Submitted by मुग्धमानसी on 13 October, 2024 - 12:44
मीही रडलो आहे पुस्तक वाचून
पण आता आठवत नाही... की कुठलं
बहुदा तो कुठलासा वृत्तांत होता
पात्र ज्यात अनेको होती..
चारी बाजूंनी भिरभिरत यायची
वाचत जायचो अन् रडत रहायचो मी.
क्षणभरात साहजिक समजलं की वाचतो काही वेगळं
रडतो काही वेगळं...
दोन्ही जुळून गेलंय.
वाचणं पुस्तकाचं
अन् रडणं माझ्या व्यक्तित्त्वाचं!
पण मी जे वाचलं होतं त्यावर नव्हतो रडलो
वाचण्याने तर मला रडण्याची ताकत दिली!
मी दु:ख मिळवलं होतं बाहेर... पुस्तकी जीवनाच्या...
वाचत जायचो अन् रडत जायचो मी!
जे वाचतो त्यावर मी रडत नाही
पुस्तकी जीवनाच्या बाहेर गवसतं माझ्या रडायचं कारण
पण पुस्तक... रडणं शक्य करतं!
------
रघुवीर सहाय यांच्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद
-मुग्धमानसी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'रडण्याची शक्यता निर्माण करतं
'रडण्याची शक्यता निर्माण करतं' - असे मला वाटते
=====
सुंदर भावानुवाद
ना! पुस्तक रडणं शक्य करतं!
ना!
पुस्तक रडणं शक्य करतं!
छान!
छान!
''किताब रोना संभव बनाती है'
''किताब रोना संभव बनाती है'
छानच
छानच