गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:19

काय मंडळी,

शीर्षक वाचून शाळेतले दिवस आठवले ना? पण घाबरू नका आम्ही काही तुम्हाला परत धडे वाचणे, पाठांतर करणे असे काही करायला लावणार नाही.

आपण शाळेत हे प्रश्न सोडवायचो त्याच स्वरुपाचा हा गंमतखेळ आहे.

खेळ एकदम साधा व सोप्पा आहे.

मराठी चित्रपट, कथा, कादंबर्‍या, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या तोंडी आलेला संवाद अथवा त्यांचे प्रसिद्ध वक्तव्य दिले जाईल व ते वक्तव्य कोणी केले हे ओळखायचे आहे.

उदाहरणार्थ.

१. "अरे, पुराव्याने शाबित करेन!" :- हरितात्या,
२. "तुमचे सत्तर रुपये वारले" :- धनंजय माने
३. " काय हॉटेल! काय झाडी! काय डोंगर!":- शहाजीबापू पाटील

सुरुवातीला संयोजक एक वक्तव्य देतील, बरोबर उत्तर देणारा पुढचे वक्तव्य आणि गरज पडल्यास क्ल्यू देईल व हा खेळ पुढे चालू राहील.

तुमच्यासाठी पहिला संवाद आहे...

"गॉड इज सफरिंग--आमचे बायकोचा चिमटा असते तसा"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या सोपं कोडं

'तू लहान असताना मी ही तुला हेच दिलं होतं'

वावे, बरोबर !
वुडवर्ड्स ग्राईप वॉटरची जाहिरात

रारंगढांग.
लेखक प्रभाकर पेंढारकर

पुढचा क्लू माझ्याकडून
'म्हणजे मी माणूस असूनही घरातल्या लोकांनी मला आणखी चांगलाच माणसाळवलाय?'

Pages