ट्रोल होणारे दवणीय वक्तव्य / लिखाण

Submitted by रघू आचार्य on 4 November, 2024 - 20:39

ट्रोलिंग चांगलं कि वाईट हे ठरवणे अवघड आहे. पण समाजावर प्रभाव पाडू शकणार्‍या काही मंडळींची वक्तव्ये ट्रोल होण्यासाठीच असतात का असे वाटते. अशा वक्तव्यांसाठी हा धागा.

प्राजक्ता (माळी) म्हणाली “मी नेहमी बाहेरून खूप माणसांमधून घरी गेले तर मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करते. सातत्याने थोडे थोडे केस कापत राहते. कारण तुमची सर्वात जास्त मेमरी किंवा ती एनर्जी असते ती केसांमध्ये असते. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळेच मला हे कळलंय की, जेव्हा डाव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा ध्यानाला बसा, पाणी प्या. मला या छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप फायदा होतो. त्यामुळे लोकांमध्ये बाहेर फिरताना पोट बिघडत नाही.”

पुढे प्राजक्ता म्हणाली की, “एकावेळेला तुम्ही चारच पदार्थ खा. म्हणजे पोटात मारामारी होतं नाही. चार पेक्षा अधिक पदार्थ असेल तर मग गडबड होते. यामुळे मी कितीही प्रवास केला तर माझी सिस्टिम जाग राहायला मदत होते. ते शिकल्यामुळे बाहेर वावरताना त्रास होतो. पण ते शिकल्यामुळे असं वावरणं सुसह्य देखील होतं.

सध्या केसाबाबतच्या या वक्तव्यावरून ती ट्रोल होताना दिसत आहे.
https://marathi.timesnownews.com/entertainment/actress-prajakta-mali-tro...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा मी कोल्हापूर ला जात असताना>>>>> खुप छान पोष्ट .. अगदिच भारी वाटलं त्यांचं एकंदरीत व्यक्तीत्व.

बरोबर.
इतक्या महान व्यक्तीचे नाव सांगायची लेखकाला लाज का वाटत असेल? बहुतेक लेखकाने कादंबरी लिहायला घेतली असेल आणि बोटं दुखायला लागल्यावर व्हॉटस अॅप ढकलगाडी म्हणून सोडून दिली असेल.

मुक्तपीठ मिस करतो. त्या वेळी उगीच ट्रोल केलं. आनंदाला मुकलो.
>>
हो ना
ज्यू ब्रह्मे, पो पा मदाम
अन् काही टिपीकल कमेंट्स : वा रे वा, सिंघम बघितलास का??? / हे एक आपण बरं केलं / चिंटू ला आंबा बर्फी आवडते का??? Etc.

कुणाच्याही इडी कारवाई वर कायद्याची चाड असणाऱ्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही पण जर राजकारणाचा पट आपल्याला हवा तसा वळविण्यासाठी इडी च्या होणाऱ्या सापत्न कारवायांबद्दल जर कुणी आवाज उठवत असेल तर तो रास्तच आहे. त्यात गल्लत तेच
स्वेच्छेने झालेले रंगांधळे करु शकतात जे जगात फक्त पांढरा नाहीतर काळा हेच दोन रंग अस्तित्वात आहेत हे दाखवायच्या स्वर्थी हेतूने प्रेरित झालेले आहेत. तुम्ही जर पांढरे नाही तर त्यांच्या तकलादू सिद्धतेनुसार तुम्ही फक्त आणि फक्त काळेच असू शकता.

मुक्तपीठ जोमात असल्याच्या काळात सकाळ मध्ये एक बातमी आली होती... कुठल्यातरी विमानाचे टायर लँडिंग करताना फुटले की कायतरी... त्याखाली एकाची प्रतिक्रिया होती - सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता.

सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता.
>>
Rofl Rofl Rofl Rofl

सकाळ नी या मुक्तपीठ प्रकाराचा इतका धसका घेतला की कॉमेंट्स सेक्शन च बंद करून टाकला...

सकाळ नी या मुक्तपीठ प्रकाराचा इतका धसका घेतला की कॉमेंट्स सेक्शन च बंद करून टाकला...

होना !
एखाद्या सोशल फंक्शन मध्ये एखाद्याने 'मी मिस्टर ब्रह्मे' अशी ओळख करून दिली तर 'लुनावाले ब्रह्मे आपणच का? ' असा प्रश्न आपसूक ओठावर येइल.

एखाद्या सोशल फंक्शन मध्ये एखाद्याने 'मी मिस्टर ब्रह्मे' अशी ओळख करून दिली तर 'लुनावाले ब्रह्मे आपणच का? ' असा प्रश्न आपसूक ओठावर येइल.

>> माझ्या मित्राचं आडनाव ब्रह्मे आहे. मीच त्याची ओळख खूप वेळा "हा xxx ब्रह्मे. पण याच्याकडे लुना नाहीये" अशी करून देते. बिचारा वैतागला असावा पण अजून मैत्री टिकून आहे Happy

प्राजक्ता माळीकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. जे देतात त्यांच्याकडे रिकामा वेळ जास्त असावा.

>>+१

Pages