नशीबासाठी!

Submitted by नरेश रावताला on 27 December, 2024 - 10:38

नशीबासाठी!
एखाद्या ठिकाणी नशीब
विकत मिळाले तर
विकत घ्यायला
जरूर आवडेल...
भंगलेल्या स्वप्नांच्या
कुरूप सांगाडाच्या
पुनरूज्जीवनासाठी!
रक्तमांसाचा चिखल
तुडवता यावा म्हणून...
परकेपणाने शत्रुत्व पत्करले;
स्वामित्वासाठी-स्वातंत्र्यासाठी,
भेदरून आता-
संकटाशी त्वेषाने लढताना
हळूहळू हरलेली लढाईच
लढतो आहे खजिल होऊन...
जन्मजात कणखरपणा हरवलेला;
सार्‍या माणूस जातीने
तो हरवलेला,
ती जागा भरून काढण्यासाठी
कुटिलपणा आहे जारी
इथल्या बकाल दुनियेत;
पण तो मेंदू यायला
आणखी कैक साल जातील
नशीबासाठी!
© नरेश रावताला
nareshrawatala@gmail.com
***

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला जे काही आकलन झाले त्यानुसार:

जबरदस्त लिहिले आहेत

मांडणी गद्यप्राय आहे, पण विस्फोटक आशय आहे असे वाटते