मभागौदि २०२५ - शशक - पारिजात - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 23 February, 2025 - 10:34

साक्षात समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक - पारिजात वृक्ष. साहजिकच इंद्राने तो त्याच्या बागेत लावला. पुढे नारदमुनींनी त्याचे रसभरीत वर्णन केल्यावर रुक्मिणीला त्या फुलांचा मोह झाला. त्यावर कृष्णाने तिला ती फुले आणून दिली परंतु सवतीमत्सराने सत्यभामेला देखील त्या फुलांचा मोह झाला. मग सत्यभामेने "हा स्वर्गीय वृक्ष मला माझ्या बागेत हवाच" असा हट्ट धरला. आता झाली का पंचाईत? मोठा कठीण प्रश्न. शेवटी स्त्रीहट्टच तो, पण कृष्णाने एक युक्ती केली. पारिजातकाचे झाड त्याने सत्यभामेच्या अंगणात असे लावले की त्याच्या फांद्या रुक्मिणीच्या अंगणात वाकत होत्या. सडा पडायचा तो रुक्मिणीच्या अंगणात.
..........बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद,
स्वाती, झकासराव, ऋन्मेSSष

Pages