्वयंस्फूर्तीने किती लोक बंद पाळतील देव जाणे.

No I am not...but I am accurate in judging. So chill. ईथेच किती लोक प्रतिसाद देतात ते बघा मोजके दहा - बारा सोडून.

असे म्हणतात कोणाच्या मरणाचा विषय निघाला की त्याचे आयुष्य वाढते.

शाहरुखला शंभर वर्षाचे आयुष्य मिळो.

कारण तो अखेरच्या क्षणापर्यंत सर्वांना असेच एंटररटेन करत राहणार याची पुरेपूर खात्री आहे Happy

अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा न्यूज चॅनल्सने सुद्धा दिल्या. ईशा देओलने वडलांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले आहे. तिच्या भावनांचा आणि संवेदनांचा आदर आहे.
(हे या धाग्याला अनुसरून नाही.)
लोक इतरांच्या निधनाबद्दल, जवळच्या लोकांच्या निधनाच्या ओझरत्या उल्लेखावरून विनोद करू शकतात, आपली विकृती दाखवू शकतात याचा पुरेपुर अनुभव आहे. अशांना महामृत्यूने क्षमा करावी ही प्रार्थना.

कागदे यांचा प्रतिसाद फारच वाईट.<< +१

अरेरे, किती तो द्वेष. तरीही काही फरक पडत नाही त्याला.. लोक मात्र लवकर बरे होऊ देत

No I am not...but I am accurate in judging. So chill. ईथेच किती लोक प्रतिसाद देतात ते बघा मोजके दहा - बारा सोडून. >>

तुम्हाला अंदाज सुद्धा नाही की शाहरुख खानचे फॅन्स किती किती आणि कुठे कुठे आहेत.

जेव्हा बॉलीवूड बॅन चे दंगे चालू होते तेव्हा फक्त त्याचा पिक्चर म्हणून जेव्हा मी इथे जर्मनीत सलग पाच दिवस जवान (लिहायच राहिल होत) बघितला होता. आणि हो दररोज 80 टक्के पब्लिक जर्मन होतं.

जनरली माझ्या सगळ्या ग्रुप मध्ये फार राईट हिंदुत्ववादी लोकांच्या नादाला लागत नाही मी. पण शाहरुखचा विषय आला की तेव्हा मात्र गप्प बसायचं हे त्यांना सुद्धा कळते.

केवळ शाहरुखच्या प्रेमापाई 25 वेळा स्वित्झर्लंडला जाऊन आलो आहे. एक न एक जागा जिथे त्याने शूटींग केल ती पाहिली आहे . प्रत्येक वेळी प्रत्येक वयोगटातले त्याचे फॅन भेटलेत मला. अगदी इजिप्तचे पिरॅमिड बघायला ज्यावेळी गेलेलो, त्यावेळी तिथल्या लेडी गार्डने इंडिया म्हटल्यावर शाहरुख खानची कंट्री म्हणून अगदी हसून स्वागत केलेला आठवतं मला.

तुमचा धागा लेखकावर काय असेल तो राग असेल (खर तर तो माझ्याही डोक्यात जातो. माझे दोन आवडत्या गोष्टी , क्रिकेट आणि शाहरुख याला त्यांन इथे एवढा dilute केलं आहे की मी मायबोलीवर लिहायलाच येत नाही) पण म्हणून असलं काही बोलणं मूर्खपणा आहे एवढंच .

शारुखची हवा (मार्केटिंग) त्याने सिस्टमॅटिकली निर्माण केलेली आहे, ज्याचं क्रेडिट त्याला दिलं गेलं पाहिजे. सुरुवातीला कोटरीने (जोहर, चोप्रा इ.) त्याचा भाव वाढवुन ठेवला, पुढे सोशल मिडियाने त्याला अजुन हवा दिली. थोडक्यात, एका सुमार अ‍ॅक्टरला त्याच्या लायकिपेक्षा जास्त यश मिळालेलं आहे..

बॉलिवुडमधे कित्येक उदाहरणं आहेत, मिडियॉकर अ‍ॅक्टर्सनी मेहनतीने अभिनयात वेगळी पातळी गाठल्याची. अक्षय कुमार हे एक ठळक उदाहरण. शारुख मात्र अजुनहि चाचपडतोच आहे. एनिवे, गॉड ब्लेस हिम अँड हिज फॅन्स...

एका सुमार अ‍ॅक्टरला त्याच्या

>>

सुमार?????????

शारुखची हवा (मार्केटिंग) त्याने सिस्टमॅटिकली निर्माण केलेली आहे,
>
राजू बन गया जेंटलमन, चमत्कार, कभी हा कभी ना, बाजीगर... यावेळी कोण चोप्रा जोहर होते?
त्यांच्यासोबत देखील आधी डर केला आणि गाजवला..
त्याची ती रोमँटिक हिरो निर्माण व्हायच्या आधीच त्याने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले होते.
अन्यथा एक outsider कशी आपली हवा तयार करणार या फिल्म इंडस्ट्रीमध्ये? नेपोकिड किती होते त्याच्या काळात.. अशी हवा करणे आणि ती टिकवणे सोपे असते तर त्यांचीच झाली असती.

आता या वॉट्सॅप अंकलचं काय करायचं. नेहेमी सूतावरुन स्वर्ग गाठायला जातात आणि दाणकन आपटतात. एखाद्याचं काम अ‍ॅप्रिशिएट करणं आणि फॅन असणं यातला फरक यांना अजुन समजत नाहि. कठिण आहे...

Pages