भयंकर, अस्वस्थ करणारे

Submitted by रघू आचार्य on 15 October, 2024 - 09:49

हा व्हिडीओ डिस्टर्बिंग वाटू शकेल. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर पहा.
https://www.youtube.com/watch?v=GYnbUiokKM8

आताच अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडीयन फेस्टीवल झाला. या दिवसासाठी अ‍ॅमेझॉन वर्षभर तयारी करत असते. फ्लिपकार्ट आणि अन्य ऑनलाईन स्टोअर्स सुद्धा आपापले असे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करत असतात. डेकॅथलॉन हा एक ब्रॅण्ड सुद्धा यासाठी प्रसिद्ध आहे. यांच्याकडे क्लिअरन्स सेल सुद्धा असतो. या उत्सवा दरम्यान मोठ मोठे डिस्काउंट्स दिले जातात. त्यामुळे या चार ते पाच दिवसांसाठी कधी कधी वाढीव चार दिवसांसाठी खूप मोठा ताण या स्टोअर्सच्या कामगारांवर येतो.

वर्षभरात जेव्हढा सेल होत नाही तेव्हढा या चार दिवसात होतो. म्हणजेच ३६० दिवसाचे काम चार दिवसात !
मनुष्याच्या क्षमतेच्या पलिकडे हा लोड असतो. अ‍ॅमेझॉनवर असा एक यूट्यूब वर व्हिडीओ उपलब्ध होता. तो बहुधा कंपनीने डिलीट करायला लावला असावा. कारण हे शोषण आहे. आठ तास काम हे शास्त्रशुद्ध पाहणीनंतर, अनेक अहवालानंतर संमत झालेले आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नावाच्या विषयात एखादा मनुष्य किती काम करू शकतो, दोन हातांनी किती काम करू शकतो याची पाहणी कशी करायची आणि काम कसे नेमून द्यावे हे शिकवत. पुढे त्यात मानवी मर्यादा आल्या. निरनिराळ्या हॅण्डबुक्स मधून मानवी शरीराची क्षमता सांगितलेली असे.

आता कम्युनिस्ट चीननेच बारा तास रोबोपेक्षाही भयानक रितीने कामगारांना राबवून घ्यायला सुरूवात केली आहे. यामुळे स्वस्तात उत्पादने देणे शक्य होते. चीनच्या चलनाचा दर, उपलब्ध असलेले मनुष्यबळ यामुळे लेबर स्वस्तात उपलब्ध आहे. त्यांच्या शोषणाच्या कहाण्या पोलादी पडद्याआडच रहात असत. दारिद्र्य आहे म्हणून त्याचा फायदा घेणे आहे हे. यालाच शोषण म्हणतात. काही भलावणकार आम्ही रोजगारनिर्मिती करतो असे म्हणतात. पण श्रम तर लागणारच आहेत. मोठी लोकसंख्या रोजगारापासून वंचित ठेवणे हे (रक्तरंजीत?) क्रांतीला निमंत्रण असते.

भारतातही आता बारा तासांचे काम सुरू झाले आहे. ते ही सकाळी जी क्षमता असेल त्याच क्षमतेने पूर्ण बारा तास काम करावे या अपेक्षेने.
हे सगळं कुठे जाणार आहे ? हे सगळं भयंकर आहे. रोबो हा यावरचा उपाय आणखी भयानक आहे. भीक नको पण कुत्रं आवर अशा पद्धतीने रोबो आता सगळं काम करू लागलेले आहेत.

खरंच आपण सोपी लाईफस्टाईल सोडून कुठे चाललो आहोत. आपल्या मुलांना असे राबावे लागले तर ? काही सांगता येत नाही.

टीप : मध्यंतरी सातत्याने मानवी मूल्यांबाबत मांडणी करणार्‍या एका महाभागाने अशाच एका विषयात त्याच्या पक्षावर ठपका आल्यावर "मग काय हाताने टायपिंग करायचे का ?" असा प्रश्न विचारला होता. एका वाक्यात हवा काढायची ही युक्ती यांना पक्षाच्या आयटी सेल मधे शिकवली जाते. टूलकीट येते. त्यामुळे अ असो कि ब, या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी या विषयावर मत मांडू नये ही हात जोडून कळकळीची विनंती. तुम्हाला एकट्यालाच मतस्वातंत्र्य आहे असा अर्थ सोशल मीडीयावर तुम्ही काढलेला आहे. इतरांना लेबले लावून त्यांची मतं मोडीत काढणे, कुणी राष्ट्रद्रोही ठरवणे, कुणी धर्मद्रोही ठरवणे आणि आमच्या सोबत नसाल तर खलप्रवृत्तीसोबत तुम्ही आहात असा दम भरून आपले घोडे दामटणे यामुळे चर्चा करणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे ज्या सत्राशेसाठ विषयांची आपण वासलात . विल्हेवाट लावत असता, त्याच धाग्यावर सुखाने नांदावे ही विनंती.
एकही प्रतिसाद मिळाला नाही तरी चालेल. पण उगाच पक्षीय पातळीवर विषय भरकटण्यापेक्षा ते लाखपटीने परवडलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं, मग कायद्यात काय बदल करावा अशी अपेक्षा आहे तुमची?

@विक्रमसिंह , @माबो वाचक
>> अतिमार्मिक, प्रतिसादाशी सहमत आहे.

मायबोलीवरच्या लोकांनी तुमच्या इतके विद्वान होण्यासाठी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे ?
या प्रश्नाचे जे उत्तर असेल तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर.

जर सरकारांनी शोषण कमी करण्यासाठी कडक कामगार कायदे आणले तर उद्योग इतरत्र निघून जातील. मग कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. >> हा कायदा अस्तित्वात असताना जे जे उद्योग भारतात आले त्यातले किती निघून गेले याचा विदा देऊ शकाल काय ? एलॉन मस्कला टेस्ला कारच्या विक्रीसाठी अटी घातल्या होत्या, त्या मान्य नसल्याने त्याने टेस्ला भारतात न विकण्याचा निर्णय का फिरवला ? चीन मधे उत्पादन करण्याऐवजी भारतात उत्पादन करण्याची अट मान्य का केली ? तो गेला का भारत सोडून ?

याशिवाय इंटरनेट च्या धंद्यातल्या सर्व अटी मान्य केल्या.

मुद्दा हा आहे कि व्यापाराच्या अटी मान्य केल्या तर कामगार कायद्याच्या का नाहीत ? युरोपात यातल्या अटी नाहीत का ?
चीन मधे उत्पादन केल्यावर त्या देशात माल विकता येत नाही हे माहिती असूनही तिथे गुंतवणूक करतातच. मग भारताला अटी घालणे का अडचणीचे असेल ?

मला वाटतं हे विषयांतर थांबवूयात. हे कन्सेप्ट्स मायबोलीवरच्या कोणत्याही चर्चेत सापडतील. पुन्हा मागे जाऊन तेच मुद्दे काढून त्याच त्या चर्चा करण्यात राम आहे असे वाटत असेल तर राहीलं

Stop promoting work-life balance; Work 14 hours daily from Mon to Sat, says Narayana Murthy again >> कुछ भी..
कुछ तो लोग कहेंगे...
इथे वर्क वीक चार दिवसांच्या करण्याच्या चर्चा चालू आहेत..

https://indianexpress.com/article/lifestyle/workplace/larsen-toubro-chai...
Subrahmanyan expressed frustration about not being able to get employees to work seven days a week, questioning, “What do you do sitting at home? How long can you stare at your wife? Come on get to the office and start working.”

“If I can make you work on Sundays, I’ll be happier. Because I work on Sundays also,” he added.

भरत सर.
आता हा कोण सुभ्रमण्याम?
हे लोक आमच्या राविवारावर का उठले?
एक धुंडो तो हजार मिलते है.

स्वतःची महत्वाकांक्षा म्हणून कुणाला आठवड्याचे ९० काय १०० तास काम करायचे असले तरी खुशाल करावे पण एंप्लॉयीजना वेठीला धरणे गैर!
>>What do you do sitting at home? How long can you stare at your wife? Come on get to the office and start working.”>> सिरीयसली? हे तर फारचे डेरोगेटरी रिमार्क्स झाले. चांगले लिडर दुर्मिळ असतात हेच खरे!

>>>>आता हा कोण सुभ्रमण्याम?
हे लोक आमच्या राविवारावर का उठले?
एक धुंडो तो हजार मिलते है.

आणि

>>>>कौन कंबखत अपने ही वाईफ को घुरने छुट्टी लेता है..

दोन्ही कमेंटस हहपुवा Happy

>>>>>>>>>>How long can you stare at your wife?
काम फक्त पुरुष करतात का? सेक्सिस्ट कुठले Sad

sexist
‍ˈसे᠎̮क्‌सिस्‍ट्‌
adjective
लिंगभेदवादी
..
हे आम्हा मराठी मिडीयम पोरांना समजेपर्यंत बरेच उलट सुलट अर्थ काढून झाले असतात Happy

अमितव
आभार. समझनेवाला कोई तो है!

To be fair, ते म्हणाले तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ टक लावून बघू शकाल? बायका त्यांच्या नवर्‍यांकडे किती वेळ बघत बसू शकतात?
पण प्रसारमाध्यमांनी त्यातले फक्त नवर्‍याबद्दलचे उद्गार उचलून त्याचा मथळा केला. मलीही हे काल त्या बातमीचा दुवा इथे डकवल्यानंतर कळले.

आता दुसरा मुद्दा - त्यांना कर्मचार्‍यांनी रविवारी कामाला यायला हवंय. आठवड्याला ९० तास भरायला हवेत. भारतात सध्या (हा सध्या काही तिमाह्या ते काही वर्षे) कंपन्यांचे रेव्हेन्यु संथगतीने वाढत आहेत. त्याचे कारण उत्पादनांना मागणी वाढत नाही. अशा वेळी कर्मचार्‍यांनी जास्त काम करून काय होईल? कंपन्या उत्पादन क्षमता वाढवत नाहीत, आणखी गुंतवणूक करत नाहीत ही अर्थमंत्र्यांची तक्रार आहे.
दुसरीकडे देशात बेकारी उच्चांक गाठते आहे. अशा वेळी आहेत त्याच कर्मचार्‍यांकडून अधिक तास कामाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा अधिक कर्मचारी नेमण्यात काय समस्या आहे? कर्मचारी घेतला की त्याला निवृत्तीपर्यंत काढता येत नाही, हे दिवस तर इतिहासजमा झालेत.

माझ्या नोकरीत मीही वर्षातले सगळेच नाही, तरी बरेच दिवस दिवसाचे बारा तास आणि आठवड्याचे सहा , कधी सात तास ऑफिसात जाऊन काम केलं आहे. कधी घरी आणूनही केलं आहे. तेवढं काम होतं. ते प्रत्येक वेळी वाटून घेण्यासारखं नव्हतं किंवा वाटून घ्यायला , घेण्याजोगा स्टाफ
हाताखाली नव्हता. जो होता , जेव्हा होता, तेव्हा ती मंडळीही माझ्याच - कौटुंबिक जबाबदार्‍या फारशा नाहीतवयोगटातली असल्याने - त्यांनाही एवढा वेळ देणं शक्य होई. स्त्री कर्मचार्‍यांना ऑफिसात उशिरापर्यंत थांबवले जात नसे.
पण या सगळ्यात बरेचदा नातेवाईकांच्या भेटीगाठी कमी होत. माझ्या पुढच्या पिढीतल्या लोकांची स्थिती सध्या अशीच दिसते आहे. मी नाही, पण माझ्या पिढीतले ज्येष्ठ - हल्ली कोणी कोणाकडे येत जात नाही अशी तक्रार करतत.

आठवड्याला ७०-९० तास कामाच्या ठिकाणी + प्रवासात जाणारा वेळ यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यावर होणारा परिणाम या मुद्द्याकडे तर दुर्लक्ष करता येणारच नाही.
साडेनऊ ते सव्वापाच आणि सोमवार ते शुक्रवार या पलीकडे केलेल्या कामासाठी कर्मचार्‍यांना ओव्हरटाइम असे. पण ऑफिसर्सना फक्त tea & snacks allownace मिळत असे.

कामाचे तास कमी करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी लढे दिले आहेत. म्हणजे एका प्रकारे ही साम्यवादी - समाजवादी संकल्पना आहे. आता नवी भांडवलशाही आपल्याला पुन्हा वसाहतवादाच्या काळातल्या शोषणाकडे घेऊन जाते आहे का?

<<. महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी करणाऱ्या महिलांबद्दल न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख आले होते. हंगामात कामात अडथळा येऊ नये म्हणून कंत्राटदार त्यांना गर्भाशय काढून टाकण्याची सक्ती करतात. शस्त्रक्रियेनंतर त्यांना आराम वा वैद्यकीय मदत मिळत नाही.
कोक/पेप्सीसारख्या त्यांच्या ‘ग्राहक’ कंपन्या यासंदर्भात कानांवर हात ठेवतात. >>

------ जास्त काम करवून घेण्याच्या आणि कामाच्या दिवसांतून कमी सुटी द्यावी लागावी अशा उद्देशाने एक जरी hysterectomy ची घटना घडत असेल तर भयंकर वाईट आणि तेव्हढेच चिड आणणारे आहे. त्यांना याची पूर्व कल्पना, तोटे- फायदे दिली जात असेल का?

https://www.newindianexpress.com/nation/2019/Aug/29/over-13000-female-su...

काम करुन पैसे कमावणे हा आयुष्याचा एक भाग आहे. आयुष्याचा मेन फोकस वेगळा आहे त्यात कला क्रिडा संगित लेखन वाचन भटकंती छंद इत्यादी भरपुर गोष्टी येतात. ऑफिसात काम करायचे ते ह्या मेन फोकसाचा आनंद मिळवायला जे पैसे लागतात ते कमवायला. ऑफिसात काम करुन एम्प्लॉयरला बिलियनेर बनवण्यासाठी एम्प्लोयीचा जन्म झालेला नाही.

हे कोणीतरी सांगा त्या भ्रमिष्टाला… Happy

कोण हा रविवारी काम करायला सांगतोय? या असल्या माणसांमुळे सोमवार ते शुक्रवार मी काम नाही करत.>>>> ही कॉमेंट वाचून ख्खीक्क करून हसू आले..

What do you do sitting at home? How long can you stare>>> तुला हवे ते तू कर ना. लोकांनी सुट्टीच्या दिवशी काय करायला हवे हे सांगणारा तू कोण टीक्कोजीराव? Angry हे असले लोक जन्माला येतात ना म्हणुनच नव नविन शिव्यांचा ही जन्म होत असावा

साधना बँग ऑन!!!
सदगुरू म्हणतात स्वतः की आयुष्यात कामाचे तास, आरामाचे, अध्ययना चे वगैरे असे तास ठरलेले असावे. कामातच आयुष्य संपऊ नये

लार्सन & टुब्रोने आपल्या चेअरमनच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राष्ट्रनिर्माणाचा मुलामा दिला आहे.

त्या चेअरमन साहेबांना गेल्या वर्षी कंपनीने ५१ कोटी रुपये इतकी बिदागी दिली. आधीच्या वर्षीच्या बिदागीत ४३% वाढ. कंपनीचा टर्नोव्हर २१% नी तर करपश्चात नफा २५% नी वाढला.

कंपनीचे महत्त्वाचे कर्मचारी सोडले तर सरासरी पगार पुरुष ९.७७ लाख स्त्रिया ६.७७ लाख ( वार्षिक).
म्हणजे चेअरमन साहेब सामान्य कर्मचार्‍याच्या पन्नास पट मोबदला घेतात.

>>>>>> कंत्राटदार त्यांना गर्भाशय काढून टाकण्याची सक्ती करतात.
अतिशय डिस्टर्बिंग आहे हे.

>>> अतिशय डिस्टर्बिंग आहे हे.

हे वरच्या कोणत्या प्रतिसादात आहे हे वाचले नाही. मात्र, बीड ऊसतोडणी कामगारांच्या बायकांच्या बाबतीत हे कॉमन आहे. त्या मुलींचे लवकर लग्न करून पंधरा, सोळाव्या वर्षापर्यंत त्यांना दोन मुले होऊ देतात व नंतर गर्भाशय काढून टाकतात. पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी यायचे असेल तर 'कोयत्याची मूठ' हा हिशोब असतो. नवरा बायको दोघेही कामावर असण्याचा नियम असतो. बायकोला पाच दिवसांची सुट्टी घेता येऊ नये म्हणून हे सगळे केले जाते.

माझ्या जुन्या कंपनीतील सिईओ पण म्हणायचे की मी ७ तही दिवस रात्री १२ पर्यंत काम करतो. त्यांची बायकोही तिथेच मोठ्या पदावर. दोघे मिळुन महिन्याला टॅक्स कापुन ५०-६० लाख आरामात घरी नेत होते. बाकी आम्हा मजुरांना इन्क्रीमेंट्स असायची ३ -६ -९ या टक्क्यात.. यापेक्षा जास्त नाही. काहीना १ टक्काही मिळालेले होते. हे मोठे लोक तुलना करताना पगाराची तुलना का करत नाहीत.

हे कोणीतरी बोलायला हवेच होते:

https://www.businesstoday.in/latest/corporate/story/99-of-indians-wont-s...

माझ्या मते हा पगाराचा विषय नसून कीड लागलेल्या मानसिकतेचा आहे.... मग १०० लाख सीटीसी वाला असो की १० लाखवाला की १ लाख वाला, आपले व्यक्तिमत्त्व व वैयक्तिक आयुष्य जगताना नोकरी व ते आयुष्य यांचा समतोल राखायला हवा. मी एका प्रख्यात बहु राष्ट्रीय कंपनीचा महाव्यवस्थापक म्हणून रु जु झाल्यावर मी पाहिले की माझ्या आधीच्या महाव्यवस्थापकाने रात्री ८ ते ९ पर्यंत थांबून काम (? ) करणे की नुसतेच थांबणे खूप ग्लोरिफाय केले होते.... थां बण्याची कारणे ट्रिव्हियल्/किरकोळ होती... मी नियम केला की ६ नंतर ( ५.३० ला कारखाना बंद व्हायचा) कोणीही थांबले तर ते त्यांच्या वार्षिक अप्रेजल मध्ये त्यां च्या विरुध्द जाईल.... के आर ए बदलली नाही सर्वांनी तो बदल स्वीकारला अन आज ही तो प्रघात इन्स्टिट्युशनलाइ़झ झाला आहे...
सो........ इट इज द टॉप हू मेक इट ह्~एपन

माझ्या मते हा पगाराचा विषय नसून कीड लागलेल्या मानसिकतेचा आहे...

सो........ इट इज द टॉप हू मेक इट हॅपन >>

प्रत्येक वाक्याशी १००% सहमत आहे.

Pages