गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैं इस दूध मे आग लगा दुंगा
शक्कर जला दूंगा
तवे का कलेजा चिर के करामेल मेरे पाकृ धागे पे खीच खिच के ले आऊंगा
OkgY.gif
.
घाबरून गुमान डिश मध्ये स्वतः जाऊन बसलेले कॅरामेल
caramellized-caramel.gif

खूप दिवसांनी बघितला धागा......किती वेळ गेला कळलंच नाही . धमाल चाललीय इथे. यावर्षी मी खरंच ठरवलेले कि इतर स्पर्धेत भाग घ्यायचा
पण मी इथे आले कि या धाग्याशिवाय दुसरं काही बघतच नाही Lol

निपा Lol

अगदी अगदी Happy
गेस करण्याइतकीही अक्कल स्वतःला सध्याच्या कोड्यात नसावी याने नाथा कामत सारखी खुदाई खिन्नता येते.

अरे इतक्या वर्षांनंतर ही कॅरेमल पुडिंग ची आठवण ठेवली
हहपुवा
गजब मीम्स
अजरामर केलंत हो पुडिंग

कोण कोणास धाग्याच्या पुस्तकी प्रतिसादांवर केलेल्या मीमवर सहमती दर्शवत असताना नाथा कामतचा डायलॉग वापरलेला पाहून मी
images (13).jpeg

निपा Happy

न शिजणारा राजमा आणि चिपकू, जळकू सोप्पं कॅरेमल पुडिंग नंतर "गारेगार बर्फा" च्या यशस्वी प्रयोगानंतर माबोकर

IMG_20240917_174133.jpg

Illusion --
ऑफिस मध्ये बॉसला दिसणारा माबोकर
images (32).jpeg
Reality --
गणेशोत्सव २०२४च्या धाग्यात गुरफटल्यावरचा ऑफीस मधला कामसू माबोकर
string.gif

कॅरामेल पुडिंगची सगळीच मीम्स Lol पण विशेष आवडली ती पीएस२ आणि कुकुहोहै Rofl _/\_ अफाट क्रिएटिव्ह लोकं आहेत इथे!
वेड लागल्यासारखी हसतेय मी मगाचपासून.

दरम्यान,
गणेशोत्सव संपला तरी मीम्स बनवणाऱ्या माबोकराच्या घरचा गुप्त वृत्तांतFB_IMG_1726633193331.jpg

सर्व नवे मिम्स भारी!!
काजोल काय, योगासनं काय.कल्पना शक्ती ला भसाभस बहर आलाय.

मस्तच झाला हा माबो चा उपक्रम... यंदाच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण. गालातल्या गालात, ही ही , खो खो असं सर्व हसू येत होत वाचून.
ही कल्पना सुचणाऱ्या संयोजकांचे आणि टॅलेंट आणि सखोल माबो अभ्यास ह्यामुळे ती कल्पना प्रचंड यशस्वी करणाऱ्या सर्व मीम करांचे खुप कौतुक.
फालतूल्या फालतू विषयावर लेख पाडणाऱ्या माझ्यावर ची ऋतुराज आणि अमितव ह्यांची मीम खूपच आवडली आहेत. पूर्वी एक शेकाप नावाचा पक्ष होता. त्यांचं चिन्ह कोयता होत. आज तो पक्ष अस्तित्वात असता तर त्यांनी अमितव च मीम त्यांचं चिन्ह म्हणून घेतल असतं. Happy

Pages