पाककृती स्पर्धा २: चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ

Submitted by संयोजक on 18 August, 2025 - 03:46

नमस्कार मायबोलीकरहो!
सादर करत आहोत दुसरी पाककृती स्पर्धा - चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ.
आपल्याला रोजच गॅस पेटवून स्वयंपाक करण्याची सवय असते. पण, काही कारणाने गॅस पेटविण्याची सोय नसेल तर काय करायचं? अशा वेळी देखील चविष्ट, पोटभरीचा पदार्थ तयार करता आला, तर ती कल्पकताच म्हणावी लागेल! या स्पर्धेत तुम्हाला दाखवायचे आहे तुमचे पाककौशल्य. मायबोलीकर मतदान करतील ते तुमच्या त्या कौशल्याला!
तर ही पाककृती स्पर्धा आहे पोटभरीचा पदार्थ करायचा आणि तोही कोणतीही उष्णता न वापरता, म्हणजेच चूल, गॅस, इंडक्शन, ओव्हन, मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर इ. न वापरता! म्हणजेच शिजवणे, उकडणे, परतणे, तळणे, वाफविणे, भाजणे, उकळणे इ. काहीही करायचे नाही नाही; पण तरीही पदार्थ चवदार आणि पोटभरीचा पदार्थ तयार करायचा. यासाठी तुम्ही कोणतेही साहित्य वापरू शकता.

नियम:
१. पदार्थ तयार करताना गॅस वगैरे पेटवायचा नाही.
२. पदार्थ पोटभरीचा असावा म्हणजे जेवण म्हणून पुरेल असा असावा.
३. भाज्या, फळे, किराणा, दुग्धपदार्थ इ. (vegetables, fruits, grocery, dairy etc) जे हवे ते वापरू शकता.
४. दुकानातून मिळणारे पनीर वगैरे पदार्थ घटक म्हणून वापरू शकता.# पण तुमचा पदार्थ करताना चूल वगैरे पेटवायची नाही.
५.पाककृती पूर्ण लिहिणे आवश्यक आहे; साहित्य व कृती स्पष्ट नमूद करावी.
६. आपल्या पदार्थाचा फोटो काढून पाककृती धाग्यावर टाकावा.
७.प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे –
८. पाककृती स्पर्धा २: पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
९. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
१०. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
११. ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
१३. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
१४. पदार्थ शाकाहारी असावा.

चला तर तर बल्लवाचार्य आणि सुगरण मायबोलीकरहो, यंदा गणपती बाप्पाला अर्पण करा एक सोपा, गॅस-फ्री, पोटभरीचा पदार्थ आणि दाखवा तुमची कल्पकता!
- संयोजक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘सणाला शाकाहारच’ हा विचार गतानुगतिकपणे बिंबवत राहायची आवश्यकता वाटत नाही.>>> कशाला कोण बिबवतय? कोणाला काय हव ते खाव की..अगदी स्टेक, पोर्क, बिफ वैगरेही चालाव.
पुर्वी इथे ह्याच सदर्भाने चर्चा झाली तेव्हा अनेक देवाना मासाहारी नैवेद्य दाखवतात वैगरेही इथेही वाचल आहे.
गणपतीला नॉन्व्हेज नैवेद्य कुठेही एकल नाहिये आतापर्यत ..तेव्हा ज्याचा सण साजरा करतोय निदान त्याच्या आवडी निवडीनुसार तरी पदार्थ करावे हे अपेक्षित आहे.
बाकी चुल पेटवायला बन्दी आहे पण एखादा नविन पाकक्रुतीची स्पर्धा काढली तर मिन्स बिफ किवा पोर्क घालुन उकडिचे मोदक वैगरे नाविन्यपुर्ण पाकक्रुतीला वाव आहे.
बाकी निर्णय सयोजक आणि माबो मालकाचा या पुर्विच्या स्पर्धेत शाकाहार होता म्हणून सुचवल.

पूर्वी शाकाहार होता हे पूर्ण बरोबर नाही. दोन का तीन वर्षांपूर्वी स्पर्धेत शाकाहार स्पष्ट न लिहिल्याने मी सुशी दिलेली आणि तेव्हा संयोजकांना चाललेली.
यंदा ही १० मिनिटांपूर्वी सुशीला वाव होता. आता नाही. Lol

{गणपतीला नॉन्व्हेज नैवेद्य कुठेही एकल नाहिये आतापर्यत .}
ऐकले नही म्हणजे होतच नाही. ऐकले नाही, पण इथेच वाचले त्याला किम्मत नाही.
(अनुस्वार न वापरता लिहिले)

>>> ज्याचा सण साजरा करतोय निदान त्याच्या आवडी निवडीनुसार तरी पदार्थ करावे हे अपेक्षित आहे.
गणपतीची आवड तुम्हाला कशी माहीत??

ऐकले नही म्हणजे होतच नाही. ऐकले नाही, पण इथेच वाचले त्याला किम्मत नाही.>>> अस मी म्हटलेल नाही.
मला वाद घालायची बिलकुल इच्छा नाहिये.
अनुस्वार उमटत नाहिये हा माझ्या पिसीचा प्रॉब्लेम आहे पण त्यावरुन तुम्हाला टोमणे मारायचा अधिकार आहेच.आपली मत इतरत्र पटत नाही त्याच इथे उट्ट काढु शकताच..
सन्योजक आणी माबो प्रशसनाने काय ते ठरवावे हे वर लिहलेल वाचल नाही का?
गणपतीची आवड तुम्हाला कशी माहीत??>>> माझ्या माहितीप्रमाणे मी लिहल, तुला माहिती असेल इथे दे मला जाणुन घ्यायला आवडेल.

>>> ह्या विषयावर माझी ही शेवटची पोस्ट आहे.
थांबा थांबा, तेवढी गणपतीची आवड तुम्हाला कशी माहीत ते तरी सांगून जा!

तुमच्या पीसीसाठी गणपणीबाप्पाकडे प्रार्थना करेन. दुसरीकडचं उट्टं मी इथे काढतोय हे पण ठरवलं? छान.

तुम्ही लिहिलं त्याचा मला जो अर्थ लागला, तो लिहिला. चुकला असेल तर माबुदो.

>>> तुला माहिती असेल इथे दे मला जाणुन घ्यायला आवडेल.
हे घे. Happy

‘वगैरे’मध्ये अनुस्वार नाही, ‘वैगरे’ लिहिण्याची आवड दिसते तुझ्या पीसीला. Proud
सण आहे, दिवा घेशीलच. Light 1

अमितव
<<<< दोन का तीन वर्षांपूर्वी स्पर्धेत शाकाहार स्पष्ट न लिहिल्याने मी सुशी दिलेली आणि तेव्हा संयोजकांना चाललेली.>>>>

हो बरोबर.. मी मगाशी असे काहीतरी घडलेले आठवते म्हणालो होतो ते हेच होते Happy

असो, पण या निमित्ताने मी इथे नमूद करू इच्छितो,
मला वैयक्तिकरीत्या स्पर्धेत शाकाहारी पदार्थाची अट ठेवल्यास काही प्रॉब्लेम नाही. त्याने माझ्या कुठल्याही स्वातंत्र्यावर गदा येत नाही. स्पर्धेचे नियम काय असावेत हे ठरवण्याचे पूर्ण अधिकार संयोजक आणि मायबोली प्रशासनाला आहेत.

पण....... ,
मला कोणी मांसाहार करण्यापासून रोखायला गेले आणि जबरदस्ती माझ्या तोंडात दुधी पडवळ भरवले तर मात्र मी नरभक्षक बनून त्यालाच खाऊन टाकेन Happy

सण आहे म्हणत आपली रिक्षा फिरवणे चालुच ठेवणे. मस्तय.
गणपतीत जोगवा मागतात का? कुठल्या पंडिताकडून एकले नाही वा कुठल्या लेखात वाचले नाही. पण रिक्षा भरपुर फिरवतात बाँ. Wink
आणि अबकने किंवा स्वघोषित पंडिताने लिहिले म्हणून तरी प्रमाण कशाला माना?
….
संयोजक, तुम्ही ठरवा तुम्हाला काय नियम हवेत ते. सुचना देणं काम आहे आमचं. Proud

ही कॅटेगरी एक्झॅक्टली काय आहे?
१. गणेशोत्सवातील एक पाकृ स्पर्धा व त्यात चूल न पेटवता तयार केलेला पदार्थ - इतकेच, की
२. वरचे सगळे तर आहेच पण त्यातही गणपतीला नैवेद्य म्हणून केला जाणारा असा पदार्थ

फक्त "१" असेल कोणताही पदार्थ चालायला हवा. तो नैवेद्याला करतात की नाही हा मुद्दाच येत नाही. पण "२" असेल तर गणपतीच्या नैवेद्याला तुम्हाला जो करावासा वाटेल असा पदार्थ - हा महत्त्वाचा पॉइण्ट आहे.

तेव्हा:
- केवळ स्पर्धेत म्हणून करायचा तर कोणताही पदार्थ चालेल
- गणपतीला नैवेद्य दाखवायला, अर्पण करायला म्हणून म्हंटले की माझ्या डोळ्यासमोर फक्त शाकाहारी पदार्थच येतात. मी तरी कधी नॉन-व्हेज ऐकले नाही.
- इतरांच्याही तसेच यावेत असा हट्ट नाही. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. त्यात इतरांनी आडकाठी करण्याचा प्रश्नच नाही. प्राचीन काळी अनेक सणांत होतही असेल वापर, माहीत नाही.

आमचा सण आहे म्हणून सगळ्या दुनियेने त्या दिवसांत शाकाहारी राहावे असले प्रकार भारतात सुरू झाले आहेत ते माहीत आहे. त्याला विरोधच आहे.

हे यात भाग घेणार्‍यांकरता फक्त. संयोजकांच्या नियमाला विरोध नाही. जे जबाबदारी घेत आहेत ते नियम ठरवतील हे मान्य आहे.

गणपतीला काय आवडतं, याबद्दल -

गणपतीच्या हातात मोदक हे आधुनिक प्रकरण आहे. गणपतीला पूर्वी लाडवांचा नैवेद्य दाखवला जाई. मोदक या शब्दाचा अर्थ - आनंद देणारे. मोदक हा शब्द लाडवांना समानार्थी वापरला जाई. पुढे तो शब्द सर्वच मिठायांना वापरला जाऊ लागला. गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडू आणि खीर हा नैवेद्य एकोणिसाव्या शतकापर्यंत होता. खीर हा मूषकाचा आवडता पदार्थ.

आपण आज ज्याला मोदक म्हणतो, तो पदार्थ आग्नेय आशियात थोड्याफार फरकानं रांधला जातो. मोमो वगैरे त्याची हल्लीची लोकप्रिय रूपं आहेत. तमीळनाडू, केरळ या प्रांतातही उकडीचे मोदक आहेत. कोळकुट्टै हे त्यांचं नाव. तिकडून हा पदार्थ गणपतीचा आवडता म्हणून महाराष्ट्रात आला असावा. असे बाहेरून पदार्थ येतात, तेव्हा त्यांना एक जेनेरिक नाव मिळतं. उदाहरणार्थ, हलवा. हलवा म्हणजे गोड पदार्थ. गाजर हलवा म्हणजे गाजराचा गोड पदार्थ. शिरा हाही अरबी शब्द आहे. साखरेचा पाक हा मूळ अर्थ होता. मग साखरेपासून केलेला पदार्थ, अर्थात मिठाई, या अर्थी तो वापरला जाऊ लागला. आपण करतो त्या शिर्‍याला शिरा हे जेनेरिक नावच आहे. तेच मोदकाच्या बाबतीत घडलं. मोदक, म्हणजे मिठाई, हे जेनेरिक नाव आपण त्याला देऊन टाकलं. पण हेच जेनेरिक नाव त्याचं या भूमीतलं आधुनिकत्व अधोरेखित करतं.

गणपती ही मूळ मांसाहारी देवताच होती. पुढे तिचं शाकाहारी गोडखाऊ देवात रूपांतर झालं.

परंपरेलाच चिकटून राहायचं असेल तर मांसाहारी नैवेद्य दाखवावा, किंवा निदान किबे - टिळक - रंगारी यांच्या काळातले लाडू - खीरतरी ठेवावे.

तटी - स्पर्धेच्या नियमांशी मला काहीही देणंघेणं नाही. तरी सणाच्या दिवशी मांसाहार नाही / नको, ही भूमिका मला अमान्य आहे.

मुळात देव हि संकल्पना आहे. मग त्याला काय चालते नाहि चालत हे प्रत्येक जाती जमातीने ठरवले आहे. त्याचे मूळ शोधणे व काय बरोबर व चूक हेच मुर्खपणाच आहे.
आणि नंतर त्या गोष्टीला ( देव ह्या संक्ल्पनेला व सण) एक भावनिक झालर लावून प्रसार करणे हाच तर अनंत काळापासून हेतु असे व आहे. हेतु मागे बरीच कारण पण मुख्यतः पॉवरप्ले. बाकी नेवेद्या हे उप्लब्धता, आणि इतर अन्य कारणे असावीत.
मग मोदकच का मग हे का नको मग ह्या आख्यायिकेत ह्यांव म्हटलय की त्यांव का ह्या पंडिताने असे म्हटलेय ह्यावर चर्चा व लेख हा निव्वळ वेळ दडिवणे( ज्याला ज्ञान दाखवायचं आहे वा हुज्जत घालायची घालेल त्याने ते करावे व तो करेलच Wink
पण शेवटी सण हे मनुष्यप्राण्याने भावनिक रित्या भावना व्यक्त करायला जोडलं गेलेलं प्रतिक आहे . तेव्हा ज्याला जसं साजरं करायचं तर करा पण स्पर्धेत उतरायचं आहे आणि स्पर्धेचे नियम आहेत तर बदल म्हणून त्या नियमानुसार करायला त्रास नसावा.
उगाच तिथे ज्ञानाचे दिवे दाखवु नये.
आणि तुमच्या घरच्या गणपतीला घाला कोंबडी करून पहिल्या दिवशी. येणार्‍यांना प्रसाद तोच ठेवा.

माहिती म्हणून सांगायची अस आहे तर वेगळे बाफ उघडून पाहिजे तितकी रिक्षा फिरवा. Wink
शाळेत जातात ना गणवेष घालून? तसे समजून करा. नाहितर गप्प्गुमान बसावं.

पूर्वी शाकाहार होता हे पूर्ण बरोबर नाही. दोन का तीन वर्षांपूर्वी स्पर्धेत शाकाहार स्पष्ट न लिहिल्याने मी सुशी दिलेली आणि तेव्हा संयोजकांना चाललेली.

>>>

या वेळच्या क्रायटेरियामध्ये साशिमी फिट्ट बसेल.

उष्णता न देता मांसाहार थोडे अवघडच आहे तसे. >>
सुका जवळा चांगला कुरकुरीत असेल तर बारीक चिरलेला कांदा, खोबरं , हिरवी मिरचीबरोबर कुस्करुन खाऊन पहा एकदा Happy

अभारतीय पाककृती आहेत काही ज्यात उष्णता न देता बिन-शाकाहारी पदार्थ बनवले / खाल्ले जातात - सुशी, साशिमी , Carpaccio, Kibbeh Nayeh इत्यादी.

सुका जवळा चांगला कुरकुरीत असेल तर
>>>
म्हणजे उष्णता देणे आलेच Happy
पण हा प्रकार सुचवल्याबद्दल धन्यवाद... तसाच कुरकुरीत असेल तर करतो ट्राय.. नाहीच आवडले तर एखादा सुका बोंबील भाजून खाईन पटकन

हॉटेलात दोन वेळा जेवायला जायचा कंटाळा यायचा तेव्हा एक पदार्थ शोधून ठेवला होता. पण त्यात पावाचे वाळवलेले तुकडे घालावे लागत. ते बाद.

Lol चर्चा तर 'पाक'प्रश्न ! ही घरोघरी 'चालणाऱ्या' नैवेद्याची स्पर्धा नसून, न शिजवलेल्या पाककृतींची आहे. सणाला किंवा वर्षभरच मांसाहार करावे/करू नये याविषयी ज्याने- त्याने ठरवावे. सणावाराचा वैयक्तिक आहार किंवा आपल्या घरी "चालणारा" नैवेद्य ह्या सगळ्या भिन्न गोष्टी आहेत. या सगळ्याचा स्पर्धेशी किंवा गणपतीशी सुद्धा काहीच संबंध नाही. त्यामुळे संयोजक म्हणतील तेच प्रमाण मानायला हवे.

गणपती बुद्धीची देवता आहे पण हे वाचून तोही 'माबुदो' म्हणायचा की काय वाटतंय. Proud

चिनूक्स यांची पोस्ट वाचून वाटलं गणपतीचे शीर हत्तीचे आहे आणि हत्ती तर शाकाहारी आहे. त्याची तोंडाची- दातांची रचना मांसाचे लचके तोडून खाणारी नाही. देवता म्हणून मांसाहारी असेलही पण ही जैविक रचना जुळत नाहीये. प्राण्यांत देव मानण्यासाठीची ही प्रतिकं म्हटलं तर कुठेतरी समांतर असायला हवे. तेच हनुमान मिश्राहारी असायला हवा असं वाटतं.

छान स्पर्धा संयोजक. Happy

@ झंपी,
देव एक संकल्पना आणि स्पर्धेचे नियम –
पूर्ण पोस्ट +७८६

नास्तिक लोकांचे बरे असते.
देव नाही विषय संपला.

आस्तिक लोकं मात्र देव आहे आणि आम्ही म्हणतो तसाच आहे.
एक गट म्हणतोय गणपती शाकाहारी आहे.
तर एक गट म्हणतोय गणपती मांसाहारी आहे.
पण त्या देवाला पाहिले कोणीच नाही.
फक्त आम्ही जे प्रमाण मानू तेच खरे.

ज्या देवाला कोणी पाहिलेच नाही तो शाकाहारी आहे की मांसाहारी करत भांडत बसाल तर आयुष्य यातच खर्ची पाडाल.

त्यापेक्षा घरचा गणपती यंदा सात दिवस आहे.
स्पर्धेसाठी म्हणून एक दिवस शाकाहारी पदार्थ बनवा.
आणि उरलेले सहा दिवस ज्यांना मांसाहारी स्वयंपाक करायचा आहे त्यांनी मला जेवायला बोलवा. माझे मत त्यांनाच Happy
बक्षीस सुद्धा मिळवा आणि पुण्य सुद्धा कमवा!

>>> देवता म्हणून मांसाहारी असेलही पण ही जैविक रचना जुळत नाहीये.
आणि मुळात माणसाच्या धडाला हत्तीचं शीर ही जैविक रचना जुळते ?! Lol

विनोद बाजूला ठेवू. नियम ठरवण्याचा संयोजकांचा अधिकार कोणीही अमान्य करत नाहीये इथे. आक्षेप ‘सण म्हणजे शाकाहारी पदार्थ हे अध्याहृतच आहे’ या वाक्याला / विचारसरणीला आहे.
अशा एका वाक्याने आपण तशी पद्धत नसणाऱ्या आपल्याच समाजातील वर्गांना दूर लोटत असतो.

तशी पद्धत नसणाऱ्या आपल्याच समाजातील वर्गांना दूर लोटत असतो.
>>>>

+७८६
प्रचंड सहमत आहे.

तसेच या वाक्यात देखील आपला समाज असे म्हणताना / वाचताना कोणाच्या डोळ्यासमोर जर आपल्या ठराविक धर्माची लोकं असतील तर तिथेही आपल्या समाजातील परधर्मीय नकळत दूर लोटले जात असतात.

उदाहरणार्थ जर मी माझ्या एका मुस्लिम सहकाऱ्याला म्हणतो की आमच्यात मूर्तीपूजा असते तुमच्यात नसते तेव्हाही मी नकळत समाजात दोन गट तयार करत असतो.

किंबहुना जेव्हा आपण स्वतःला कुठल्या जातीधर्माचा टॅग लावतो तेव्हाच मुळात आपण समाजात आपला एक गट बनवून इतरांना दूर लोटलेले असते.

जर तुझा गणपती माझा गणपती सेम हवा तर का नाही तुझा अल्लाह आणि माझा राम सुद्धा सेमच हवा. पण सर्वशक्तिमान अशा देवाला मानताना सुद्धा देवात भेद असतो.

कधी कधी मलाही वाटते देव म्हणून एखाद्या शक्तीला मानावे म्हणजे आपल्यातील अहंकार कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होईल.

पण सध्याची जी देवाची संकल्पना आहे त्यात देवासोबत धर्माचा सुद्धा टॅग येतो तो नको वाटतो.

जसे लोकांना आडनाव कळले तर ते जात शोधत बसतात म्हणून ते सुद्धा नको वाटते.

सोशल मीडियावर एखाद्याने आपले नाव आणि ओळख लपवली तर त्याला डू आयडी म्हणून हिणवले जाते.
पण सोशल मिडीयाचं नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपण चारचौघात आपली ओळख पर्यायाने आपल्याला जन्मजात चिकटलेले जातीधर्माचे लेबल लपवूनच वावरायला पाहिजे. म्हणजे कालांतराने ते नाहीसे होईल.

हा खरे तर व्यापक विषय आहे. धाग्याला धागे जोडले गेले आहेत. म्हणून यावर स्वतंत्र धागा काढून चर्चा व्हायला हवी.

पुर्ण चर्चा वाचली.

उगीचच वादासाठी वाद म्हणुन सुरु आहे असे वाटले. सगळ्यांचा वेळ मस्त गेला असणार. माझा तरी वाचताना मस्त गेला.

एकच मुद्दा नवा वाटला म्हणुन आवडला. - चिनुक्सच्या गणपती मुळात मांसाहारी ह्या मुद्द्यावर अस्मिताचा हत्तीचे शिर असलेला गणपती मांसाहार करणार कसा हा.

त्याचे काय आहे की
जर गोगल गायींचा देव असेल तर तो सर्व जग पाठीवर घेतलेळी प्रचंड गोगलगाय असेल.
थोडक्यात आपण जसे तसा आपला देव, आपण मास मच्छी खाणारे तर देव ही मांसाहारी.

>>चिनुक्सच्या गणपती मुळात मांसाहारी ह्या मुद्द्यावर >> कोणत्या पुराणात उल्लेख आहे ते द्यावेत. उत्सुकता हो.
पुराणात सांगितलेल्या प्रमाणे सर्व धार्मिक स्थळांचा भारतात कारभार सुरू आहे.
मी असं वाचलं की इंडोनेशियातील लोक धर्माने मुसलमान, कपडे घालतात आपल्या इथल्या सात राज्यांतल्यांसारखे आणि शंकराच्या विष्णूच्या देवळांत नैवेद्य दाखवतात मांसाचा. जे पदार्थ खातात त्याचा नैवेद्य.

उडीद, मूग डाळ दळून त्यात गूळ तूप घालून मिसळून छान लाडू होतात. स्पर्धेच्या नियमानुसार उडीद मूग भाजायचे नाहीत.

जे आपण खाणार तेच आपले देव खाणार याच्याशी सहमत. गणपतीला दुपारच्या जेवणात मॅगी वाढलेली पाहिलीय. आपल्या दोन पिढ्या आधी सगळा सैपाक घरात करुन त्यातलाच नैवेद्य दाखवायचे. आता नैवेद्यापुरता सैपाक घरात करुन बाकी सगळे मागवतात. अजुन २० वर्षांनी सगळेच बाहेरुन येईल, त्यात मांस असले तरी तेव्हाच्या कोणाला खटकणार नाही.

असो, माझ्याकडुन खुप विषयांतर झाले. मुळ विषय सुरु राहुदे.

हत्तीचे शिर असलेला गणपती मांसाहार करणार कसा हा.
>>>>>

हत्ती हा मुळात मांसाहारी होता. ते आफ्रिकेत राहायचे.
उत्क्रांती नंतर ते भारतात आले आणि इथली संस्कृती अंगिकारून शाकाहारी झाले.

किंवा

शंकराने शीर उडवण्याआधी गणपती मांसाहारी होता.
हत्तीचे शीर लावल्यावर शाकाहारी झाला.

किंवा

तो देव आहे. तो काहीही करू शकतो. त्याला ब्रह्माचे वरदान होते.

पुराण हा असा विषय आहे की तिथे काहीही म्हणता येते.
कोणी बघायला जात नाही.

त्यामुळे इथला वाद संपणार नाही..

आणि संपवू सुद्धा नका जोपर्यंत गणपतीचे धागे निघायला सुरुवात होत नाहीत..

फारेण्ड, व्यवस्थित आणि नेमके लिहिले आहे.

मुळात माणसाच्या धडाला हत्तीचं शीर ही जैविक रचना जुळते - सही जवाब.

अशा एका वाक्याने आपण तशी पद्धत नसणाऱ्या आपल्याच समाजातील वर्गांना दूर लोटत असतो. +१

ही शाळा असेल तर विचारलेल्या प्रश्नांना फक्त संयोजकांनी उत्तरे द्यावीत, इतरांनी गप बसावे असं म्हटलं तर चालेल का?

शिवाय संयोजक म्हणतील तसं हे सगळ्या धाग्यांवर ना? की दुसरीकडे आम्ही कीस पाडणार?

Pages