(मूळ इंग्रजी कवितेचा अनुवाद)
साय तिच्या त्वचेतून पाझरत राहिली.
किळस तिच्या चेहऱ्यावर वावरत राहिला.
अंधकार – ज्याने तिचे आयुष्य झपाटले होते –
तिच्या पापण्यांखाली घट्ट तो बंदिस्त राहिला.
पैसा बेरहम, तिच्या ओठांवर हसण्याची बळजबरी —
तिच्या शरीरावर माझी मालकी, दीड तासभरासाठी;
तिच्या कत्तलेची माझी जबाबदारी, दीड तासभरासाठी;
दोन बोटांनी मानेखाली अलगद खुपसले आणि,
दूध घळघळा वाहून गेले, दीड तासभरासाठी.
मी तिचा कोणीच होऊ शकणार नव्हतो, हे स्पष्टच होते.
मी तिला माझा कोणीच करू शकणार नव्हतो, हे देखील स्पष्ट होते.
तिचे शरीर जरी मी मिळवले होते, तिचा सांगाडा तरी कधीच पाहू शकणार नव्हतो.
आणि म्हणूनच सर्वभूतांच्या अस्तित्वांतून अर्थ झपाट्याने नाहीसा झाला.
चिरकाल रिकाम्या अशा पोकळीत,
मिठीतून विलग होणारी दोन नग्न शरीरे फक्त.
आणि त्या क्षणी छातीतून तिने दाखविले;
हुबेहूब कोरून ठेवलेले बुद्धाचे एक स्मित मात्र.
[ऑक्टोबर २०२३]
(मूळ कविता)
Cream oozed from her skin.
Disgust hovered over her face.
Under her eyelids, she tightly imprisoned;
the darkness that had her life possessed.
Money merciless, forced her lips into a smile —
My ownership of her body, one and a half hours.
My responsibility for her slaughter, one and a half hours.
Two fingers slowly pierced her at neck;
and let streams of milk out, one and a half hours.
I could never be anything to her, that’s clear.
I could never make her anything of mine, that’s also clear.
I owned her surface but could never own her skeleton;
And therefore, meaning rapidly degraded from the existence of matter.
In an eternal empty space;
two naked bodies, coming out of a transactional embrace.
And, at that point, she revealed from within her bosom;
a buddha smile precisely engraved.
मूळ कवि कोण?
मूळ कवि कोण?
मीच लिहिली होती. आज अनुवाद
मीच लिहिली होती. आज अनुवाद केला पोस्ट करायची म्हणून. मूळ इन्ग्रजी कविता ही आज पहिल्यान्दाच कुठेही पोस्ट केली आहे.
गुड वन
गुड वन