मभागौदि २०२५ - गंमतखेळ - चित्रांची भाषांतरे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 18 February, 2025 - 02:08

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.

आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.

मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'

तुम्हांला आम्ही काही चित्रे देणार आहोत आणि या चित्रांवरून गोष्ट, लेख, कविता, चारोळी, स्फुट, काकाफॅा (काहींच्या काही फॅारवर्ड), जे तुम्हाला सुचेल ते तुमच्या शब्दांत मराठीतून लिहायचे आहे . चित्र जरी एकच असले, तरी प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या कल्पना वेगळ्या आणि मजेदार असू शकतात. तेच तर हवं आहे आपल्याला!

तर लेखणी सरसावून आणि मन एकाग्र करून तयार व्हा बरं लिहायला!

तुम्हांला लिहिताना मजा येणार आहे आणि आम्हांला वाचताना!

आम्ही दर दिवशी एक नविन चित्र देऊ. चित्र मुख्य धाग्यातच संपादन करून दिले जाईल. प्रत्येक चित्राला क्रमांक दिलेला असेल. तुम्ही लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा.

चला तर मग, सुरुवात करू या.

तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौखूर उधळू द्या.

चित्र क्रमांक १.
Screenshot_20250224_084652_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक २.
Screenshot_20250225_090653_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ३.
Screenshot_20250226_043622_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ४.
Screenshot_20250227_063111_WhatsApp.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy हो, मी आधी "माझीया एआयला (रिकामी जागा) कळेना" असे काहीतरी लिहावे म्हणत होतो पण रिकामी जागा भरायला योग्य शब्द सुचले नाहीत.

एवढी वाढली असती पक्वान्ने
परी कुणाचे लक्ष नसे त्याकडे
सर्वांचे लक्ष त्या छायाचित्राकडे
काय करावे सकळ जनांचे

रोटी डाळ भजी भात
वाढला असे ताटात
चटणी सरबत नि सार
कोणाचे लक्ष न त्याकडे फार..

एवढा घातला जेवणाचा घाट
करून सगळा हा झगमगाट
तरी आधी सगळे पहाती वाट
स्वछबी काढण्याची...

एवढा घातला जेवणाचा घाट
करून सगळा हा झगमगाट
तरी आधी सगळे पहाती वाट
स्वछबी काढण्याची...

उपवासाच्या नावे
मोठे खाती भरपूर
एका चिमुकलीने मग
धरीला उपवास वार
होते ते कसले निमित्त
राखिला संयम क्षुधेवर.

जीवनोन्न्तीचे फार सोपान >>> Lol

चित्र क्र.२

ए.आय.चीच कढी, ए.आय.चाच भात
या पाचांत दोन मिळवा, होतील सात

ते चित्रं AI नं काढलंय , AAI नं नाही त्यामुळे कुटुंब एकत्र जेवतं म्हणजे कसं ते त्याला कळत नाही.

Submitted by मामी on 24 February, 2>>>>OIG4.uLi2JPx.jpeg

---
OIG1 (2).jpeg

Ai ला आता ते पण कळतं.. Happy

चित्र क्रमांक २

हवेली: वारसा समृद्धतेचा अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या एका हॉटेलमधे मी माझ्या टीमबरोबर प्रवेश केला. राजस्थानी + महाराष्ट्रीयन अशा आंतरराज्यीय जोडप्याने चालवायला घेतलेलं हे हॉटेल तसे जुने म्हणजे किमान तीन पिढ्या या व्यवसायात असलेले. पण गेल्या काही वर्षात म्हणावे तितके ते चालले नाही आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट मेकओव्हर आमच्या कंपनीकडे गेल्या आठवड्यात आला होता.
बाय द वे आत्ता पर्यन्त नेटफ्लिक्स वरुन अशा प्रकारचा एखाद्या जागेचा/व्यवसायाचा मेकओव्हर कसा करतात ते माहिती असेलच तुम्हाला. किमान पक्षी असा मेकओव्हर करता येतो इतके तरी आलेच असेल लक्षात. नसेल आले तर लगेच जाऊन आमची वेबसाईट बघा, आमच्या युट्यूब चॅनलला आणि इंस्टा हॅंडलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरु नका म्हणजे तुम्हाल नवीन अपडेट्स मिळत रहातील. spacesthatspeaks.com ही आमची वेबसाईट आणि याच नावाने युट्युब चॅनल आणि इंस्टा हॅंडल आहे.

तर आपण परत वळूया या हवेलीकडे. हवेलीची युवा पिढी हा व्यवसाय आहे तसा सुरु ठेवायला उत्सुक नाही आणि जुनी पिढी बदल करायला तयार नाही या कात्रीत हवेलीचा समृद्ध वारसा कधीही बंद होण्याच्या सावटाखाली आला होता. त्यातल्या त्यात सुवर्णमध्य काढावा असा विचार त्यांच्या दिव्याने केला आणि आमचे इंस्टा रील्स बघून आम्हाला ॲप्रोच केला.
आता इतक्या तपशीलात आमची प्रोसेस इथे लिहीत नाही नाहीतर मग तिकडे इंस्टा युट्युबला सबस्क्रायबर कसे वाढणार. पण तरी थोडक्यात सांगते. असं करते, त्यांनी त्यांचे पोस्टर शेअर केले होते तेच दाखवून जे त्यांना सांगितले तेच तुम्हालाही वाचायला देते
१)सगळ्यात पहिले ते ताट बघा - अशा पद्धतीने वाढलेली थाळी बघणाऱ्याला अपील करत नाही. आपण आधी नजरेने जेवतो, मग नाकाने म्हणजे त्याचा सुगंधाने आणि मग टेस्ट बड्सना काम देतो. ही तुमची थाळी नजरेच्या लेव्हललाच भूक मारतेय. एकमेकांत मिसळले जाणारे पदार्थ एकी दर्शवत नाहीत. रस्साभाजी वाटीत दिली आणि भात वगैरेची व्यवस्थीत मूद असेल तर ताटात काला दिसत नाही. आम्ही भरभरून देतो/ पोटभर देतो/ पैसा वसूल थाळी आहे हे ठसवायला वापरलेली ही पद्धत फसलेली आहे.
२) जाहीरातीत देखणी टापटिप घरेलूही वाटेल अशी गृहिणी अग्रभागी दाखवणे याला काही मार्क्स दिले तुम्हाला तरी तुमचा फोकस त्या बरोबरीने तुमच्या हॉटेलचे ॲस्थेटिक्स दाखवण्यावर असायला हवा होता. जेवणाऱ्याने उजवा हात टेबलवर ठेवणे पण हायजेनीक वाटत नाही पण ती तुमची चूक नाही.
३) हवेलीची भव्यता, समृद्ध वारसा जपणारी पुरातन शैली असलेले इंटेरिअर आणि आधुनिक टच देणारे, संपूर्ण फॅमिलीला cosy & comfortable आसन व्यवस्था असा मिलाफ तुमच्या इथे आहे हे ठसवणारे पोस्टर हवे होते.

असो तर मंडळी हे अगदी जुजबी पॉईंटर्स त्यांना दिले. बाकी त्यांच्या इंटेरिअर मधले किंवा मेन्यु मधले काय बदलता येईल, काय हायलाईट करता येईल हे आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांना एक डिटेल्ड प्रोजेक्ट प्लॅन सबमीट करुन कळवलेच.
मेकओव्हर करायचा असेल तर सुरवात अशीच हवी की तो का करायचा आहे आणि कुठे बदल गरजेचा आहे हे हुडकणे. यातही क्लाएंटला स्वत:ला त्या जागा आम्हाला दिसतायत तशाच दिसणे महत्वाचे. किमान इथे क्लाएंट आणि आम्ही एका पेजवर आलो हे उत्तम. आता पुढचे बदल अमलात यायला अजून थोडा कालावधी लागेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरला नसाल तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळतच जातील आणि हा मेकओव्हर पूर्ण झाल्या नंतरची छबीही तिथेच बघायला मिळेल.

चला मंडळी पुन्हा भेटूया असेच एखादे प्रोजेक्ट घेऊन. तोपर्यंत जुने प्रोजेक्ट्स लाईक करायला विसरु नका. See you soon, stay tuned

Ai ला आता ते पण कळतं.. >>>> तो एक फुटकळ विनोद होता छन्दीफन्दी. AI आणि AAI (पक्षी: आई) यावरून. तुम्ही फारच सिरियसली घेतलं बुवा. Lol

चित्र २ कमाल आहे. पितळी पेला, चिनी मातीचे ताट, त्यात पांढरा भात, मुगाची खिचडी, फिश करी, वडे, बाजूला वाडग्यात बटर चिकन आणि सोबत वेगळ्या ताटलीत हॉटेलातून आणलेली एक रोटी. ताटाजवळ तूप आणि गंधाच्या दोन छोट्या ताटल्या, मागे तांब्याचा पेला आणि पळी. AI च्या प्राज्ञ परीक्षेची पातळी चट्कन लक्षात यावी.

चित्र क्रमांक २

स्वतः च्या मनाने लग्न करून गेली होती वीस वर्षापूर्वी..तेव्हापासून भाऊ बहिणीचं नातं मी मानलंच नव्हतं..तीला या घरचे दरवाजे बंद केले होते मी..
शेवटचा श्वास घेत असताना वडिलांनी सगळी संपत्ती हिच्या आणि हिच्या लेकीच्या नावे केली आहे..
मी बरा जाऊ देईन हातातून हा पैलेस, हा बीझनेस.एकदा का ह्या सगळ्यांनी हे विषारी जेवण खाल्लं कि सगळ्या इस्टेटीचा मालक मीच..हो मीच, तीचा मोठा भाऊ, फोटो काढतोय यांचा शेवटचा......स्माईल आक्का....
(मागे आपल्या लेकीला वाचवू न शकणारा आणि हताशपणे बघत बसलेला, पुसटसा दिसणारा वडिलांचा आत्मा)

चित्र क्रमांक 2

उत्तरभारतीय ललनेला ( कुंकू बघा भांगेतील )
दक्षिण भारतीय थाळी ( भात बघा थाळीतील )
(हे 2 वेळा म्हणा )
चेहऱ्यावर हसू
तरी चिंता आहे कपाळी

चित्र २ : लग्नात पंगत बसलेली आहे आणि अचानक फोटो काढायला / व्हिडिओ काढायला आले की उगाच कृत्रिम हास्य चेहेऱ्यावर आणावी लागते.

झकास लिहीलय झकास

मृ चे मुव्हीप्रेम डोकावले इथे. सिनुमाचा सीन मस्त लिहीलायस मृ

कविन, छल्ला Lol थँक्यू थँक्यू.

झकासराव , छान लिहिलंय..
ती साऊथ इंडियन मुलगी आहे..उत्तर भारतीय मुलाबरोबर लग्न करून गेली होती.. आता इतक्या वर्षानंतर भावाने बोलवलंय आणि प्रेमाने वागतोय खरा पण सगळं आलबेल आहे ना काही दगाफटका तर नसावा म्हणून थोडी चिंतित वाटतीए ती Lol

Ai ला आता ते पण कळतं.. >>>> तो एक फुटकळ विनोद होता छन्दीफन्दी. AI आणि AAI (पक्षी: आई) यावरून. तुम्ही फारच सिरियसली घेतलं बुवा. Lol

Submitted by मामी on 25 February, 2025>>>
खर आहे , पण त्या पण त्या कमेंटनी तुम्ही मला दार उघडून दिल की हो, मी त्या गल्ली निघाले पुढे.
१५-२० फोटो करून बघितले.. त्यातलेच हे काही.

नऊवारी साडी काही जमल नाही...

मागे दिवाळीला फराळ पाडायला ( ai) ne असाच बराच वेळ घातला होता.. पण नीटस जमला नव्हता

आजचे चित्र मुख्य धाग्यात संपादन करून दिले आहे. कृपया लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा. धन्यवाद.

१५-२० फोटो करून बघितले.. त्यातलेच हे काही. >>> मजेशीर आहेत चित्रं.

एक गंमत म्हणजे पहिल्या चित्रात दोन गुलाबी बायकांच्या मध्ये जो निळा पगडीवाला आहे ना, त्याला तीन हात आहेत. Lol
शेवटच्या चित्रात बाळासाहेब ठाकरे आणि मोदी पूजा करतायत असं वाटतंय.

बायकांच्या मध्ये जो निळा पगडीवाला आहे ना, त्याला तीन हात आहेत. >>>>मामी भारी निरीक्षण.
ह्याच फोटोत सगळ्यांना दात घासायची नितांत गरज आहे

पाहून AIच्या घरी किती दाटीवाटीने जेवायला बसतात लोक, असं वाटलं.>>> Wedding/ feast म्हटलं की तो गर्दी जमवतो

Family म्हटलं की टिपिकल हम दो हमारे दो .. त्यातही एक मुलगा एक मुलगी..
_2c6ecab0-1223-4807-9c18-12e48454cbe8.jpeg

चित्र क्रमांक 3

पाउले चालती पंढरीची वाट

तेव्हा असाच माहोल असतो

Pages