Submitted by ऋतुराज. on 17 March, 2025 - 11:31
कोबीची कोशिंबीर
कोबी आवडणारे आणि न आवडणारे अनेक जण आहेत.
कोबीची भाजी सर्रास होते पण झटपट होणारी ही कोशिंबीर कोबी न आवडणाऱ्यांना देखील आवडेल.
साहित्य:
कोबी १५० ग्रॅम भाजीला चिरतो तसा चिरून
कढीपत्ता, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी, हिंग, तेल, मीठ, लिंबू आणि अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे
कृती:
प्रथम कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे मोहरीची फोडणी द्यावी. यातच कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. आता एका भांड्यात चिरलेला कोबी घ्यावा त्यावर वरील फोडणी टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे व लिंबू पिळावे. सगळ्यात शेवटी सर्व्ह करताना डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर टाकावी.

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>Btw मी ही माहेरची भावे.>>
>>Btw मी ही माहेरची भावे.>>
क्या बात... क्या बात... क्या बात... 👍
.. तुमच्या आणि आमच्या
.. तुमच्या आणि आमच्या सौभाग्यवतींच्या खाण्या-पिण्याच्या आवडी बर्यापैकी समान आहेत …
खाण्यातल्या माझ्या नखरेल सवयींनी वैतागतात घरचे-दारचे पण आता सुधारणे पलीकडची केस आहे हे मान्य झालंय
कसली ही जीभशिंदळकी असे म्हणतात अन देतात सोडून 😀
अवांतर पुरे करतो
कृपया असे लेखन ललित लेखनात न
कृपया असे लेखन ललित लेखनात न प्रकाशित करता , पाककृती आणि आहारशास्त्र विभागात पाककृती म्हणून प्रकाशित करा.
कधी बनवली नाही अशी कोशिंबीर..
कधी बनवली नाही अशी कोशिंबीर.. खाल्ली पण नाही..
छान आहे रेसिपी.. करून बघेन एकदा..
फोटो मस्त..
धन्यवाद वेमा.
धन्यवाद वेमा.
माझ्याकडून तो चुकून गुलमोहर ललित मध्ये प्रकाशित झाला.
मस्त.
मस्त.
मला पानकोबी अगदी खूपच आवडते
मला पानकोबी अगदी खूपच आवडते असे काही नाही आणि तिचा अगदी तिरस्कार करावा असेही काही नाही. कोबीची कोशिंबीर मात्र आवडते. महिन्यातून एकदातरी होतेच. काल इतर एका रेसीपीचे फोटो काढत असताना कोबीची कोशिंबीर ही होती. तीवर मोठ्या मोहरीची फोडणी टाकलेली मला आवडते. म्हणून हा एक फोटो काढला.
ह्यात दही आहे का?
ह्यात दही आहे का?
हो.
हो.
कोबी, काकडी, कांदा, टोमॅटो इ पैकी कशाचाही कोशिंबिरीत आमच्याकडे दही असतंच.
अच्छा.
अच्छा.
कोशिंबिर सुरेख दिसते आहे.
कोशिंबिर सुरेख दिसते आहे.
जर फार कचकचीत नको असेल अथवा
जर फार कचकचीत नको असेल अथवा उग्र वास आवडत नसेल, तर फोडणीत बारीक चिरलेला कोबी टाकून एक वाफ काढून खायचा पर्यायही चांगला आहे. फक्त त्यात मग हळद घालावी लागेल किंचित!
यात तीन प्रकार आहेत.
यात तीन प्रकार आहेत.
१. गुजरातकडे ढोकळयाबरोबर देतात.
२. Coleslaw
३. कोबीवर तेल+विनिगर + मिरी चे ड्रेसिंग घातलेले सलाड. ( बेदाणे, मनुका घालून)
Pages