ट्रोलिंग चांगलं कि वाईट हे ठरवणे अवघड आहे. पण समाजावर प्रभाव पाडू शकणार्या काही मंडळींची वक्तव्ये ट्रोल होण्यासाठीच असतात का असे वाटते. अशा वक्तव्यांसाठी हा धागा.
प्राजक्ता (माळी) म्हणाली “मी नेहमी बाहेरून खूप माणसांमधून घरी गेले तर मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करते. सातत्याने थोडे थोडे केस कापत राहते. कारण तुमची सर्वात जास्त मेमरी किंवा ती एनर्जी असते ती केसांमध्ये असते. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळेच मला हे कळलंय की, जेव्हा डाव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा ध्यानाला बसा, पाणी प्या. मला या छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप फायदा होतो. त्यामुळे लोकांमध्ये बाहेर फिरताना पोट बिघडत नाही.”
पुढे प्राजक्ता म्हणाली की, “एकावेळेला तुम्ही चारच पदार्थ खा. म्हणजे पोटात मारामारी होतं नाही. चार पेक्षा अधिक पदार्थ असेल तर मग गडबड होते. यामुळे मी कितीही प्रवास केला तर माझी सिस्टिम जाग राहायला मदत होते. ते शिकल्यामुळे बाहेर वावरताना त्रास होतो. पण ते शिकल्यामुळे असं वावरणं सुसह्य देखील होतं.
सध्या केसाबाबतच्या या वक्तव्यावरून ती ट्रोल होताना दिसत आहे.
https://marathi.timesnownews.com/entertainment/actress-prajakta-mali-tro...
She is no health expert. Woh
She is no health expert. Woh jawani gaye baad koi faltu business man milega toh ganimat hai. wah dada wah.
प्राजक्ता माळीकडे फार लक्ष
प्राजक्ता माळीकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. जे देतात त्यांच्याकडे रिकामा वेळ जास्त असावा.
^^^
^^^
मायबोली बंद पडेल अशाने
प्राजक्ता माळी हुषार आहे हा डौट खूप आधीपासून होता
प्रामाणिक वक्तव्ये!
प्रामाणिक वक्तव्ये!
(प्रामा + आणिक (अवग्रहाचा विलोम करून))
प्राजक्ता माळीकडे फार लक्ष
प्राजक्ता माळीकडे फार लक्ष द्यायची गरज नाही.
>>>
पण ती छान दिसते.
तुमची सर्वात जास्त मेमरी
तुमची सर्वात जास्त मेमरी किंवा ती एनर्जी असते ती केसांमध्ये असते.>> प्रामा ने अभ्यास वाढवला तर भीडे गुरुजींना टफ फाईट देऊ शकेल.
पण ती छान दिसते.+११
पण ती छान दिसते.+११
आणि गोड हसते.
प्राजक्ता माळीचा काही दोष
प्राजक्ता माळीचा काही दोष नाही. तिने हे सगळे एन्ग्रजीतुन फाडले असणार ज्याचा गुगलने केलेला मराठी अनुवाद कोणीतरी छापला असणार..
किंवा फुलवंतीसाठी परत परत प्रोमोशन करण्यासाठी तिने ही आयड्यआ काढली असणार. त्या निमित्ते लोक तिला गुगल तरी करतील.
लेखाचे पहिले वाक्य.
लेखाचे पहिले वाक्य.
ट्रोलिंग चांगलं कि वाईट हे ठरवणे अवघड आहे.
>>>>
हेच सध्या दुर्दैव आहे.
ट्रोलिंग वाईटच आहे हेच लोकांना कळत नाहीये.
साधनाजी, मराठीतच दिलीये तिने
साधनाजी, मराठीतच दिलीये तिने मुलाखत. तिचं इंग्रजी ऐकण्याचे सौभाग्य अद्याप मिळालेले नाही.
किल्ली > तिला बरेच जण प्राजु म्हणतात. पण ती तेव्हढी नाजूक तर वाटत नाही. कर्दळी, धोतरा, ब्रह्मकमळ ठीक होतं.
मानव आणि वीरू
प्रामाणिक हा शब्द प्राजक्ता माळी वरून आला असावा !
केसात मेमरी असेल तर अनुपम खेरला स्मृतीभ्रंश झाला असणार.
प्रा मा ने दिलेली मुलाखत
प्रा मा ने दिलेली मुलाखत तुम्ही पाहिलीत…… दिवाळीच्या सुट्टीचा सदुपयोग का??
राखी सावंत बाईंची सगळी
राखी सावंत बाईंची सगळी वक्तव्ये ह्यात फिट होण्यासारखी असतात.
ट्रोलिंग वाईटच आहे +१
ट्रोलिंग वाईटच आहे +१
इतरत्र ज्या वक्तव्यावरून कुणाचं तरी ट्रोलिंग सुरू आहे ते इथे दिलं तर इथेही ट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता बरीच आहे. ती व्यक्ती इथे वाचत असेल किंवा नसेल, पण ते चुकीचंच आहे.
प्रा मा ने दिलेली मुलाखत
प्रा मा ने दिलेली मुलाखत तुम्ही पाहिलीत >> ट्रोलिंग झाल्यावर मुलाखत दिली आहे हे कळतंच कि, जसं तुम्हाला आत्ता समजलं
फॉर्वर्डच्या धाग्यावर आपण जे
फॉर्वर्डच्या धाग्यावर आपण जे करतो तेच इथे करायचे. त्याला ट्रोलिंग म्हणतात का ?
फक्त तिथे निनावी फॉर्वर्डच टाकता येत असल्याने हा धागा आहे. जर प्रसिद्ध नसणार्या व्यक्तींचे ते ट्रोलिंग नसेल तर याला का ट्रोलिंग समजावे ?
ते सुद्धा वाचत असतीलच ना ?
प्रामाचे ट्रोलिंग वर्तमानपत्राच्या पोर्टल्सवर झालेले आहे. तिने ते वाचले नसेल, इथेच ती वाचणार असेल तर मग मान्यच.
निनावी फॉरवर्डची चेष्टा करणं
निनावी फॉरवर्डची चेष्टा करणं आणि एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणं यात फरक आहे.
कसा काय ? निनावी असले तरी
कसा काय ? निनावी असले तरी कुणी तरी लिहीलेलेच असते.
ती चेष्टा असेल तर इथे ट्रोलिंग कसे काय ? डोक्यावरून गेले लॉजिक.
मी इथे थांबतो.
एखादी व्यक्ती तिचे होणारे
एखादी व्यक्ती तिचे होणारे ट्रोलिंग वाचत आहे की नाही यावर ट्रोलिंग करणे योग्य की अयोग्य हे कसे ठरू शकते?
जे सेलेब्रेटी मायबोली वाचायला येणार नाहीत त्यांच्याबद्दल ईथे काहीही लिहू शकतो हे काय लॉजिक आहे?
त्या दिवशी सलमान धाग्यावर एका
त्या दिवशी सलमान धाग्यावर एका गॅगस्टरने त्याला धमकी दिली त्याला कोणीतरी गोड बातमी म्हटले तेव्हा त्यावर कायद्याची पाठराखण करायला गर्दी उसळली होती.
आता मात्र आपणच कोण काय म्हणाले ते चूक की बरोबर हे ठरवून त्याला ट्रोल करायचे की नाही याचा न्यायनिवाडा करू लागलोय
कुठला कायदा आपल्याला हा हक्क देतो हे जाणून घ्यायला आवडेल.
तुम्ही त्या गोड बातमीचे
तुम्ही त्या गोड बातमीचे समर्थन करत होता आणि आता ट्रोलिंग बद्दल चिंतातूर होताय ही जास्त मोठी हिपोक्रसी आहे.
असो.
(काड्या सारणे हा आरोप आता खरा वाटतो आहे.)
तुम्ही त्या गोड बातमीचे
तुम्ही त्या गोड बातमीचे समर्थन करत होता >>>> चूक आहे ते. माझ्या पोस्ट पुन्हा वाचा. सलमानचा गुन्हा पाहता त्याला या प्रकारे शिक्षा मिळावी असे एखाद्याला वाटू शकते असे मी म्हणालो होतो. मी त्या बातमील गोड म्हटले नव्हते की तसे व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली नव्हती. पण एखाद्या गुन्हेगाराला कायदा शिक्षा देण्यास असमर्थ ठरला तर जनतेची अशी प्रतिक्रिया येऊ शकते असे म्हटले होते.
उलट त्या गोड बातमी पोस्टचे जे ट्रोलिंग सुरू झाले होते तिथे त्यालाच मी विरोध केला होता. तात्विक द्रुष्ट्या ते देखील ट्रोलिंगलाच विरोध होते.
बघा पटले तर.. पूर्वग्रहदूषित विचार असेल तर सोडून द्या
लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश
लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सत्तेचे ट्रोलिंग करताना म्हटले होते "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?"
सायन्सला अजुन सर्व कुठे माहीत
सायन्सला अजुन सर्व कुठे माहीत आहे?
गोड बातमीच्या वेळी मस्त मजा
गोड बातमीच्या वेळी मस्त मजा आली होती.
जरी ट्रोलींग ही समुहाकडू होत
जरी ट्रोलींग ही समुहाकडू होत असली तरी त्यामागे एखाद्याला वैयक्तिकरीत्या जाणवलेला sarcasm चं असतो. तुम्ही जर सेलेब्रिटी असाल किंवा तुमचा सोशल प्रेझेंस असामान्य असेल तर तुमच्या nonsense टिपण्ण्यांवर सोमी वर लोक sarcastically व्यक्त होणारच. आता यात काही प्रमाणात बॅंडवॅगन ईफेक्टचा प्रभाव असेलही, काही प्रमाणात haters नी साधलेली वेळही असेल, पण त्यामुळे समुहाकडून वैयक्तिकरीत्या व्यक्त केला जाणारा sarcasm ही चुकीची गोष्ट आहे हे म्हणणे म्हणजे अगदीच बाळबोधपणा झाला. जेव्हा १०-१२ मित्र एकत्र जमलेले असतात आणि एखाद्याने नकळत देखील बाष्कळ विधान केले तर त्याच्यावर sarcastically कमेंट्स करुन त्याची ग्रुपमध्ये हुर्यो उडवली जाते. ट्रोलिंग हे सुध्दा काही प्रमाणात सारखंच असतं फक्त सोमीच्या सर्व समावेशकतेमुळे त्याची व्याप्ती वाढते, आणि तसेही हे प्रकार मुख्यत्वे चर्चेत रहाण्याचे आणि प्रसिद्धी मिळवण्याचे मार्ग असतात या लोकांसाठी, त्याला 'गोड बातमी' सारख्या मागणीवर कायद्याची चाड दाखवणाऱ्या प्रतिसादांशी तुलना करणे म्हणजे, दोन गोष्टींची तुलना करताना ती कशी आणि किती Far fetched नसावी याचाच नमूना आहे.
प्रामा ने मुक्तपीठात लिहायला
प्रामा ने मुक्तपीठात लिहायला हवे. एक से एक बढ के कॉमेंट्स आल्या असत्या. दुर्दैवाने ते बंद झालेय ..
फाविदडि मस्त पोस्ट.
फाविदडि मस्त पोस्ट.
मुक्तपीठ मिस करतो. त्या वेळी उगीच ट्रोल केलं. आनंदाला मुकलो.
गोड बातमी धागा पुन्हा वर
गोड बातमी धागा पुन्हा वर काढायला हवा.
तिथे कायद्याची चाड दाखवणाऱ्याना काही राजकीय आयडीजना जेव्हा ईडी कारवाईबाबत मग आपली मते पक्ष बघून का बदलतात असे विचारले तेव्हा धागाच थांबला होता
गोड बातमी धागा पुन्हा वर
गोड बातमी धागा पुन्हा वर काढायला हवा.
तिथे कायद्याची चाड दाखवणाऱ्याना काही राजकीय आयडीजना जेव्हा ईडी कारवाईबाबत मग आपली मते पक्ष बघून का बदलतात असे विचारले तेव्हा धागाच थांबला होता
काकाफॉ वर देता येत नाही कारण
काकाफॉ वर देता येत नाही कारण नावासहीत आला आहे.
एकदा मी कोल्हापूर ला जात असताना माझ्या बस मधे माझ्याच बाजूच्या सीट वर एक गृहस्थ येऊन बसले , इस्लामपूर ला जायचं होतं त्यांना , नव्वद टक्के पांढरे झालेल्या दाट कुरळ्या केसांचा छानसा भांग पाडला होता त्यांनी , व्हेजिटेबल ऑईल लावल्याने त्यांच्या केसांवर किंचित हिरवट छटा आली होती , मेन्टेन केलेल्या बॉडी वर इन केलेला साधा कॉटन चा पांढरा शर्ट , नीटनेटकी ब्राऊन कलर ची कौड्रा पँट , काळ्या जाड फ्रेम चा चष्मा ..…!
एकूणच ह्या वयातही देखणे म्हणावे असे स्मार्ट सिनियर सिटिझन वाटत होते ते , त्यांनी त्यांची ओळख करुन दिल्यावर माझ्या लक्षात आलं आपण ह्यांना पेपरमधे , टीव्ही वर बघितलंय कधीतरी , कुठल्यातरी मोठ्या मेकॅनिकल कंपनी चे मालक होते ते ..! मला आठवलं , मी नकळत बोलून गेलो ...
ओ माय गॉड , मी ऐकलंय तुमचं नाव , हाय्येस्ट इन्कमटॅक्स पेयर आहात आज तुम्ही पुण्यातले , राईट..? ठाऊक आहे मला ..!
पण तुम्ही ..? अन् ह्या बस मधे ..? त्यावर ते थोडे संकोचल्या सारखे झाले अन् म्हणे...
" हो , मला सर्व सामान्य माणसां सारखंच रहायला मनापासून आवडतं , बस स्टँड वरच्या गर्दीत आणि बस मधे माझा जास्त छान टाईम पास होतो , एअपोर्टवरच्या गर्दीत मला ती मजा येत नाही , बस मधली लोकं कशी आपल्यातली वाटतात मला ..!
ट्रेन चा प्रवास सुध्दा मला आवडतो , नाही असं नाही , पण तोही मी नॉन एसी बोगीतून करतो , खिडकीच्या बंद काचा , त्याही पडद्यांनी झाकलेल्या एसी बोगीत माझा जीव घुसमटतो..! खिडकीच्या काचा उघडून बाहेर प्लॅटफॉर्म वर चाललेली लोकांची धांदल बघत बसण्यात अजूनही रमतो मी ..! लोक कसं कसं आपलं आयुष्य जगत असतात हे तिथेच कळतं मला ..!
गप्पा मारायची आवड असावी बहुतेक साहेबांना , पूर्ण चार तासांच्या प्रवासात छान संवाद झाला आमच्यात , त्यातील त्यांनी त्यांच्या विषयी जे बरंच काही सांगितलं , जे मला भावलं त्याचा सारांश सांगतो ...!
" गरिबीत वाढलोय मी , मध्यमवर्गीयात साहजिकच मी जास्त रुळतो , आपले वाटतात ते , जास्त कंफर्टेबलही मी त्यांच्यातच असतो , मोकळं बोलायला मला आवडतं..!
****
मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मधल्या पार्ट्या मी अव्हॉइड करतो , मला तिथल्या त्या कृत्रिम फॉरमॅलिटीज जमतही नाहीत अन् आवडतही नाहीत , मी समोरच्याला टाळी देत मोठं तोंड उघडुन , पोटातून खदखदा हसणाऱ्यांपैकी आहे , मिटलेल्या ओठांनी छोटंसं औपचारिक स्माईल मी देऊ शकत नाही
*********
विनाकारण पैसा उधळणं मला आवडत नाही , ज्या गोष्टीं शिवाय अडत नाही त्या गोष्टी मी कधी घेत नाही , काटकसरी आहे मी , पण कंजूस नाही , लहान असल्या पासून सवयच पडली आहे काटकसरीची..! गरिबीत वाढल्याने पैशाची किंमत आहे मला त्यामुळे आता जरी मुबलक पैसा आहे गाठीशी तरी तो उगीच खर्च करणं मला जमत नाही ..!
****
दोघेच असतो आम्ही घरी , छोटासा सुंदर 2 BHK फ्लॅट आहे पुण्यातल्या कोथरूडात जिथून दिवसभर बाहेरची वर्दळ दिसते ..! अशा मार्केट जवळील गजबजलेल्या वस्तीतच खूप आवडतं आम्हाला रहायला , सतत समोर लोकांची लगबग दिसायला हवी , ती दिसत राहिली की अंगात आळस भरत नाही , काम करत राहण्याची स्फूर्ती मिळते , उत्साह वाटतो..!
****
दोन मुलं होती आम्हाला , स्कूलबस च्या ॲक्सीडेंट मधे दोघेही गेलीत , कुठेतरी दूर शांत निवांत जागी जाऊन रहावं असं वाटतंच नाही आता आम्हा दोघांनाही , शांततेत करमत नाही , मन उदास होतं..!
****
माझ्याकडे चार चार गाड्या नाहीत , माझे कामगार म्हणतात साहेब आता घ्याल तर एक छान मोठी गाडी घ्या , मी म्हणतो अरे आम्ही दोघेच आहोत , मोठी गाडी घेऊन काय करू..? उलट ह्या पेक्षा छोटी मिळाली तर ती घेणं पसंत करीन मी , पुण्याचा ट्रॅफिक बघितला ना..? इथे गाडी जितकी छोटी तितकी बरी , सहज पार्क करता येईल अशी...!
****
एक अल्टो च आहे माझ्याकडे , आज ही मी ड्रायव्हर ला घेऊन माझ्या अल्टो ने त्याच्या बाजूला बसून एकटा जाऊ शकलो असतो पण त्याला बोलण्यात गुंतवण बरोबर नाही , अन् दूरच्या प्रवासात चार तास शांत बसणं मला जमणार नाही , सगळ्यां बरोबर सर्वसामान्यां सारखंच आयुष्य जगायला आवडतं मला ..!
****
गाड्यावर वडापाव खायला आवडतो , टपरी वरचा कटिंग चहा प्यायला आवडतो पण त्या ग्रीन टी च्या नादी मी लागत नाही ..!
****
मला साधी राहणी आवडते हो , तुम्हाला सांगतो माझ्या कपाटात दोन चार शर्ट पँटस् जरी प्रेस केलेल्या दिसल्या तरी मला पुरेशा वाटतात , टाय सूट नाही माझ्याकडे , नाही आवडत घालायला , उगीच आणून काय करायचा , माझ्या स्वतः साठी कपड्यांच्या दुकानात मी कधी गेलो नाही , कोणाबरोबर गेलोही तरी आवडलं म्हणून कुठलं एखादं शर्ट घेतलं असं कधी झालं नाही , एकतर मला गरजही नाही आणि आवडही नाही..!
****
शूज , घड्याळं , जॅकेट्स , स्वेटर्स , मोबाईल्स आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी वापरतोय त्या खराब झाल्याशिवाय मी दुसऱ्या घेत नाही कधी ..!
****
पुण्यात एकटाच कुठे जाणार असलो तर ओला ऑटोच मी जास्त प्रिफर करतो , ऑटो ने ट्रॅफिक मधून लवकर जाता येतं शिवाय डोक्याला पार्किंग ची चिंता रहात नाही , गचके बसतात पण ठीक आहे , त्याचीही सवय हवी , मला माझ्या जीवाचे नसते लाड करून घ्यायला आवडत नाहीत , थोड्या अंतरा साठी मी कार मधे एसी लावत नाही , लहानपणी भरपूर उन्हाळे अंगावर घेतले आहेत मी , उकाडा सहन करायची सवय मोडू द्यायची नाहीये मला..!
****
पाचव्या मजल्या पर्यंत कोणाकडे जायचे असेल तर मी लिफ्ट वापरत नाही , जिन्यानी चढून जातो , ते म्हणतात अरे एवढं धापा टाकत येण्याची काय गरज होती ..? लिफ्ट होती ना , मी म्हणतो सवय आहे हो मला जिने चढायची आणि त्या निमित्ताने गुडग्यांना व्यायाम होतो ना माझ्या..!
****
अजब वाटत होतं मला हे सगळं ऐकतांना , लोकं पैशाच्या मागे का लागतात तर त्यांचे शान शौक पुरे करून घ्यायला , पुढचं आयुष्य ऐशोआरामात घालवायला , मौज लुटत जगायला , स्वतः च्या श्रीमंती चे प्रदर्शन करत नकळत चेहऱ्यावर श्रीमंतीचा अहंकार ओढून घ्यायला पण हे एकदमच वेगळे वाटले , हे पैशाच्या मागे नाहीत , म्हणूनच कदाचित पैसा ह्यांच्या मागे येत असावा..! एव्हढा पैसा असून अगदी साधे , निगर्वी , चार चौघांसारखे , जनरल पब्लिक मधे वावरणारे , रमणारे , भरपूर गप्पा मारणारे असे आहेत ते ..!
****
विचारलं सहज काय काम काढलं होतं इस्लामपूरला ..?
" काही नाही , इथे पण माझ्या पुण्यातल्या फॅक्टरी चं एक छोटं युनिट आहे ज्यात पाचशे कामगार आहेत , मी कामगारांना दिवाळीची भेट म्हणून दर वर्षी प्रत्येकी एक लाखाचा चेक देत असतो , तेवढ्यासाठी मी नं येता हे काम मी माझ्या स्टाफला सांगूनही करु शकलो असतो पण ते मला माझ्या हातानीच करायचं असतं , त्यांच्या हाती चेक सोपवतांना त्या बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलून येणारी खुषी मला बघायची असते , बस ती खुषी बघून त्या बदल्यात मला जे खूपसारे समाधान मिळते ते घेऊन मी परत जातो , माझ्यासाठी त्यांच्याकडून मिळालेली हीच सगळ्यात मोठी गिफ्ट असते..! "
इस्लामपूर दहा मिंटांवर आलं होतं , त्यांनी खिडकीतून हात बाहेर काढत मला साधारण दोन फर्लांगावर दिसणारी त्यांची फॅक्टरी दाखवली , पुढे जवळच पेठ नाक्यावर बस थांबली तेंव्हा ते उठले , खांद्यावर सॅक अडकवली , माझ्याशी हात मिळवून आमची पुण्याची फॅक्टरी बघायला या नक्की म्हणून निमंत्रण देऊन ते उतरले..! दिसेपर्यंत झपाझप चालत चाललेले ते मी पाठमोरे बघत होतो..!
स्वतः काटकसरीने राहून आपल्या गरीब कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी बस ने येऊन त्यांना तब्बल पाच करोड सारखी मोठी रक्कम सहज वाटून निघून जाणारे असेही लोक असतात हे मला माहीत नव्हतं ..!
एकतर ह्यासाठी मन फार मोठं असावं लागत किंवा मोह कशाचाच अजिबात नसावा लागतो..!
एका असामान्य व्यक्तीची योगायोगाने भेट झाल्याने फार छान वाटले..!
त्यांच्या बोलण्याने मी इतका प्रभावित झालो होतो की प्रवासातले माझे चार तास कसे गेले कळलं पण नाही..!
इस्लामपुर हून पुढे कोल्हापूर एक तास मात्र फार कंटाळवाणा गेला , अजून खूप ऐकुन घ्यायचं होतं मला त्यांच्याकडून , फार मिस केलं मी त्यांना ..!
~डॉ संजय जहागीरदार
Pages