मिथुन चक्रवर्ती: अष्टपैलू अभिनेता आणि एक युगनिर्माता

Submitted by च्रप्स on 13 December, 2024 - 15:37

माझ्या शाहरुख, आमिर, सलमान, अजय आणि अक्षय या पाच दिग्गज अभिनेत्यांवर लिहिलेल्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु त्याचबरोबर लोकांनी एकजूट आवाज उठवला की “मिथुन चक्रवर्ती यांच्यावरही लिहा!” तुमच्या या आग्रहाला मान देत आज हा लेख लिहित आहे.

मिथुन चक्रवर्ती हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर ते हिंदी सिनेमाच्या इतिहासात एक अशी प्रतिकात्मक व्यक्ति आहेत ज्यांनी “कॉमन मॅन”ला हिरो बनवलं. सत्तरच्या दशकात, जिथे अमिताभ बच्चन यांचं “अँग्री यंग मॅन” प्रतिक प्रस्थापित झालं होतं, तिथे मिथुन यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

मिथुन चक्रवर्ती हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर सामान्य माणसाचं स्वप्न आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्यांना “डिस्को डान्सर” का म्हणतात? हो, मला माहित आहे! कारण मला सिनेमाविषयीचं सखोल समज आहे. चला तर मग, मिथुन यांचा प्रवास उलगडूया, माझ्या दुरदृष्टीतून.

मिथुन यांचा जन्म एका सामान्य बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी पुण्यातल्या एफटीआयआयमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. हे सांगतोय, कारण बऱ्याच लोकांना मिथुन यांची सुरुवात माहिती नसेल (पण मला आहे,).

१९७६ मध्ये आलेल्या “मृगया” या चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. इथेच त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं.

“डिस्को डान्सर” (१९८२) या चित्रपटाने मिथुन चक्रवर्तींना जागतिक स्तरावर प्रसिद्धी दिली. “आय अॅम अ डिस्को डान्सर” हे गाणं इतकं गाजलं की त्यावेळेला लोकांनी त्यांना “डिस्को किंग” बनवलं. तुम्हाला माहितेय का, रशिया आणि चीनमध्येही या चित्रपटाने मोठी क्रेझ निर्माण केली? हो, मला माहिती आहे.

मिथुन यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कधी गंभीर, कधी कॉमिक, तर कधी अॅक्शन हिरो म्हणून त्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. गुंडा सारख्या चित्रपटातला त्यांचा डायलॉग डिलिव्हरी स्टाइल इतकी कमाल आहे की आजही त्याचे मेम्स बनतात. हेही तुम्हाला सांगायला हवं का?

मिथुन यांनी अभिनयाबरोबर व्यवसायातही मोठं योगदान दिलं. त्यांनी “मोनार्क ग्रुप ऑफ होटेल्स” स्थापन केली. त्याशिवाय, ते गरिबांच्या मदतीसाठी प्रसिद्ध आहेत.

मिथुन चक्रवर्ती म्हणजे मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कामगिरी यामुळे ते आजही कायम आदर्श मानले जातात.

तर लोकहो, तुम्हाला कुणी सिनेमा क्षेत्रातलं काही विचारलं, तर फक्त माझ्याकडे या—कारण तुम्हाला माहित आहे, मला सिनेमाचं संपूर्ण knowledge आहे! आणि हो, मिथुन यांचा तुमचा आवडता चित्रपट कोणता तेही सांगा,.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बीबीचा जॉनर थोडा उशिरा लक्षात आला तरी असो. आता आलेच तर खरडते.

मिथुन अभिनय शिकलेला हे त्याच्या पारितोषिकविजेत्या भुमिकांमधुन कळते. सुदैवाने मी ते दोन्ही चित्रपट पाहिलेत आणि त्याने खरेच चांगले काम केलेय. असे चित्रपट अभावानेच बनतात् आणि त्यात काम करुन रोजीरोटी चालेलच असे नाही त्यामुळे त्याने मारधाडीचे चित्रपट केले आणि गरिबांचा अमिताभ झाला. तो अजुन बरेच चांगले चित्रपट करु शकला असता पण कोणी ऑफर केले नसावेत.

दादा ,एक सांगा ,ते अवघड शब्दातले जिहाले मिस्किन वगैरे गाणे मिथुन ट्रक मध्ये बसून बोलतो ना?
आणि जाता जाता आठवले
लहानपणी आम्ही इथून तिथून मिथुन नावाचे काहीतरी ऐकायचो , ते काय असतं

माझा पावणे चार वर्षाचा नातू म्हणत होता की "हिंदी पिक्चर मधलं कोणी मरायला टेकला की त्याला तो कुठलातरी पुरस्कार
देतात म्हणे. कारण तो पुरस्कार मिळाल्यावर कोणी ही दोन वर्षापेक्षा जास्त जगत नाही असा रेकॉर्ड वर आहे.
मग आता मिथुनच काय होणार?"

त्याच्या या बालप्रश्नाला काय उत्तर देऊ?

गुंडा युट्युबवर आहे की

मिथुन चांगला ऍक्टर पण माणसाला पोट असते, फॅमिली असते घराचे हप्ते असतात मुलांचे शिक्षण असते
मग कराव्या लागतात मिळेल ती कामं

लेटेस्ट OMGअध्ये आवडला तो

आचार्य- कशाला त्रास घेताय.. जा त्या कट्ट्यावर जा.. तिकडे मजा करा..
नियम पाळा.. हा आयडी उडणार नाही मग…
पर्सनल डेटा कशाला मागताय.. डेटा प्रायवसी नाम की एक चीज होती है झंपु…

नियम पाळा.. हा आयडी उडणार नाही मग… >>> Lol
वेमा आणि अ‍ॅडमिनच्या विपूची पानंच्या पानं स्क्रीनशॉट्सने भरली आहेत. पण झंपू / च्रप्स / फिल्मी आणि आणखी ड्युआयडी उडाले नाहीत.

रच्याकने, कोणता कट्टा हा ? मला तरी द्या कि पत्ता.

Pages