भाषादान

Submitted by माबो वाचक on 24 May, 2025 - 00:36

आंतरजालावर फिरताना हा लेख सापडला.
https://thinkmaharashtra.com/govt-initiative-to-facilitate-translation-i...

भाषादान हा भारत सरकारच्या भाषिणी प्रकल्पाचा “Crowd Source” उपप्रकल्प आहे. वरील लिंकमधील लेखात त्याबद्दल सर्व माहिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा येथे देत नाही.
मी तेथे केलेल्या भाषादानाच्या डॅशबोर्ड चा फोटो खाली देत आहे. मायबोलीवरील इच्छुक मंडळींना या प्रकल्पाची माहिती मिळावी म्हणून येथे पोस्ट करत आहे.
मी भाषादान करण्या व्यतिरिक्त या प्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.

Bhashadaan Screenshot.png

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गेल्या वर्षभरापासून येथे जात येत आहे. माबोकर मैत्रिणीनंच सांगितले होते. छानच आहे. विशेषतः संस्कृत भाषेसाठी थोडंसं (सवडीनुसार) काही करण्याची इच्छा असेल तर उत्तम मार्ग दिसेल इथे. (कारण तिथे अगदी कमी प्रतिसाद दिसतोय त्याकरिता)
शिवाय विशिष्ट टप्प्यावर badge मिळतात. मी तर ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांना हे सांगायचा सपाटा लावला होता. घरबसल्या समाधान देणारा उपक्रम आहे हा.
टीप - संस्कृत भाषा validation साठी त्यांच्याकडे डेटा उपलब्ध नाहीये. यावरूनही उपक्रमाची आवश्यकता लक्षातह येऊ शकते)