सोंग

Submitted by जोतिराम on 9 November, 2024 - 11:55

कोण गाढ झोपलाय
आणि कोण घेतोय सोंग
सर्वांनाच राग येतोय
हे कसल आलय ढोंग

मी कायच करू शकतो
हेच आधी सांगा कुणी
नसेल जमत काहीच मग
काढू नका माझी उनी
मी आहे साधा आणि
मला कळतो माझा रंग
सर्वांनाच राग येतोय. . . .

सगळं आहे हातात, तरी
रडण्याची घाई घाई
कळतं पण वळेल कसं
सांगा आत्या मावशा आई
छोटंसच स्वप्न माझं
रोजच होतंय भंग
सर्वांनाच राग येतोय. . . .

कितवर वाट बघत बसू
कधी मिळेल तोडगा
की आहे भाळी माझ्या
आपेक्षांचा वाडगा
एकटच चालणार
की होईल कोणी संग
सर्वांनाच राग येतोय. . . .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ..!