पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - सफरचंदाची कोशिंबीर - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 2 September, 2025 - 11:06

ग्रॅनी स्मिथ किंवा कुठलंही घट्ट गराचं (पिठूळ गर नको) आंबटगोड सफरचंद धुवून किसून घ्या.
सालं ठेवायची की नाही हे तुमच्या आवडीनुसार ठरवा.
किसात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
साखर घालायची की नाही हे तुमच्या आवडीनुसार ठरवा.
चवीनुसार मीठ घालून दह्यात कालवून घ्या.

IMG_3800.jpeg

अशीच कोशिंबीर पिकलेल्या केळ्याचीही करता येते, उकडलेल्या बटाट्याचीही!
आवडत असेल तर यात ओलं खोबरं, दाण्याचं कूट वगैरेही घालता येईल.
मी हल्ली ड्राय रोस्टेड अनसॉल्टेड दाणेच आणते, त्यामुळे दाणे भाजायलाही मला चूल पेटवावी लागत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श श क पाकृ अशी पण स्पर्धा ठेवलीय काय आता ?
हे मायबोली संयोजक पण कधी कधी जरा जास्तच करतात ना ???

Lol
आता चूल पेटवायची नाही म्हटल्यावर कोशिंबिरीला ऊत तरी कुठून आणि कसा आणायचा म्हणते मी! Proud

Chan lagatey hi koshimbir. सजावटीला चार द्राक्षे किंवा थोडे डाळिंबाचे दाणे मजा आणतील अजून. सावर रे क्रीम घालून पण बघता येईल. Thanks for sharing.

सजावटीला चार द्राक्षे किंवा थोडे डाळिंबाचे दाणे मजा आणतील अजून.>>> अगदी. पण जशी दिलेय तशीही छानच लागते. मला अशीही आवडते आणि त्यावर फोडणी दिलेलीही आवडते.

यम्मी कोशिंबीर

कोशिंबीर नाही केली कधी सफरचंदाची, पण रायते करते बर्‍याचदा सफरचंदाच्या फोडी घालून. त्यात हिरवी मिरची + आलं (किंवा लसणाची पाकळी) + काळं मीठ + पुदिना/ कोथिंबीर कुटून घालते. पातळ असतं ते रायतं.
कोशिंबीर करायचे कधी लक्षात आलं नाही. दाण्याचे कुट आणि वरून चरचरीत फोडणी घालून कोशिंबीर आवडेल खायला.