नॉन हिंदी/मराठी/इंग्रजी गाणी

Submitted by सामो on 28 July, 2025 - 13:38

मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी आपण ऐकतोच पण आपल्यापैकी अनेकजण अन्य भाषेतीलही गाणी ऐकत असतील. कारण त्यांना भाषा येत असेल, किंवा भाषा गोड वाटत असेल. या धाग्यावरती अशी नॉन-मराठी, नॉन - हिंदी व नॉन-इंग्रजी गाणी शेअर करु यात का? मी करते सुरुवात. बंगाली भाषा अतिव मधुर असल्या कारणाने मी खूप बंगाली गाणी ऐकते. बरेचदा असे कळते की हिंदी आणि बंगाली गाण्यांच्या चाली डिट्टो आहेत. -
उदा -

https://www.youtube.com/watch?v=Ccw-AppiE-Q - आमी चोलते चोलते थेमे गेशी
हे आणि याचा हिंदी काऊंटरपार्ट -
https://www.youtube.com/watch?v=CPwbi-hfenI - कई बार यूं ही होता है
------------------

https://www.youtube.com/watch?v=UQvcmBUd_uc&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - ना जेओ ना
हे आणि याचा हिंदी काऊंटरपार्ट -
https://www.youtube.com/watch?v=SYEzJfSZm2w - ओ सजना बरखा बहार
-----------------------------------------------
बंगाली - https://www.youtube.com/watch?v=EZ-V8YvUqSM&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - ना मोनो लागे ना
हिंदी - https://www.youtube.com/watch?v=hdX_sQr19Yo&list=RDhdX_sQr19Yo&start_rad... - ना जिया लागे ना
---------------------------------
अशी खरच खूप बंगाली गाणी आहेत. मग गुगल ट्रान्स्लेशन करुन त्यांचा अर्थ शोधायचा. कधीकधी म्हणजे खरे तर खूपदा रम्य कविता सापडतात. आर्त गाणी सापडतात. एक आर्त गाणे -
https://www.youtube.com/watch?v=r3lYU0FI1WE - जोखोन निरोबे दूरे
“Jokhon Nirobe Dure” (যখন নীরবে দূরে) translates to “When Silently, from Afar.”
This title immediately sets a contemplative and distant tone, suggesting themes of separation, quiet observation, or unspoken emotions.
The poem explores an emotion of quiet longing, possibly for a lost love, an unattainable dream, or a moment forever out of reach. Jibanananda often portrayed characters who observe life from a distance, detached yet deeply affected.

वरती इंग्रजीत कोणी तरी सुंदर वर्णन केलेले आहे. माझ्याच्याने ते मराठीत तितक्या उत्कटतेने रुपांतरित होणार नाही म्हणुन तसेच ठेवले आहे.
----------------------------------
https://www.youtube.com/watch?v=Laeq6MgYVPk&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - - ब्रिष्टी ब्रिष्टी ब्रिष्टी
खरोखर अवतीभवती पाऊस पडू लागतो.
-----------------------
https://www.youtube.com/watch?v=Y7ZHkpRcshQ&list=RDY7ZHkpRcshQ&start_rad...
हे एक तेलुगु गाणे इतके सुंदर चित्रीकरण आहे. खेड्यातील जीवन दाखविले आहे. अर्थात फक्त सुंदर सुंदर घटना, निसर्ग दाखविण्याची आर्टिस्टिक लिबर्टी घेतलेली आहे.
--------------------------------------
हे आदिभिक्षु नावाचे शंकरांचे गाणे. त्या 'आदिभिक्षु' नावाच्याच प्रेमात पडले नंतर गाण्याच्या व शेवटी त्या गाण्यातील काव्याच्या.
https://www.youtube.com/watch?v=RQRlVmDwlyo&list=RDRQRlVmDwlyo&start_rad...
--------------------------------------
श्रीरामदासुडू तर प्रत्येक गाणे विलक्षण आहे.
https://www.youtube.com/watch?v=E8aZn74OOXQ&list=RDE8aZn74OOXQ&start_rad... - वर्णनात्मक रामनामावली भजणारे हे गाणे घ्या
किंवा
अंत राममयम - https://www.youtube.com/watch?v=TLfOhQGDzvY&list=RDTLfOhQGDzvY&start_rad...
-----------------------------------------
हे तामिळ 'दशावतार' गाणे सुमधुर तर आहेच पण पहायलाही खूप मजेशीर आहे. - https://www.youtube.com/watch?v=IfHnOxw_N0w
-----------
https://www.youtube.com/watch?v=XGeccjWtWnc&list=RDXGeccjWtWnc&start_rad... - गंगा तुमी गंगा बोइझोकॅनो
.
त्याचे हे हिंदी व्हर्जन -
https://www.youtube.com/watch?v=syrh0rEnFGQ&list=RDsyrh0rEnFGQ&start_rad...
.
विस्तार है अपार, प्रजा दोनों पार
करे हाहाकार निःशब्द सदा
ओ गंगा तुम
ओ गंगा बहती हो क्यूँ?

नैतिकता नष्ट हुई, मानवता भ्रष्ट हुई
निर्लज्ज भाव से बहती हो क्यूँ?
इतिहास की पुकार, करे हुंकार
ओ गंगा की धार
निर्बल जन को
सबल-संग्रामी, समग्रोगामी
बनाती नहीं हो क्यूँ?

अनपढ़ जन अक्षरहिन
अनगीन जन खाद्यविहीन
नेत्रविहीन दिक्षमौन हो क्यूँ?
इतिहास की पुकार...

व्यक्ति रहे व्यक्ति केंद्रित
सकल समाज व्यक्तित्व रहित
निष्प्राण समाज को छोड़ती ना क्यूँ?
इतिहास की पुकार...

रुदस्विनी क्यूँ न रहीं?
तुम निश्चय चितन नहीं
प्राणों में प्रेरणा देती ना क्यूँ?
उनमद अवमी कुरुक्षेत्रग्रमी
गंगे जननी, नव भारत में
भीष्मरूपी सुतसमरजयी जनती नहीं हो क्यूँ?
विस्तार है अपार...
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=xGanUSHrFoQ&list=RDxGanUSHrFoQ&start_rad... - आमि एक जाजाबोर

मी एक मनमुक्त हरफनमौला/ भटक्या ....
फार सुंदर युनिव्हर्सल गाणे आहे. माझे सर्वात लाडके. कारण या गाण्याच्या चालीतच एक मोकळा श्वास आहे, विस्तीर्ण रस्ता, मोकळे आभाळ आहे. मला नेहमी वॉल्ट व्हिटमनचे, 'सॉंग ऑफ ओपन रोड' आठवते. इट स्टर्स माय हार्ट. काहीतरी विलक्षण वाटते, काहीतरी हाक घालते. कारण या गाण्याची चाल.
Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.
-------------------------
https://youtu.be/luwe3NKvxos?si=_f5q4JmNd1Regp5R

कोणी एक भणंग योगी 'अलख निरंजन' घोष करीत भिक्षेसाठी, तिच्या दारात आला. भस्म-विभूषित असा तो देखणा योगी उच्च रवाने 'अलख निरंजन' घोष करत तिच्या दारापुढे थांबला. सौधावरील, गवाक्षातून तिने त्याला पाहीले आणि तिची काया रोमांचित झाली. तिच्या मनाचे बांध सुटले. आणि तिच्या समुद्रासम शांत, विशाल नेत्रात एक वीज चमकली. स्वतःच्याच या आवेगापुढे, तिचे गाल आरक्त झाले, तिची वेणीसुटली, पदर ढळला.
परत तेच स्वर तिच्या कानामध्ये घुमले "अलख निरंजन-अलख निरंजन" आता, तिला आपली कर्तव्ये विसरायाला झाली, आणि राहीली फक्त एक ओढ. अनामिक, अतार्किक, उत्कट ओढ तिच्या रक्तात सळसळली. आणि आपली वस्त्राप्रवरणे सावरुन, तिने घायाळ हरीणीसम, सौधावरुन, अंगणी धाव घेतली. योग्याच्या तेजस्वी नेत्रांना तिचे नेत्र भिडले आणि ती स्तिमित स्तब्ध झाली. तिने उच्चारले " हे योग्या, कोण आहेस तू? तुझ्या डोळ्यात हे काय तेज आहे ज्याचे मला विलक्षण संमोहन पडते."
दुसर्‍या दिवशी योगी परत तिच्या अंगणी आला आणि परत तोच नाद अंगणी घुमला, "अलख निरंजन" यावेळेला ती वाटच पहात होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने, तिने अंगणात धाव घेतली, दार उघडले आणि ती भिक्षा घालणार तोच, यावेळेस योग्यानेच तिला भिक्षापात्र हाती दिले. काय होते त्या भिक्षापात्रात, होते खुडलेले तेजस्वी डोळे - योग्याचे.
योगी तिला संबोधुन म्हणाला "आई, ज्या डोळ्यांनी तुला मोह घातला, तुला तुझ्या कर्तव्यांचे विस्मरण घडविले ते हे दोन डोळे - घे. मी तुला दिले." आणि परत 'अलख निरंजन' घोष करीत, तो योगी दूर दूर निघून गेला, ठिपका ठिपका झाला. हातामधे पात्र धरुन ती किती वेळ त्याला पाठमोरी पहात राहीली, वेळेचे जणू भानच हरपले.
आणि तिला कळून आले, भिक्षा तर त्याने तिला घातली - विवेकाची. योग्याच्या नेत्रांचे, हे उत्कट, विलक्षण दान तिला अंतर्चक्षु देउन गेले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सामो आणि @रानभुली बंगाली गाण्यांविषयी खूप ऐकून होते पण कधी ऐकली नव्हती. तुम्ही खजिना उघडून दिलाय.

'आमी बोलते बोलते'ची चाल 'कई बार यूं' सारखीच असली तरी ट्रीटमेंट वेगळी आहे. 'आमी बोलते'चा प्रिल्यूड किती वेगळा आहे आणि ते खेळकर वाटते तर कई बार यूं thoughtfool आहे.

आर डीच्या आवाजातलं 'जेते जेते पॉथे' आवडलं. त्याला नेहमी ढिनच्यॅक गाण्यात ऐकले आहे. 'तेरे बिना जिंदगी से'ची चाल आणि 'इस मोड से'ची उदास मूडमधली कविता असं वेगळंच मिश्रण आहे.

'कि लिखी तोमाय'ची चाल कुठेतरी बहुतेक मराठी गाण्यात ऐकल्यासारखी वाटते आहे पण पकडीत येत नाही.

'ऐयी रात तोमार आमार'चा प्रील्यूड 'तुम पुकार लो'चा वाटतो आणि 'ये नयन डरे डरे' सुरु होतं.

हळूहळू ऐकते आहे.

https://www.youtube.com/watch?v=XGeccjWtWnc&list=RDXGeccjWtWnc&start_rad... - गंगा तुमी गंगा बोइझोकॅनो
.
त्याचे हे हिंदी व्हर्जन -
https://www.youtube.com/watch?v=syrh0rEnFGQ&list=RDsyrh0rEnFGQ&start_rad...
.
विस्तार है अपार, प्रजा दोनों पार
करे हाहाकार निःशब्द सदा
ओ गंगा तुम
ओ गंगा बहती हो क्यूँ?

नैतिकता नष्ट हुई, मानवता भ्रष्ट हुई
निर्लज्ज भाव से बहती हो क्यूँ?
इतिहास की पुकार, करे हुंकार
ओ गंगा की धार
निर्बल जन को
सबल-संग्रामी, समग्रोगामी
बनाती नहीं हो क्यूँ?

अनपढ़ जन अक्षरहिन
अनगीन जन खाद्यविहीन
नेत्रविहीन दिक्षमौन हो क्यूँ?
इतिहास की पुकार...

व्यक्ति रहे व्यक्ति केंद्रित
सकल समाज व्यक्तित्व रहित
निष्प्राण समाज को छोड़ती ना क्यूँ?
इतिहास की पुकार...

रुदस्विनी क्यूँ न रहीं?
तुम निश्चय चितन नहीं
प्राणों में प्रेरणा देती ना क्यूँ?
उनमद अवमी कुरुक्षेत्रग्रमी
गंगे जननी, नव भारत में
भीष्मरूपी सुतसमरजयी जनती नहीं हो क्यूँ?
विस्तार है अपार...

https://www.youtube.com/watch?v=xGanUSHrFoQ&list=RDxGanUSHrFoQ&start_rad... - आमि एक जाजाबोर

मी एक मनमुक्त हरफनमौला/ भटक्या ....
फार सुंदर युनिव्हर्सल गाणे आहे. माझे सर्वात लाडके. कारण या गाण्याच्या चालीतच एक मोकळा श्वास आहे, विस्तीर्ण रस्ता, मोकळे आभाळ आहे. मला नेहमी वॉल्ट व्हिटमनचे, 'सॉंग ऑफ ओपन रोड' आठवते. इट स्टर्स माय हार्ट. काहीतरी विलक्षण वाटते, काहीतरी हाक घालते. कारण या गाण्याची चाल.
Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.

'गंगा बहती हो क्यूँ?' हे पण आवडीचे गाणे आहे. विसरलेच होते.

त्यांचेच 'एका बेका बातेरे' हे आसामीज गाणे

आणि त्याचे हिंदी व्हर्जन डोला हो डोला

हक्कुस बक्कुस चा अर्थ मध्यंतरी लावला होता. इथेच कुठल्या तरी धाग्यावर दिलेला.

हीच लिंक मी शोधत होतो पण ती मला मिळाली नाही. मग जी मिळाली ती दिली.
आभार.
ह्या गाण्या वरून माझा आणि माझ्या एका वंग मित्राचा वाद झाला होता, तो म्हणत होता की हे मूळ बंगाली गाणे आहे ,ते तुम्ही मराठीत कॉपी केले आहे. आणि मी त्याच्या उलट. खर तर दोनही गाणी एकाच वेळी रीलीज झाली होती. दिवाळी स्पेशल.

र्मदने वरती २-३ दिली आहेत, पण मी पोन्नियीन सेल्वनची सगळीच तमिळ गाणी अनेकदा आवडीने ऐकतो. दर वेळी वेगवेगळं गाणं मनात घर करतं. पूर्वी येलो येलेलो जास्त आवडायचं. नंतर सोडा सोडा आवडायला लागलं. मग त्याची जागा देवराळन नाचाच्या गाण्याने घेतली. सध्या अग नगा अग नगा फारच आवडायला लागलं आहे. रेहमानच्या गाण्यांच्या बाबतीत असे प्रकार बर्‍याचदा घडतात.

तेलुगूत 'कोथ्थ बंगारू लोकम' (उच्चार चुकत असतील, क्षमस्व) या पिक्चरची सगळी गाणी छान आणि गोड आहेत एकदम. त्यातली 'निजंगा नेनेना' आणि 'नी प्रश्नलु' ही मला फार आवडतात. हॅपी डेज (तेलुगू) पिक्चरची गाणी माहीत असतीलच.. नसतील तर ऐकून पहा, मस्त आहेत.

अनिरुद्ध रविचंदर हा तमिळ चित्रपटातील गाण्यांना आंतरराष्ट्रीय, नवा आणि फ्रेश साज चढवणारा उदयोन्मुख संगीतकार वाटतो मला. (पूर्णतः वैयक्तिक मत.) त्याची गाणी spotify वर ऐकू शकता.
काही हिट गाणी ही तमिळ स्थानिक बीट Kuththu या प्रकाराला नवा साज चढवलेली मसाला चित्रपटांसाठीची गाणी आहेत, काही हळुवार, तर काही मनस्वी अशी.
त्याची काही गाणी व चित्रपट नावे - वर्ष:
Why This Kolaveri Di (from 3– 2011)
Aaluma Doluma (from Vedalam– 2015)
Kanave Kanave (from David – 2013)
Sodakku (from Theeran Adhigaaram Ondru – 2017)
Marana Mass (from Petta – 2019)
Thangamey (from Naanum Rowdy Dhaan – 2015)
Vathi Coming (from Master – 2021)

https://youtu.be/luwe3NKvxos?si=_f5q4JmNd1Regp5R

कोणी एक भणंग योगी 'अलख निरंजन' घोष करीत भिक्षेसाठी, तिच्या दारात आला. भस्म-विभूषित असा तो देखणा योगी उच्च रवाने 'अलख निरंजन' घोष करत तिच्या दारापुढे थांबला. सौधावरील, गवाक्षातून तिने त्याला पाहीले आणि तिची काया रोमांचित झाली. तिच्या मनाचे बांध सुटले. आणि तिच्या समुद्रासम शांत, विशाल नेत्रात एक वीज चमकली. स्वतःच्याच या आवेगापुढे, तिचे गाल आरक्त झाले, तिची वेणीसुटली, पदर ढळला.
परत तेच स्वर तिच्या कानामध्ये घुमले "अलख निरंजन-अलख निरंजन" आता, तिला आपली कर्तव्ये विसरायाला झाली, आणि राहीली फक्त एक ओढ. अनामिक, अतार्किक, उत्कट ओढ तिच्या रक्तात सळसळली. आणि आपली वस्त्राप्रवरणे सावरुन, तिने घायाळ हरीणीसम, सौधावरुन, अंगणी धाव घेतली. योग्याच्या तेजस्वी नेत्रांना तिचे नेत्र भिडले आणि ती स्तिमित स्तब्ध झाली. तिने उच्चारले " हे योग्या, कोण आहेस तू? तुझ्या डोळ्यात हे काय तेज आहे ज्याचे मला विलक्षण संमोहन पडते."
दुसर्‍या दिवशी योगी परत तिच्या अंगणी आला आणि परत तोच नाद अंगणी घुमला, "अलख निरंजन" यावेळेला ती वाटच पहात होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने, तिने अंगणात धाव घेतली, दार उघडले आणि ती भिक्षा घालणार तोच, यावेळेस योग्यानेच तिला भिक्षापात्र हाती दिले. काय होते त्या भिक्षापात्रात, होते खुडलेले तेजस्वी डोळे - योग्याचे.
योगी तिला संबोधुन म्हणाला "आई, ज्या डोळ्यांनी तुला मोह घातला, तुला तुझ्या कर्तव्यांचे विस्मरण घडविले ते हे दोन डोळे - घे. मी तुला दिले." आणि परत 'अलख निरंजन' घोष करीत, तो योगी दूर दूर निघून गेला, ठिपका ठिपका झाला. हातामधे पात्र धरुन ती किती वेळ त्याला पाठमोरी पहात राहीली, वेळेचे जणू भानच हरपले.
आणि तिला कळून आले, भिक्षा तर त्याने तिला घातली - विवेकाची. योग्याच्या नेत्रांचे, हे उत्कट, विलक्षण दान तिला अंतर्चक्षु देउन गेले.

सामो, सुंदर आहे हे.
युट्यूब व्हिडीओ पाहिला. सुंदरच आहे.
चित्रं विशेष आवडलीत.

Pages