पाककृती स्पर्धा २: चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ

Submitted by संयोजक on 18 August, 2025 - 03:46

नमस्कार मायबोलीकरहो!
सादर करत आहोत दुसरी पाककृती स्पर्धा - चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ.
आपल्याला रोजच गॅस पेटवून स्वयंपाक करण्याची सवय असते. पण, काही कारणाने गॅस पेटविण्याची सोय नसेल तर काय करायचं? अशा वेळी देखील चविष्ट, पोटभरीचा पदार्थ तयार करता आला, तर ती कल्पकताच म्हणावी लागेल! या स्पर्धेत तुम्हाला दाखवायचे आहे तुमचे पाककौशल्य. मायबोलीकर मतदान करतील ते तुमच्या त्या कौशल्याला!
तर ही पाककृती स्पर्धा आहे पोटभरीचा पदार्थ करायचा आणि तोही कोणतीही उष्णता न वापरता, म्हणजेच चूल, गॅस, इंडक्शन, ओव्हन, मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर इ. न वापरता! म्हणजेच शिजवणे, उकडणे, परतणे, तळणे, वाफविणे, भाजणे, उकळणे इ. काहीही करायचे नाही नाही; पण तरीही पदार्थ चवदार आणि पोटभरीचा पदार्थ तयार करायचा. यासाठी तुम्ही कोणतेही साहित्य वापरू शकता.

नियम:
१. पदार्थ तयार करताना गॅस वगैरे पेटवायचा नाही.
२. पदार्थ पोटभरीचा असावा म्हणजे जेवण म्हणून पुरेल असा असावा.
३. भाज्या, फळे, किराणा, दुग्धपदार्थ इ. (vegetables, fruits, grocery, dairy etc) जे हवे ते वापरू शकता.
४. दुकानातून मिळणारे पनीर वगैरे पदार्थ घटक म्हणून वापरू शकता.# पण तुमचा पदार्थ करताना चूल वगैरे पेटवायची नाही.
५.पाककृती पूर्ण लिहिणे आवश्यक आहे; साहित्य व कृती स्पष्ट नमूद करावी.
६. आपल्या पदार्थाचा फोटो काढून पाककृती धाग्यावर टाकावा.
७.प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे –
८. पाककृती स्पर्धा २: पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
९. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
१०. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
११. ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
१३. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
१४. पदार्थ शाकाहारी असावा.

चला तर तर बल्लवाचार्य आणि सुगरण मायबोलीकरहो, यंदा गणपती बाप्पाला अर्पण करा एक सोपा, गॅस-फ्री, पोटभरीचा पदार्थ आणि दाखवा तुमची कल्पकता!
- संयोजक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा पेटला नाही.
सणासुदीची तयारी म्हणा.
आम्ही थोडी पदार्थांची शक्यता अजमावून पाहात आहोत. पण वाभाडे काढणे, ट्रोल करत नाही.
गणपती उत्सव संपल्यावर हाच धागा "अंतराळात भारतीय माणूस गेल्यास कोणते टिकाऊ पदार्थ नेता येतील" या शीर्षकाखाली चालू ठेवता येईल. ( धागेकाढकरांना टिचकी). शुक्ला जाऊन आलाच आहे पण त्याची मुलाखत घेऊन हे विचारणार कोण? उपमा नेला होता ऐकून आहे.

>>>>>अशा एका वाक्याने आपण तशी पद्धत नसणाऱ्या आपल्याच समाजातील वर्गांना दूर लोटत असतो.<<<<
:हहपुवा:
दिवसभर कंपुगिरी करून नेमके एखाद्याला टारगेट करून टवाळी करणारे , नाव ठेवणारे कधीपासून अशी चिंता करायाला लागले?
उगाच एखादा शब्द पकडून वाद करून आपण काहितरी समाजसुधार (?)करतोय असे वाटणे म्हणजे :हहपूवा: पुरेच..
हे बहुधा आपल्याच टोळक्यात(कोषात) राहिल्याने होते वाटतं.
----
बाकी, बंगाली,असामी तर मासे, मटण गणपतीत खातातच म्हणा. बंगाली माशाचे डोकं नेवेद्या म्हणून करतात, अष्टमीला मटण म्हणून प्रसाद असतो. इतर जमातीत( महारष्ट्रीयन सुद्धा) गौरीला बोकड , कोंबडं ते चैत्रात सुद्धा बोकड, बकरी खाणारे आहेत. खास कलेजी(लिवर) मसाला करून ठेवतात.
मुळात प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणेच करतो.
जिथे बोकड/ बकरी . कोंबडा चालत नाहीत तिथे भेंडा, भोपळा , कोहळा कुंकू लावून कापतातच. हे पाहिलय मी बर्‍याच जातीत.

पण इथे स्पर्धा आहे मग त्यात नियम हे असणारच. नको ते मुद्दे घुसवून कसली शाईन मारायची आहे. Proud
तुमच्या घरी दाखवा बोकड, डुक्कर का काय ते नेवेद्य गणपतीला. मग ह्यावेळी 'घरचा नेवेद्य ' बाफवर पोर्क मोदक फोटो डाकवा.
--
पौराणिक कथा ह्या कथाच आहेत. दगडाला देव मानून पुजतो आपल्या देशात आणि तिथे नेवेद्या काय दाखवायचा मग मासांहारी वर्ग कसा एकटा पडतो असे हास्यास्पद युक्तीवाद करून समाजसुधारक आव आणून वाद घालायचा. :हहपुवा:
गणपतीला हत्तीचे डोकं का , कशाने ह्या वादाने काहीच हासिल नाही. असा कोणीच प्रकाड पंडीत खात्री देवु शकत नाही की गणपती शाकाहारी कधी व कसा झाला? :हहपुवा:

बाकी चालु द्या आता.......
संयोजक, धागाच पेटलाय , आता चुल पेटवायची गरजच नाही. Proud आम्ही नियम पाळणारच.

-----

केशवकूल Lol
आधीच धाग्याला बराच टीआरपी आहे
त्यात शाखा नको

सिद्धिविनायक मंदिरात किंवा कोणाकडे सत्यनारायणाची पूजा असल्यास, किंवा गणपतीची आरती झाल्यावर,

प्रसाद स्वीकारताना मायबोलीकर - शाकाहारी आहे ना? मांसाहारी नाही ना?

प्रसाद देणारा – प्रसाद शाकाहारीच असणार. हे तर अध्याहृतच आहे ना?

मायबोलीकर - काय म्हणता अध्याहृतच आहे???
...
..
...
पुढील संवादासाठी धागा वाचत राहा Happy

ऑन ए सिरीयस नोट, किती जण प्रसाद स्वीकारताना आधी तो शाकाहारी आहे की मांसाहारी याची खात्री करतात? जसे आपण केक खाताना अंडे आहे का नाही हे विचारतो...
की प्रसाद आहे तर शाकाहारीच असणार हे गृहीत धरता?

कारण जर तुम्ही प्रसाद शाकाहारीच हे चौकशी न करता गृहीत धरत आहात तर तुम्ही प्रसादात मांसाहारी पदार्थ देणाऱ्यांना वेगळे पाडत आहात. चुकीचे ठरवत आहात.

की अमुक तमुक जाती धर्म पंथाचा आहे तर यांच्याकडे शाकाहारीच असणार अंदाज बांधता...
हे तर त्याहून वाईट

अर्थात कोणी माझ्यासारखे सणवार न पाळता वर्षाचे 365 दिवस खाणार असेल तर त्याला हा प्रश्न लागू नाही.

इतरांनी प्रामाणिकपणे उत्तर शोधले तर इथे आलेला अध्याहृत शब्दावरचा आक्षेप खोडला जाईल.

>>>>सणाला किंवा वर्षभरच मांसाहार करावे/करू नये याविषयी ज्याने- त्याने ठरवावे. सणावाराचा वैयक्तिक आहार किंवा आपल्या घरी "चालणारा" नैवेद्य ह्या सगळ्या भिन्न गोष्टी आहेत. या सगळ्याचा स्पर्धेशी किंवा गणपतीशी सुद्धा काहीच संबंध नाही. त्यामुळे संयोजक म्हणतील तेच प्रमाण मानायला हवे.

हा मुद्दा मुंह तोड जवाब होता. तू तूळ ना गं Happy .... नको सांगूस हवे तर. गंमत केली.

>>>>>>>>>>>>>पुराण हा असा विषय आहे की तिथे काहीही म्हणता येते.
कोणी बघायला जात नाही.
Lol

पाककृती स्पर्धा २: चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ
हमरी तुमरी स्पर्धा : चूल न पेटविता चर्चेची आग लावणारा अनर्थ
Light 1

बाकी वरच्या चर्चेत सामिष आहार / पदार्थ आलेच आहेत तर त्याचे बाकी आप्त /सवंगडी सुद्धा पोहोचतीलच पुढच्या पानांवर.

पुराणातले देव सुरापान करत होते. आणि गणपतीत बरेच जण दारू पिऊन नाचतात. त्यामुळे कोणाला exclude करायचे नसल्यास योग्य लोकांनी स्पर्धेत तो पण पर्याय विचारात घ्यावा. दारू नको हे अध्यारूत अध्याहृत आहे असे म्हणाल्याने कोणाच्या भावना नको दुखवायला.

अध्याहृत - असा शब्द आहे. बाकी चर्चा वाचते आहे. Happy

दारू नको हे अध्याहृतआहे असे म्हणाल्याने कोणाच्या भावना नको दुखवायला.
>>>> अस्सल देशी तयार करताना चुली पेटवाव्या लागतात (म्हणे) त्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार चालणार नाही बहुधा Wink

शाकाहारीच का गृहीत धरायचे हा स्वातीचा आक्षेप पटतो. बाकी फारएंडची, अस्मिताची पोस्ट आवडली. अर्थात स्पर्धेचे नियम संयोजकच ठरवणार. त्यामुळे त्यांनी उद्या फक्त इथिओपियन स्वैपाक चालेल म्हटलं तर तसं.

पुराणातले देव सुरापान करत होते.>>> आणि हत्ती? त्याचे सुद्धा चेक करावे लागणार

बाकी दारूला मांसाहारासोबत न जोडले तरच उत्तम
मांस मटण मच्छी हे अन्न आहे
तर दारू एक मादक आणि अमली पेय.
सण असो किंवा नसो, त्यापासून अंतर राखलेले केव्हाही चांगले.

>>गणेशोत्सवातील एक पाकृ स्पर्धा व त्यात चूल न पेटवता तयार केलेला पदार्थ <<
या नियमात रेसिपीतले घटक प्रिप्रोसेस्ड/प्रिकुक नसावेत असा उपनियम गृहित धरल्यास (किंवा अध्याहृत असल्यास) मांसाहारी डिश कशी बनु शकते याचं कुतुहुल आहे. म्हणुनच संयोजकांना शाकाहारी डिशेस अभिप्रेत आहेत, हा मला समजलेला अर्थ.

बाकि, गणपती मांसाहारी होता हे वाचुन ज्ञानात भर पडली. हर्बव्होर्सना चार जठरं असतात असं शाळेत शिकल्याचं आठवतंय. परंतु गणपतीचं शरीर माणसाचं असल्याने त्याची डायजेस्टिव सिस्टम सामिष भोजन पचवत असेल. परंतु खायचे सुळे नसल्याने केवळ खिमा अथवा फिले मिन्यांवर भागवांव लागत असेल..

त.टि. - सुशी, सशिमी, कोल्डकट्स सँडविच या सगळ्यांमधे एकतरी घटक प्रिकुक असतो...

इथे गणपती मांसाहारी आहे बोलणारे पुण्यात मुंबईत कुठल्याही गणेशोत्सव मंडळ मांडवात पहिल्या दिवशी हेच बोलले तर खरे खोटे काय ते होऊन जाईल आणि उत्सव संपेपर्यन्त इकडील स्पर्धकाना आवश्यक त्या टिप्स वेळेवर उपलब्ध होतील.

राज,
तुम्ही सगळी चर्चा पहिल्यापासून न वाचताच मत देताहात बहुधा.
१. प्रश्न उपस्थित करतानाच 'चूल पेटवायची नाही म्हणून शाकाहार अध्याहृत आहे का' असा केला गेला होता.
२. त्यावर संयोजकांनी 'गणेशोत्सवातला पदार्थ म्हणजे शाकाहार अध्याहृतच' अशी पोस्ट टाकून याच नव्हे, तर सर्वच पाककृतींच्या (हो, अगदी शिरा आणि वरणभाताच्याही!) स्पर्धांत हा नियम अ‍ॅड केला.

हरकत नाही, होतं असं. Proud

ड्राय फ्रूट लाडू शक्य आहेत. सुका मेव्याचा चुरा आणि ताडाचा गूळ एकत्र खलायचे की झाले कर्जन तयार. ( कर्नाटकात या चिक्कीला कर्जन म्हणतात.)

मी जर लहानपणी घरी असे म्हणालो असतो ना की गणपती मांसाहारी असतो तर मला तुडव तुडव तुडवला असता

अरेरे,सर तुम्ही खरच असे लहानपणी का नाही बोलले ?

इथे गणपती मांसाहारी आहे बोलणारे पुण्यात मुंबईत कुठल्याही गणेशोत्सव मंडळ मांडवात पहिल्या दिवशी हेच बोलले तर खरे खोटे काय ते होऊन जाईल >>> कोणी काय बोलावे हे "कार्यकर्ते" ठरवू लागल्याने तर सगळा प्रॉब्लेम झाला आहे Happy

अरेरे,सर तुम्ही खरच असे लहानपणी का नाही बोलले?
>>>>>

आता बोलतो.
म्हणजे गणपती मांसाहारी होता, किंवा अमुकतमुक देव मदिरापान करायचे असे बोलत नाही. त्याचा माझ्याकडे काही पुरावा नसताना बोलणे हा उगाच समोरच्याची श्रद्धा दुखावणारा खोडसाळपणा ठरेल.
(किंबहुना मी देवच मानत नसल्याने माझ्यामते त्या पुराव्याला सुद्धा काही अर्थ नाही.)

पण मी देव मानत नाही, मला प्रसाद खायची इच्छा नाही, तुम्ही करा आरती मी मायबोलीवर टाईमपास करतोय, असे सगळे बोलायला आणि तसे वागायला अलाऊड आहे आता.

आपण समोरच्याची श्रद्धा जपावी आणि त्याच्याकडून आपले स्वातंत्र्य जपले जाईल ही अपेक्षा ठेवावी इतके सोपे सर्वांनी पाळले की वाद मिटतील Happy

उडीद, मूग डाळ दळून त्यात गूळ तूप घालून मिसळून छान लाडू होतात. स्पर्धेच्या नियमानुसार उडीद मूग भाजायचे नाहीत. >> भाजलेली डाळ आणली तर चालेल (कुणाकडून भाजून आणायची हा मुद्दा गुलदस्त्यामध्ये ठेवायचा :))

आमच्या बिल्डिंग मध्ये एकांकडे गणपतीला माश्यांचा नैवेद्य असतो पहिल्या दिवशी.

माझी लेक विचारते, "आई तुला देवानं सांगितलं आहे का स्वतः:? तुला कसं माहिती? "
प्रत्येकाला स्वतः:पुरते नियम ठरवायचा अधिकार आहे.
असावा.
घरातल्या घरातही आम्हाला प्रत्येकाचे वेगवेगळे नियम चालतात. ज्याला नियम नको आहे, तेही ९०% चालतं.

Happy संयोजक, लाडू चालतील का ? मी आधी सामान आणून ठेवलं आणि नंतर नीट वाचलं. 'पोटभरी' शब्दाने चिंतेत ! एकेक लाडू तिरूपती बालाजीच्या लाडूच्या साईझचा केला तर छोटा भीम कार्टून सारखे पोट भरू शकते. तुम्ही 'हो' म्हणालात तर मी तुम्हाला 'देवमाणूस' म्हणेन. असेही एकवेळ नारूचा रोगी सापडेल पण देव....! Proud

तो पोटभरीचा आहे हे गळी उतरवणे हे तुझं स्किल!
त्यातील प्रोटीन आणि ग्लायसमिक इंडेक्स आणि फिडींग गट बायोम ने कसं पोट भरल्याचं फिलिंग दीर्घकाळ राहतं त्याबद्दल सुरुवातीपासून लिहित रहा. आप मान गए या और बोलू विचार... आणि आणखी बोल.

एकेक लाडू तिरूपती बालाजीच्या लाडूच्या साईझचा केला तर ...
>>>>>
साईज मॅटर करत नाही..
जर २१ लाडू केले तर गणपतीच पोटभरीचे आहे म्हणेल.. मग संयोजकांची काय बिशाद Happy

Lol गळी उतरवण्यात तर मी स्वयंपाकापेक्षाही तरबेज आहे, पण चूल न पेटवता संयोजकांना गॅस वर बसवू म्हणताय....

Pages