सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्री २०२५–२६

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 August, 2025 - 10:30

IMDb च्या जगातील टॉप १० सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये (२०२५-२०२६) स्थान मिळवणारी क्रिती सॅनन ही एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

सौंदर्य, प्रतिभा आणि जागतिक प्रभावाचा सन्मान करणाऱ्या या यादीत क्रिती सॅनन ने पाचवे स्थान पटकावले आहे.

2021 साली तिला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

------------------

बातमी संपली.

आता माझे चार शब्द.
याआधी देखील मी इथे तिथे क्रितीचे क्रिती तरी कौतुक केले आहे. तसे मी दर दुसऱ्या हिरोईनीचे करत असल्याने ते चटकन उठून दिसत नाही पण विशेष करून "तेरी बातो मे ऐसा उलझा जिया" चित्रपटानिमित्त विशेष कौतुक केले होते. कारण त्यात ती रोबोटची भूमिका अक्षरशा जगली होती.

मागे एकदा कुठेतरी कोणीतरी तिच्याबद्दल म्हणाले होते की ती इतकी सुंदर असल्याने तिला चित्रपटात भूमिका मिळत नाही. इतकी आखीव रेखीव असल्याने तिचे सौंदर्य AI generated वाटते. त्यामुळे कुठल्या हिरोला ती शोभत नाही. इन आदर वर्डस, कुठला हिरो तिला शोभत नाही.

पण वैयक्तिकरीत्या मला कार्तिक आर्यन सोबत तिची जोडी बघायला छान वाटते. कदाचित त्यासोबत तिचे सौंदर्य आणखी खुलून येत असावे. दोघांचा लुक्काछुपी चित्रपट फार आवडला होता आणि शेहजादे चित्रपट बंडल असला तरी दोघांचे सीन आणि केमिस्ट्री आवडली होती.

आज तिचे वय चेक केले तर ३५ वर्षे बघून मला हलकासा शॉक बसला. ती मला त्या वयाची वाटत नव्हती ते सोडा. पण त्या मानाने तिला तितके चांगले चित्रपट मिळाले नाही याचा खेद झाला. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे "बरेली की बर्फी" रूपाने तिचा गोडवा कायम लक्षात राहील.

आज या निमित्ताने अजून एक गोष्ट जाणवली की मी आजवर तिचा एकही चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही. भारतातली IMDB rated आजघडीची सर्वात सुंदर हिरोईन आणि तिला मोठ्या पडद्यावर पाहिले नाही ही एक शरमेची गोष्ट म्हणू शकतो. त्यामुळे लवकरच तिला बिग बॅनरचे चित्रपट मिळावेत आणि बॉक्स ऑफिसवर राडा करत माझ्यासह जास्तीत जास्त लोकांनी तिला मोठ्या पडद्यावर बघावे या शुभेच्छा Happy

अभिनंदन क्रिती!
धन्यवाद,

Screenshot_2025-08-21-20-48-59-56_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

-------------

ताक - डॉन 3 चित्रपटात ती मेन हिरोईन म्हणून झळकणार अश्या अफवा आहेत.

डोक्याचे दही - पण त्या चित्रपटात शाहरुख नसणार अशी पक्की खबर आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो काही हरकत नाही. तुम्ही जे बोलता ते योग्यच आहे. थांबतो. इतरांना बोलू देतो.

पण मला जे आवडतात त्यांचे मी असेच भरभरून कौतुक करतो. म्हणजे खरे सांगू तर ही एक खूप आनंददायी प्रोसेस असते..
हा एक खूप चांगला विषय आहे. यावर नंतर वेगळा धागा काढेन. नोंद करून ठेवतो Happy

>>>>थांबतो. इतरांना बोलू देतो.
Happy थँक्स.
मला तुमच्यात ते सारे दुर्गुण दिसतात जे माझ्यात आहेत. मी ही अति कौतुक करते, अनेकदा डोक्यावर घेउन नाचते पण मग लक्षात येतं हे खूप अति होतय म्हणजे जरा न्युट्रल रहायला हवे तरच इतरांचे बोलणे फॅसिलिटेट होते. नाहीतर मग लोक डिफेन्सिव्ह तरी होतात,मुद्दाम उलटच बोलतात किंवा मग गप्प बसतात.

बरोबर आहे सामो..
कदाचित मी त्याला दुर्गुणाचे लेबल लावत नसेल. फार तर स्वभाव दोष म्हणावे..
पण मुद्दा योग्य आहे Happy

माझ्या ऑफिसात एके काळी मला रिपोर्ट करणारी (कधी नव्हे ते Wink पण शेवटचीच ठरली) एक मुलगी होती, मनालीची . मग तिच्या टेन्युअरच्या शेवटी, माझ्या मॅनेजरने (माघ नक्षत्र, कुंभ सू) मला तिच्याबद्दल मला फीडबॅक विचारला आणि मी सगळं चांगलं एककल्ली सांगत गेले, अतिच केले. मग त्याची परत एक ईमेल आली - आता मला हे सांग की काय तुला आवडलं नाही किंवा किंचित का होइना नकारात्मक वाटलं. मग मी ते सांगीतलं.
.
पण नंतर विचार करता मला हे लक्षात आलं की बॅलन्स्ड फीडबॅक द्यायला हवा होता आणि तेच अपेक्षित होते.

अरे वा ! मस्त गप्पा. Happy
एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर टाकून दळून घ्या. हे पीठ इडलीच्या घोळात टाकल्यानं खमीर चांगला येतो.

सेलिब्रिटीचे फॅन असणे किंवा आवडत्या व्यक्तीचे कौतुक असणे यात आणि एखाद्याबद्दल फीडबॅक देणे यात फरक असतो असे वाटते. तिथे प्लस मायनस दोन्ही सांगणे गरजेचे असते. जे आधीच्या केस मध्ये गरजेचे नसते.

असो, पण या विषयाला बरेच पैलू आहेत असे जाणवले. यावर विचार करायला हवा. पण उद्या शुक्रवार असल्याने तूर्तास शुभरात्री Happy

एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर टाकून दळून घ्या. हे पीठ इडलीच्या घोळात टाकल्यानं खमीर चांगला येतो. >> Lol क्रिती पेक्षा हे कीतीतरी छाने

मलाही कृती आवडते. छान दिसते, तिची उंची तिला शोभुन दिसते आणि अभिनयही इतरांच्या मानाने उत्तम करते. तिचा बरेली की बर्फी खुप आवडलेला. एआय वालाही पाहिला, तोही आवडलेला. बाकी काही पाहिले असतील तर आता आठवत नाहीत.

बाकी पडद्यावर सुंदर दिसणे वगैरे सगळे टेक्नॉलॉजीने जमवता येते. रिन्कु झा म्हणुन एक यु ट्युबर आहे. मी तिला कधीतरी सब्स्च्राईब केले होते त्यामुळे तिचा एक नवा व्लॉग काल यु ट्युबने दाखवला. तिच्या दैनंदिन आयुष्याचे व्लॉग्स टाकते त्यात सावळी, चेहर्‍यावर डाग बगैरे दिसतात आणि गाण्यांचे शॉर्ट्स टाकते त्यात गोरी, गुळगुळीत चेहरा वगैरे… ती दिसायला सुंदरच आहे, नो डाऊट, पण गाण्यांच्या शॉर्ट्समध्ये टेक्नॉलॉजी वापरुन ती अजुन सुंदर होते.

बाकी पडद्यावर सुंदर दिसणे वगैरे सगळे टेक्नॉलॉजीने जमवता येते.
>>>>>>

चांगला मुद्दा साधना.
कदाचित इथे ती इतरांच्या पुढे निघून जात असेल.

हे पीठ इडलीच्या घोळात टाकल्यानं खमीर चांगला येतो. >> Lol क्रिती पेक्षा हे कीतीतरी छाने
Submitted by भ्रमर on 22 August, 2025 - 10:06
>>>

हो, छान असेल. पण सुंदर नाहीये Happy
पुरस्कृत सौंदर्याला केले आहे.
अन्यथा माझा स्वभाव सुद्धा छान आहे Happy

बहुधा धागा काढल्याने आता मला ही फीड मध्ये जास्त दिसू लागली आहे.
वाईट काही नाही त्यात.. जस्ट saying..

आज ही बातमी वाचली..
म्हणजे हा फोटो पाहिला..
इतका पैसा?? ते देखील कुठल्या बिझनेसमॅन सोबत लग्न न करता..
शोधायला हवे या बातमीतील तथ्य

FB_IMG_1755386368478.jpg

करोडोचा बंगला मलिका शेरावत नेही घेतल्याची बातमी वाचली होती.. ती तर कधीपासून चित्रपटांत नाहीये.
क्रीती आवडते. बरेली & मिमी मधे आवडली. हिरोईन मटेरियल आहे तिच्यात पुर्ण. अभिनय, लूक्स, डान्स, संवाद फेक सर्व.

ऋन्मेष तू धागा काढला आहेस तर जरा लोकांना पण प्रतिक्रिया देऊन देत की.. किती तुझीच बडबड.

छान आहे ती. तिचं नाव कृती आहे, पण हिंदी उच्चारानुसार kriti असा उच्चार केला जातो. ती देवनागरीत स्वतःचं नाव कसं लिहिते विचारायला पाहिजे.

तब्बू
film fair मराठी अवार्ड्स नाईट मध्ये दिसली.
wow दिसत होती.

कृती क्रिती Kruti Kriti
Hrutik Hritik हृतिक ऋतिक ...

जे पहिला टाईप होते ते मी वापरून मोकळा होतो Happy

लोकं सुद्धा माझ्या नावासोबत हेच करतात Wink

ती प्रचंड सुंदर आहे . म्हणून मला ती अतिशय polished वाटते . म्हणजे १-२ चित्रपटात ती खेडेगावातली दाखवली , तशी ती आजिबात वाटत नाही . अतिशय polished , high maintenance अशी वाटते .

ट्युलिप हो सहमत...

तिच्या २०१७ सालच्या मुलाखतीत हे होते. तिला एक दिग्दर्शक हे म्हणाला होता.

‘You’re too good-looking. There has to be some sort of imperfection in you to look real on screen.’

एव्हढी काय सुंदर आहे ती?
मला तरी नाही वाटत.
भौमितिक उभट चेहरा आहे... अँगल्स जाणवतात.
अजिबात भारतीय चेहरेपट्टी नाही.

अजिबात भारतीय चेहरेपट्टी नाही.
>>>
मान्य! चेहरेपट्टी भारतीय नाही. पण मुळात तो निकष नव्हता. कारण रँकिंग जगातील सुंदर मुलींची होती.
आणि कित्येक भारतीयांना देखील अभारतीय चेहरेपट्टीतले सौंदर्य आवडते.

images (26).jpeg

सगळ्यात सुंदर अभिनेत्री यामी गौतम

Pages