अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन!!!

Submitted by मोरोबा on 6 November, 2024 - 05:49

निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।

कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।

लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।

गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।

या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।

कित्येक इल्लिगल ॲरेस्टिला। कित्येकासि धाक सुटला।
कित्येकांस डिपोर्ट केला। डॉनल्डराजा।।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Congratulations America for electing a President despite his 34 felony convictions>>> आजच ट्रम्प वर 35 वा फेलनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
He is a woman-beater.
.
.
.
.
.
.
He beat two women named Hillary and Kamala.

कमला हॅरिस म्हणजे स्वतःची कोणतीही मते नसलेली ( रोबोट सिनेमातील क्रिती सेनोन सारखी) मशीन कॅंडीडेट होती.
कॅलिफोर्नियाचे प्रपोझिशन ४७ ने झालेले मातेरे थोडे तरी सुधारावे म्हणून तिथे प्रपोझिशन ३६ मतदानाला होते.
त्यावर तुमचे मत काय से विचारले तर चक्क नकार दिला. तेही तिथे आधी ए जी म्हनून काम केलेले असताना.
( सुदैवाने ते पास झाले)
ट्रम्प ची पत्रिका पहायला हवी एकदा. पठ्ठ्याच्या पत्रिकेत सारेच ग्रह उंचीचे असावेत. आता जॅक स्मिथ ची चौकशी थांबली.

राज , जस्ट बिकॉज आज तुझा उमेदवार जिंकला म्हणुन सगळे डेमोक्रॅट्स सपोर्टर्स डिम्विट्स आहेत असे तु जेव्हा म्हणतोस तेव्हा तुझ्यात व सगळे रिपब्लिकन्स डिप्लोरेबल व व गार्बेज् आहेत असे म्हणणार्‍यात् काय फरक?

माझ्या मते प्रत्येक पक्षाच्या पाठिराख्यांनी निवडणुक जिंकली तर विरोधी पक्षाच्या पाठीराख्यांना असे नावे न ठेवता पुढची चार वर्षे एकत्र देशाला कसे पुढे नेता येइल व विकसित करता येइल याचा विचार करावा व निवडणुक हरली तर हरलेल्या पक्षाच्या पाठीराख्यांनी निवडणुक कशी चोरली वगैरे तद्दन खोटे नाटे बेसलेस आरोप न करता सोल सर्चिंग करावे की ते निवडणुक का हरले. असे पुर्वी होत असे पण गेली २०-३० वर्षे ( बिल क्लिंटन पासुन पुढे) बायपार्टीसनशिप अमेरिकन राजकारणातुन जवळजवळ बाद होत चालली आहे व देशाचे एक्स्ट्रिम पोलरायझेशन होत चालले आहे जे देशासाठी हितकारक नाही.

मुकुंदः

बायडन पेक्षा वेगळे तु काय करशील तेव्हा “ नॉट अ थिंग कम्स टु माय माइंड !” >>> करेक्ट. ट्रम्पने २०१६ पासूनच आधीच्या रिपब्लिकन प्रेसिडेण्टसचे निर्णयही बिनडोक होते म्हणून सरळ सांगितले, त्यामुळे आधीच्या कोणत्याही रिपब्लिकन निर्णयांचे बॅगेज त्याच्या डोक्यावर आले नाही (इराक वॉर ई). कमलाने तसेच करायला हवे होते. पण अगदी तितके नाही, तरी एखादे चतुर उत्तर राजकारणी लोकांना अशा वेळेस चटकन देताच आले पाहिजे - आता आम्हाला जी माहिती आहे त्यावरून काही निर्णय कदाचित बदलले असते वगैरे. तिची टीम काय तयारी करत होती माहीत नाही.

तरी तिच्या मर्यादेत तीन महिन्यांत ती जे लढली ते ही क्रेडिटेबल आहे. मिड-जुलै मधे डेम्सकरता "गेम ओव्हर" स्थिती होती.

डेम्स मधे वोक गिरी किती भरली आहे हे बायडेनने एकदा एक "खुलासा" केला होता तेव्हाच जाणवले होते. कोणाच्या तरी खुनाकरता पकडला गेलेल्या एका इल्लिगल इमिग्रंट बद्दल बोलताना त्याला आवर्जून "इल्लिगल म्हणायला नको होते" हे सांगायला भाग पाडले गेले. तेथे त्या व्यक्तीने केलेल्या खुनाबद्दल चर्चा सुरू होती. एका खुन्याबद्दल काय विशेषण वापरतोय हे तेथे महत्त्वाचे नवह्ते. असे तारतम्य हुकलेले लोक जर भरले असतील तर सर्वसामान्य लोकांशी हे लोक कनेक्ट होणार नाहीत. हार्वर्ड व इतर विद्यापीठांच्या प्रमुखांना तेथे ज्यू लोकांना धमक्या दिल्या जात आहेत हे त्यांच्या पॉलिसीत बसते का याबद्दल कोहिरंटली उत्तर देता आले नाही. हे लोक डेम्स (मधले नेते) नव्हेत पण त्यांना धारेवर धरणार्‍यांमधे रिपब्लिकन्स जितके सहज दिसले तितके डेम्स का दिसले नाहीत असे प्रश्न लोकांना पडतच असतील.

तरी तिच्या मर्यादेत तीन महिन्यांत ती जे लढली ते ही क्रेडिटेबल आहे. मिड-जुलै मधे डेम्सकरता "गेम ओव्हर" स्थिती होती.> यात तिच काडिचही कर्तुत्व नाही, मुळातच कमला हॅरिस अजिबातच हुशार ,स्मार्ट नाहि, तिचे इन्टरव्यु सगळे फेल गेलेत, मागच्या ४ वर्शात झालेल्या सगळ्या मिसहॅप्सची उत्तर दयाव लागण हे नशिबी असेल तर त्याची तयारी करण आवश्यक होत...ज्याचा पुरेसा वेळ न मिळण समजु शकतो पण डेमोक्रॅटसने मतदाराना पुर्णपणे ग्रुहित धरण मग आधी बायडेनच्या फिटनेसची भलामण करण आणी तोण्डावर पडल्यावर कॅन्डीडेन्ट बदलण..काय खेळ होता हा?लोक काय मुर्ख आहेत का?
कमलाला मिळालेली मत ही एकतर ऑपोझिट पार्टीची जी जहाल मत आहे त्याला नाकारणर्‍या मतदाराची मत आहेत किवा डेमोक्रट लॉयल्स!
ट्र्म्पला मत देणार्यानी गन, अ‍ॅबॉर्शन यापूढे विचार करत फक्त इकॉनॉमी आणी वॉर एन्ड या प्रॉमिसला मत दिली असावित.
असो! त्याने ती दोन्ही प्रॉमिसेस पाळावित .. पुढची ४ वर्श निट जावित या साठी ट्रम्पला आणी अमेरिकन रेसीडेन्ट्ला शुभेच्छा!

>>राज , जस्ट बिकॉज आज तुझा उमेदवार जिंकला ... <<
अरे बाबा, ट्रंप हरला असता तरिहि माझं तेच मत असतं. उद्या खायचे वांदे झालेले चालतील, पण अ‍ॅबॉर्शन हि आमची टॉप प्रायॉरिटी आहे असं मानणार्‍यांना मी डिम्विटच समजतो..

>>कमलाला मिळालेली मत ही एकतर ऑपोझिट पार्टीची जी जहाल मत आहे त्याला नाकारणर्‍या मतदाराची मत आहेत किवा डेमोक्रट लॉयल्स!
ट्र्म्पला मत देणार्यानी गन, अ‍ॅबॉर्शन यापूढे विचार करत फक्त इकॉनॉमी आणी वॉर एन्ड या प्रॉमिसला मत दिली असावित.<< +१
बिंगो. यात अजुन अ‍ॅड करेन कि अनेक डेम्स अ‍ॅबॉर्शन बाबतीत रिपब्लिकन्सशी अलाइन्ड आहेत. जी लोकं फक्त अ‍ॅबॉर्शन्चा मुद्दा कवटाळुन बसले आहेत, आणि हॅरिस अ‍ॅबॉर्शन्च्या मुद्द्यावर निवडुन येइल असं छातीठोकपणे इथेच सांगत होते त्यांना डिम्विट नाहि तर काय बोलणार हे आता तुच सांग..

जिम कार्विलचं फेमस कोट तु ऐकलं असशीलंच - इट्स द इकानमी, स्टुपिड...

मोरोबा, नविन धागा काढल्याबद्दल धन्यवाद. या धाग्यावरची पोस्ट-पोल अ‍नॅलिसिस, आणि शेंडेनक्षत्रांच्या धाग्यावरची प्रि-पोल प्रेडिक्शन्स यांचा ताळा करताना त्यातली तफावत बघुन चांगलीच करमणुक होतेय... Proud

राज, मग तुझ्या लॉजिक प्रमाणे अमेरिकेत ४७ टक्के डिम्विट्स व ५३ टक्के गार्बेज/डिप्लोरेबल्स आहेत तर! मग तुझा कँडिडेट अमेरिका ग्रेट अगेन कसा करतो ते बघायला फारच करमणुकीचे होइल! Proud

“अनेक डेम्स अ‍ॅबॉर्शन बाबतीत रिपब्लिकन्सशी अलाइन्ड आहेत.”

राज अ‍ॅक्च्युअली याच्या उलट वस्तुस्थिती आहे. अनेक रिपब्लिकन्स अ‍ॅबॉर्शन बाबतीत टोकाच्या भुमीकेविरुद्ध आहेत हे फ्लोरिडा सोडुन बाकीच्या राज्याच्या बॅलटवर असलेल्या अ‍ॅबॉर्शन राइट अमेंडमेंट पास झाल्यावरुन सिद्ध झाले आहे.

राज हे कोणाबद्दल बोलत आहेत माहीत नाही. कारण कमला त्यावर निवडून येईल असे इथे कोणीच म्हंटलेले नाही.

US election coverage is so boring.

They don't come up with imaginative, poetic lines such as :

▪︎ “Kamala ka Hamla!”

▪︎ “Trump ka Bhukamp!”

▪︎ "Trump ko mili jaadu ki jhappi; jeet gaye Mississippi."

▪︎ “Pennsylvania mein Trump mania?”

▪︎"Kamala ke ude chaina; Trump jeete North Carolina!"

▪︎ "Dukh, dard aur peeda; Kamala haari Florida."

▪︎ "No If, no But; Trump haare Connecticut!"

▪︎ "Trump ne diye Democrats ko gehra ghaav; Kamala pakaati reh gayi khyaali pulaav."

साधना - हे मजेशीर आहे. Happy

रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यावर आनंद व्यक्त करतांना आपले एक केंद्रातले लोकप्रिय मंत्री
https://www.youtube.com/watch?v=wDyiTJuzmTQ

अनेक माध्यमांची कीर्ती धुळीस मिळाली. अनेक एकेकटे पॉडकास्टर्स हे लोकांना जास्त विश्वसनीय वाटतात हे स्पष्ट झाले.
एम एस एन बी सी (ज्यांना बिगर डावे लोक कौतुकाने एम एस DNC म्हणतात) त्यांनी ट्रंपच्या अनेक प्रायमरीच्या विजयानंतर त्याचे भाषण प्रसारित करायला नकार दिला. का? कारण तो खोटारडा आहे. तो घातक गोष्टी बोलून देशाचे वातावरण बिघडवतो आहे. कोंबडे झाकून सूर्य उगवणे थांबवण्याचा एक मूर्ख प्रकार होता.

ट्रंपचे त्याच्या पहिल्या हत्येच्या प्रयत्नानंतर दिसलेले वागणे (ज्याचा फोटो ह्या धाग्याच्या सुरवातीला आहे) हे त्याच्या धाडसाची, धैर्याची (कदाचित बेफिकिरपणाही असेल) परिसीमा होती. एक सत्तरीतील म्हातारा हत्येच्या, मरणाच्या इतका जवळ आला होता आणि तरी काही सेकंदात हात उंचावून लढत रहा असे चेवाने हात उंचावत सांगत आहे ह्याचा निश्चितच चांगला परिणाम झाला असेल विशेषतः तरुण वर्गात. धैर्य हा गुण सहसा राजकारणी लोकांत दिसत नाही तो इथे ठळकपणे दिसला.

कमला बाई ही डी ई आय कोट्यातून भरती केलेली स्त्री आहे. कुठल्याही पदासाठी काहीतरी अग्नीपरीक्षा द्यावी लागते हा नियम तिच्या बाबतीत पूर्ण धुडकावला गेला. बायडनने तिला केवळ काळी आहे, स्त्री आहे म्हणून घेतली तेव्हा तिने प्रायमरीत आपण साफ नापास झालो आहोत हे जगाला दाखवले होते. तरी तिला घेतले आणि तिच्या उपराष्ट्रपतीपदावरील अत्यंत निष्प्रभ, वाईट कामगिरीनंतर तिला प्रमोशन देऊन राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवणे हे लोकांना पटले नाही. जनता जनार्दनाची कृपा झाली. नाहीतर काय भयंकर प्रसंग उद्भवला असता!

इथे पण लिहितो.

काही रिप्सना आपण निवडणूक जिंकलोय, प्रचार संपलाय, आता आपण विरोधी पक्षात नसून, सत्ताधारी पक्षात असणार आहोत त्यामुळे धूळवड करायची गरज नाहीये हे अजून लक्षातच येत नाहीये.

काही रिप्सना आपण निवडणूक जिंकलोय, प्रचार संपलाय, आता आपण विरोधी पक्षात नसून, सत्ताधारी पक्षात असणार आहोत त्यामुळे धूळवड करायची गरज नाहीये हे अजून लक्षातच येत नाहीये.

बॉलर खूप होते. बॅटिंग करणारा एकच होता. त्यामुळे बरेच बॉल खेळायचे राहिलेले आहेत. ते शोधून काढून खेळणे चाललंय. आपला बॉल दुर्लक्षीत राहिल्याचं दु:ख बॉलरला व्हायला नको. ३१ डिसेंबर पर्यंत वेळ आहे तोपर्यंत हे संपेल असं वाटतंय. Happy

ट्रम्प यांच्या विजयाने शोकाकुल झालेल्या अनेक वोक महिला क्षौरकर्म करून ब्रह्मचर्याचं पालन करण्याची शपथ घेत आहेत Biggrin Biggrin याला 4b movement की कायसंसं म्हणतात म्हणे Lol

थॅन्क्सगिविंगच्या निमित्ताने आज परमेश्वराचे आभार. ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मप्रमाणेच पुढची चार वर्षे अमेरिकेला स्थैर्याची, समृद्धीची, शांततेची आणि युद्धमुक्त जावोत.
आमेन _/\_

मोरोबा, त्रंप्या तुम्हाला कॅबिनेट पोस्ट देणार!! फक्त हे सगळे, वरची कविता वगैरे सर्व इंग्रजीत लिहून त्याला पाठवा!!
शेंडेनक्षत्र तुमचे असिस्टंट! दोघे मिळून मायबोलीवरच्या लोकांच्या मागे लागा!

मला ट्रंपकडचे मंत्रीपद नको नि मंत्र्याच्या सहायकपदही नको. डाव्यांची षंढ आक्रंदने, शिव्याशाप, जनता कशी मूर्ख आहे वगैरे कुढणे (ज्यात मायबोलीवरील बहुतेक सदस्य समाविष्ट आहेत) हेच माझ्यासाठी आनंददायक आहे!
कमलाबाईची निवडणूक मोहिम हा एक आनंदसोहळा असल्याचे ठासून सांगितले जात होते. पण ते अत्यंत सुतकी होते. खोटा खोटा आनंद दाखवायचा प्रयत्न होता. विनोदबुद्धीचा पूर्ण अभाव. नुसती हास्यास्पद भाषणे आणि डायलॉग हेच त्यांचे वैशिष्ट्य
दुसरीकडे ट्रंपसाहेबांचे म्याकडॉनल्ड मधे काम करणे, कचर्याचा ट्रक हाकणे एवढेच काय त्यांचा तो अवघडलेल्या पद्धतीने हातांची हालचाल करत केला जाणारा नाच हेही व्हायरल होत आहे.

मोरोबांशी सहमत आहे. ट्रंपच्या बहुतेक नेमणुका आशादायक आहेत. काय काय चांगल्या गोष्टी बघायला मिळतात ह्याची उत्सुकता आहे.

कधी एकदा जानेवारी येतो आणि ह्या भ्रमिष्ट म्हातार्‍याच्या वेडगळ राजवटीचा अंत्यविधी होतो आहे असे झाले आहे. तोवर ह्या आसन्नमरण पिशाच्चाने तिसरे महायुद्ध पेटवून देऊ नये हीच प्रार्थना!

“ ह्या भ्रमिष्ट म्हातार्‍याच्या वेडगळ राजवटीचा अंत्यविधी होतो आहे असे झाले आहे” - बापरे!! स्वतः कॅलिफोर्नियासारख्या प्रगत राज्यात रहायचं आणि उगाच उंटावरून शेळ्या हाकायच्या हे हास्यास्पद आहे. असल्या एक्स्ट्रीम शिवीगाळ करणार्या भाषेचा कंटाळा आलाय. एक रिपब्लिकन सपोर्टर म्हणून सुद्धा इतक्या दर्जाहीन पोस्ट्सचा फक्त निषेध करावासा वाटतो.

“ तिसरे महायुद्ध” - बिनबुडाचं फिअर माँगरिंग! त्यापेक्षा एखाद्या रेड स्टेटमधे व्हाईट सुप्रिमसिस्ट्सचा धिंगाणा बघा.

Pages