गाणी आणि प्राणी - चित्रपटसंगीत आणि झूलॉजी!

Submitted by स्वाती_आंबोळे on 13 March, 2025 - 11:03

गाण्यांत आलेल्या बोटॅनिकल उल्लेखांची यादी आपण पूर्वी केली.
मायबोलीकर ऋतुराज यांनी 'झाडंफुलं झाली, आता प्राणी/पक्षी/कीटक वगैरेही हवेत' असं सुचवलं. त्यावरून हा धागा काढत आहे, त्यामुळे या धाग्याचं श्रेय ऋतुराज यांचं. Happy

मला चटकन आठवणारी गाणी लिहून सुरुवात करून देते - तुम्ही भर घाला.
मथळ्यात 'चित्रपटसंगीत' असं म्हटलं असलं तरी अर्थातच चित्रपटबाह्य गाणी आणि कविता आठवल्या तरी त्या जरूर लिहा.
(मला तो चित्रपट शब्द स्ट्राइकआऊट करायचा होता, पण मथळ्यात ते टॅग्ज चालत नाहीत. Happy )

हिंदी:
१. चुन चुन करती आयी चिडिया
२. ईचक दाना बीचक दाना (एक जानवर ऐसा, जिस की दुम पर पैसा... मोर)
३. जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा
४. चल चल चल मेरे साथी
५. तोता मैना की कहानी तो पुरानी हो गयी
६. माई नि माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा
७. एक चतुर नार (जारे जारे जारे कागा, अबे घोडे)
८. जा रे, जा रे उड जा रे पंछी
९. भँवरा बडा नादान
१०. म्हारो गाँव काठाबाडे (दुभ्ती जाती गैया, जहाँ नाचे मोरन)
११. मोरनी बागा मा बोले आधी रात मा
१२. लकडी की काठी, काठी पे घोडा
१३. तितली दबोच ली मैंने

मराठी:
१. अ आ आई, म म मका (ह ह हम्मा गोड दूध देते)
२. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
३. पैलतोगे काऊ कोकताहे
४. वार्‍याने हलते रान (गाईचे डोळे करुण)
५. डौल मोराच्या मानंचा / जिवाशिवाची बैलजोड
६. माज्या बकरीचा सम्द्यांस्नी लागलाय लळा
७. काळ्या मातीत मातीत (नंदीबैलाच्या जोडीले सदाशिव हकारते)
८. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी
९. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
१०. माज्या व्हटाचं डाळींब फुटलं, सांगा राघू मी न्हाई कदी म्हटलं
११. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला
१२. जा मुली जा, दिल्या घरी (दारात उभी राहिली खिलारी जोडी)
१३. कुणीतरी बोलवा दाजीबाला (गाडीचा खोंड बिथरला, सजवतिल घोडा सांगितल्यासरशी)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाकी रंग दिवारोपर लटकती
गांधीकी फोटोके पीछे
............
एक लंबी चिप्पकली, हं चिप्पकली सरसराती.

खाकी रंग दिवारोपर लटकती
गांधीकी फोटोके पीछे
............
एक लंबी चिप्पकली, हं चिप्पकली सरसराती.

ये रात, ये अंधेरा, जालियोंकी छिपकली रात, कडी और कोंबडी की रात... सन्नाटे के सेज पे सोई सांप सी सरकती रात...

जत्रा मधलं धमाल गाणं आलंय की नाही अजून?

कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली

जत्रामधीलच सुरवातीचे आयटम सॉंग (?)

ये गो ये ये मैना, पिंजरा बनाया सोनेका

ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

ह्यो फिरता घोडा नाव त्याचं व्यवहार
कुनी चोर असंल त्यो टांग टाकुनी स्वार

हितंच हाय परि दिसत न्हाई पोलिस मारतोय चकरा

हे माणुसकीचं हाटेल बघतंय वाट
कुनी तिखाट भेटतोय हितं कुनी गुळमाट
तुकड्यासाठी लाचार होऊन शेपुट हालवी कुत्रा

भेटीलागी जीवा ...
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन

नको देवराया अंत अता पाहू..
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा

ओ पवनवेग से उडनेवाले घोडे

दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट..

गारे राघू गा ग मैने बाळाच्या या ओळी...

कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे..

श्रावणात घन निळा..

हिरवा मोरपिसारा

थेंबाचे फूलपाखरू

फुलपाखरू छान किती दिसते

फूलपाखरू झालो रे मी

फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे

ब्रम्हा, विष्णु आणि महेश्वर
सामोरी बसले,
मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी,
पुढे वासरु पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे,
पायावर झुकले ...मला हे दत्तगुरु दिसले

कोंबड्यांनो विचार करा तुम्ही थोडा
अंडी द्या नाहीतर खुराडी सोडा >> हे कुठलं गाणं आहे?>>>
आम्ही दोघे राजा राणी.
https://youtu.be/AAXqnQ7hBrY?si=GBhqUa4hLBGW7eGO

ऋतुराज ते कोंबड्यांनो गाणे अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा चित्रपट का?>>>>> हो, लक्ष्या

@भरत,
खूप छान गाणी टाकत आहात तुम्ही.
मला कोंबड्या, कुत्रे, नाग असलीच सुचतायेत Lol

भँवरे की गुंजन है मेरा दिल

भँवरा बडा नादान है

दिल का भँवर करे पुकार

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद

दत्तगुरु दिसले ज्या चित्रपटात त्याच चित्रपटात एका गाण्यात
( गाणे आहे , देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता )

पिते दूध डोळे झाकुनी जात मांजराची
मनी कारे चोरट्याच्या भिती चांदण्यांची

असे शब्द आहेत.

पप्पा सांगा कुणाचे गाण्यात
इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात
असे शब्द आहेत

काला कौवा काट खाएगा

मुंगी उडाली आकाशी

रुणुझुणू रे भ्रमरा

सावध हरिणी सावध

गोरी गोरी पान (हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान - इथे झूलॉजिने बॉटनीला तुडवला)

शेपटीवाले प्राणी, ससा तो ससा, कोणास ठाऊक कसा, एका माकडाने, घबड घबड, फेरीवाला, लाला टांगेवाला, चिव चिव चिमणी, वगैरे बालगीतात कचऱ्यासारखे प्राणी आहेत.

चुकीच्या ऐकू आलेल्या गाण्यात - हे चिंचेचे झाड ... गं सशी तू नवतरुणी काश्मिरी

१. काले नागीन के जैसी आंखे तेरी काली काली

२. बुझ मेरा क्या नाव रे..... पिपल झुमे, मोर आंगना ठंडी ठंडी छांव रे

३. ...... जैसे तडपू मै जैसे जल बिन मछली

४. बन के तितली दिल उडा, कंही दूर....

५. आओ सिखाउ तुम्हे अंडे का फंडा..... अंडा अगर न होता तो मुर्गीया न होती....

६. जुगनु साँग

७. सजन रे झुठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है....

८. बोले रे पपीहरा... पपीहरा

९. रिंग रिंग रिंगा.... इक खटमल था सयाना.....

१०. चांदी की डाल पर सोने का मोर

११. धीरे धीरे से जा खटमल खटीयन मे

१२. गुन गुन करता आया भंवरा, भंवरे ने सुनाया

हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
नेम असा धरुनी तू ये ना
सावज हे तू वेधून घे ना
ये ना सजणा ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना

मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा

राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता

गरुडवाहना गुण गंभीरा येई गा दातारा ... दिन तैसी रजनी

गणपतीबाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या
उंदरावरी बसुन कशी डुलत येते स्वारी

सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही
अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही..
निदाघसमयी चुकल्या कोठे वत्सासह गाई

गोठ्यात कशाला बांधली कपिला
देते ना ती गोड दूध आपुल्या बाळाला.

या कवितेत पुढे आणखीही प्राणी होते का? पुढली कडवी कोणाला आठवताहेत का?

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट तशी तुझी माय
घाल घाल पिंगा वार्‍या..

सांग सांग भोलानाथ पाउस पडेल काय ?

सासुर्‍यास चालली लाडकी शकुंतला
..ढाळतात आसवे मोर हरिणशावके
... गर्भिणी मृगी कुणी वाट तिची ये धरू

दैव किती अविचारी
उधो! जीवनगती ही न्यारी

शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळतनू अंधारी
कृष्णलोचने सुंदर हरिणे
वनि वनि फिरत बिचारी

दैव जाणिले कुणी - मृग सोन्याचा जगी असंभव

गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.

>>> गोठ्यात कशाला बांधली कपिला
हे ऐकलं/वाचलेलं नाही.

>>> शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू
हा मीरेच्या 'करम की गति न्यारी'चा अनुवाद दिसतो आहे. मी ऐकला नव्हता. गंमत म्हणजे त्यात सूरदासांचं नाव आहे!

कविता कोश - सूरदास - ऊधो, कर्मन की गति न्यारी

पण शोभा गुर्टूंनी गायलंय त्यात शेवटी मीरा के प्रभू आहे.

गोठ्यात कशाला बांधली कपिला - आठवणीतल्या कविता या संग्रहात वाचली असावी.

तीतर के दो आगे तीतर
तीतर के दो पीछे तीतर

मी हरणुली होईन
चौखुर धावेन , मुरडत मिरवीन
तू परि येता, वनि लपुनी, तुज न गवसेन

मी मासुळी होईन
जळात खेळेन, शिंपली शोधेन
तू परि येता , मोती बनुनी तुज न गवसेन

@स्वाती मीही तेच सुचवणार होते.
@माधव तुमचा अली ऱ्हस्व असता तर चालला असता.
@भरत फार सुंदर गाणी लिहीलीत.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा

लकडी की काठी, काठी पे घोडा

मधुकर वन वन फिरत करी

परीमळाची धाव भ्रमर ओढी

इंद्रबनातील मी पाकोळी

कस्तुरी हिरण जैसे अपनी खुशबु में पागल घुमता है


कागा रे कागा रे

मोरी इतनी अरज तोसे
चुनचुन खाईयों मांस
खाईयों ना तू नैना मोरे
खाईयों ना तू नैना मोरे
पिया के मीलन की आस

कागा रे कागा
पिया की खबर सुनाना

आवारा भंवरे जो होले होले गाए...

कोयल सी तेरी बोली...

गुनगुना रहे है भंवरे, खिल रही है कली कली

चिडिया चूं चूं करती है, तोते ताली बजाते है...

तोता मेरे तोता मै तो तेरी हो गई

हंसीनी , मेरी हंसीनी.... कंहा उड चली

जंगल मे मोर नाचा किसिने ना देखा

पंछी, नदीयां, हवां के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके

आधी रोटी, सारा कबाब, बोल मेरे मुर्गे कुकडू कू

तुमच्या चक्रवाकावरून क्रौंच (नीट लिहीता सेत नाहीये) आठवला मामी.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत् क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम्

Pages