Submitted by अक्षय समेळ on 13 April, 2025 - 09:56
सोसूनि उन्हाचा चटका जळले तनु माझे
शीतल हवांचा शोध न लागे, दु:ख हे साचे
अंतास आता आरंभ गवसे, मंत्र हा काळा
प्रवास नव्याचा मार्ग खुला, चित्त हे उजळा
परतीत गेले मेघ उमटती, आशा हरपली
वर्षाव होता, संहाराची सीमा गाठली
वाटेवरीती अंधार होता, एकटी झाली
मार्तंड आला, तेजाने दिशा उजळली
सुखसुविधा या येऊनि बसती दारामाजी
स्वप्नांमध्ये फक्त दिसे हे, खरे काही नाही
सुवर्णयुग फसवेपणाने हुलकावणी देते
इच्छा बिचारी, कैद होऊनि थांबुनी बसते
कष्टातुनी मी शोध घेतो मुक्ततेसाठी
स्वप्नांसवे मी चालत गेलो ध्यास धरूनी
कृष्णास स्मरतो मंत्र नवीन, हृदय हे गाते
आशेवरी मी चालतो जे, ध्यासच ठरवते
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान
छान !
छान !
छान !