Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:19
काय मंडळी,
शीर्षक वाचून शाळेतले दिवस आठवले ना? पण घाबरू नका आम्ही काही तुम्हाला परत धडे वाचणे, पाठांतर करणे असे काही करायला लावणार नाही.
आपण शाळेत हे प्रश्न सोडवायचो त्याच स्वरुपाचा हा गंमतखेळ आहे.
खेळ एकदम साधा व सोप्पा आहे.
मराठी चित्रपट, कथा, कादंबर्या, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या तोंडी आलेला संवाद अथवा त्यांचे प्रसिद्ध वक्तव्य दिले जाईल व ते वक्तव्य कोणी केले हे ओळखायचे आहे.
उदाहरणार्थ.
१. "अरे, पुराव्याने शाबित करेन!" :- हरितात्या,
२. "तुमचे सत्तर रुपये वारले" :- धनंजय माने
३. " काय हॉटेल! काय झाडी! काय डोंगर!":- शहाजीबापू पाटील
सुरुवातीला संयोजक एक वक्तव्य देतील, बरोबर उत्तर देणारा पुढचे वक्तव्य आणि गरज पडल्यास क्ल्यू देईल व हा खेळ पुढे चालू राहील.
तुमच्यासाठी पहिला संवाद आहे...
"गॉड इज सफरिंग--आमचे बायकोचा चिमटा असते तसा"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघना पेठ्यांचं नातिचरामि का?
मेघना पेठ्यांचं नातिचरामि का? (पण तू कथा आहे म्हणतेस तर हे नसावं.)
व पु का?
व पु का?
वावे, ह्यावर मीम बनण्याआधी सोपा क्लू द्या
>>ह्यावर मीम बनण्याआधी सोपा
>>ह्यावर मीम बनण्याआधी सोपा क्लू द्या
मी बनवायलाच निघालो होतो
गौरी देशपांडे..
गौरी देशपांडे..
करेक्ट अनिरुद्ध! आता कथा ओळखा
करेक्ट अनिरुद्ध! आता कथा ओळखा. सोपं आहे आता.
बहुतेक टोळंभट्ट वगैरे अशी
बहुतेक टोळंभट्ट वगैरे अशी काहीतरी आहे.
Let me recollect.
बरोब्बर अनिरुद्ध! :टाळ्या:
बरोब्बर अनिरुद्ध! :टाळ्या:
'आता कुठे जाशील टोळंभट्टा?'
'आहे हे असं आहे' कथासंग्रह.
निरू सर आजच्या दिवसातला दुसरा
निरू सर आजच्या दिवसातला दुसरा दंडवत घ्या!!!!
आणि पुढचे वक्तव्य वगैरे द्या…
"भंवऱ्याला असं जालं म्हंजी
"भंवऱ्याला असं जालं म्हंजी तो 'पम्मर' जाला म्हणायचं. बगा, लागलीय ना त्येची 'समाध' ?"
(बदलू का ?)
ह्याच पुस्तकातलं अजून एक वाक्य : "खमा गीर तुला"
मी तरी हे पुस्तक वाचलेलं नाही
मी तरी हे पुस्तक वाचलेलं नाही. क्ल्यू द्या. ज्यांनी वाचलंय त्यांच्यापैकी कुणीतरी ओळखतील.
विराज अविरत >>>> आहा… काय
विराज अविरत >>>> आहा… काय मस्त आठवण काढलीस श्रद्धा…. गौरी देशपांडे व अनंत सामंत यांचे नायक ‘लार्जर दॅन लाईफ’ असायचे नाही?
अनुवादित पुस्तक आहे..
भारतीय भाषेतील मराठी अनुवादित पुस्तक आहे..
कथेचा नायक चित्रकार आहे..
अकूपार - ध्रुव भट्ट. अनुवाद -
अकूपार - ध्रुव भट्ट. अनुवाद - अंजनी नरवणे
आहा… काय मस्त आठवण काढलीस
आहा… काय मस्त आठवण काढलीस
मला आधी ती शब्दरचना वाचून तीच जोडी आठवली.
<<<<<
बरोबर श्रद्धा..
बरोबर श्रद्धा..
धन्यवाद.
धन्यवाद.
हे एक सोपं.
'खिशात काय आहे रे खडकू?'
.....
'हेडमास्तर, तुम्ही काठेवाडी घोडा आहात...'
....
'मास्तर मेले काय?'
कथा : माझ्या बापाची पेंड
कथा : माझ्या बापाची पेंड
लेखक : द. मा. मिरासदार
बरोबर आहे असं समजून पुढचं
बरोबर आहे असं समजून पुढचं वाक्य देतो..
अहो मिस्टर घुबड ! शुक, शुक, मिस्टर घुबड !
बरोबर आहे असं समजून पुढचं
बरोबर आहे असं समजून पुढचं वाक्य देतो..<<<< बरोबर आहेच!
मिस्टर घुबड बंडूकथेत.बंडू
मिस्टर घुबड बंडूकथेत.बंडू बक्षीस मिळवतो मध्ये बहुतेक.
माझ्याकडून एक कोडं:
माझ्याकडून एक कोडं:
"पाताळदेवतेला त्यांनी सिंदूर फासलं आणि सगळं भव्य दिव्य हंत झालं."
हिंट:
माझे सर्व आवडते लेखक
या कथेत एक अत्यंत प्रिटेंड,स्त्रीबाज मेल पात्र बरेच गोंधळ घालून शेवटी एक फिमेल पात्र जिंकतं.
जी ए. च्या कथेत आहे का?
जी ए. च्या कथेत आहे का?
"वेड्या मुली, मला नको असताना
"वेड्या मुली, मला नको असताना मीही तुझ्या प्रेमात पडलो आहे. ये ना तू माझ्याकडे ! ये ना लवकर !" -मुक्काम, दिमित्री
मुक्काम - गौरी देशपांडे का?
मुक्काम - गौरी देशपांडे का?
जीए कथा नाही.
जीए कथा नाही.
पल्लवी, माझं कोडं वर झालंय
पल्लवी, माझं कोडं वर झालंय सोडवून.
अनु, नारायण धारप?
मिस्टर घुबड बंडूकथेत.बंडू
मिस्टर घुबड बंडूकथेत.बंडू बक्षीस मिळवतो मध्ये बहुतेक.. <<
मी अनु : बरोबर..
कथा सुशि लिखित आहे.
कथा सुशि लिखित आहे.
ओह मग नाही माहिती.
ओह मग नाही माहिती.
बरं जाऊदे, ज्यांना हे येईल
बरं जाऊदे, ज्यांना हे येईल त्यांनी नंतर सोडवा, नवं कोडं द्या कोणीतरी, पुढे जाऊदे धागा, डेडलॉक नको.
Pages