बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 24 August, 2025 - 06:33

बाप्पाचा नैवेद्य

बाप्पाचे आगमन झाले लोकहो. आरती केल्यावर नैवेद्यासाठी काय काय करणार?
उकडीचे मोदक की बुंदीचे लाडू?
मावा मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, आंबा मोदक की आणखी काय?
पेढे, गुलाबजाम की वड्या आणि बर्फी?
पंचामृत, गुळ-खोबरे आणि खिरापत पण असणार ना?
नैवेद्याच्या ताटात भाताच्या मुदीवर वरण आणि त्यावर तुपाची धार, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर आणि आणखी काय विशेष?
गणपतीबरोबरच गौरींसाठी काय केलात नैवेद्य?
या गणेशोत्सवात तुम्ही काय काय नैवेद्य केला त्याचे भरपूर फोटो इथे द्या. सगळे मायबोलीकर ते पाहायला अगदी उत्सुक आहेत.
..आणि हो नुसती प्रकाशचित्रे देऊ नका, त्याबद्दलची माहिती आणि तुमच्या खास आठवणी असल्यास प्रतिसादात नक्की लिहा त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रुपचं सभासद होणं गरजेचं आहे.

गणपती बाप्पा मोरया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट ताट!
चार वेळा स्क्रोल करुन बघितलं. पत्ता शोधत मीच येणारे तुझ्याकडे. Proud

IMG_20250827_220608.jpg
.
Screenshot_2025-08-27-22-06-45-53_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

ऋतुराज, सगळं फारच नीट आणि कलात्मकतेने वाढलं आहे. फारच छान. आलेच जेवायला Proud

जुई, छान ताट. अळूवड्या ताबडतोब हव्या आहेत आता मला Proud

वाह ऋतुराज मस्तच ताट!
हॉटेल मध्ये जशी साधी थाळी आणि स्पेशल थाळी असते तशी ही स्पेशल नैवेद्य थाळी वाटत आहे Happy

जुई, तुमचे नैवेद्याचे ताट तर गणपतीच्या आरासीसोबत इतके एकरूप झालेय की त्याचाच भाग वाटत आहे Happy

या वेळी २२ मोदक घडले. मग एका पानात सगळा नैवेद्य +१ मोदक, सिद्धलाडू, करंजी वाढून ते पान देव्हार्‍यात देवासमोर ठेवलं. बालकलाकाराने नैवेद्य वाढलाय अगदी मुदी पाडून. मी सूचना केल्यायत. (सिद्धलाडू - नुसती उकड कडबोळ्यासारखी लांब वळकटी करून गणपतीच्या मांडीचा आकार देतात, गणपतीचं शुभासन म्हणून गणेश चतुर्थीला करायची कोकणात काही ठिकाणी पद्धत आहे.)

naivedya .jpg

आणि २१ मोदकांचा नैवेद्य बाप्पांसमोर ठेवलाय.
modak.jpg

ही जराशी गम्मत. परवा एका मैत्रिणीकडे प्रसाद दिला. देताना सोयीचं म्हणून डिस्पोजेबल डब्यात दिला. इथे या धाग्यावर त्या काळ्या डब्याचा फोटो टाकायला नको वाटत होतं म्हणून ए आयला म्हटलं या फोटोचं काही करता येतं का बघ. तर पठ्ठ्यानं कमालच केली. बाप्पाची कृपा, दुसरं काय!

हा वर्जिनल फोटो-
0522b699-00c0-4190-b31c-7e8e7fe42089.jpeg

हा एआयबाप्पाच्या कृपेनं-

IMG_7743.png

कसले एकेक नैवेद्य, चला गणपती गौरी होऊया आणि नैवेद्य खाऊया.

सिंड्रेला खरोखर भांड्याची कमाल AI ची. नैवेद्यही छान.

सर्वांचे फोटू छान.

ऋतुराजचा पहिला (कुरडया आहेत ना त्यात ❤ आणि खोबरे नाहीये 😀 ) आणि सिंडरेलाचे विशेष आवडले.