Submitted by -शर्वरी- on 16 September, 2024 - 16:01
ईवलसं बाळ हातात आले. तिला माहितही नसलेल्या कित्येक भावनांनी तिचे मन भरून गेले. बाळाच्या रडण्याने, जावळाच्या वासानेही तिचा जीव उचंबळून यायचा.
नक्षत्रासारखी आहे पोर, आजी म्हंटली. तिला आता निवांत वाटत होतं. सगे-सोयरे आजूबाजूला होते. भूक तर इतकी प्रचंड लागत असे की, ज्याचे नाव ते.
लहान असताना, गरम पुरणपोळीवर तुपाची धार घालून आजी द्यायची. दमानं घे, तोंड भाजेल म्हणायची. चांदीच्या वाटीत कवडी सारखं घट्ट दही द्यायची. भरलं वांग, मिरचीचा खर्डा. अहाहा! जातीच्या खवय्याला संयम कसला?
बाळ आता हसू लागलं. आजीने कितव्यांदा तरी ताटात मेथीची भाजी भाकरी वाढली. तिच्या चेहऱ्यावरचे झरझर पालटणारे भाव पहात म्हंटली, "खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा, मस्तच
व्वा, मस्तच
छान आहे.
छान आहे.
खरं आहे.. रिलेटेबल
खरं आहे.. रिलेटेबल
आवडली
आवडली