Submitted by किरण कुमार on 9 August, 2024 - 03:57
जीवघेणी भूक होती , मांडला बाजार माझा
श्वापदांच्या रंजनाला जाहला व्यवहार माझा
चांदणेही पाहिले अन् चंद्रही तो पाहिला मी
पण जवळचा वाटला मज शेवटी अंधार माझा
एकदा तो भेटल्यावर तृप्त झाले एवढी की
टाळला आयुष्यभर मी भाबडा शृंगार माझा
ऐनवेळी पाडले का भाव हे त्यांनी पिकाचे ?
सांग सांभाळून घेऊ मी कसा संसार माझा ?
सूर वेड्या मैफिलीचे कोंडले त्यांनी कितीही
मज पुरे हा धुंद होण्या जन्मभर गंधार माझा
अंतरीचे युद्ध आहे आणि शत्रू ओळखीचे
सोबतीला या शराच्या गर्जतो अंगार माझा
रंगली पैशात जेंव्हा छान ती सन्मानचिन्हे
स्वाभिमानाने तिथे मी टाळला सत्कार माझा
- किरण कुमार
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली गझल, दोन तीन शेर अगदी
चांगली गझल, दोन तीन शेर अगदी पारंपारिक! बाकी शेर खूप सुरेख!
जमीनही तशी बऱ्यापैकी वाचनात आल्यासारखी, पण उत्तम निभावली आहे
छान आहे. पिकांचा शेर खटकला..
छान आहे. पिकांचा शेर खटकला.. कारण माहीत नाही.
चांदणे शिंपीत जावे या चालीवर
चांदणे शिंपीत जावे या चालीवर म्हणता येतेय.
आपल्या सर्वांचे धन्यवाद
आपल्या सर्वांचे धन्यवाद
धन्यवाद बेफिकिर सर ...../\.....
छान. आवडली रचना. लिहिते राहा.
छान. आवडली रचना. लिहिते राहा.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे