सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्री २०२५–२६

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 August, 2025 - 10:30

IMDb च्या जगातील टॉप १० सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये (२०२५-२०२६) स्थान मिळवणारी क्रिती सॅनन ही एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

सौंदर्य, प्रतिभा आणि जागतिक प्रभावाचा सन्मान करणाऱ्या या यादीत क्रिती सॅनन ने पाचवे स्थान पटकावले आहे.

2021 साली तिला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

------------------

बातमी संपली.

आता माझे चार शब्द.
याआधी देखील मी इथे तिथे क्रितीचे क्रिती तरी कौतुक केले आहे. तसे मी दर दुसऱ्या हिरोईनीचे करत असल्याने ते चटकन उठून दिसत नाही पण विशेष करून "तेरी बातो मे ऐसा उलझा जिया" चित्रपटानिमित्त विशेष कौतुक केले होते. कारण त्यात ती रोबोटची भूमिका अक्षरशा जगली होती.

मागे एकदा कुठेतरी कोणीतरी तिच्याबद्दल म्हणाले होते की ती इतकी सुंदर असल्याने तिला चित्रपटात भूमिका मिळत नाही. इतकी आखीव रेखीव असल्याने तिचे सौंदर्य AI generated वाटते. त्यामुळे कुठल्या हिरोला ती शोभत नाही. इन आदर वर्डस, कुठला हिरो तिला शोभत नाही.

पण वैयक्तिकरीत्या मला कार्तिक आर्यन सोबत तिची जोडी बघायला छान वाटते. कदाचित त्यासोबत तिचे सौंदर्य आणखी खुलून येत असावे. दोघांचा लुक्काछुपी चित्रपट फार आवडला होता आणि शेहजादे चित्रपट बंडल असला तरी दोघांचे सीन आणि केमिस्ट्री आवडली होती.

आज तिचे वय चेक केले तर ३५ वर्षे बघून मला हलकासा शॉक बसला. ती मला त्या वयाची वाटत नव्हती ते सोडा. पण त्या मानाने तिला तितके चांगले चित्रपट मिळाले नाही याचा खेद झाला. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे "बरेली की बर्फी" रूपाने तिचा गोडवा कायम लक्षात राहील.

आज या निमित्ताने अजून एक गोष्ट जाणवली की मी आजवर तिचा एकही चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही. भारतातली IMDB rated आजघडीची सर्वात सुंदर हिरोईन आणि तिला मोठ्या पडद्यावर पाहिले नाही ही एक शरमेची गोष्ट म्हणू शकतो. त्यामुळे लवकरच तिला बिग बॅनरचे चित्रपट मिळावेत आणि बॉक्स ऑफिसवर राडा करत माझ्यासह जास्तीत जास्त लोकांनी तिला मोठ्या पडद्यावर बघावे या शुभेच्छा Happy

अभिनंदन क्रिती!
धन्यवाद,

Screenshot_2025-08-21-20-48-59-56_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

-------------

ताक - डॉन 3 चित्रपटात ती मेन हिरोईन म्हणून झळकणार अश्या अफवा आहेत.

डोक्याचे दही - पण त्या चित्रपटात शाहरुख नसणार अशी पक्की खबर आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचं झालं ना ?
मला क्रिती सॅनन ही नाके डोळे नीटस कॅटेगरीतली वाटते. मॉडेल लुक्स आहेत तिचे.
भारतीय नारी कैशी ठसठशीत असणी मंगताय कि नई ?
मीनाक्षी, श्रीदेवी आणि पूजापाठ व्यवस्थित करून शिलाईकाम करणारी सुलक्षणी म्हणजे जयाप्रदा.

ऑलटाईमग्रेट ओन्ली मधुबाला मग माधुरी आणि ऐश्वर्या.

सगळ्यात सुंदर अभिनेत्री यामी गौतम
>>>
Wow बदाम बदाम बदाम
माझ्या हातात असते तर मी सुद्धा हिलाच मत दिले असते.
आपण गणपतीनंतर हिच्यावर वेगळा धागा काढुया..

बरं ऋन्मेष ते शशक इथे फिट होतय. इथे टाकत Happy -

एकदा शाहरुखच्या मन्नत वर आपले ऋन्मेष गेले बरं का.
खानांचा शाहरुख आणि सॅननांची क्रिती आपले पॉपकॉर्न खात, सैय्यारा बघत बसलेले होते. ऋन्मेष आल्या आल्या तिने त्याच्याकडे विस्मयचकित नजरेने पाहीले, व त्याला घट्ट मिठी मारली व क्रिती म्हणाली "माबोवरती माझ्या तारिफांचे पूल वर पूल बांधण्याबद्दल धन्यवाद. मला सुंदर म्हणणारा एकमेव तूच रे बाबा. मलासुद्धा ही न्युजच आहे." Wink
इतक्यात इकडे, हा आनंदसोहळा सहन न होउन, फुरंगटुन, शाहरुख निघाला व जाता जाता म्हणाला "हे बरे नव्हे. कधी आमीर कधी सैय्याराचा हिरो कधी क्रिती ...... मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!"

ऐश्वर्या रॉयला सुश्मिताने मिस इंडिया स्पर्धेत मात दिली होती.
भारतीय नारीचे निकष तिथे लावत असावेत अशी अपेक्षा.

भारतीय नारीचे निकष
आपल्या भारतात एवढी विविधता आहे की पूर्वेकडच्या राज्यातील मुलींचे सौंदर्य आणखी वेगळ्याच धाटणीचे असते. त्या जर भारतीय नारीच्या निकषात बसत नसतील तर म्हणजे त्या भारतीयच नाहीत असे होईल.

>>>>>प्रत्येक स्त्री जन्मजात सुंदर असते
Happy धन्यवाद केकु. सौंदर्यामुळे तर हे जग आहे. "Beauty is eternity gazing at itself in a mirror" is a profound line from Kahlil Gibran's philosophical work, The Prophet; implying that every form of beauty we perceive in the world is a manifestation of this divine, eternal presence.

केकू
अगदी बरोबर
.
.
(ह्यात हे सिद्ध झालंय की सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्री
मी आहे Rofl Proud )
द्या आता अवॉर्ड वगैरे काहीतरी

मला क्रिती फार आवडायची नाही. पण या धाग्यावर ऋन्म्याला इतका विरोध झाला की आता मला क्रिती आवडायला लागू लागली आहे. Lol

>>>>>>>> पण या धाग्यावर ऋन्म्याला इतका विरोध झाला की आता मला क्रिती आवडायला लागू लागली आहे. Lol
हाण्ण्ण!!! Happy सटल ह्युमर. विचार करावा लागला.

प्रत्येक स्त्री जन्मजात अभिनेत्री असते
प्रत्येक स्त्री जन्मजात सुंदर असते
>>>>

दोन्ही विधानांना +७८६
फक्त कृती त्या सर्वात सुंदर आहे Happy

इतर सर्व सुंदर स्त्रियांनी आपापले participations prize घेऊन जावे Happy

आणि हो, आपले सौंदर्य सिद्ध करायला सोबत घरचा आरसा आणायचा गरज नाही. मलाही तुम्ही जगातल्या सर्व स्त्रिया सर्व सुंदरच वाटता.
आपण सुंदर असलो की जग सुंदर दिसते यावर माझा विश्वास आहे Happy

प्रत्येक स्त्री जन्मजात अभिनेत्री असते
प्रत्येक स्त्री जन्मजात सुंदर असते

<<

प्रत्येक स्त्री ही सुंदर अभिनेत्री असते.

(अर्थ नीटच लक्षात घ्या.)

प्रत्येक स्त्री ही सुंदर अभिनेत्री असते.
>>>
+७८६
आणि ती पुरुषाला देखील अभिनय करायला शिकवते / भाग पाडते.

सुंदर अभिनय हेच सुखी संसाराचे सूत्र

Pages