मभागौदि २०२५ शशक- बेधुंद- छल्ला

Submitted by स्वानंदी१ on 24 February, 2025 - 01:00

वेदांत! श्रीमंत घरात वाढलेला एकुलता एक वारस.
आज त्याचा सतरावा वाढदिवस होता.
सकाळीच त्याने बाबांना सांगून ठेवले होते, की तो संध्याकाळी मित्रांना पार्टी देणार आहे; आणि त्यासाठी परवाच नवीन आणलेली पोर्शे कार हवी आहे.
नाही ऐकायची त्याला सवय नव्हतीच. उर्मट-अरेरावीनेच योग्यता सिद्ध होते असे त्याचे मत होते.
बार, तिथला झगमगाट, मद्याचे प्याले, अगदी हवा तसा माहोल बनला होता.
परत निघायलाच एक वाजला. ड्रायव्हरकडून वेदांतने चाव्या हिसकावून घेतल्या. मला चालवायचीच आहे ही नवीन पोर्शे. तू बस मागे!
मद्याचा कैफ चढत होता. भरधाव गाडी, रात्रीचे मोकळे रस्ते, मित्रांचे टोळके, मजामस्ती...
समोर बाईकवर जाणारे दोघेजण एकदमच मध्ये आले त्याला वेदांत तरी काय करणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad

:|