सत्यवान सावित्री

Submitted by तुषार विष्णू खांबल on 10 June, 2025 - 14:37
का करू मी वटपौर्णिमा?

सत्यवान-सावित्री
शब्दांकन: तुषार खांबल
फोटो साभार - गुगल

जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून
सावित्रीने व्रत-वैकल्य केली
हुंडा मिळाला नाही म्हणून सत्यवानाने
तिलाच यमसदनी दिली

सोने,चांदी, बंगला गाडी
सर्व काही दिलं
स्वतःच पाप झाकण्यासाठी
त्याने तिला चारित्र्यहीन केलं

काय काय सहन केलं
व्यथा सांगायला नव्हता वाव
शेवटी सावित्री लटकली फासावर
सत्यवान मारी मटणावर ताव

बातमी आली, अटक झाली
तरी सत्यवानाचा उतरेना माज
हैवान भरले घरात सारे
कुणालाच कसली वाटेना लाज

भूतकाळ शोधताना मग कळले
हा सत्यवान शैतान होता
हाव मिटविण्या पैश्याची
सावित्रीला शोषत होता

सरतेशेवटी शैतानाचा
खरा चेहरा समोर आला
ओरडून जगाला सांगे बाप मग
सावित्री पेक्षा तुम्ही दुर्गा जन्मास घाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users