Submitted by Ashwini_९९९ on 25 February, 2025 - 02:08
गिरनार यात्रा करून कोणी आल आहे का? मी एप्रिल एंड ला जात आहे...माझ्याबरोबर चे सगळे ऑलरेडी एकदा दोनदा जाऊन आले आहेत... मी त्यात फिजिकली कच्चा लिंबू आहे..कारण व्यायाम काहीच नाही.. १०००० पायऱ्या चढून उतरून येण्या करता जो फिटनेस हवा तो नक्कीच नाही माझ्याकडे...अजून दोन महिने आहेत... काय तयारी करावी लागेल शारीरिक दृष्ट्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दहा हजार पायर्या चढायच्या..
दहा हजार पायर्या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही. तुमच्या कडे दोन महिने आहेत म्हणजे शारिरीक तयारी साठी पुष्कळ वेळ आहे. रोज सकाळी एक तास चालायचा व्यायाम सुरु करा. म्हणजे स्टॅमिना बिल्ट होईल. मी गेलो होतो तेव्हा ६० - ७० वर्षाची जोडपी सुद्धा थांबत थांबत चढाताना बघितली होती. शारिरीक तयारी झाली की मानसिक तयारी आपोआप होते.
मी पहाटे चारला चढायला सुरवात केली होती आणि आरामात मजल दर मजल करत सकाळी सुर्दोयदयाला सात वाजता मंदिरा खाली पोहचलो होतो. येताना उडन खटोला टाळून गिरनारचं सौदर्यं न्याहाळत आरामात एकरा वाजे पर्यण्त उतरलो होतो.
हा धागा बघून घ्या: https:/
हा धागा बघून घ्या: https://www.maayboli.com/node/71555 - ४ भागांची मालिका आहे.
इंद्राने सांगितले आहेच.
इंद्राने सांगितले आहेच. चालण्याच्या जोडीला राहत्या इमारतीचे ३-४ जीने चढायचा रोज सराव केला तर फिटनेसबरोबर स्वतःचा आत्मविश्वास पण वाढेल. जमल्यास प्राणायाम पण करा (मला त्याचा खूप फायदा झाला होता)
एप्रिलला जाताय तर मी म्हणेन पहाटे २ - २:३० वाजताच चढायला सुरुवात करा, तेंव्हा हवेत थोडा गारवा असेल. वर्दळ तुरळक असली तरी काही काळजी नाही. पण एकदा का सूर्य वरती आला की उन्हाने आणि घामाने खूप जास्त थकायला होतं (एप्रिल आहे त्यामुळे उन्हाळा जाणवेल)
१. शक्यतो वाटेत बसू नका, उभे राहूनच विश्राम करा.
२. सोबत पुरेसं पाणी, एलेक्ट्रल ठेवा (वाटेत पाणी मिळतं पण इतक्या पहाटे बरेच स्टॉल्स बंद असतात)
३. बरोबर आधाराकरता काठी हवीच (ती खाली भाड्याने मिळू शकते - २४ तास)
४. वाटेत काही जण माघारी फिरताना दिसतील पण आपल्याला पादुकांचे दर्शन घ्यायचेच आहे हा चंग बांधायचाच.
५. गुरुपादुका असलेले शिखर दिसायला छोटे दिसते, पण खरी दमछाक तेच करते. ते चढताना बर्याचदा "आता पुरे, इतकं आलो ना" असं वाटत राहतं. पण हत्ती गेलेला आहे फक्त शेपूट राहिले आहे असे म्हणायचे आणि चढत रहायचे.
६. बरोबर कुणी असेल तरीही आपली चढाई आपल्या वेगाने करायची. त्यामुळे उगाच पाठी राहिलेल्यांकरता थांबावे लागत नाही आणि पुढे गेलेल्यांना गाठायची दमछाक होत नाही.
७. श्रद्धा असेल तर "मी चढतोय / चढतेय" असे चुकूनही मनात आणायचे नाही. तुमची चढाई खूप सोपी होते त्याने.
८. उतरताना जराही घाई करू नका. मी जरा वेगाने उतरलो तर पायांची पूर्ण वाट लागली होती.
जायचं ठरवलं आहे तर नक्कीच जाल.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार... तीच शंका होती नुसत्या चालण्याच्या प्रॅक्टीस ने होईल का? माझ्या बिल्डिंग ला लिफ्ट नसल्यामुळे तसही ३ मजले चढण उतरण होतच डेली ..पण ते ही हाफ हूफ करत...
रात्री दोन तीन ठिकाणी
रात्री दोन तीन ठिकाणी पाण्याची सोय होते.. बाकी दुकानं बंद असतात. उडन खटोलाची सेवा सकाळी ८ ला सुरु होते. पण ती ही पाच हजार पायर्या पर्यन्तच आहे. पुढे गुरु शिखरा पर्यन्त चढ - उतार आहे.
एका लयीत चालत राहायचं.. नामस्मरण करत.
पुर्वी १०,००० पायऱ्या
पुर्वी १०,००० पायऱ्या चढाव्या लागायच्या, आता रोप वे मुळे (जवळपास) ५००० पायऱ्या कमी चढाव्या लागतात. आणि अगदी १०,००० पायऱ्याही चढायची वेळ आली तरी तुम्ही सवय नसल्यास बरोबरच्यांपेक्षा फारतर थोड्या जास्त वेळात, पण नक्की चढाल...
(मी ३ वेळा पायऱ्या चढुन आणि एकदा रोप वे नी गेलो आहे, बिन्धास्त जा...)
मला गिरनारचा अनुभव नाही पण
मला गिरनारचा अनुभव नाही पण थोडं फार ट्रेकिंग केलेलं आहे त्यावरुन सांगेन की व्यवस्थित फिट होणारे आणि सपोर्टिव्ह शूज घ्या आणि निघायच्या महिनाभर आधी तरी ते बूट घालून चालणे / चढणे उतरणे अशी प्रॅक्टिस रोज तासभर तरी करा. चढताना आणि उतरताना पावलांवर फार स्ट्रेस येतो.
इतर लोक अनवाणी चढतात , हवाई चपला घालून देखील जातात असे विचार मनात आणू नका. तुमच्या पावलांची काळजी घेणे महत्वाचे !
तुम्हाला शुभेच्छा
शुभेच्छा ! जाऊन आल्यानंतर
शुभेच्छा ! जाऊन आल्यानंतर येथे अनुभव लिहा.
मी गेलेले.
मी गेलेले.
दत्तप्रभूना सरेंडर करा आणि सांगा मला यायचं आहे..
त्यापुढे जमले उत्तम नाही जमले तरी उत्तम असा दृष्टिकोन ठेवा. कारण तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे.
मी कुणालाही चढलेलं आणि अगदी कॉलेज मधला मुलगा ढसाढसा रडताना तिथे पाहिला आहे.
अगदी तरुण , फिट दिसणाऱ्या मुली पण अगदी गुरूशिखराच्या खाली बसून जमणार नाही ह्यापुढे म्हणताना पाहिल्या आहेत.
आणि हेच माझी आई ६७ वर्ष आणि अनेक ज्येष्ठ नागरिक चढताना पाहिले. इट्स मोर ऑफ या माईंड गेम. देव नेईल हा विश्वास ठेवलात तर तो नेतो.
खाली काठी मिळते. ती घ्या नक्की. जास्त ओझ पाठीवर घेऊ नका. आम्ही शेले घेतलेले, पण ते लोकांनी दिलेले पण आमच्या पाठीवर होतें. ते फार ओझे झाले चढताना.
कमीत कमी सामना घ्या.
वाटेत साधारण ५००० पायऱ्यांच्या पुढपर्यंत दुकानं पण आहेत आणि लोक प्रसाद पण वाटतात.
मीठ/सॉल्ट कँपसुल्स ठेवा बरोबर आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन खा. Ors capsules देखील ठेवा.
आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केली. १२ च्या आसपास आम्ही वर होतो.
वर खूप वेळ थांबून दिले नाही (पौर्णिमा होती).
पण सगळी मजा प्रवासात आहे.
काही वेळा मी त्या रात्री त्या टप्प्यात एकटीच होते पण ते बरोबर आहेत ह्याची जाणीव असल्याने मी निर्भय , relax होते!
चढायला सुरुवात करण्यापूर्वी खाली lambe हनुमानजी आहेत त्यांना नारळ फोडून त्यांची प्रार्थना करण्याची प्रथा आहे. पहिल्या पायरीला नमस्कार करून मला न्या म्हणून सांगतात.
स्वामींच छोटस देऊळ आहे, तिथे आशीर्वाद घ्या त्यांचा..
फिजिकली मी आधी वर्षभर व्यायाम करत होते (गिरनार करता नव्हे, फिटनेस करता. ).
दोन महिने आधी २०० जी २५० पायऱ्या एका वेळेस चढू शकायचे आरामात.
पण गिरनार ला जायच्या आधी महिनाभर आजारी पडले आणि एक महिना व्यायाम/पायऱ्या चढण झाले नाही. महिनाभर पाय खूप दुखायचे. गिरनार वरून आल्यावर पाय दुखले नाहीत
गिरनार स्वामी/dattaprabhoonchyaa इच्छेने/कृपेने घडले. प्लॅन जसा क्षणात ठरला/ जसे जाऊन आलो ..
दहा हजार पायर्या चढायच्या..
दहा हजार पायर्या चढायच्या.. ........ बापरे! इथूनच नमस्कार
हेच माझी आई ६७ वर्ष आणि अनेक ज्येष्ठ नागरिक चढताना पाहिले. ....... नमस्कार.
10000*2 देवकी जाऊन येऊन :D.
10000*2 देवकी जाऊन येऊन :D.
>> "दहा हजार पायर्या
>> "दहा हजार पायर्या चढायच्या.. " >>
आणि उतरायच्याही... 😀
वरती अनेकांनी छान उपयुक्त माहिती दिलेलीच आहे, त्यातले काही महत्वाचे मुद्दे:
>> १. शक्यतो वाटेत बसू नका, उभे राहूनच विश्राम करा. >>
लाख मोलाचा सल्ला आहे हा! वाटेत शंभर वेळा थांबलात तरी काही बिघडत नाही पण चुकुनही कुठे बसु नका, त्याचा फार विपरीत परिणाम होतो. उभ्या उभ्या, काठिच्या आधाराने थोडी विश्रांती घेत चढाई सुरु ठेवा!
>> "३. बरोबर आधाराकरता काठी हवीच" >>
+१ कुठलाही संकोच न बाळगता बरोबर काठी घ्या!
>> "८. उतरताना जराही घाई करू नका. मी जरा वेगाने उतरलो तर पायांची पूर्ण वाट लागली होती." >>
अगदी अगदी... पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी पण ही चुक केल्यामुळे पायांची (विषेशतः गुढग्यांची) पार वाट लागली होती!
काही जणांना पायर्या चढणे त्रासदायक वाटते, तर काही जणांना उतरणे. मी दुसर्या प्रकारात मोडत असल्याने मला उतरायला बरोबरच्यांपेक्षा अधिक वेळ लागतो. इथे एकच डोंगर चढा-उतरायचा नसुन पहिला अंबामाता मंदिराचा, दुसरा गोरक्षनाथ आणि तिसरे दत्त शिखर असे तीन डोंगर चढा-उतरायचे असल्यानेच काय ती दमछाक होते आणि "चढने को तो यूँ ही बदनाम करते हैं लोग, असली तकलीफ तो उतरने मे होती है" ह्या वाक्याची सत्यता पटते 😀
वाटेत तुम्हाला कोणी झिग-झॅग पद्धतीने चढताना दिसले तर तो प्रकारही करुन पहा, कहिजणांना तशा पद्धतीने चढणे सोयीस्कर वाटते, अर्थात भरपुर चढायचे अस्ल्याने तुम्हाला त्यात वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आणि वेळ मिळत असल्याने जो प्रकार सोयीस्कर वाटेल तो निवडा!
शेवटी -
>> "दहा हजार पायर्या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही." >>
+१.
फार काही चालण्याची सवय आणि ट्रेकींग वगैरेची अजिबात आवड नसलेला माझ्यासारखा माणुस तीन वेळा यशस्वीरित्या १०००० पायर्या चढु-उतरु शकला त्याप्रमाणे तुम्ही पण त्यात नक्कीच यशस्वी व्हाल ह्याची खात्री बाळगा आणि निश्चिंत मनाने आपली गिरनार यात्रा सुफळ-संपुर्ण करा...
जय गिरनारी 🙏
मी अगदी माधव यांच्याच सूचना
मी अगदी माधव यांच्याच सूचना लिहायला आले होते.
अगदी आरामात चढा.. आजिबात घाई करू नका. उतरताना knee cap बरोबर असणे गरजेचे. चांगला सपोर्ट मिळतो.
गिरनार यात्रा आहे त्यामुळे योग यावा लागतो. त्यामुळे बिन्धास्त जा.. तुम्हाला बोलावणे आले आहे
उतरताना पायर्याही उतरत्या आहेत तेंव्हा काठीचा खरा उपयोग होतो
संपूर्ण पायर्या चढणार असलात तर वाटेत काही बाही मिळत रहाते. अंबामाता मंदीराच्या पुढे मात्र काहीच मिळत नाही. शक्यतो फार वजन नेऊ नका. पाणी, उन्हासाठी टोपी, थोडा खाऊ पुरे होते. नॉर्मली रात्री जेवण करून चढतात त्यामुळे पाण्याशिवाय फार काही लागत नाही. सकाळी धुनीपाशी प्रसाद मिळतो त्याने समाधान होते. मग बाकी स्टॉलस असतातच.
कुठलीही चिंता न करता अगदी बिनधास्त जा..चालणे, पायर्या चतरणे/ उतरणे याची सवय दिसते आहे त्याचा फायदा होईल. मी कुठल्याही तयारीविना चढले होते तरी चढू शकले.. तुम्हीही पूर्ण कराल यात्रा! अनेक शुभेच्छा !
"दहा हजार पायर्या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही." >> +१११
सगळ्यांचेच सल्ले खूप मोलाचे
सगळ्यांचेच सल्ले खूप मोलाचे आहेत... शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद... तयारीला सुरवात केली आहे... आता श्री दत्तप्रभूंची इच्छा आणि कृपा.. परत येताना ५००० पायऱ्यानंतर रोप वे ने खाली येणार आहोत.
वय, वजन यानुसार आवश्यक वाटत
वय, वजन यानुसार आवश्यक वाटत असल्यास Stress Test करुन घ्या म्हणजे ह्रदयाची क्षमता कळेल, आत्मविश्वास वाढेल.
निश्चिंत मनाने जा.
निश्चिंत मनाने जा.
दररोज चार माळे चढउतार आणि अर्धा तास चालायचा व्यायाम पुरेसा आहे. रात्री चढायला सुरुवात करा. काठी नक्की घ्या. हळूहळू चालत रहा. एका ठिकाणी फार थांबू नका.
@ ऋतुराज @.अ'निरु'द्ध ....
@ ऋतुराज @.अ'निरु'द्ध .... धन्यवाद.
सर्वांनी आपापल्या अनुभवानुसार
सर्वांनी आपापल्या अनुभवानुसार योग्य सल्ले दिले आहेतच.. माझेही थोडे..
१. पादुकांपर्यंत पायी पोहोचायला आधी अंबामता पर्यंत ६००० पायऱ्या चढायच्या मग २००० उतरायच्या आणि परत २००० चढायच्या असा प्रवास आहे. त्यामुळे जाऊन येऊन एकूण १०००० पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या आहेत. परतीच्या प्रवासात उतरायचे मन असते त्यामुळे २००० पायऱ्या चढायला त्रासदायक वाटते. पण अधीपासूनच तयारी ठेवलीत तर होऊन जाईल.
२. वर सांगितलेला काठी घ्यायचा सल्ला योग्यच आहे. तरीपण काठीचे लोढणे वाटू लागले, वजन वाटू लागले तर काठी शिवाय चालून पहा. आणि छान चालता येत असेल तर खुशाल बाजूला ठेऊन दया. पायऱ्या खूपच छान आहेत त्यामुळे मला काठी अनावश्यक आणि गैरसोयची वाटली होती.
३. चालण्याचा आणि जिने चढ उतरून कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल तर बैठका मारा. १० चे ५ सेट मारे पर्यंत तयारी झाली की चिंता नाही.
४. आठवड्यातून एक दिवस व्यायामाला सुट्टी घ्या. चढायच्या आधी दोन दिवस व्यायाम बंद ठेवा.
५. वाट छानच आहे. त्यामुळे महागड्या बुटांची आवश्यकता नाही. साधे टेनिस शूज देखील उत्तम. फक्त नवीन बूट घेतलेतच तर किमान महिनाभर आधी ते वापरायला लागा. पावलांना वापरायच्या बुटांची पक्की सवय आवश्यक.
@ अजित केतकर... धन्यवाद.
@ अजित केतकर... धन्यवाद.
श्री दत्तप्रभूंच्या कृपेने
श्री दत्तप्रभूंच्या कृपेने आणि सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे गिरनार दर्शन अतिशय व्यवस्थित झाले. १०००० पायऱ्या पूर्ण चढून गेले.
जाईपर्यंत बऱ्यापैकी अडचणी आल्या. अगदी निघायच्या आदल्या दिवशी माझं जायचं कन्फर्म झालं. घरच्यांनी पण शेवटपर्यंत माझं तिकीट कॅन्सल केलं नाही..तू येच असच सगळंयाचं म्हणणं होत.
आणि सर्व अतिशय व्यवस्थित पार पडलं... काही अनुभव नक्कीच सांगण्यासारखे आहेत ज्या मुळे दैवी शक्ती वरचा विश्वास दृढ झाला... नक्की सांगते..
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार!!!!
अश्विनी, एवढी मोठी यात्रा
अश्विनी, एवढी मोठी यात्रा सुखरुप पार पडली त्याबद्दल अभिनंदन.
^^... काही अनुभव नक्कीच
^^... काही अनुभव नक्कीच सांगण्यासारखे आहेत ज्या मुळे दैवी शक्ती वरचा विश्वास दृढ झाला... नक्की सांगते..^^
नक्की लिहा. वाट पाहत आहे.
अश्विनी नक्की लिहा अनुभव
अश्विनी नक्की लिहा अनुभव
यात्रा दर्शन सुफळ संपन्न झाली हे वाचून आनंद झाला
अश्विनी खूप मस्त. योग आहे तो
अश्विनी खूप मस्त. योग आहे तो. आपले अनुभव जरुर लिहा.
माहिती विचारायच्या धाग्यात
माहिती विचारायच्या धाग्यात माहिती घेऊन जाऊन आल्यावर आवर्जून केलेली नोंद आवडली.
फेब्रुवारीत थंडी असते, गार असते पण गेलात ऊन वाढल्यावर एप्रिलमध्ये!
गिरनारला गेलो नाही कधी. यूट्यूबवरचे विडिओ पाहून त्यातल्या माहितीवर आधारित पुढे कधी गेलोच तर जाईन. मी भाविक अजिबात नाही.
प्रश्न वर जाऊन परत येण्याचा आहे. तिथे वरती फारच अपुरी जागा असल्याने जाऊन राहता येणार नाही हे समजले. इतर डोंगर यात्रेत/ भटकंतीमध्ये ( नाशिक इगतपुरीच्या दक्षिणेचा सह्याद्री) झाडी भरपूर असते सावलीसाठी. तसं इकडे बहुतेक नाही. या दोन कारणांमुळे भाविक पहाटेस सुरुवात करून दुपारनंतर खाली येतात. पहाटे आणि सकाळी वारा नसतो. दुपारी दीड दोनला वारा सुरू होतो आणि डोंगर चढताना थकवा येत नाही. पश्चिम उतार असल्यास आणि छत्री घेतल्यास ( टोपी नव्हे) उन्हाचा त्रासही होत नाही. वारा पाठीमागून ढकलत असतो हा फायदा. दहा वाजता जेवण करून दोन तास उलटल्यावर बारा वाजता चढायला सुरुवात केली तर दम अजिबात लागत नाही. खाण्यासाठी केळी ठेवणे उत्तम. हलकासा गोडपणा उपयोगी पडतो. काठीचा उपयोग हा उतरताना होतो पण ती काठी डोक्यापेक्षा उंच हवी. उतरताना दोन पायऱ्या खाली टेकवल्यावर हाताच्या जोरावर खाली पाय टाकायला सोपे जाते आणि गुडघ्यांवर दाब येत नाही. माकडांनी त्रास देऊ नये म्हणून काठी घेऊ नये कारण काठीवाला माणूस पाहिला की माकडं अधिकच चेकाळतात , छत्रीला मात्र घाबरतात. ( माझे अनुभव आणि मत).
अरे वा अश्विनी छान झाली
अरे वा अश्विनी छान झाली यात्रा, अभिनंदन.
दैवी शक्ती अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.
अभिनंदन अश्विनी ,!! तुमच्या
अभिनंदन अश्विनी ,!! तुमच्या अनुभवावरील लिखाणाच्या प्रतीक्षेत !!!
अश्विनी,
अश्विनी,
मस्तच. नक्की लिहा अनुभव
अश्विनी, एवढी मोठी यात्रा
अश्विनी, एवढी मोठी यात्रा सुखरुप पार पडली त्याबद्दल अभिनंदन.>>+१
माझे भाऊजी परवापासून ११ दिवस तिथे सेवेसाठी राहणार आहेत.
माझ्या डाव्या गुडघ्याच छोटस
माझ्या डाव्या गुडघ्याच छोटस ऑपरेशन झालं आहे..फार चालण झालं की गुडघ्यापासून खाली पोटरी पर्यंत कळा येतात.. तसं होऊ नये म्हणून जायचं ठरल्यापासून म्हणजे फेब्रुवारी पासून दररोज ऑफिस नंतर २५० ते ३०० पायऱ्या चढायची आणि उतरायची प्रॅक्टीस करत होते..( कॉलेज मध्ये मागे मंदिर आहे उंचावर). बऱ्यापैकी त्रास कमी झाला होता पण १० का १२ एप्रिल ला डावा पाय कशामुळे तरी ट्विस्ट झाला आणि परत गुडघा दुखायला लागला आणि चांगलाच दुखायला लागला होता...थोडस चाललं तरी त्रास होत होता...मी ऑलमोस्ट जायची आशा सोडली होती..पण घरचे धीर देत होते...रात्रीच दर्शनासाठी चढायला सुरुवात करायची हे कन्फर्म होत कारण एप्रिल च्या उन्हात दिवसा चढण शक्य न्हवत.एक पर्याय असा होता की मी संध्याकाळी ५ च्या रोप वे नी अंबा माता मंदिरापाशी जाऊन बसायचं.प्रिया (धाकटी बहीण), अजय (तिचा नवरा)लवकर निघून रात्री १२ पर्यंत तिथे येतील ..मग आम्ही पुढ जायचं..पण माझा नवरा याला तयार होईना कारण ५ च्या रोप वे नी मी जास्तीत जास्त ५.१५ ला अंबा माता मंदिरा पाशी पोचले असते...तिथून पुढे रात्री १२ पर्यंत काय? तिथे ना जेवायची व्यवस्था..ना कुठलं प्रसाधन गृह... बरं ही लोकं १२ पर्यंत पोचतीलच अस नाही..उशीरही झाला असता त्यांना..फोन संपर्क होईल की नाही याची खात्री नाही.वरच मंदिर सकाळी ६ ला उघडत ..मला संध्याकाळी ५.१५ ते पहाटे ३.३० आणि त्यांना रात्री १२ ते सकाळी ३.३० पर्यंत नुसत बसून रहायला लागलं असत..त्यामुळे तो ऑप्शन बाद...त्यामुळे चढून जाणे हाच एक पर्याय होता.. डोली साठी मी आधीपासूनच तयार न्हवते..
२४ ला रात्री ९ ची रेल्वे होती...काय कराव सुचत न्हवत...तुम्ही लोकांनी मायबोलीवर दिलेले सल्ले परत परत वाचत होते आणि एका क्षणी निकु यांनी लिहिलेले वाक्य एकदम क्लिक झालं.."गिरनार यात्रा आहे त्यामुळे योग यावा लागतो. त्यामुळे बिन्धास्त जा.. तुम्हाला बोलावणे आले आहे".
मला बोलावण आलं आहे..मी जाणार..याउप्पर दत्तगुरूंची इच्छा आणि २२ ला मी जायचं फायनल केलं...अगदीच गुडघ्याचा त्रास झाला ..नाहीच जमणार असं वाटलं तरी atleast पहिल्या पायरी वर डोकं टेकवून पायथ्याच दर्शन घेऊन मी परत हॉटेल वर येईन आणि बाकीचे वर चढायला सुरुवात करतील असं ठरलं. मी, प्रिया , अजय आणि तिचा १२ वर्षाचा मुलगा (तन्मय) असे आम्ही ४ जण होतो..अजय ची ही ९ वी वेळ होती दर्शनाची, प्रिया ची ५वी आणि तन्मय ची ३री..आणि माझी पहिली..२४ एप्रिल ला पुणे अहमदाबाद अशी दुरांतो express होती रात्री ९ ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अहमदाबाद ते जुनागढ अशी वेरावळ एक्स्प्रेस सकाळीं ७.२५ ला.
सुदैवानी पूर्ण रेल्वे प्रवासात गुडघे दुखीचा काहीच त्रास झाला नाही...मग मी वर चढायचा निर्णय घेतला...२५ एप्रिल ला रात्री ९ लाच निघालो... प्रवेशद्वाराशी प्रथेप्रमाणे श्री हनुमानाच दर्शन घेतलं..सुखरूप पणे वर पोचव देवा..अशी प्रार्थना केली..काठ्या घेतल्या ..पहिल्या पायरीवर डोक टेकलं ..श्री दत्तप्रभूंची मनोमन प्रार्थना केली...मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे...यश द्या...कृपा ठेवा...
चढायला सुरवात केली.जेमतेम १०० पायऱ्या चढलो असू तेवढ्यात समोरून मोठमोठ्यानी बोलण्याचा आवाज आला.एक ६ ते ७ लोकांची फॅमिली घाईघाईने खाली उतरत होती...आम्हाला पाहून ते थांबले आणि विचारलं तुम्ही ४ च जण आहात का. हो सांगितल्यावर म्हणाले परत फिरा आणि उद्या सकाळी रोप वे नी वर जा..आम्हाला आत्ताच बिबट्या क्रॉस झालाय..वरती उजवीकडे शिरलाय..वरती फार माणसं नाहीयेत..बऱ्यापैकी सामसुम आहे...माझे हात पाय तिथेच गार पडले..तन्मय पण घाबरला..ती लोक निघून गेल्यावर प्रिया नी मला विचारलं काय करायचं ताई? माझी पहिलीच वेळ ..मी काय सांगणार... त्या दोघांचही म्हणणं पडल की आजपर्यंत त्यांना कधीही असा अनुभव आलेला नाही...ते दरवेळेस रात्रीच चढायला सुरुवात करतात.घाबरले असले तरी मागे फिरायची माझीही तयारी न्हवती..श्री दत्तप्रभूंची इच्छा असेल तरी काहीही झालं तरी माझं दर्शन होईलच हा विश्वास होता...मग पुन्हा चालायला सुरुवात केली..श्री दत्तगुरुंच नामस्मरण सतत चालू होत.. फक्त यावेळेस काठ्या आपटत पायऱ्या चढत होतो आणि शक्यतो तन्मय आमच्या तिघांच्या मध्ये राहील अशी काळजी घेत होतो.पायऱ्या चढताना चांगलाच दम लागत होता.. घाम टपकत होता..पण गुडघे दुखी अजिबात नाही..ते दोघं ही माझ्या कलाने थांबत थांबत चालत होते. साधारण २५० पायऱ्यांवर एका दुकान उघडं दिसलं..थांबलो ..थोड थोड पाणी पिल. दुकानातल्या आजींना विचारलं बिबट्याचं तर त्या म्हणाल्या मला काय कोण दिसलं नाहीये..पण असतो तो कधी कधी..दिसतो लोकांना.. आज आला असेल पायऱ्यांवर...दिसला असेल तर जवळपासच असेल.. शक्यतो तुम्ही एखादा ग्रुप दिसला तर त्यांच्या सोबत राहा...अगदी ४ च जण आहात तुम्ही..त्यात हा छोटा बरोबर आहे.... मोठा ग्रुप असला तर भीती नाही . आता ग्रुप तर कोणी दिसत न्हवता..मागेही सामसुम होत आणि पुढेही कोणाचा आवाज येत न्हवता..टपरीची जागा सोडली तर मागे पुढे किर्र अंधार होता..थोडा वेळ कोणी मागून येतंय का वाट पाहिली ..काहीच आवाज नाही..साधारण मोठा ग्रुप असला की आजूबाजूच्या शांततेमुळे त्यांचा आवाज येतोच...पण सगळच शांत होत...फक्त रातकिड्यांचा आवाज..देवाच नाव घेऊन पुन्हा चालायला सुरुवात केली...स्ट्रीट लाईट आहेत पण बऱ्यापैकी लांब लांब आहेत..त्यामुळे काहीही झालं कितीही दम लागला तरी स्ट्रीट लाइटच्या उजेडातच थांबायचं असं ठरवलं होत.. ...थोड्यावेळानी माझ्या लक्षात आलं की पाय उचलून पुढे टाकताना जड जड वाटतय...आणि त्यामुळे मी स्लो चढत होते..पायात स्पोर्ट शूज होते....मी शूज काढायचा निर्णय घेतला. दोघांनी ही मला विरोध केला पण शूज काढले नाहीत तर मला नीट चालता येणार नाही हे कळत होत. शूज काढले सॅकला मागे बांधून टाकले आणि सॉक्स वर चढायला सुरुवात
केली....आता पाय हलके वाटत होते... अजून साधारण एक ५० पायऱ्या चढलो असू नसू मागून बायकांचा बोलण्याचा आवाज यायला लागला..मागे वळून पाहिलं तर साधारण ४० ते ४५ वयोगटातल्या ८ बायका गप्पा मारत वर येत होत्या..हिंदी बोलत होत्या..मोठमोठ्यानी गप्पा चालू होत्या त्यांच्या.. काठियावाडी होत्या बहुतेक..सगळ्या अनवाणी..हातात काठी नाही .. टॉर्च नाही..आम्हाला पाहून थांबल्या.. किधर जा रहे हो ?आम्हाला विचारलं..आम्ही सांगितलं की गुरुशिखरापर्यंत... त्यांना विचारल्यावर कळलं की त्या जैन मंदिरापर्यंत जाणार आहेत..म्हटलं चला झाली सोबत..त्याही म्हणाल्या तुम लोग चलते रहो..हम लोग आ रहे है पीछे पीछे.. बैठते उठते..हम में ये तीन budhiya हे ना अस म्हणून त्यांच्यातल्या कोणत्यातरी तीन बायकांकडे बोट करून हसायला लागल्या...आम्हाला म्हणाल्या जाओ जाओ तुम लोग जाओ.. चढना शुरू करो....परत त्यांच्या गप्पा चालू झाल्या..आम्हीही हसून परत चालायला सुरुवात केली...थोड्या वेळानी त्या बायकांचा आवाज यायला लागला ..आमच्या मागेच बहुतेक निघाल्या त्या...आमच्या मागे पुढेच होत्या...कधी त्या बसलेल्या असायच्या. आम्ही हात दाखवून हसून पुढे जायचो...कधी त्या मागून पुढे जायच्या...जाताना चलो माई ,चलो भैया म्हणायच्या... आता भिती बऱ्यापैकी कमी झाली होती..वाटेत बऱ्याच टपऱ्या होत्या पण सगळ्या बंद....त्या आजींच्या दुकानानंतर आम्हाला थेट जैन मंदिराच्या अलीकडेच दोन टपऱ्या उघड्या दिसल्या.. मला दम लागण्या शिवाय दुसरा काहीही त्रास होत न्हवता..गुडघे दुखी जादू झाल्यासारखी गायब झाली होती. पायऱ्या चढण चालूच होत..महिला मंडळाचा आवाज मागून येत होता..१००० पायऱ्यांचा टप्पा गाठला..अजून साधारण ५०० पायऱ्या चढल्यानंतर एक ७_८ मुलांचा ग्रुप बसलेला दिसला..ते पण वर चालले होते..साधारणतः २० ते २२ वयोगटातली मुल होती आणि त्यांचा लीडर ४५ ते ५० वयोगटातला एक माणूस होता..त्याला सगळे मामा म्हणत होते..एकमेकांच्या चौकश्या झाल्या.
नाशिकचा ग्रुप होता..कुठल्यातरी यात्रा कंपनी बरोबर आले होते...द्वारका आणि सोमनाथ ला जाऊन दर्शन घेऊन आले होते...आज गिरनार दर्शन होत...सकाळी त्यांचा इतर ग्रुप येऊन गेला होता..ही लोकं रात्री आली होती...दुसऱ्या दिवशी दुपारी ते सगळे निघणार होते... ..मग ते मामा म्हणाले चला आमच्या बरोबर..एकत्रच जाऊ..आम्हालाही सोबत ..तुम्हालाही सोबत..त्यांची गिरनार यात्रेची पहिलीच वेळ होती..अजून थोड वर चढल्यावर लक्षात आलं की अरे मागच्या महिला मंडळाचा आवाजच येत नाहीये..त्या मामांना म्हणालो थोडा वेळ थांबूया ..मागून एक ladies ग्रुप येत आहे..सगळेच एकत्र जाऊ..ते ही हो म्हणाले.. थोड्या अंतरावर असलेल्या एका टपरीच्या उजेडात बसलो...मुलांच्या गप्पा चालू झाल्या..बिबट्याचा विषय निघाला..त्यांनाही ती फॅमिली वाटेत भेटली होती..त्यांनाही सांगितलं होत बिबट्या बद्दल..पण मुल बिनधास्त.. आखाड्यातली...तरुण रक्त..ते थोडेच ऐकणार आणि थांबणार.. १० ची १५ मिनिट झाली तरी बायकांचा पत्ता नाही..इतक्या वेळात असं कधीच झालं न्हवत ..आम्ही जस्ट दम खायला टेकतो ना टेकतो की त्या मागून यायच्या..शेवटी पुढ जायचं ठरवलं...एखाद वेळेस जास्त वेळ त्या विश्रांती साठी थांबल्या असतील ..गाठतीलच आपल्याला अस म्हणून वर चढायला सुरुवात केली.... अजय बोलघेवडा आहे त्याला सोबत मामांची मिळाली . त्यांच्या गप्पा रंगल्या...त्या मुलांमध्ये तन्मय रमला.. तो त्यांच्याबरोबरच चालत होता..आम्ही दोघी एकमेकीं बरोबर .. सतत नामस्मरण चालू होत.. थांबत बसत ४००० पायऱ्यांवर जैन मंदिरा पाशी आलो...मला खूप धाप लागत होती बाकी absolutely काहीही त्रास होत न्हवता...१०००० पैकी ४००० पायऱ्या सर.. रात्रीचा १ वाजला होता...खूप छान वाटत होत..जैन मंदिरापाशी थोड्या जास्त लाइट्स होत्या आणि बसायला ही थोडी सपाट मोकळी जागा होती.. तिथे जरा वेळ थांबायच ठरलं...महिला मंडळाचा अजून काहीच पत्ता नाही.. तेवढ्यात मागून तीन मध्यमवयीन माणसं चढून वर आली..ते ही दम खायला तिथे टेकले... अजय नी त्यांना विचारलं की तो बायकांचा ग्रुप अजून किती लांब आहे...ते म्हणाले कोणता ग्रुप ..आम्हाला तर आत्ता पर्यंत एकही ग्रुप दिसला नाही की क्रॉस झाला नाही...एक संभाजीनगरचा ग्रुप आहे ६ जणांचा पण ते लांब आहेत अजून..त्यांना बराच वेळ लागेल वर यायला . वयस्कर आहेत ते सगळे..आम्ही ३ जण अवाक होऊन एकमेकांकडे पाहतोय..बायका गेल्या कुठे? एखाद दुसरी नाही..चांगल्या ८ जणी होत्या..नाशिकचा ग्रुप भेटे पर्यंत त्यांचा आवाज येत होता..मग गेल्या कुठे...काहीच कळेना... बरं परत फिरल्या म्हणावं तर या तीन जणांना atleast खाली उतरताना तरी क्रॉस झाल्या असत्या..आम्ही ३ जण नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहतोय....अजय पटकन बोलून गेला..गुरू महाराजांनीच त्या अष्टयोगिनी पाठवल्या आपल्यासाठी...नाशिकचा मोठा ग्रुप मिळाला सोबतीला आणि त्या हवेत विरल्या सारख्या गायब झाल्या...मला एकदम रडायलाच आलं..अंगावर सरसरून काटा आला....ही नक्की श्री दत्तगुरूंची कृपा...आम्ही तिघेही तिथे बधिर होऊन उभे होतो...नकळत तिघांचे ही हात गुरू शिखराच्या दिशेनी जोडले गेले...एकदा मागे वळून नमस्कार केला..थोडा वेळ तिथे थांबून मग अंबामाता मंदिराकडे चालायला सुरवात केली...साधारण रात्री २ च्या सुमारास आम्ही तिथे पोचलो..तिथे मात्र बऱ्यापैकी गर्दी होती..बरीच लोक आमच्या आधी चढून तिथे येऊन थांबली होती.. तर काही लोकांनी गुरूशिखराकडे वर चढायला सुरुवात केलीय असं कळलं..
तन्मय ला बघून एका माणसानं बेंच रिकामा करून दिला...खूपच गार वारा सुटला होता..हुडहुडी भरेल इतका...वरती गार असत हे माहित असल्यामुळे शाल ,जॅकेट आणि स्कार्फ बरोबर ठेवला होता..सगळ्यांनी स्वतःला गुंडाळून घेतलं..आणि डोळे मिटून घेतले...वाऱ्याचा जोर चांगलाच वाढला होता.थोड्या वेळानी वाऱ्याचा जोर जास्तच वाढला..खूपच थंडी वाजायला लागली...तन्मय ला मी आणि प्रिया नी पूर्ण पणे गुंडाळून घेतलं..आणि दोघी एकमेकींना धरून बसलो..नाशिक करांचे मात्र हाल झाले थंडीने..त्यांची पहिलीच वेळ..काहीच माहीत न्हवत...ते काहीच न घेता वर आले होते..त्यांच्या कडच्या पाण्याच्या बाटल्या पण खाली सिक्युरिटी नी काढून घेतल्या होत्या प्लास्टिक च्या होत्या म्हणून...आमच्या कडे पाणी होत...त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही..पण थंडीमुळे हाल झाले त्यांचे..ती मुलंही एकमेकांना धरून गोल करून बसली होती...हळू हळू वाऱ्याचा जोर कमी झाला..तसे आम्ही थोडे रिलॅक्स झालो..मुलंही सरळ जमिनीवर आडवी झाली..सगळ्यांचाच डोळा लागला..मधून मधून डुलकी लागत होती पण बसलेल्या अवस्थेत खूप अवघडून गेलो होतो...पण काहीही झालं तरी गुरुशिखरावर जाऊन श्री दत्तप्रभूंच दर्शन घ्यायचं हे मनाशी पक्क ठरवलं होत...पहाटे ६ ला वरच मंदिर उघडत...अंबा मातेच्या मंदिरापासून वर जायला साधारण दीड तास लागतो.. आधी पायऱ्या उतरायच्या आणि मग चढायच्या ....अंबा मातेच्या मंदिरापासून पुढे फार लाईट नाही..किर्र अंधार...पायऱ्या चढण उतरण हे सर्व टॉर्च च्या उजेडात... प्रिया नी मला आधीच कल्पना दिली होती...अजय नी साधारण ३ वाजता मामांना विचारलं..तुम्ही ३.३० ला आमच्या बरोबर निघताय की थोडा वेळ थांबून मग निघाल? ते लगेच म्हणाले सोबतच जाऊ सगळे..मग त्यानी त्यांना कल्पना दिली की वरती अंधार आहे..पूर्ण खडा चढ आहे...काही काही ठिकाणी एका बाजूला कठडा नाही पायरयाना...
...मुलांना सांगा जपून चाला..आणि एका मागोमाग एक चला... कारण पायऱ्या लहान आहेत..(खालच्या पायऱ्या थोड्या लांब लांब आहेत).अंबा मातेला नमस्कार करून , श्री दत्तप्रभूंची प्रार्थना करून निघालो... मुलांनी मोबाईलवर गाणी लावली होती...उतरायला सुरवात केली ..एक छोट वळण घेतलं आणि समोरच गुरुशिखराच अतिशय सुरेख दर्शन झालं...पूर्ण मंदिर वेगवेगळ्या रंगांच्या लाईटच्या माळाननी झगमगत होत...विलक्षण विलक्षण सुंदर दृश्य होत...आजूबाजूला मिट्ट काळोख आणि त्यात ते झगमगणार मंदिर... सरळ खाली गुडघे टेकले आणि वाकून मनोभावे नमस्कार केला..आत्तापर्यंत सुखरूप आणलस देवा..आताही लक्ष राहू दे असं सांगितलं .प्रिया म्हणाली मंदिरा ला अशी सजावट पहिल्यांदाच केली आहे...नुसती एक ट्यूब लाईट लावलेली असते..दुप्पट उत्साहाने चालायला सुरुवात केली... खूपच सरळसोट पायऱ्या आहेत... सगळेजण देवाच नाव घेत उतरत होते...मी knee cap सुरवातीपासूनच घातलेल्या होत्या..तरीही बऱ्यापैकी ताण येत होता गुडघ्यांवर..... पण गुडघे दुखत न्हवते...शेवटी उतरण संपलं आता पायऱ्या चढायच्या ... सगळ्यांचेच पाय थरथरायला लागले होते... तिथे सगळ्यांनीच थोडा जास्त वेळ विश्रांती घेतली...प्यायच पाणी संपत आलं होत.. शेवटची चढण खरच अवघड आहे..पूर्ण खडी चढण आहे...पहिल्यांदा जाणाऱ्या साठी तर नक्कीच.....पायऱ्या चढायच्या आधी एका वळणावर काही चपला काढलेल्या दिसल्या..मी मग sac la अडकवलेले शूज काढून तिथे ठेऊन दिले..सॅक जरा हलकी झाली. सॉक्स केव्हाच काढून टाकले होते..अनवाणी चढत होते. पण एकदाही खडा टोचला नाही की काटा बोचला नाही..... फक्त विश्रांती साठी एखाद्या दगडावर टेकलं की काटेरी पांढऱ्या रंगाची अगदी छोटी छोटी फुल ड्रेस मध्ये खूप अडकत होती.. छान गार वारा सुटला होता पण थंडी वाजत न्हवती ..देवाच नाव घेऊन चढायला सुरवात केली...आता अंधार असला तरी कुठल्या प्राण्याची भीती न्हवती..
त्यामुळे दम लागला तर थांबायचं..विश्रांती घ्यायची..परत चालायला लागायच अस ठरवलं.. झगमगणार मंदिर नजरेआड झालं होतं.आमच्याकडे आधीपासूनच टॉर्च होते...आणि मुल मोबाईल चा टॉर्च लावून चढत होती.. शेवटचा टप्पा जवळ आला होता...आता फक्त ५०_६० पायऱ्या राहिल्या..आता फक्त अजून दोन वळणं...मग मंदिर...लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता... पहिलं वळण घेतलं.. बरीच लोक पायऱ्यांवर बसली होती...आम्हाला वाटलं विश्रांती साठी बसले आहेत म्हणून पुढे जायला निघालो तर कळलं ते सगळे दर्शनासाठी रांग लावून बसले आहेत..तेव्हा पहाटेचे ५.१५ वाजले होते...तिथेच रांगेत थांबायला लागलं...मंदिर अगदी दृष्टिक्षेपात होत पण ६ शिवाय दर्शन शक्य न्हवत...पहाटेची चंद्रकोर फार सुरेख दिसत होती....मनसोक्त फोटो काढले...प्रिया म्हणाली अशी रांगेत पायऱ्यांवर बसलेली लोक आम्ही पहिल्यांदा पाहतोय... अस कधीच नसत...साधारण ६ वाजता एकदम खट खट करून दोन हॅलोजन चे मोठे दिवे लागले पायऱ्यांवर..लख्ख उजेड पडला..खालून लोकांचा आवाज यायला सुरुवात आली..गुरुजी आले..गुरुजी आले..वर जायला जागा द्या.. आत्तापर्यंत पायऱ्यांवर पसरून बसलेलो आम्ही सगळे फटाफट उठलो...सगळे भिंतीच्या कडेला झाले..आणि एक बाजू मोकळी करून दिली...भगव्या वस्त्रात गुरुजी वर येताना दिसले...त्यांच्या पुढे एक माणूस होता आणि मागे खाकी वर्दीतला एक माणूस होता.पोलिस होता की वॉचमन काही कळलं नाही...प्रिया म्हणाली आता आरती होईल आणि मग दर्शन सुरू होईल....आरती झाली आणि दर्शन सुरू झालं...२० _२५ पायऱ्यांवर मंदिर होत...माझ्या छातीत धड धड सुरू झाली होती...आणि शेवटी माझा नंबर आला....समोरच्या पादुकांसमोर डोक टेकलं ...समोरची श्री दत्तगुरूंची मूर्ती डोळे भरून पाहिली..एकदम शांत वाटत होत...प्रदक्षिणा घातली...बाहेर निघाले...दारातून परत आत फिरले...पुन्हा एकदा दर्शन घेतलं..मग निघाले...
उतरताना मागच्या महिन्यातली झालेली जीवाची तगमग आठवत होती...मी १००%जाणार नाही कारण मला चढताच येणार नाही अशी हात टेकलेली मी ते मला बोलावण आलं आहे,प्रभूंची इच्छा असेल तर माझं दर्शन होईलच या विश्वासाने निघालेली मी... कर्ता करविता तो..आपण फक्त मनापासून प्रयत्न करायचे.
आशिका यांनी लिहिल्याप्रमाणे"ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे". यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे.
माझ्या घरच्यांचा तर पूर्ण सपोर्ट होताच मला पण मायबोलीकरांनी ही मी प्रश्न विचारल्या विचारल्या खूप मोलाचे सल्ले दिले..ज्याचा खूप फायदा झाला. सगळ्यांचे मनापासून आभार...
दोन तीन गोष्टी आवर्जून सांगीन ..
१.पाण्याच्या जरा जास्त बाटल्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे..फार कोरड पडते घशाला चढताना..आम्ही ३ च नेल्या होत्या..कारण आम्हाला वाटलं वाटेत दुकानं उघडी असतात ..तिथून लागलं तर घेता येईल..पण ९ वाजता निघालो होतो तरी मोजून ३च दुकान उघडी दिसली पण तेव्हा पाणी होत जवळ..म्हणून नाही घेतलं..
२.टॉर्च अतिशय गरजेचा आहे..कारण चालताना मागेपुढे झालं तरी अडचण होत नाही...आणि अंबा माता मंदिरा नंतर टॉर्च लागतोच लागतो..
३. शूज घालून चालायची सवय असेल तर छानच..पण नसली तरी रेग्युलर सँडल घालून सुद्धा पायऱ्या व्यवस्थित चढता येतील..पण सँडल घसरणारे नसावेत..मी तर सरळ अनवाणी चढले..काही म्हणजे काही त्रास झाला नाही...
अशी ही माझी नाही जमणार पासून मी जाईनच पर्यंतची गोष्ट..
जय श्री गुरुदेव दत्त!!!
खूप छान अनुभव अश्विनी! एका
खूप छान अनुभव अश्विनी! एका विडीओ मधे अष्टयोगिनी बद्दल ऐकलं होतं.
विलक्षण अनुभव अश्विनी,
विलक्षण अनुभव अश्विनी, मंत्रमुग्ध झाले वाचून, डोळे पाणावले, वाचून होईपर्यंत अंगावरचा शहारा गेला नाही. खरोखर दत्तगुरुकृपा. अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त. जय गिरनारी.
खूप सुरेख अनुभव. छान वाटलं
खूप सुरेख अनुभव. छान वाटलं वाचून.
खुप छान माहिती.
खुप छान माहिती.
छान झाली तुमची गिरनारव्यात्र.
छान झाली तुमची गिरनारव्यात्र. छान अनुभव.
छान अनुभव. छान वाटलं वाचून.
छान अनुभव. छान वाटलं वाचून.
छान वाटलं वाचून...
छान वाटलं वाचून...
गुरुदेव दत्त..
गुरुदेव दत्त..
अश्विनी छान पार पडली तुमची गिरनार यात्रा..
मी पण याच महिन्यात पौर्णिमेला जाऊन आले गिरनार la.. रात्री 9.30 ला चढायला सुरुवात केली ..1.30 वाजता गुरु शिखरावर होतो.. धुनी आणि प्रसाद घेऊन पहाटे 5.30 ला खाली आलो..पौर्णिमेला मंदिर 24 तास उघडे असते..त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती..दर्शन फार छान झाले..आणि सगळी दुकाने पौर्णिमेला.24 तास उघडी असतात..इतर वेळी 6 वाजता बंद होतात..
@केया .... पौर्णिमेला
@केया .... पौर्णिमेला मंदिर २४ तास उघडं असत हे न्हवत माहित...फारच छान.
यात्रा आवडली.
यात्रा आवडली.
अंबामाता ठिकाणी काय आहे?
अश्विनी ९९९, छान वाटले की
अश्विनी ९९९, छान वाटले की तुम्ही दर्शन घेऊन आलात. अनुभव इथे लिहिलात हे खूप छान केलेत.
केया, तुझा पण अनुभव सविस्तर लिही की.
अश्विनीजी काय अनुभव!!!!
अश्विनीजी काय अनुभव!!!!
वाचताना रोमांचित होणे अनुभव आला, काटे आले अंगावर, आनंदाश्रू आले.
स्तब्ध राहिलो 2 मिनिटे , ते फिलिंग मुरू दिलं मगच पुढचा प्रवास वाचत राहिलो.
हे इथे लिहिलेत हे फार बरे झाले.
जय श्री गुरुदेव दत्त
ओढ आहे
केव्हा बोलावणं येतंय बघू
@ srd..५००० पायऱ्यानंतर अंबा
@ srd..५००० पायऱ्यानंतर अंबा माता मंदिर येत. आपल्या एकूण 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. अंबा मातेच दर्शन घेतलं की तिच्या आशीर्वादाने पुढचा मार्ग सुकर होतो असं म्हणतात. जैन मंदिर असतात तस मंदिर आहे..संगमरवरी बांधकाम आहे.
इथे व्हिडिओ कसा पोस्ट करायचा?
इथे व्हिडिओ कसा पोस्ट करायचा? गुरुशिखराचा एक छोटा व्हिडिओ काढलाय
https://drive.google.com/file
.......
https://drive.google.com/file
https://drive.google.com/file/d/1_PWc88Hjez2Q__USv0nY4GT_Xf6tJuxl/view?u...
अश्विनी , अभिनंदन !! तुमचा
अश्विनी , अभिनंदन !! तुमचा योग होताच दर्शनाचा !!
अश्विनी , अभिनंदन !!
अश्विनी , अभिनंदन !!
लेख वाचला,व्हिडीओ पाहिला, छान.
वा! अश्विनी यात्रा पूर्ती
वा! अश्विनी यात्रा पूर्ती बद्द्ल अभिनंदन! खूपच छान अनुभव !
गिरनार बद्दल प्रसिद्ध म्हण आहे - "जय गिरिनारी, तेरा भरोसा है भारी!" तुम्ही अगदी साक्षात अनुभव घेतलात.
अश्विनी , अभिनंदन !! तुमचा
अश्विनी , अभिनंदन !! तुमचा योग होताच दर्शनाचा >> हेच म्हणतो.
Pages