जिन्नसः:
मसाले:
३-४ सुक्या लाल मिरच्या भिजवून( तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाच्या घ्या),
अर्धा चमचा जीरं पूड भाजून.
पेरभर आलं किसून,
४-५ लसूण पाकळ्या ठेचून.
वरील सर्व वाटून लाल खर्डा तयार ठेवावा.
बुचकाभर कोथिंबीर बारीक चिरून,
४-५ काजू भिजवून,
पाव वाटी खोवलेलं खोबरं
हळद, हिंग रोजचे कलाकार.
बदामाची पूड १ वाटी
४ कच्ची प्लॅन्टेन (वेफर्स्ची केळी),
तळायला तेल
कृती:
केळी धूवून वाफवून घ्यावी बोट चेपी होइपर्यंत. साल सोलून मग कुस्करून घ्यावी.
आता टोपात तेल टाकून तापले की हिंग घालून खर्डा परतावा. मग कुस्करलेली केळी टाकून छान पारतावे. वरून ओलं खोबरं व कोथिंबीर घालून १-२ वाफा काढून गॅस बंद करावा.
मिश्रण थंड झालं की बदामी आकाराचे कटलेट करावे व त्यावर एक काजू खोवुन द्यावा. मग बदामाची पेस्ट करावी पाव वाटी पाणी घालून आणि त्यात कटलेट बुडवून तव्यावर खरपूस तळावे.
त. टी: बदामची पूड नाही लावली तरी चालेल पण एक खरपुस टेस्ट येते. ६-७ मध्यम आकाराचे कटलेट होतात.
हि माझ्या आईची रेसीपी तिच्याच शब्दात लिहिली आहे. ती कच्च्या केळ्याचे वेफर्स,
खालील पदार्थ ती कच्ची केळी वाफवून करते:
तांदूळ-केळे घारगे, बटाटे वड्यासारखे वडे, कटलेट, कोफ्ते, भाजी, भजी , चकली (कच्ची केळी वाफवून) , शेव असे अनेक पदार्थ करते. तेव्हा क्रेडिट तिलाच देते.


छान आहे रेसिपी. चवीलाही
छान आहे रेसिपी. चवीलाही चांगले लागत असेल हे असे बघून वाटतय
मी उपवासाची रसभाजी, अवियल आणि भजीसाठीच वापरते कच्चे केळे. कधी खटाटोप करण्याचा ॲटॅक आला तर हे नक्की करुन बघेन
छान आहे रेसेपी. मी १-२ वेळाच
छान आहे रेसेपी. मी १-२ वेळाच आणली आहेत कच्ची केळी. आणली त्यावेळी बहूतेक चिप्स / भजी असं काहीतरी केलं. भाजीवाल्याकडे दिसली कि घ्यावी वाटतात, पण सोप्पं काय करावं हे न कळल्याने घेतली जात नाहीत.
सुट्टीच्या दिवशी कधीतरी वेगळं, स्पेशल काही करावं वाटतं, त्यावे़ळी करून बघेन.
आमच्याकडे उपवासाची भाजी करतात
आमच्याकडे उपवासाची भाजी करतात. चीप्स करताना खुपच किचकट आहे, म्हणून बंद झालं.
सगळ्यांना थँक्स.
सगळ्यांना थँक्स. मी हे कटलेट, इथेच लिहिलेल्या चटपटीत पीच जॅम ( https://www.maayboli.com/node/87231 ) बरोबर दिले आरतीला आलेल्या सर्वांना , त्यांना आवडले.
देविका, आज चतुर्थीला उपासाचे
देविका, आज चतुर्थीला उपासाचे कटलेट केले होते वरील कृतीप्रमाणे. फक्त लसूण वगळून. आणि उपास भाजणी ने कोटिंग केले.


छान आहे रेसिपी. फोटोही मस्त.
छान आहे रेसिपी. फोटोही मस्त.
छल्ला मस्तच. मनात आलेलंच थोडा बदल करून उपासाचे करता येतील, लगेच हा फोटो दिसला.
छल्ला, वा, छान. आवडले का?
छल्ला,
वा, छान. आवडले का?
हेच मिश्रण आरारूटच्या किंवा राजगीरा पीठात बुडवून उपवास कचोरी सुद्धा छान लागते. मिश्रणात बेदाणे घालायचे आणि किंचित साखर सुद्धा उपवास कचोरीत. मस्त तिखट गोड उपवासाची कचोरी लागते. बर्याच जणांना कळत नाही केळ्याची आहे ते.
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
....चकली (कच्ची केळी वाफवून) , शेव >>> व्वा, जमल्यास या रेसिपी पण टाका इथे.