चंदेरी! - भाग ३ - द रायझिंग स्टार!

Submitted by अज्ञातवासी on 4 October, 2024 - 13:00

याआधीचे भाग

भाग - २
https://www.maayboli.com/node/85818

भाग - १
https://www.maayboli.com/node/85814

.'वेलकम टू फिल्मशो अवॉर्डस... पॉवरड बाय...'
...ती अनाऊंस करत होती. पूर्ण हॉल खचाखच भरलेला होता.
"द मोस्ट प्रेस्टीजियस अवॉर्ड ऑफ धीस इयर. बेस्ट एक्टर... अँड नॉमिनिज आर..."
ती नावे वाचू लागली.
"अँड द विनर इज..." तिने मोठा श्वास घेतला.
"...मिहिर पाटील."
टाळ्यांचा कडकडाट झाला.
एक काळा कुडता आणि पांढरा पायजमा घातलेला माणूस उठला. खुरटी पांढरी दाढी व जाड काळ्या काड्यांचा चष्मा त्याच्या अवतारात अजून भर घालत होता.
तो हळूहळू चालत स्टेजवर गेला. त्याने अवॉर्ड घेतलं व तो पोडियमजवळ उभा राहिला.
"सॉरी टू डीसअपॉइंट यू ऑल, बट आय एम नॉट मिहिर पाटील. जरी मी त्याच्यापेक्षा जास्त हँडसम असलो तरीही."
उपस्थितात हशा पिकला.
"हो. तो वेळेवर फक्त माझ्या सेटवर असतो. बाकी कुठेही नाही. आणि माझ्यासाठी तेच भरपूर आहे. नाहीतर आदित्य करिकालन साकारला गेला नसता. सो थॅन्क्स फॉर धिस अवॉर्ड, फ्रॉम हिज साईड."
त्याने अवॉर्ड उचललं. तसाच तो शांतपणे खाली चालत गेला.
एका रंगीत रात्रीची सांगता झाली.
*****
"वुई वन..." ती ओरडली. "चीयर्स गाईज."
"दहा करोड फुकलेत तू..." एकजण म्हणाला.
"मिहिर पाटील इज बेस्ट. हेन्स प्रूवड."
"गरज होती?"
"होती. आता बघ उद्यापासून युट्यूबवर कसा धुमाकूळ घालते मी."
"आदिती यू आर नट."
"आय एम क्रेझी फॉर माय एम्प्लॉयर, यू नो."
"अच्छा... आणि तुझा एम्प्लॉयर किती मुलींसाठी क्रेझी आहे?"
"काश ऐसा होता. एक फेक तरी लव स्टोरी करावी त्याने, म्हणजे मी युट्यूब, इंस्टाचे रिल्स भरायला मोकळी."
"तू त्याला एक स्वीट बॉय म्हणून प्रेजेंट करतेय, लाँग टर्मसाठी चांगलं नाहीये हे." एकजण म्हणाला.
"त्याची पोझिशनिंगच ती आहे. साऊथच्या मार्केटसाठी बेस्ट पॅकेज आहे आणि फ्रँकली सांगू?"
"हा."
"ही इज स्वीट बॉय. खरोखरच."
"लव्हली आदिती. त्याच्या प्रेमात आहेस तू."
"हो. आहेच मी." ती हसली.
तेवढ्यात तिचा फोन वाजला.
"गप्प बसा सगळे." तिने आवाज दिला. "हॅलो सर."
"काँग्राच्युलेशंस..." तिकडून एक अतिशय शांत, आश्वासक आवाज आला.
"थॅन्क्स सर. पण मी अजूनही म्हणेन की आपण ही डील स्वस्तात करू शकलो असतो. आय मीन इट वॉज जस्ट अ डान्स परफॉर्मन्स..."
"...सॉरी. दॅटस नॉट इन माय बुक्स." तिकडून आवाज आला. "एन्जॉय द पार्टी." आणि फोन कट झाला.
ती हसली.
"गाईज. एन्जॉय द पार्टी." ती ओरडली...
आणि एकच कल्ला सुरू झाला.
*****
वांद्र्यामधील एका आलिशान बंगल्यात चार पाच लोक बसलेले होते.
समोरच एका हसऱ्या माणसाचं भलंमोठं चित्र लावलेलं होतं. गालावर खळी उठून दिसावी याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता.
आणि तेवढ्यात तो आला, सर्वजण उभे राहिले.
"अरे बैठो बैठो, मेरे लिये इतना करने की जरुरत नहीं है. हू कौन मैं?"
"सर कैसी बात कर रहे हो. सुपरस्टार हो आप."
"तो सालो, एक अवॉर्ड नहीं खरिद सके?" तो ओरडला.
शांतता पसरली.
"बात ऐसी नही थी सर. आपकी मुव्हीज या तो कॉमेडी थी, या फिर रोमँटिक."
"तो?" त्याने नजर रोखली.
"बवाल हो जाता, अगर खरीदते तो."
"अब क्या वाहवाई हो रही है? वो मिस्त्री कल क्या करेगा पता है ना?"
"हा सर."
"अवार्ड किसी को भी मिले, उसे नहीं मिलना चाहिए था. वो कपूर साब का लडका था, उसने कुछ नहीं किया क्या?"
"किया ना. स्टेटमेंट दिया."
"क्या?"
"आय एम हॅप्पी फॉर माय फ्रेंड."
"साला. खुदकी फिल्म फ्लॉप जा रही है, और...चलो निकलो. रहमान भाई. आप रुकिये..."
रहमान थांबला.
"मिस्त्री से बात किजिये." तो म्हणाला.
"सुलतान..." रहमान म्हणाला.
"क्या?"
"मिस्त्री को हम खरीद नहीं सकते. तुम्हारी वो स्टेटमेंट अभी बहोत ज्यादा युज होगी. क्या बोला था तुमने?"
"आय एम लास्ट सुपरस्टार..." तो उद्गारला.
*****
'द रायजिंग स्टार.'
फिल्मलूक युट्यूब चॅनलचं थंबनेलच ते होतं, आणि एक फोटो होता.
मिहिरचा...
"आज मी खुश आहे." मिस्त्री हसत होता.
"जरा जास्तच खुश. कारण इतक्या दिवसांची चिंता आज मिटलीय...
कुणीतरी म्हटलं होतं, आय एम लास्ट सुपरस्टार. वेल. कमीत कमी आता आम्हाला एक स्टार तरी मिळालाय...
आणि तो फक्त हिंदी बेल्टमध्ये नाहीच, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचा स्टार आहे.
मिहिर पाटील."
मिस्त्रीने बॉम्ब टाकला होता.
*****
"त्यादिवशी मानसी अनेक गणिते बदलली होती. पाच चित्रपट जुना असलेला मिहिर आता टॉपच्या पोजिशनचा दावेदार झाला होता.
आदित्य, महावीर, न्यू मुन, लव स्टोरी एटी टू आणि बाजीराव.
आदित्य आणि महावीर तर ऑल इंडिया ब्लॉकबस्टर झाले होते...
...आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, संपूर्ण भारत महावीर भाग २ ची वाट बघत होता. इतकी प्रचंड क्रेझ असणारा चित्रपट तेव्हा कुठलाही नव्हता..."
"सुलतान कोण होता?" तिने प्रश्न विचारला.
"त्याकाळचा टॉपचा सुपरस्टार... बॉलिवूडचा सुलतान...
ज्याचं त्याकाळी इथे राज्य होतं... टॉपचे प्रोड्युसर आणि वितरक त्याचे अतिशय जवळचे होते. त्याच्यासोबतच्या स्पर्धेत आजपर्यंत कुणीही टिकलं नव्हतं...
...आणि आता मिहिर त्या स्पर्धेत उतरला होता... किंबहुना आता तो आघाडीवर होता...
मात्र स्पर्धा आताशा सुरू झाली होती."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users