परकीय भाषेतील चित्रपटांचा मायबोलीवर धागा असावा. पण बरेचदा माझ्यासारख्यांना त्याचा काही फायदा होत नाही. कारण सर्वांनाच परकीय भाषेतील संवाद कळत नाहीत. तसेच चित्रपट बघताना सोबत सबटायटल वाचणे त्रासदायक ठरते. ते देखील बरेचदा इंग्लिशमध्येच असल्याने सर्वांनाच ते कळत नाहीत किंवा पटपट वाचणे जमत नाहीत. त्यामुळे बरेच जण हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटांना प्राधान्य देतात. काही मराठीत देखील असतात. पण त्या डबिंगचा दर्जा तितका चांगला नसल्याने म्हणून म्हणा तितकी मजा येत नाही. सुधारणा झाली तर आवडेल.
असो,
तर अश्या सर्व चित्रपट प्रेमींसाठी हा धागा.
आजकाल ओटीटी किंवा युट्युबवर बरेच चित्रपट हिंदीमध्ये डब केलेले आढळतात. त्यातील आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल इथे लिहूया आणि इतरांना सांगूया.
त्याआधी मी हे चित्रपट साधारणपणे कसे वेचतो ते सांगतो.
पहिला मी ट्रेलर बघतो. तसेच कुठला जॉनर नमूद केला आहे ते बघतो. म्हणजे मूडनुसार कुठला चित्रपट बघायचा हे ठरवता येते. उदाहरणार्थ, हलके फुलके बघायचे असल्यास ड्रामा कॉमेडी रोमान्स असले चित्रपट आधी निवडतो. त्यानंतर जे शॉर्ट लिस्ट होतात त्यांचे नाव गुगल सर्च करून त्याचे IMDB रेटिंग बघून घेतो. किंवा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बघतो. बरेचदा चांगले मास चित्रपट बॉक्स ऑफिस कमाईवरून कळतात.
रेटिंग आणि बॉक्स ऑफिस कमाई दोन्ही कमी असेल तर सहसा वेळ वाया घालवायची रिस्क घेत नाही. किंवा थोडावेळ फॉरवर्ड करत बघतो आणि नाही आवडल्यास सोडून देतो.
चला, प्रतिसादात सुरुवात मीच करतो.
किष्किंधा कांडम मध्ये जो विषय
किष्किंधा कांडम मध्ये जो विषय हाताळला आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या विचार न करता जशी ट्रीटमेंट देत ती कलाकृती तयार केली आहे ते मला धाडसाचे काम वाटले आणि याचे जास्त कौतुक वाटले. असे चित्रपट उचलून धरणाऱ्या तिथल्या प्रेक्षकांचे सुद्धा कौतुक.
केरला क्राईम स्टोरी बघायची आहे. बरे झाले आठवण केली. विस्मरणात गेले होते.
किष्किन्धा कांडम चांगला केलाय
किष्किन्धा कांडम चांगला केलाय सिनेमा पण खूप लक्षपुर्वक बघावा लागतो.
Biker बघितला , नवर्याने
Biker बघितला , नवर्याने आवर्जून मला आणि लेकाला बघायला लावलेला. सुरुवातीला हे काय चालू आहे असं झालं , पण नंतर आवडला.
Pages