खंत

Submitted by Meghvalli on 18 September, 2025 - 08:05

तारुण्यातली स्वप्ने विरून गेली, ही खंत।
आयुष्याची कळी गर्दीत चिरडून गेली, ही खंत।।

जपलं जे गुपित हृदयात, अंतरीच राहीलं।
मनातून ओठांवर न आलं, ही खंत।।

वाटलं होतं उमलतील पुन्हा नवी फुलं।
न उमलतांच पाकळ्या गेल्या झडून -ही खंत।।

प्रीत माझ्या मनातली, जरी गहिरी।
तुला न कळली सखे, ही खंत।।

"मेघ" अश्रूंमध्ये भिजत भिजत रात्र सरली।
माझा उदयस्त सूर्य मलूल-ही खंत।।

गुरुवार, १८/९/२५ , ०३:०१ PM
अजय सरदेसाई -मेघ
meghvalli.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघ, ही कविता गद्य, सरधोपट वाटली. त्यात चमचमणार्‍या उपमा नाहीत. किंवा नवीन एखादा विचार नाही. पण पुलेशु.

@सामो you are right.उगाच पोस्ट केल्या सारखी वाटली नंतर.आजुन परिपक्व झालीच नव्हती.विषय होता पण शब्द आणि expression नव्हते. जमली नाहीच कविता .
फक्त हे कडवं
"प्रीत माझ्या मनातली, जरी गहिरी।
तुला न कळली सखे, ही खंत।।"
जरा ठिक आहे आणि त्या भवती कविता विणण्याचा विफळ प्रयत्न केला.
ओडून ताणून कविता खुलत नाही हेच सत्य आहे.

हे चित्र माझ्या भाचीने AI वर रेंडर करुन दिलं आहे मला. ते मात्र बरं जमलय .
आपल्या सच्या प्रतिक्रियेसाठी आभार _/\_

>>>>जमली नाहीच कविता .
अर्रे असे काही नाही. इट्स अ प्रॉसेस दॅट मॅटर्स नॉट जस्ट अ प्रॉडक्ट.
>>>>>हे चित्र माझ्या भाचीने AI वर रेंडर करुन दिलं आहे मला. ते मात्र बरं जमलय .
खूप सुंदर Happy