रोलर प्रकारातले पक्षी एकंदरीत सुरेख असतात असं म्हणायला हरकत नाही.
मी आतापर्यंत दोनच रोलर्स पाहिलेत. एकदा कामशेतला दिसलेला इंडीयन रोलर (मराठीत नीलपंख/नीलकंठ?) आणि अलिकडे बाल्टीमोरच्या झू मध्ये दिसलेला हा Blue bellied Roller. त्याचा आफ्रिकन बंधू.
किती देखणं असावं एखाद्याने? फिकट गुलाबी/पीच रंगाची मान, काळे आणि अगदी इंकब्ल्यू रंगाचे पंख. त्यात मध्येच चमकदार आकाशी रंगाचा पट्टा. उडताना हे पसरलेले पंख दहापट जास्त सुंदर दिसतात.
वेगवेगळ्या पोझेसमधल्या असंख्य फोटोंमधून एक निवडणं आणि त्याहीपेक्षा मूळ रंगांच्या शक्य तितक्या जवळ जाणार्या छ्टांच्या पेन्सिल्स गोळा करणं हे काम आलं. पंधरा वर्षांपूर्वी घेतलेला ४८ छटांचा Prismacolor पेन्सिल्सचा सेट मदतीला धावून आला. आश्चर्य म्हणजे पेन्सिल्सचा दर्जा अजूनही टिकून आहे हे पाहून धन्य झाले. 
त्या निळाईत हरवायला झाले. म्हणून याचे नाव दिले - Wings of Sapphire
Strathmore 300 series artist paper.
Prismacolor premier.
Prismacolor VeryThins.
स्केच =
स्केच = 👌
धन्यवाद, माधव, निर्मल,
धन्यवाद, माधव, निर्मल, अनिंद्य!
Pages