Submitted by देवीका on 28 August, 2025 - 18:38
मध्यरात्रं उलटली तरी तिचा डोळा लागत नव्हता.
छताशी गरगरणारा पंखा आणि तिचे विचारांचं चक्र दोन्ही एकाच लयीत फिरत होते.
परत एकदा कुशीवर वळून तिनं त्याच्याकडे पाहिलं.
कसं शक्य आहे? रागाने तिने हातातला फोन खोलीत भिरकावलाच.
आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच म्हणत उठून तिने त्याला गदागदा हलवत म्हटलं,
मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!
अर्धवट झोपेतही तिच्या त्या वाक्यावर तो दचकलाच.
फणकारतच ती पुढे बोलली, तु फोनचा पासवर्ड बदललास ना?
चादर ओढत कुस बदलून तो करवदला, विसरलीस का मी पावसात पडलो तेव्हा फोनही निसटून चिखलात पडला ते?
सॉरी, हे मी विसरलेच म्हणत ती आडवी झाली.
आणि त्याने दीर्घ श्वास सोडला…
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही हे शशक मी वाचणार नाही,
नाही हे शशक मी वाचणार नाही, उगाच दिवस भर तिढा सोडवत बसावे लागेल . आधी कुणाला तरी वाचू दे, त्याचा प्रतिसाद येऊ देत म ठरवू वाचायचे की बाही.
/
/
/
हळूच चोरून वाचले . समजले की. छानच आहे.
बायको वेडी आहे का?
बायको वेडी आहे का?
समजली नाही
समजली नाही
तिला संशय येतोय. पण फोनच
तिला संशय येतोय. पण फोनच बदललाय. मग पास्वर्ड बदललं असेल.
बायको वेडी आहे का?
बायको वेडी आहे का?
>>>
हो ते सुद्धा आहे.
आणि सामो म्हणतात ते सुद्धा आहे.
हळूच चोरून वाचले . समजले की.
हळूच चोरून वाचले . समजले की. छानच आहे..... शशक आधी हा प्रतिसाद वाचला म्हणून वाचले.पण कळलेच नाही.
ऋन्मेष, तुम्हाला बरे माहितीय.
ऋन्मेष, तुम्हाला बरे माहितीय.
ये भी सही है.
ये भी सही है.
-----डॉक्टर हाथी.
(No subject)
त्याने दीर्घ श्वास सोडला
त्याने दीर्घ श्वास सोडला म्हणजे सुटकेचा नि:श्वास सोडला. म्हणजे पावसात पडणे आणि फोन चिखलात पडणे ही निमित्ते होती.
तिचा संशय बरोबर आहे.
पण शीर्षक भलामण का आहे ? भलामण म्हणजे शिफारस ना?
ओह. मी भलावण लिहिले आहे.
ओह. मी भलावण लिहिले आहे. अर्थ वेगळा आहे का? भलामण म्हणजे शिफारस का?
मी शिर्षक बदलते. थँक्स.
वरच्या प्रतिसादातील काही
वरच्या प्रतिसादातील काही अंदाज जवळपास आहेत कथेच्या. आताच लिहु का काय आहेत ते? की स्पर्धा संपायच्या आधी लिहु?
भांडखोर व संशयी बायको रो
भांडखोर व संशयी बायको रोज रात्री नवर्याचे फोनवरचे मेसेजेस, एमेल्स वाचून तर्क-वितर्क लावून मग नवर्याशी भांडायची.
सुरुवातीलाच बायकोला आपले प्रेम पटवून द्यायला तो पासवर्ड देवुन चुक करून बसला असतो.
मग एक दिवस फोन चिखलात पडलाय सांगून तात्पुरती सुटका होइल हा विचार करतो. कित्येक दिवस हिच थाप मारून निभावतो.
बायको विचार करत बसते, फोन खराब आहे तर नवीन का घेत नाही मग? रागाने नवर्याचा फोन फेकुन तोडुन टाकते.
हिला आपली आयडीया कळली बघुन तो दचकतो.
इतकेच आहे.
ओह ओके. कळली.
ओह ओके. कळली.
थँक्स सर्वांना.
थँक्स सर्वांना.
छान आहे. बरीचशी कळते मुळ
छान आहे. बरीचशी कळते मुळ कथेतच. त्यामुळे नो वरी. अजुन लिहित राहा.
तुम्ही शशकच्या नावावर उगाच
तुम्ही शशकच्या नावावर उगाच शंभर शब्दांची रास न रचता कथा लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताय म्हणून लिहितो.-
बायकोने फोन फोडून तोडून टाकलाय असं कथेत कळत नाही. तिने भिरकावला असे लिहिले आहे.
नवर्याने सुटकेचा नि:श्वास सोडला म्हणजे आपली थाप तिला पटले असे त्याला वाटले.
थंंक्स भरत.
थंंक्स भरत.
मायबोलीवरचे प्रोत्साहन खुप मदत करते. मी फक्त वाचनच ज्यास्त करते मायबोलीवर. शशक खुप गाजतात बघुन एक लिहायचा प्रयत्न केला इतकेच.