Submitted by संयोजक on 24 August, 2025 - 06:33
बाप्पाचा नैवेद्य
बाप्पाचे आगमन झाले लोकहो. आरती केल्यावर नैवेद्यासाठी काय काय करणार?
उकडीचे मोदक की बुंदीचे लाडू?
मावा मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, आंबा मोदक की आणखी काय?
पेढे, गुलाबजाम की वड्या आणि बर्फी?
पंचामृत, गुळ-खोबरे आणि खिरापत पण असणार ना?
नैवेद्याच्या ताटात भाताच्या मुदीवर वरण आणि त्यावर तुपाची धार, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर आणि आणखी काय विशेष?
गणपतीबरोबरच गौरींसाठी काय केलात नैवेद्य?
या गणेशोत्सवात तुम्ही काय काय नैवेद्य केला त्याचे भरपूर फोटो इथे द्या. सगळे मायबोलीकर ते पाहायला अगदी उत्सुक आहेत.
..आणि हो नुसती प्रकाशचित्रे देऊ नका, त्याबद्दलची माहिती आणि तुमच्या खास आठवणी असल्यास प्रतिसादात नक्की लिहा त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रुपचं सभासद होणं गरजेचं आहे.
गणपती बाप्पा मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया...!
व्वा , काय ताट दिसतंय...
व्वा , काय ताट दिसतंय... गणपती तृप्त होणार जेवून...
भन्नाट ताट!
भन्नाट ताट!
चार वेळा स्क्रोल करुन बघितलं. पत्ता शोधत मीच येणारे तुझ्याकडे.
.
.
ऋतूराज ताट आधी पाहिलं असतं तर
ऋतूराज ताट आधी पाहिलं असतं तर सकुसप दर्शनाला आले असते ना!!
ऋतुराज, सगळं फारच नीट आणि
ऋतुराज, सगळं फारच नीट आणि कलात्मकतेने वाढलं आहे. फारच छान. आलेच जेवायला
जुई, छान ताट. अळूवड्या ताबडतोब हव्या आहेत आता मला
वाह ऋतुराज मस्तच ताट!
वाह ऋतुराज मस्तच ताट!
हॉटेल मध्ये जशी साधी थाळी आणि स्पेशल थाळी असते तशी ही स्पेशल नैवेद्य थाळी वाटत आहे
जुई, तुमचे नैवेद्याचे ताट तर गणपतीच्या आरासीसोबत इतके एकरूप झालेय की त्याचाच भाग वाटत आहे
या वेळी २२ मोदक घडले. मग एका
या वेळी २२ मोदक घडले. मग एका पानात सगळा नैवेद्य +१ मोदक, सिद्धलाडू, करंजी वाढून ते पान देव्हार्यात देवासमोर ठेवलं. बालकलाकाराने नैवेद्य वाढलाय अगदी मुदी पाडून. मी सूचना केल्यायत. (सिद्धलाडू - नुसती उकड कडबोळ्यासारखी लांब वळकटी करून गणपतीच्या मांडीचा आकार देतात, गणपतीचं शुभासन म्हणून गणेश चतुर्थीला करायची कोकणात काही ठिकाणी पद्धत आहे.)
आणि २१ मोदकांचा नैवेद्य बाप्पांसमोर ठेवलाय.

(No subject)
अरे काय ताटं आलीयेत. गणपती
अरे काय ताटं आलीयेत. गणपती व्हावसं वाटतय
(No subject)
अरे काय ताटं आलीयेत. गणपती
अरे काय ताटं आलीयेत. गणपती व्हावसं वाटतय>>> +१ बाप्पाची मज्जा आहे.
(No subject)
ही जराशी गम्मत. परवा एका
ही जराशी गम्मत. परवा एका मैत्रिणीकडे प्रसाद दिला. देताना सोयीचं म्हणून डिस्पोजेबल डब्यात दिला. इथे या धाग्यावर त्या काळ्या डब्याचा फोटो टाकायला नको वाटत होतं म्हणून ए आयला म्हटलं या फोटोचं काही करता येतं का बघ. तर पठ्ठ्यानं कमालच केली. बाप्पाची कृपा, दुसरं काय!
हा वर्जिनल फोटो-

हा एआयबाप्पाच्या कृपेनं-
गौरीचा फराळ
गौरीचा फराळ
कसले एकेक नैवेद्य, चला गणपती
कसले एकेक नैवेद्य, चला गणपती गौरी होऊया आणि नैवेद्य खाऊया.
सिंड्रेला खरोखर भांड्याची कमाल AI ची. नैवेद्यही छान.
(No subject)
सगळ्यांकडे नैवेद्य बघून मन
सगळ्यांकडे नैवेद्य बघून मन तृप्त झालं!
सर्वांचे फोटू छान.
सर्वांचे फोटू छान.
ऋतुराजचा पहिला (कुरडया आहेत ना त्यात ❤ आणि खोबरे नाहीये 😀 ) आणि सिंडरेलाचे विशेष आवडले.