आरंभ संस्था औरंगाबाद या NGO साठी माझी आतेबहिण प्रज्ञा देशपांडे अनेक वर्षांपासून काम करते. तिने मला हे फॉरवर्ड पाठवले होते. ही ऑथेन्टिक पोस्ट आहे. मला याबाबत फारशी माहिती नाही पण तिच्या तोंडून कधीमधी याबद्दल कळले आहे. कधीकधी या मुलांनी बनवलेली प्रॉडक्ट्स घेतलेली आहेत. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे, तिथे ऑटिझम विषयी समाजात फारशी जाणीव नाही. अशा मुलांसाठी व प्रौढांसाठी येणाऱ्या आव्हानांची कल्पनाही सहज येणं कठीण आहे. मराठवाड्यात अशा शाळा किंवा संस्थाही नसाव्यात. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ही पुढील माहिती तिने जशी पाठवली तशीच इथे देत आहे.
*हार्दिक विनंती*
*सहयोगाची मनस्वी हाक*
मराठवाड्यातील छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे मागील १२ वर्षापासून स्वमग्न आणि गतिमंद समाज घटकासाठी *आरंभ संस्था* सेवा काम करते. स्वमग्न आणि गतिमंद गटातील बालक आणि प्रौढ यांचे जीवन अतिशय आव्हानात्मक असते. किंबहुना अशा मुला - मुलींच्या पालकांचे जीवन अनेक आव्हानांनी भरलेले असते, अशा स्वमग्न व गतिमंद गटासाठी आम्ही शाळा चालवतो. अशा विशेष मुला - मुलींसाठी निवासी शाळा ,प्रकल्प असणे अती आवश्यक असते. बदललेल्या काळात अशा विशेष शाळांची समाजात नितांत गरज आहे. यामुळे छ. संभाजी नगर (औरंगाबाद) शहरापासून जवळच आरंभ संस्थेच्या शाळेचे काम सुरू आहे, संस्थेच्या जवळच्या सर्व संचिता (आर्थिक रकमेतून) स्वमग्न व गतिमंद बालके व प्रौढ यांचे घर व शाळा उभा करीत आहोत. पैशांच्या अर्थात निधीच्या कमतरतेमुळे हे बांधकाम थांबले आहे. आपल्या शहरातील असंख्य स्वमग्न व गतिमंद मुला - मुलींचे थांबलेले हे काम उभे करण्यासाठी आरंभ संस्थेला आपण खालील प्रमाणे छोटी मदत जरूर करावी. एकदा या कामाला भेट जरूर द्या.. शाळेचे सर्व पालक आणि या राज्य व देशातील अशा बालकांच्या - प्रौढांच्या समस्यांची जाण असणा-या प्रत्येकाने छोटी मदत जरूर आरंभला जोडून द्यावी..!!
आपण पाठविलेल्या प्रत्येक मदतीची आर्थिक व वस्तुरूप पावती संस्थेमार्फत आपणास जरूर मिळेल. संस्थेला दिलेल्या आर्थिक मदतीस आयकर कलम ८० जी अन्वये आयकर यात सवलत मिळते.
आपण आरंभ च्या शाळेच्या बांधकामासाठी खालील प्रमाणे मदत करू शकता..!
1) एक सिमेंट पोते: 360 रुपये
2) दहा विटा : 150 रुपये
3) एक गज स्टील : रुपये 400
4) एकब्रास फरशी : 2500 रुपये
5) एक ब्रास वाळू : 6000 रुपये
6) आपण वरील बांधकाम साहित्य किंवा त्याची किम्मत किंवा कमीत कमी 500 रु किंवा जास्त रक्कम पण मदत म्हणून पाठवू शकता.
संपर्क:
टीम आरंभ संस्था ,
https://aarambhtrust.in/
ही त्यांची वेबसाईट.
छ. संभाजी नगर (औरंगाबाद)
संपर्क :
अंबिका ताई:
82752 84178
प्रज्ञा ताई:
99231 82155
आनंद सर:
9372006965
खाली अकांऊट नंबर व बॅन्क ट्रान्स्फरची माहिती देत आहे. यापेक्षा अधिक माहिती हवी असेल तर वरील कुठल्याही नंबर वर मेसेज करून विचारू शकता.
भारतातील लोकांना -
उत्तर अमेरिकेतील लोकांना भारतीय अकाऊंट मधून पैसे ट्रान्स्फर करणे सोपे जाईल. मी तेच केले.
Account Name: AARAMBH SOCIETY FOR AUTISM & SLOW LEARNER CHILDREN, AURANGABAD Bank Name: COSMOS Bank
AC No. 91205010109925
Account type: Saving Account.
IFSC Code - COSB0000912
Branch name: Dashmeshnagar.
Branch Code - 00912
8275284178
Aarambh Aurangabad
युरोप मधील लोकांना समहाऊ कॉस्मॉस चालत नाही असे लक्षात आले-
AARAMBH SOCIETY FOR AUTISM & SLOW
LEARNERS CHILDREN
Account No 62244857159
IFSC Code SBIN0021139
Bank Name State Bank of India
Branch Name Shahnoorwadi
Branch Code 21139
City Aurangabad
Contact No 8275284178
Account type Saving Account.
शिवाय -
-
धन्यवाद. /\
माझ्या आतेबहिणीने मला
प्रज्ञाने मला विचारायला सांगितले आहे - इथे कुणी प्रसाद शुक्ल आहेत का जे युएस मधे आहेत आणि ज्यांनी नुकतीच आरंभ संस्थेला देणगी दिली आहे. एक एप्रिलची तारीख आहे.
Pages