Submitted by रॉय on 4 September, 2025 - 08:24
प्रथमेश, मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील! गृहपाठाचं सर विसरून गेले होते. कशाला आठवण करून दिलीस माझं नाव घेऊन? यानं गृहपाठ केला नाही म्हणून ओरडायलाच लागलास. दिड तास अंगठे धरून मला दरदरून घाम फुटायलाय. नेमका या गणिताच्या पुरंदरे सरांचा डबल तास आला. काल गाडा घरी आणायला रात्री अकरा वाजले. अवकाळी पावसानं सगळी काळी मैना कुजाय लागली. गृहपाठ करायला कुठनं वेळ मिळणार? सगळेजन माझ्यावर संशय घ्यायलेत. वर्गातली मुलं मला जवळ करीनात. सरस्वतीपूजनात मला हाकलून लावायलेत. माझा डबा उघडून बघायलेत. परवा गिरहाईकाने 'पपईवर थुंकलास काय लांड्या' म्हणून कानफटात हाणले.
बेल वाजली. सुटलो. पण कान सोडून उठणार इतक्यात पाठीत डस्टर बसलाच. अम्मीSSSS
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
वाईट वाटलं... कथा छान अर्थात.
वाईट वाटलं... कथा छान अर्थात.
(No subject)
(No subject)
चांगली कथा.
चांगली कथा.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी. आवडली.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी. आवडली.>>>+१
आई गं बिचारा
आई गं बिचारा
ऑह
ऑह
कल से मैं मदरसे जाऊंगा
कल से मैं मदरसे जाऊंगा
छबुराव वरील कथा बहुतेक अंशी
छबुराव वरील कथा बहुतेक अंशी खरी आहे.
हा वीडियो पाहा. एका मुलाला इतर एकेक मुलाने येऊन थोबाडात हाणावे असे त्यांची शिकलेली शिक्षिका सांगत आहे, का तर 'हे' लोक असेच असतात म्हणून. सगळ्या शाळांमधून थोडेफार असेच वातावरण होत आहे.
https://www.facebook.com/100010732927750/videos/pcb.2025684587799286/683...
छान साकारलीय शशक.
छान साकारलीय शशक.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी. आवडली.>>>+१
दुःखद कथा पण मांडणी नेमकी.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी. आवडली.>>>+१
दुःखद कथा पण मांडणी नेमकी.
दुःखद कथा पण मांडणी नेमकी. आवडली. >>> +१